Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24
आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा
आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मेदूवड्यांचा एकदा स्फोट ???
मेदूवड्यांचा एकदा स्फोट ??? बापरे ? कसे काय ? साबुदाण्याचा होतो असे ऐकले होते. याचा पण होतो काय ? आईशप्पथ
मेदूवडे आतपर्यंत तळले जावेत
मेदूवडे आतपर्यंत तळले जावेत म्हणून भोक पाडत असतील. कारण नुसत्या वड्यात कधी कधी मधला भाग कच्चाच राहतो!
अंजली, हिंगाचा गोळा? उगाळून पहा बरे.

नाहीतर थोडा मायक्रोवेव्ह करुन पहा फुटणेबल होतोय का
अंजलीइथे
अंजली
इथे
लिहिलंय बघ मी.
नेहमीचं हिंग कंपाऊंड हिंग असतं. त्यात बहुतेक मैदा मिसळलेला असतो वापरायला सोपं जाण्यासाठी. तुम्ही आणलेलं प्युअर हिंग असणार. ते वापरायचं कसं ते मात्र नाही माहिती मला.
हिंग तो मस्त असतो.फक्त मूळ
हिंग तो मस्त असतो.फक्त मूळ रुपात असल्याने कमी वापरायचा.रेडिमेड हिंग आपल्याला मिळतो त्यात तो सौम्य करायला पीठ पण असते.
छोटा खलबत्ता असतो त्यात कुटून.किंवा मिक्सर ड्राय ग्राउंड चे अगदी छोटे भांडे(हा खडा साऊथ हुन गिफ्ट म्हणून आला होता आमच्याकडे आणि दालचिनी च्या पुंगळ्या पण)
मंडळी तुम्ही सगळ्यांनी मेदू
मंडळी तुम्ही सगळ्यांनी मेदू वडे करा, पोस्ट पण टाका. शंभर एक जणींनी पोस्ट टाकल्या की धीर येईल मला वडे करायचा. तोपर्यंत आसपास २-३ उडपी हॉटेलं झिंदाबाद.
परंतु असे घट्ट पीठ त्यात
परंतु असे घट्ट पीठ त्यात कढीपत्ता खोबरे मिरचीचे तुकडे असे घालून चांगले फेट फेट फेटायचे .. >> ह्यासाठी हॅन्ड ब्लेन्डर वापरायचा..
गाळणिची टिप चान्गली आहे.साबा केळीच्या नाहितर कर्दळीच्या पानावर करायच्या..मी झिपलॉकवर करते.
मेदूवडे आतपर्यंत तळले जावेत
मेदूवडे आतपर्यंत तळले जावेत म्हणून भोक पाडत असतील. >>> करेक्ट. दहि वड्यांसाठी हे उपद्व्याप करण्याची गरज नाही.
हिंग थोडा सुरीने कापून पाण्यात मिसळून मग भाजी/आमटीत घाला. अर्थात तो तडका वाला हिंग फ्लेवर नाही येणार पण तरी.
हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात
हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवा काही दिवस , म्हंजे तो कडक होऊन कुटता येईल. आम्ही इसवी सन पूर्व काळात जेव्हा खडा हिंग आणून त्याची पूड घरी करत होतो तेव्हा तो असाच तुर डाळीच्या डब्यात थोडे दिवस ठेवायचो. ह्या हिंगाला ही क्लृप्ती चालते आहे का ट्राय करा. तूर डाळीच्या डब्यात हिंगाचा खडा आणि सुक्या खोबऱ्याच्या वाट्या ह्या दोन गोष्टी असत. तूर डाळी मध्ये सुक खोबरं चांगल टिकत. आता एवरी थिंग इन फ्रिजच ब्लॅक होल.
मेदू वड्याची चर्चा वाचतेय. पण
मेदू वड्याची चर्चा वाचतेय. पण मी कधी ही हे घरी करणार नाही, कष्टाच्या मानाने फळ फारच कमी.
आमचा मुलगा मात्र करतो कधी तरी पण त्याला ही नीट भोकवाले जमत नाहीत. आता त्याने घाट घातला की सांगते त्याला ह्या टिप्स.
हिंगाचं माहीत नाही पण ब्राऊन
हिंगाचं माहीत नाही पण ब्राऊन शुगरचा असा दगड झाला की त्यात ब्रेडची एक स्लाइस ठेवून पिशवी घट्ट बंद केली की २४ तासात साखर परत रवाळ होते. पाणी/ आर्द्रता ब्रेड शोषून घेत असावा.
मुळात त्या मेदूवड्याला भोक
मुळात त्या मेदूवड्याला भोक पाडायचा प्रयास का करताय? नुसते वडे केले तरी काय फरक पडत नाय. चवीत तर नाहीच. ....... +१.
