Submitted by webmaster on 17 July, 2024 - 06:31
ठिकाण/पत्ता:
मल्टीस्पाईस,
हर्षल पार्क, ४६/२ म्हात्रे पूल, सिद्धी गार्डनच्यासमोर, वकील नगर एरंडवणे , पुणे. ४११०५२
पुण्यात सहज शक्य असेल तर मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. जमलं तर येत्या शनिवारी , २० जुलै , २०२४ ला सकाळी ९:३० ला भेटूया.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, July 20, 2024 - 00:00 to 02:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटोतल्या माणसांपैकी फक्त
फोटोतल्या माणसांपैकी फक्त वेमांना भेटले आहे आजपर्यंत
>>>
मला भेटली आहेस की अनेकदा.
पाहिजे तर तुझ्या व्याख्यानांची जाहिरात करतो
Rmd आपण पण भेटलो आहोत बहुधा.
Rmd आपण पण भेटलो आहोत बहुधा.
बाकी पण वरदा, मामी आणि सर्वांना धन्यवाद.
दक्षिणा, थँक्यू.
अमितव, निवडणुकीला कशाला उभं राहायचं आज या ठिकाणी? आपण स्वतःच स्वतःला निवडून लोक प्रतिनिधी म्हणून अशा सभेला हजेरी लावतो.
आणि तुम्ही सगळे कशाला नाव शोधताय वेमांसाठी? वेमा हेच किती भारी नाव आहे कशाचा कशाला पत्ता नाही. मग काही वर्षांनी वेमा नावाची काय कथा याबद्दल व्हॉटसअप मेसेज फिरतील. आणि त्यात जो काय धिंगाणा असेल की स्वतः वेमा जरी म्हणाले अरे मी फक्त मायबोली चां वेबमास्टर हा आयडी होतो तरी लोक किती हा विनम्रपणा म्हणतील. किती हे जगाचे पाप डू:ख (नीट वाचा) स्वतःच्या शिरावर घेणार धुरंदराचा हा परमात्मा म्हणून गाणी पण गातील.
पाप डू:ख >>>
पाप डू:ख >>>
आशूडी : मी गेले अनेक वर्षं पुण्यात गटगला आले नाहीये. आपण भेटलो असलो तर आपण दोघी फारच लहान असताना भेटलो अस्णार
पाहिजे तर तुझ्या व्याख्यानांची जाहिरात करतो >>> ऑ! म्हणजे विख्खि वुख्खु व्याख्ख्या?
साजिरा, तू उत्कृष्ट ऐयार तरी असला पाहिजेस किंवा मला सॉलिड स्मृतीभ्रंश झालाय!
अजून एक शक्यता म्हणजे rmd आयडी म्हणून कोणी वेगळीच पुण्यातल्या गटगंना येते आहे
>>>>>उत्कृष्ट ऐयार
>>>>>उत्कृष्ट ऐयार
क्या बात है! शशी भागवत आठवले एकदम.
बँग ऑन, सामो!
बँग ऑन, सामो!
वेमा हेच किती भारी नाव आहे
वेमा हेच किती भारी नाव आहे कशाचा कशाला पत्ता नाही. मग काही वर्षांनी वेमा नावाची काय कथा याबद्दल व्हॉटसअप मेसेज फिरतील. आणि त्यात जो काय धिंगाणा असेल की स्वतः वेमा जरी म्हणाले अरे मी फक्त मायबोली चां वेबमास्टर हा आयडी होतो तरी लोक किती हा विनम्रपणा म्हणतील. किती हे जगाचे पाप डू:ख (नीट वाचा) स्वतःच्या शिरावर घेणार धुरंदराचा हा परमात्मा म्हणून गाणी पण गातील>>>>
अगदी बरोबर... मलाही अस्ससच वाटलं होतं
पुढच्या वेळी पुणे ट्रिपच्या
पुढच्या वेळी पुणे ट्रिपच्या आधी इथे एक धागा काढावा काय? >> काढ की.. नेकी और पुछपुछ...
रमड, माय बॅड. मी तुला 'रार
रमड, माय बॅड. मी तुला 'रार'सोबत कन्फ्युज करून टाकलं. कसला ऐयार नि काय.
आयडी म्हणून कोणी वेगळीच >>> लोक आधीच स्वतःचं मूळ नाव आणि माबोआयडी अशी दोन नावं घेऊन गटगला येतात. याव्यतिरिक्त आणखी तिसराच डुआयडी घेऊन येणं म्हणजे खरी ऐयारी होईल. आयडी लपवणं किंवा दुसराच असल्याचं भासवणं हे जास्त काळ इथल्या भल्याभल्यांनाही जमलेलं नाही.
(आशूडे तू कुठे भेटलीस तिला, सरस्वती मम्दिर की अहिल्यादेवी? :फिदी:)
लोक आधीच स्वतःचं मूळ नाव आणि
लोक आधीच स्वतःचं मूळ नाव आणि माबोआयडी अशी दोन नावं घेऊन गटगला येतात. याव्यतिरिक्त आणखी तिसराच डुआयडी घेऊन येणं म्हणजे खरी ऐयारी होईल. आयडी लपवणं किंवा दुसराच असल्याचं भासवणं हे जास्त काळ इथल्या भल्याभल्यांनाही जमलेलं नाही. >>>>> तू सोडुन ????
साज्याचे डुआय्डी आहेत की नाही, आणि असल्यास किती आणि कोणते आहेत, यासाठी एक वेगळं गटग करता येईल ....
