मायबोलीकरांचे प्रतिसाद!

Submitted by AshwiniEnv on 3 August, 2024 - 01:50

गुगलवर कोणत्यातरी झाडाची माहिती शोधताना मला जागू प्राजक्ताचा निसर्गाच्या गप्पा हा धागा दिसला आणि मला मायबोलीचा शोध लागला.

२०२०, कोव्हिडमुळे लॉकडाऊन चालू होते, हाताशी वेळच वेळ होता . मी मायबोलीवरील सर्व साहित्य वाचू लागले . मोठा खजिनाच सापडला पण मायबोलीची गोडी लागली ती मात्र मायबोलीकरांच्या धमाल प्रतिसादांमुळे. ब्लॅककॅटचे तिखट आणि खोचक प्रतिसाद, मी_अनुचे प्रॅक्टिकल आणि विचारी प्रतिसाद, मानव पृथ्वीकराचे नर्मविनोदी आणि माहितीपूर्ण प्रतिसाद . पूर्वी बोकलतही छान लिहायचे पण आता ते आपले नाव सार्थक करतात.

अजुनही खुपजण आहेत जे अतिशय उत्तम प्रतिसाद देतात पण ब्लॅककॅट, मानव पृथ्वीकर आणि मी _अनु माझ्या आवडीचे. मी_ अनुचे प्रतिसाद तर बऱ्याचदा मला माझीच मते वाटतात . मी ब्लॅककॅटना खुप मिस करते.

मायबोलीकर हे माझ्या रोजच्या जगण्याचा हिस्सा झाले आहेत. उद्या फ्रेंडशीप डे आहे सर्व मायबोलीकरांना हॅपी फ्रेंडशीप डे आणि धन्यवाद!

तुम्हाला कुणाचे प्रतिसाद आवडतात? जरूर सांगा.

अजून एक अश्विनी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अय्यो
धन्यवाद. मेड माय डे.
मायबोलीवर इतके हुशार लोक आणि विचारवंत(खोचकपणे नाही, खऱ्या भावनेने बोलतेय) बोलत असतात की बरेचदा माझा फ्रेंड्स मधला जोक न कळता त्यावर हसणारा जोई होतो.पण त्यातल्या त्यात ओळखीच्या विषयावर मताच्या पिंका टाकण्याचा प्रयत्न असतो.
भांडणाऱ्या, गप्पा मारणाऱ्या, चावडीवर बसून कमेंट करणाऱ्या, मित्र बनून पाठीवर आधाराचा हात ठेवणाऱ्या, एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे वेगवेगळ्या स्वभावाचे, स्पेशालिटी चे कुटुंब सदस्य असणाऱ्या सर्व मायबोलीकरांना मैत्रिदिनाच्या शुभेच्छा.

अरे माझं नाव कशाला लिहिलंत. माझं नाव नसतं तरी मी प्रतिसाद दिले असते. आता ज्यांची नावं लिहिली नाहीत ते रुसून बसतील आणि धागा चालणार नाही. माझं तसं काही नाही मी लोभ मोह माया यांच्यापासून कधीच दूर गेलोय.

छान. सध्या मायबोली टाईम कमी झाला आहे. त्यामुळे चित्रपट वेबसिरीज राजकारण दीर्घकथा वगैरे बरेच धागे वाचायचे लिहायचे सोडले आहे. पण तरीही मायबोलीवर रोजचा फेरफटका असता तो येथील प्रतिसादांमुळेच. ते नाही वाचले तर व्यवहारज्ञानात अज्ञानीच राहीन किंवा जगात काय घडामोडी चालू आहेत हे कधी समजणऱच नाही असे वाटते Happy

बाकी इथे कोणाचे नाव घेणे अवघड आहे. नावे लिहिली कमी जातील आणि शिल्लक जास्त राहतील. प्रत्येकाची आपली एक शैली आहे. किमान तीस चाळीस जण तरी असे आहेत ज्यांची पोस्ट वाचतानाच ती कोणी लिहिली असेल याचा अंदाज मला येतो Happy

छान धागा.
मलाही कधीतरी अचानकच मायबोलीचा शोध लागला होता. इथले बरेचसे प्रतिसाद खरच खूप वाचनीय असतात. आजपर्यंत कधीच इथल्या कुणाला भेटले नसले तरी प्रतिसादा मुळे बऱयाच व्यक्ती ओळखीच्या वाटतात.

खरं आहे. खूप वेळा मूळ लेखाइतकेच आणि त्याहून खूप वेळा मूळ लेखापेक्षा, प्रतिसाद जास्त वाचनीय असतात!
यावर बहुतेक पूर्वी एक धागा होता. कुणाचा ते आठवत नाही.

छानच लिहिले आहे.
Mi anu च्या प्रतिसादाला मम.

अजून एक अश्विनी...हे आवडलं.

पूर्वी बोकलतही छान लिहायचे पण आता ते आपले नाव सार्थक करतात.>>> शायद आपने ठीक कहा. मै पहले जैसा नहीं रहा. वक्त ने मुझे मरोडा तोडा और मै बन गया एक खुंखार ड्रॅगन योद्धा. जो शांती की घाटी मै शांती प्रस्थापित करने आया है. मास्टर शिफू आज मुझे पानी को आलू वडी के पान जैसा पकडके दुसरो के उपर कैसे उडाते है वो सिखाने वाले है. अपना हाथ बिना गिला किये बिना.