गोवा,कारवारकडे किंवा कोकणात याला बिस्कीट आंबडी म्हणतात. खरंतर म्हणत होते अशी वेळ आलीय.
वर हिंगाचा उल्लेख आलाय.असा हिंग कापून किंवा पिरगळून फोडणीत घालतात.त्याच वास खूप सुरेख असतो म्हणे.
हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात
हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवा काही दिवस , म्हंजे तो कडक होऊन कुटता येईल. आम्ही इसवी सन पूर्व काळात जेव्हा खडा हिंग आणून त्याची पूड घरी करत होतो तेव्हा तो असाच तुर डाळीच्या डब्यात थोडे दिवस ठेवायचो. ह्या हिंगाला ही क्लृप्ती चालते आहे का ट्राय करा. तूर डाळीच्या डब्यात हिंगाचा खडा आणि सुक्या खोबऱ्याच्या वाट्या ह्या दोन गोष्टी असत. >>> माहेरी पुर्वी सेम नंतर मी सातवी आठवीत गेल्यावर हिंग पावडर आणायचो, निळी प्लॅस्टीक डबी. मी खोबरं वाट्या तांदुळात ठेवते, फ्रीजमधे नाही ठेवत .
आमच्याकडे अख्खा हिंग मालवणी
आमच्याकडे अख्खा हिंग मालवणी मसाल्याच्या मोठ्या डब्यात नेहेमी असतो, मसाला टिकतो आणि चांगला वासही येतो म्हणून.
ते मेदुवडा करायचा साचा माझ्या नवऱ्याच्या घरी आहे, मी एकदाच वापरला, करायला सोपा वाटत पण प्रत्यक्षात सारण भरलं की ते जड होत, शिवाय खूप मोठ्या मापाचे वडे बनतात, आणि सर्वात जास्त वैताग देणारी गोष्ट म्हणजे त्याला १ वड्याचे पीठ चिकटून बसते, सहजासहजी निघत नाही. मला हातावर च वडे ( भोकासहित) थापायला आवडतात, त्यासाठी मिक्सर मध्ये अगदी चमचा दोन चमचा पाणी घालायचे, whisk ने फेटायचे हलके होईपर्यंत. तळायला खूप वेळ घेतात मात्र वडे. तरीही इथे आसपास मिळत नसल्याने घरी करते. मीही चहाची गळणी, कधी त्याला फडका बांधून , झारा इ प्रयोग केलेत पण वडा झाऱ्याला च चिकटतो. पुन्हा करून बघेन .
आमच्या तेलुगू मित्राची बायको ओट्यावर वडे एकदम प्लास्टिक शीट वर थापते व एक एक हाताने उचलून भोकसहित तळते ते बघून मी तिला दंडवत घातलेला, आमच्या पोरांनी प्रत्येकी ८-९ वडे हाणलेले तेव्हा!
हिंगासदर्भातल्या सगळ्या
हिंगासदर्भातल्या सगळ्या सल्ल्यांसाठी आभार.
तुरडाळीच्या डब्यात ठेवला आहे सध्या.. ४-५ दिवसांनी बघते काही फरक पडतो का.
असा हिंग कापून किंवा पिरगळून फोडणीत घालतात.त्याच वास खूप सुरेख असतो म्हणे. >> कापणे आणि पिरगाळणे शक्य नाहिये इतका घट्ट आणि चिकट आहे. जमेल तेवढा बाजुबाजुचा वापरला.. खरच मस्त आहे वास...
साधारण असा दिसतोय : https://www.amazon.in/SPS-MARKETING-Perugayam-Compounded-Asafoetida/dp/B...
ओह, आम्हाला मिळाले होते ते
ओह, आम्हाला मिळाले होते ते खडे होते हिमालयन काळ्या मीठासारखे.
हा चॉकलेट सारखा दिसणारा प्रकार फक्त बाजूने खरवडून ककंवा भिजवूनच वापरणे शक्य वाटते.
हिंग पिरगळण्याची कल्पना आवडली
"हे काय, आज आमटीत इतका
"हे काय, आज आमटीत इतका हिंगाचा फ्लेवर का लागतोय?"
"काही नाही रे, कामाचं जरा टेन्शन होतं आणि स्ट्रेस बॉल पण फुटलाय.मग स्ट्रेस कमी करायला हिंग पिरगाळत बसले होते."
हिंगवडी क्रॉनीकल्स?
हिंगवडी क्रॉनीकल्स?
हिंगवडी क्रॉनीकल्स
हिंगवडी क्रॉनीकल्स

कसं सुचतं हो
कसं सुचतं हो
मेदुवडा अजून एक टीप
मेदुवडा अजून एक टीप
https://www.instagram.com/reel/C9IDedsBIf3/?utm_source=ig_embed&ig_rid=c...
वा, छान आयडिया आहे ही.
वा, छान आयडिया आहे ही.
