पुण्यात, शनिवारी २० जुलैला वेबमास्तरांबरोबर गटग

Submitted by webmaster on 17 July, 2024 - 06:31
ठिकाण/पत्ता: 
मल्टीस्पाईस, हर्षल पार्क, ४६/२ म्हात्रे पूल, सिद्धी गार्डनच्यासमोर, वकील नगर एरंडवणे , पुणे. ४११०५२

पुण्यात सहज शक्य असेल तर मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. जमलं तर येत्या शनिवारी , २० जुलै , २०२४ ला सकाळी ९:३० ला भेटूया.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 20, 2024 - 00:00 to 02:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरी जुमा शोभत्येस.>> खरी म्हणजे काय खरीच आहे मी! आयडी नव्हे Proud
आता उठा >> Lol तसे ते म्हणाले होतेच. पण आपण असं चार लोकात सांगायचं नसतं म्हणून सांगितले नव्हते. Lol
बाकी इथे येतो पेक्षा येत नाही हे आवर्जून सांगण्याची नवीनच फॅशन आलेली दिसते. आता खरे जुने झाल्यासारखं वाटतंय. Proud

विद्यार्थ्यांना चालेल, मास्तरांनाही विचारा
जुने,जाणते,मुरलेले, रोमातले माबोकरांना भेटून फारच मस्त वाटलं
गजांत लक्ष्मी चा प्रभाव अजून टिकून आहे की नाही यासाठी तरी वृतांत लिहा कोणीतरी. Lol

आजच्या वेबमास्टर भेटीचा वृत्तांत
इथे जाहीर केल्यानुसार आज वेमा गटग साठी जायचे या विचारानेच खरंतर कालपासून खूप मस्त आनंदाची लहर फिरत होती मनात. किती वर्षं झाली असे गटग अटेंड करून आठवून पण आठवत नव्हते. आणि मायबोलीवरच्या इतर कुणालाही भेटायला जाण्यापेक्षा वेमा गटग याला कायमच मनात एक वेगळं स्थान आहे, कृतज्ञतेचे कोंदण आहे. मायबोली सुरू करून आणि अव्याहत सुरूच ठेवून त्यांनी आपल्यासाठी काय केले आहे हा एक स्वतंत्र धाग्याचा विषय आहे.
तर, थोडं उशिराच पोचलो गटग ला, पण सगळे जायच्या आधी पोहोचलो हे नशीब. कारण आता पूर्वीचे कुणी आल्याची वार्ता नव्हती आणि खुद्द वेमा आता IST वापरत नसल्याने सगळे वेळेवर येऊन वेळेवर घरी जातील अशी शंका पण मी साजिऱ्याला बोलून दाखवली. फारेंड म्हणाला तसं, एक काळ होता जेव्हा सकाळी ब्रेकफास्ट ला भेटलेले लोक तांडा चालल्यागत हॉटेल टपऱ्या बदलत मजल दरमजल करत रात्री कधीतरी घरी पोचायचे. तो सुवर्णकाळ आता राहिला नाही. तर कुणी आहे का शिल्लक असे चाचपडत आम्ही मस्पा मधे शिरलो. त्यांनी मस्तपैकी पावसाळ्यात डागडुजीची कामं काढून, यायचं तर या नाहीतर निघा अशा खास थाटात प्रवेश द्वार ठेवलेले असल्याने अंदाज यायला वेळच लागला.