मायबोलीवर विविध क्षेत्रातले खूप हुशार, प्रतिभावंत, व विचारवंत लोक आहेत. तसेच उच्च कोटीच्या कोट्या विनोद करणारेही आहेत.
तरी सुद्धा आवर्जुन उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद.
चांगले चांगले लेख असतातच, पण प्रतिसादांमुळे माबो जास्त आवडते हे माझ्याही बाबतीत खरे आहे. कितीतरी मायबोलीकर माझ्या आवडीचे आहेत.

खरोखरच मायबोलीवर खूप चांगले लेखन असते. जे वाचायला आवडते. प्रतिसाद सुध्दा वाचनीयच असतात. खंत इतकीच आहे की काही उत्तम लिखाण करणा-या लोकांनी इथे लिहीणे बंद केले आहे. ते असते तर अजून बहार आली असती.

खरेच, प्रतिसादांमुळे मायबोली अधिक आवडते.
आपल्या सारखाच विचार करणारी, आपल्यासारख्याच सिच्युएशन मध्ये असणारी माणसे भेटल्याने खूप छान मैत्र मिळाल्यासारखे वाटते.
आणि इथल्या कित्येक जणांचा व्यासंग, अभ्यास, निखळ विनोदबुद्धी, बहुश्रुतता बघून स्वतः चीही पातळी उंचावल्या सारखे वाटते.
सगळ्या मायबोलीकरांना मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy

- अजून एक अश्विनी!

ज्याप्रमाणे OMG पिक्चरमध्ये अक्षय कुमार महादेवाचा अंश बनून लोकांची मदत करायला येतो त्याचप्रमाणे मी पण महादेवाचा अंश आहे आणि लोकांची मदत करायला पृथ्वीवर आलोय. लोकं केस लढत नसतील तर त्यांना मुद्दामून केसी लढायला लावणं हे माझं मुख्य काम आहे. कोणाला सांगू नका आपल्यातच राहू द्या.

प्रतिसादांमुळे मायबोली आवडते. खरंय. मी_अनू बद्दल मम! मला ती लिहिते तेंव्हा माझ्या तोंडातले वाक्य तिने म्हटल्याचा फील येतो बर्याचदा Lol [फक्त हिंजवडी सोडून] कारण ती पुणेरी,मी मुंबईकर Wink
पायस , फारेंड, अस्मिता, ह्यांचे स्पूफ लेख. नवोदित डॅशिंग कास्ट मधे रमड, माझेमन, वावे ह्या पण आवडीच्या होत चाल्यात.
स्वप्ना राज , साज ह्यांचे लेखन खूप आवडायचे, पण त्या दिसत नाहित आता. मी त्यांना मिस करते.
नी आणि वर्षा ला पण मिस करते त्यांचे लेख माहितीपूर्ण कलापूर्ण असायचे.
आणि इथल्या कित्येक जणांचा व्यासंग, अभ्यास, निखळ विनोदबुद्धी, बहुश्रुतता बघून स्वतः चीही पातळी उंचावल्या सारखे वाटते.>>>+११

---अजून १ अश्विनी (सिरीयसली) Rofl मी पण.
सर्वांना मैत्र दिनाच्या शुभेच्छा!

खूप मस्त धागा .

काही लोक हुरूप वाढवतात
तर काही ...

स्वतःची लायकी स्वतःच दाखवून देतात
बिचाऱ्यांना कळतच नाही की ...

धागाकर्ता राहिला बाजूला आपण सर्वांना आपले किडे दाखवून देतोय

खूप लिहिलं , खूप व्यक्त झालो , वावर खूप केला की लोकांना ते सर्वज्ञ वाटायला लागतात .

असो
पण प्रामाणिक प्रतिसादकांची संख्याही कमी नाही . ते जास्त महत्त्वाचे !

क्षमा असावी - असं लिहिलंय
पण अनुभवातून

पण प्रामाणिक प्रतिसादकांची संख्याही कमी नाही . ते जास्त महत्त्वाचे !
>>>>>
+७८६
तुम्ही किंवा कोणत्याही लेखकाने त्यावरच फोकस करावे हे उत्तम!

मला बिपीन सांगळे यांच्या बालकथा खूप आवडतात. त्यांच्या लिखाणात एक प्रकारची जादू आहे. त्यांच्या कथा वाचल्या की मी टाईम मशिनमध्ये बसल्याप्रमाणे माझ्या बालपणात जातो आणि ते सोनेरी दिवस पुन्हा अनुभवतो. धन्यवाद बीपीनजी. Happy

माझ्या छोट्याशाच मनोगताची दखल घेतल्याबद्दल
मी _अनु ,
बोकलत,
ऋन्मेष,
शर्मिला आर,
वावे,
देवकी,
मानव पृथ्वीकर,
समाधानी,
ssj,
छल्ला,
ललिता _प्रीति ,
aashu29,
बिपिन सांगळे
आपल्या सर्वांचे आभार!

मला उदय, उबो, भरत, अमा यांचे प्रतिसाद सर्वाधिक आवडतात. सतत कटकटलेल्या आणि जिथे तिथे तू-तू-मै-मै करणार्‍यांच्या प्रतिसादाचि ओ येते. मी तिथे फिरकतही नाही.

Back to top