>>>>>हिंगवडी क्रॉनीकल्स?
>>>>>हिंगवडी क्रॉनीकल्स?
हाहाहा
मानव ना इतके तल्लख आहेत.
हिंगवडी क्रॉनीकल्स?>>:फिदी :
हिंगवडी क्रॉनीकल्स?> खमंग अगदी.
ही क्लुप्ती भारिये !!
मेदुवडा अजून एक टीप >>>>
ही क्लुप्ती भारिये !!
थँक्स फॉर शेअरिंग साज.. (शेअरिंग साठी सामायिक असा काहीतरी शब्द वाचनात आला आहे परंतु फारसा पटत नाही).
आखाड तळण्यासाठी ही लिंक अर्धबरीला फॉरवर्डली आहे आणि आता प्रतीक्षेत आहे.
अर्धबरी??
अर्धबरी??
बेटर हाफ
बेटर हाफ
ओके नवा शब्द कळाला.
ओके नवा शब्द कळाला.
घ्या!!
घ्या!!
तर वाचकहो, करवंटीचा चमत्कार आणि इतर जादू फक्त आपल्या लाडक्या मायबोलीवर. कुठेही जाऊ नका, पहात रहा.
फायनली!! फायनली
फायनली!! फायनली
नारळाच्या करवंटीचे प्रत्यक्ष दर्शन!
पहिला फोटो : भिजवलेले छोले,
पहिला फोटो : भिजवलेले छोले, पांढरे वाटाणे, साधे हरभरे, काळे वाटाणे. प्रत्येकी 1 मोठा चमचा. पाणी घालून वर करवंटीचा तुकडा. मधल्या बोटाचं 1 पेर बुडेल इतकं पाणी. वर अजून 2-3 चमचे घातलंय.
दुसरा फोटो : शिजल्यानंतर
तिसरा फोटो : बोटाने हलकंच दाबलं तरी मऊ शिजल्यानंतर. फक्त काळा वाटाणा थोडा बोटचेपा राहिला, सॅलड साठी मस्त. पूर्ण शिजवायला 1-2 शिट्टया जास्त.
हा मिश्र कडधान्याचा डबा साध्या वरणभाताच्या कुकरला सगळ्यात वर ठेवला होता. सगळ्यात खाली ठेवला तर बेटर परफॉर्मन्स.
डबाभर छोले/ कोणतंही 1 कडधान्य डबा भरून असेल तरी फारतर 1-2 शिट्ट्या जास्त लागतात.
मस्त मस्त.
मस्त मस्त.
प्रज्ञा, एकदम शिस्तीत, यशस्वी
प्रज्ञा, एकदम शिस्तीत, यशस्वी प्रयोग !
प्रज्ञा मस्तच की..करवंटी चा
प्रज्ञा मस्तच की..करवंटी चा तुकडा टाकून टोटल किती शिट्ट्या काढायच्या..
माझा राजमा,छोले, हरभरे ७-८ शिट्ट्यात बिना करवंटी म ऊ शिजतात.. .
रोजच्याच वरणभात कुकरला मी तीन
रोजच्याच वरणभात कुकरला मी तीन शिट्टया करते. 1 हाय फ्लेमवर, मग 2 लो फ्लेमवर. आमच्याकडे जरा मऊसर भात हवा असतो, म्हणून लो फ्लेमवर करते.
कापणे आणि पिरगाळणे शक्य
कापणे आणि पिरगाळणे शक्य नाहिये इतका घट्ट आणि चिकट आहे. जमेल तेवढा बाजुबाजुचा वापरला.. खरच मस्त आहे वास...
साधारण असा दिसतोय >>> असा हिंग बंगलोरला मिळतो. नुकताच आणलेला असतो तेव्हा जरा मौ असतो. तसा असताना मी त्याचे हाताने किंवा सुरीने बारीक तुकडे करून ठेवायचे. मग कुडकुडीत झाले की मिक्सरमध्ये फिरवून पूड करायचे.
हाही पीठ मिसळलेलाच असतो असं त्याच्या खोक्यावर वाचलेलं आठवतंय.
वॉव प्रज्ञा हार्दिक अभिनंदन
वॉव प्रज्ञा हार्दिक अभिनंदन
रोजच्याच वरणभात कुकरला मी तीन
रोजच्याच वरणभात कुकरला मी तीन शिट्टया करते. >> वरणभातासाठी कुकर तयार करून २५-३० मि. नंतर गॅस वर ठेवला तर एकाच शिट्टीत काम होते.
छोले राजमा च्या
प्रज्ञा९, बरोबर आहे. मला तर
प्रज्ञा९, बरोबर आहे. मला तर शिट्ट्या न करण्याची सवय लागली आहे एक इंधन लेख वाचला तेव्हापासून. त्यामुळे अगदी आवश्यकता असते तेव्हाच (कुकरच्या) शिट्ट्या चालवून घेते.