तिथं एका लांब टेबल वर सात आठ जणांचा ग्रुप बसलेला होता. मनीष आणि वेमा दोघांनी आम्हाला व आम्ही त्यांना ओळखले. वेमानी स्वतः उठून आमचे स्वागत केले तर असे वाटले पावले की आता सर्व. पुढचे काही नाही अटेंड केले तरी चालेल. Happy अतिशय हसतमुख आणि मैत्रीपूर्ण स्वागत. हळूहळू इतरांची ओळख झाली तेव्हा कुमार१, रेशमडोर, अतरंगी, अतुल., बिपिन सांगळे, तेजो, आणि अजून एक अश्विनी होती आणि एक ट्रेकर (सॉरी आयडी आठवत नाही) यांच्याशी ओळख झाली. खूप छान वाटले त्यांचे नवीन लिखाण, आवडी माहीत करून घेतल्यावर पुन्हा एकदा मायबोलीवर ॲक्टिव्ह व्हावे का असा विचार पण मनात डोकावून गेला.
मस्पा मधे अतिशय उत्तम बुफे ब्रेकफास्ट असतो. वेमानी त्याची आधीच कूपन घेऊन ठेवली असल्याने ( सांगितले होते ना, श्री गजांत लक्ष्मी प्रसन्न) निवांत खात खात गप्पा मारता आल्या. पण गप्पा इतक्या झाल्या की आम्ही चहा कॉफी घ्यायच्या आधीच त्यांनी बुफे काऊंटर बंद केला.
गप्पांमध्ये जुनी मायबोली, भारतातून मायबोली चालवताना आलेले कायदेशीर प्रश्न, मायबोलीवरील नवीन सुधारणा असे अनेक गंभीर मुद्देही आले. कुमार१ यांनी खूप विशिष्ट असे प्रश्न विचारले यावरून त्यांची खरोखरी अभ्यासू वृत्ती जाणवली. मी आणि रेशम मात्र मनीष ला त्याच्या कंपनीतल्या ओपनिंग चे जेडी पाठव म्हणून पिडत होतो. नंतर हे वेमांना कळले तेव्हा त्यांनीही आनंद व्यक्त केला की अशा गटग मधून अशी देवाणघेवाण होत असेल तर त्या निमित्ताने लोक भेटतील! त्यावरून मग लोप पावत चाललेली गटग संस्कृती, अजून टॅग धरून असलेले ववि गणेशोत्सव मराठी भाषा दिवस इ विषय ओघाने आलेच. यावेळी वेमांचा ववि थोडक्यात हुकला ते ऐकून सर्वच हळहळले. पुन्हा , वेमा आले होते तो ववि कसा विक्रमी संख्येने विजयी झाला होता ते उशिराने आलेल्या हिमस्कुल ने सांगितले. एकूण हे गटग आठवणींना उजाळा या सदरात पण सरकार दफ्तरी नोंदवले जाऊ शकते इतकी जुनी खोडं आणि त्यांच्या जुन्या खोडी यात चर्चिल्या गेल्या.
मग आम्ही एक ओळख परेड केली आणि काही ग्रुप फोटो घेतले.
यावेळी साजिऱ्याने वेमांना भेट म्हणून राजा रवि वर्मा यांची सुप्रसिद्ध राधा पेंटिंग फ्रेम दिली. बिपिन यांनी पेढ्याचा बॉक्स आणला होता. तर, आपल्याकडे अशी काही पद्धत नसल्याचे सर्वांनी दाखवत, काय कारण? म्हणून सर्वांनी त्यांना किंचित सतावले. ओळख परेड मधे अतुल.यांचा मुलगा राजवीर याने पण मी बाबांसोबत येतो कधी कधी मायबोलीवर, मला आवडते असे सांगितले आणि हिम्या चे आजोबा पण मायबोली वर असायचे असा एकूण कितीतरी पिढ्यांचा हा वारसा पुढे जात आहे असे चित्र मनात तरळून गेले. मनातल्या मनात पार्श्वसंगीत म्हणून मायबोली शीर्षक गीत पण वाजून गेले. मग ज्यांना घाई होती ते गेल्यावर उरलेले परत टेबल वर येऊन बसले आणि मगाशी हुकलेला चहा ऑर्डर केला.
पण याचे बिल वेगळे लागेल असे वेटर ने सांगितले तरी आम्ही बिनधास्तपणे तू आण रे ( आमच्याकडे गजांत लक्ष्मी आहे) सांगितले. मग पुन्हा थोड्या गप्पा रंगल्या. त्यात नुकत्याच देवाज्ञा झालेल्या, अगदी धडाडीने समाजसेवा करणारी मायबोलीकर अरुंधती कुलकर्णी हिच्या काही आठवणी निघाल्या. मला खूप बरे वाटले. त्यानंतर रीतीने आईने अकबरी, vnc वगैरे विषय निघालेच. एकंदरीत खूप मजा आली.