मी तुला 'रार'सोबत कन्फ्युज
मी तुला 'रार'सोबत कन्फ्युज करून टाकलं >>> येस! मला तसंच वाटलं होतं
साज्याचे डुआय्डी आहेत की नाही
साज्याचे डुआय्डी आहेत की नाही
>>>
होते रे बाबा. मायबोली टीम मध्ये आल्यावर आपोआप बंद झालं. आता गेली काही वर्षे नाहीये. पण ड्युआयडी घेण्याची प्रयोजनं आणि मानसिक गरज कधीच संपली.
तुला कोणते आठवतात सांग बघू
आठवण्यावरून आठवले , दहा
आठवण्यावरून आठवले , दहा वर्षांनी मायबोलीवर आलेल्यांसाठी..
https://www.youtube.com/watch?v=6o6N55murLE
Rmd मी पण रार गटग आठवत होते.
Rmd मी पण रार गटग आठवत होते. सॉरी.
आशूडे तू कुठे भेटलीस तिला, सरस्वती मम्दिर की अहिल्यादेवी? >> छ्या अशा ठिकाणी कसच्या भेटतोय आम्ही. फारतर अशोक सराफच्या सिनेमाची तिकिटे काढायला गेल्यावर प्रभात टॉकिजच्या गर्दीत पाहिले असेल एकमेकींना
फारतर अशोक सराफच्या सिनेमाची
फारतर अशोक सराफच्या सिनेमाची तिकिटे काढायला गेल्यावर प्रभात टॉकिजच्या गर्दीत पाहिले असेल एकमेकींना >>> हे अगदीच शक्य आहे
तसंही अनेक वर्षं केळकर रस्त्यापासून टिळक रस्त्यापर्यंत आणि बाजीराव रस्त्यावरही मुक्तसंचार असल्याने एकमेक दिसणं अजिबात अवघड नाही.
पुण्यात अचानक गटग ठरले की
पुण्यात अचानक गटग ठरले की मुंबई, ठाणे येथून रविवारी जाता येता येत नाही( रेल्वेने).
साजिरा = खंडेराव. नेमाडे
साजिरा = खंडेराव. नेमाडे इफेक्ट (बहुतेक).
_डी, साडीत मस्त दिसतेयस.
आता सोडा ते गटगचं झाड
रोज नव्या पोस्टी वाचून जीव जास्त जास्त हळहळतोय
जायला पाहिजे होतं असं वाटत रहातं मग.
गटगचं झाड सोडून जमाना झाला.
गटगचं झाड सोडून जमाना झाला. लोक इथं गटग सोडून इतर सारं बोलायलेत.
पुण्यात अचानक गटग ठरले की
पुण्यात अचानक गटग ठरले की मुंबई, ठाणे येथून रविवारी जाता येता येत नाही( रेल्वेने)>>> सहमत. एकदा का गटग चा धागा आला की लोकांची जी काय तिकिटे बुक करायला झुंबड उडते की ज्याचे नाव ते. प्रत्येकाला गटगला जायचं अस्तं. लोकं ट्रेनला लटकून, छपरावर बसून सहपरिवार गटगला यायला निघतात. लहान मुले, नोकरदार, महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार होतं. तीन महिने आधीच लोकांना समजलं तर रेल्वे irctc शेअर ओव्हर बुकिंगमुळे क्रॅश होईल.
मायबोली कोट्यातून लगेच मिळतं
मायबोली कोट्यातून लगेच मिळतं तिकीट.
शिवाय पुजं ते गटगस्थान हा प्रवास रेल्वे तर्फे कॉंप्लिमेंटरी मिळतो.
वेमा यांच्या स्टँड अप कॉमेडी
वेमा यांच्या स्टँड अप कॉमेडी या नवीन वाटेवरच्या प्रवासाबद्दल धाग्यात चर्चा झाली आहे.
इथे मला काहीतरी सापडले. (आधीच्या प्रतिसादांत कुणी संदर्भ दिला नसेल तर):
https://www.youtube.com/watch?v=kpzRf234bKk
^^^ मस्त होतं
^^^ मस्त होतं
मस्त होतं +१
मस्त होतं +१
थोडेसेच वर्ष तिथे गेलेले माझे सगळे परिचित तिथल्या accent मध्ये बोलतात. त्यामुळे कळेल की नाही असं वाटलं होतं. पण एवढी वर्ष तिथे राहूनही इथल्यासारखं बोललात. मस्त !!
ए भा प्र : तिथे तुम्हाला या भारतीय accent मुळे कधी काही अडचण आली आहे का?
खरी गंमत तेव्हा येते जेव्हा
खरी गंमत तेव्हा येते जेव्हा भारतातले लोक अमेरिकन accent मध्ये बोलतात.
त्यांचं बोबडं हिंदी / इंग्रजी
त्यांचं बोबडं हिंदी / मराठी आपण नाही का कौतुकाने ऐकत ?
साधी साधी सुब्रह्मण्यम, मुखोपाध्याय, चट्टोपाध्याय वगैरे नावं उच्चारता येत नाहीत त्यांना. सुब्बी, मुखर्जी, चटर्जी म्हणतात.
ह्या धाग्यावर फोटोखाली ओळीने
ह्या धाग्यावर फोटोखाली ओळीने नावं दिलीत. तसं त्या कर्जत धाग्यावर टाकणे. आयडी मागचा चेहरा बघून छान वाटते.
Pages