मग बाहेर आल्यावर पुन्हा थोडा वेळ बोलत उभे राहिलो. तेव्हा वेमाना आम्ही त्यांच्या स्टँड अप कॉमेडी या नवीन वाटेवरच्या प्रवासाबद्दल विचारले. आणि खरं सांगायचं तर आम्हाला त्यांचा पहिला लाईव्ह मराठी शो च पाहायला मिळाला! त्यांचं म्हणणे की रिटायर व्हायला आलं की साधारणपणे लोक अध्यात्म , देव धर्म या मार्गाला लागतात. मला वाटले होते की आपण पण असाच एखादा बाबा बुवा व्हावे पण मग माझ्यावर बंधने आली असती पाप करण्यात म्हणून मी हा मार्ग निवडला. मग मी म्हंटले, दोन गोष्टी. बुवा झाले की बंधने येतात असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काही माहीतच नाही! Lol आणि दुसरी गोष्ट म्हणजे, बाबागिरी तर तुम्ही केव्हाच चालू केली आहे . १९९६ पासून तुम्ही जी बुवाबाजी सुरू केली आहे, ज्या प्रमाणे लोकांना नादाला लावले आहे, सकाळ म्हणू नका रात्र म्हणू नका ज्या प्रकारे लोक हे भजन करत आहेत जगभर तुमचे अनुयायी पसरले आहेत हा जो एक मराठी कल्ट तुम्ही बनवला आहे, ज्या ज्या शहरात तुम्ही जाता तिथे तिथे लोक तुमच्या दर्शनाला धावत येतात अजून काय पाहिजे!? हा प्रखर ज्ञानाचा प्रकाश, ही ब्रम्हानंदी लागलेली टाळी, शब्दांनी बांधलेली नाती ही एक वेगळीच दुनिया हे सगळं विश्व तुम्ही साकार केलं आहेत. त्यामुळे तुम्ही मुळीच चुटपुट लावून घेऊ नका. उलट, स्वतःचा खरा चेहरा घेऊन लोकांसमोर येऊन उपहासातून सत्याचा साक्षात्कार घडवणे हे एका अस्सल मायबोली कराचे आनंदनिधान असेल. ते तुम्ही करत आहात यातूनच कळते की तुम्ही खरोखरी सर्वात पुढे आहात! आता पुढच्या वेळी येईपर्यंत वेमा म्हणाले तसे त्यांना सेलब्रेटी स्टेट्स मिळाले असेल सोबत लोकांचा ताफा, कॅमेऱ्यांची क्लिक क्लिक असेल, बाऊंसर असतील.. पण तरी वेमा तितक्याच आठवणीने आणि मैत्रीने आपल्याला त्या गर्दीत ओळखतील, ओळख दाखवतील अशा काहीशा स्वार्थी शुभेच्छा देत हा पूर्णविराम देते.
मायबोलीला खूप खूप प्रेम. कायमच.

IMG_0518 (1).jpg

गार्डनमध्ये फोटोसेशन झालं, आणि काही माबोलेकरं निघून गेली. मल्टिस्पाईसवाल्यांनी हुश्श करुन बुफे ब्रेकफास्टचं दुकान बंद करून टाकलं. मग काही लेकरांना चहा राहून गेल्याचं लक्षात आलं. आता चहा नव्याने विकत घ्यावा लागेल असं कळल्यावर बुफेच्या पैशातून चहाचे पैसे रिफंड मागण्याची आयडिया काहींना सुचली. मग 'नीट वागा' असा इशारा देऊन पुन्हा चहासाठी मायबोलीकरांनी नवी बैठक मांडली.

IMG_0514 (1).jpg

सगळ्या लेकरांनी माबोचं आणि मास्तरांचं ऋण व्यक्त केलं. मायबोली हा आयुष्यातला महत्वाचा माईल्स्टोन राहील, असं काहींनी म्हटलं. मग कुणाचं तरी मस्पा मधल्या या माईल्स्टोनकडे लक्ष गेलं. (मस्पा असाही माबो-गटग-बखरीतला मास्टो आहेच). मग मास्तरांना या स्टोनपाशी उभं करुन हसवण्यात आलं. हाच तो सुवर्णक्षण.

आशुडी यांचा समग्र वृत्तांत वाचून तृप्तीने निथळायला झाले. अतिशय उत्तम - गटगला साजेसाच, नव्हे 'साजिरा'च !
अतुल, राजवीर आणि मी बरोबर साडेनऊला हजर होतो आणि मग लक्षात आले की आता आम्हालाच यजमान म्हणून पुढील मंडळीचे स्वागत करायचे आहे. मग एक टेबल पकडले आणि रस्त्याकडे डोळे लावून बसलो . . .

क्रमाक्रमाने मायबोलीच्या एकेक पिढीचे प्रतिनिधी असलेले लोक येऊ लागले. ६ विद्यार्थी जमल्यानंतर मास्तरांनी एकदम रुबाबदार प्रवेश केला. त्यांना बघितल्याबरोबर जाणवले की गजान्तलक्ष्मी प्रसन्न असणार आहे. Happy

जानेवारीतल्या तळजाई कट्ट्यातील काही मंडळी असल्याने त्यांचा परिचय होताच. आज बाकीच्या मंडळींचाही झाला.
खाणे पिणे, गप्पा, धमाल, फोटो व ओळख परेड हे सर्वच सुंदर . . .
साजिरा यांनी मास्तरांना एक अतिशय उत्तम चित्र भेट दिलेले आहे. त्यामुळे इथून पुढच्या गटगना राजा रविवर्माही प्रसन्न होणार यात शंका नसावी !! Happy Happy
बिपीन यांच्या पेढ्याने पहिल्या सत्राचे तोंड गोड झाले.

नंतर काही मंडळी गेल्याने उरलेल्यांचा एक चहा अड्डा झाला आणि त्यात जुन्या मायबोलीपासून अनेक प्रकारच्या हृद्य (?) आठवणी काढल्या गेल्या.
उत्तम उपाहारगृह, आजूबाजूचे छान हिरवेगार वातावरण आणि रंगलेल्या गप्पा यामुळे आजचा दिवस संस्मरणीय ठरला.

वेमा आणि सर्व गटगवासियांचे मनापासून आभार !

उत्तम वृत्तांत.
function at() { [native code] }उल, साजिरा , कुमार सर , बिसां सर यांचे चेहरे ओळखीचे झाले आहेत.
वेमांना बहुतेक भरत नाट्य मंदीरमधे २००७ साली मंदार चोळकरच्या गाण्यांच्या कार्यक्रमादरम्यान भेटलो आहे. नक्की आठवत नाही. त्या वेळी मायबोली बद्दल माहिती नव्हती. मंदार सुद्धा त्या वेळी सुप्रसिद्ध गीतकार नव्हता झालेला.

मस्पा ला मध्यंतरी चहूबाजूंनी हिरवी जाळी लावली होती. तिथे बारीक मच्छर सारखं काही तरी चावायचं म्हणून सतत पिच्छा पुरवल्यानंतर लावली गेली होती. या फोटोत दिसत नाही. तरी बाकीचे काही बदल दिसले नाहीत. पुण्यात असल्याने फारसे बदल केले जात नसावेत.
चहाचं बिल वेगळं यावरून मॅनेजमेंट बदलली आहे का असे वाटले.
नेहमी येणार्‍यांसाठी एक वेगळे आतिथ्य असायचे. आमच्यावर एकदा उधारीचा प्रसंग आला होता. पण नंतर द्या असे म्हणाले होते.
पण इतक्यात क्रेडीट कार्ड सुरू झाले आणि तो प्रसंग टळला.

अरे वा! छान वृत्तांत. जुने दिवस आठवले.

बरेच वर्षांपूर्वी... बहुतेक २०१२ मध्ये मुंबई मधील वेमा गटगला हजेरी लावली होती. वेमा, तुम्ही अजून तसेच दिसता. वय काही पुढे गेलेले दिसत नाही Lol संतूर वेमा.

आशूडी मध्येही फारसा बदल नाही. संतूर मॉम.

हिम्या आणि साजिऱ्याचे थोडे छप्पर उडालेय. चालायचेच.

कुमार सरांना व बाकीच्यांना आधीच्या गटग फोटोमध्ये पाहिले आहे. मनीष जुने आयडी असले तरी आज पहिल्यांदा पाहिले (अंदाजाने).

एकदा पुण्याला मुद्दाम gtg साठी येवून गेले होते तेव्हा बऱ्याच जणांना भेटले होते. टण्या, अवल वगैरे बरेच लोक होते.

छान झाले की gtg
वृत्तांत छान
फोटो पाहिले.
अतुल, साजिरा, कुमार सर, बिपीन सांगळे आणि अर्थात वेमा ह्यांना ओळखले.
अशाच एका gtg मध्ये पुण्यात त्यांना भेटलो आहे.
फार वर्षे झाली.
आज येण्याची इच्छा होती पण इतर काही कामात अडकलेले असल्याने जमले नाही.

आज एक लक्षात आले की
माबोवरची "एकूण अश्विनी मोजा" ही स्पर्धा चालूच राहणार आहे. . .
Happy
....
ज्यांना इच्छा असून आज यायला जमले नाही, त्यांनी दिवाळीपूर्व एक ग ट ग आयोजित करा बघू !

वय काही पुढे गेलेले दिसत नाही
>>>
सेमीरिटायरमेंट जाहीर करून आता पुढे 'बाबा' बनून गावोगावी सत्संग भरवावे अशी त्यांची इच्छा होती म्हणे. पण स्टँडिंग कॉमेडी क्षेत्रात स्टार बनायची संधी चालून आली म्हणे.
''बाबा बनून आणखी वेगळं काय करणार होतात? आताच गावोगावी तुमचे भक्त आहेत, आणि मायबोली नावाचा 'कल्ट' २५-३० वर्षं तुम्ही चालवताहात'' असं आशुडीने त्यांना तेवढ्यात म्हणून घेतलं. हे तसं खरंच आहे. आमचं छप्पर उडण्यामागे या कल्टचाही हात आहेच.

'संतूर मॉम'से याद आया केश्वे, मनीषला पुपुकर 'संतूर बॉय' म्हणतात.

Pages