'राज'मा असल्याने वाटेला जातच नाही पण छचोर छोले हाय व लो तंत्राने(उच्च नीच म्हणावं का :डोमा:) दहा पंधरा मिनिटात सहज शिजतात. वरणभातासह.
हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात
हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवा काही दिवस , म्हंजे तो कडक होऊन कुटता येईल >>
मनीमोहोर...धन्यवाद,... फायनली मिशन हिंग जमलं....
हिंग मस्त कडक झालाय... व्यवस्थित कुटुन पुड करता येते आहे..
थँक्स लोकहो.
थँक्स लोकहो.
बाय द वे, मी हे नेहमी करतेय गेली १-२ वर्षं. काळा वाटाणा, छोले हे निदान माझे तरी, कोणताही अॅडिशनाल उपाय केला नाही तर मऊ शिजत नाहीत. आणि मंद आंचेवर/ खूप शिट्ट्या/ शिट्टीविरहित कुकिंग यातलं काही करावं इतका वेळ नाही मिळत.
मदतनीस मावशींनी नारळ खवणून करवंटी केरात टाकली तर नाईलाजाने सोडा वापरते. पण आताशा मीच त्यांना करवंटी ठेवा असं २-३ वेळा सांगितलं. का हवी आहे तेही सांगितलं, आता ठेवतात त्या.
यापुढे करवंटी वापरणारच.मध्ये
यापुढे करवंटी वापरणारच.मध्ये एकदोन वेळा छोले राजमा केले तेव्हा घरात करवंटी आणि सोडा दोन्ही नव्हतं.
i hate chhole…..
i hate chhole….. त्यामुळे मी तिकडे बघतही नाही.
माझे पांढरे वाटाणे शिजत नाहीत. रगडा पॅटिस खावा अशी स्वप्ने पडतात, सगळी तयारी करुन पांढरे वाटाणे शिजवत कुकरात लावावे तर कित्तीही शिटृया मारल्या तरी मेले दगड ते दगड…. आधी असे व्हायचे नाही, जास्त शिट्ट्या झाल्या तर आतच रगडा व्हायचा.. हे दगड हल्लीच पाचसहा वर्शे पाहतेय.
आता एकदा सोडा घालुन बघेन.
माबोवरील प्रसिद्ध करवंटीची
माबोवरील प्रसिद्ध करवंटीची ख्याती सर्व दूर पसरली आहे.
नुकतेच श्री. अरविंद जोशी B. Sc. ह्या सद्गृहस्थांचे एक WA फॉरवर्ड वाचनात आले.
>>>> ५६. पाचक पाणी
माझे वैद्यक शास्त्रातील गुरु माननीय अनंतराव नित्सुरे हे १९९४ साली स्वर्गवासी झाले.
१९९८ साली (माझे वय ५२ होते) मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात अनंतराव आले आणि त्यांनी माझे हातात करवंटी दिली आणि उगाळ म्हणाले. जाग आल्यावर स्वप्न आठवले. अनंतरावानी करवंटी दिली म्हणजे यापुढील आयुष्यात भिक मागायचे संकेत दिले का? असा विचार मनात आला. मन बेचैन झाले. पण नंतर आठवले त्यांनी 'उगाळ' सांगितले होते. करवंटी उगाळायची म्हणजे पोटात घ्यायची. म्हणून मी करवंटी उगाळू लागलो. पण करवंटी इतकी कडक असते, जाम उगाळली जाईना. म्हणून मी एक करवंटीचा, वाटीत मावेल एवढा तुकडा (खोबर्याचा चिकटलेला भाग काढून टाकून) वाटीभर पाण्यात 24 तास ठेवला व ते पाणी पिण्यास सुरुवात केली. आठ दिवसात मला पचनक्रियेत फरक जाणवला. माझे अपचन कमी झाले, गॅसेस होण्याचे प्रमाण कमी झाले. म्हणजे माझी पचन क्रिया सुधारली. पावसाळ्यात मला ह्या पाण्याचा फायदा झाला आणि होत आहे.
हे औषधी पाणी आठ दहा दिवस घेतले की थांबवावे. नंतर मधून मधून आवश्यकतेनुसार थोडे थोडे दिवस घ्यावे आणि घेणे थांबवावे. ह्याचा शरीरावर झालेला परिणाम बरेच दिवस टिकतो असा माझा अनुभव आहे.
माझ्या सांगण्यावरून ज्यांनी केले त्यांना फायदा झाला असे त्यांनी सांगितले.
अरविंद जोशी B.Sc.>>>>
राजमा, काळे वाटणे अशी कडधान्ये लवकर शिजवण्याच्या गुणधर्मामुळे करवंटीचे पाणी पिल्याने पोटातील अन्न लवकर शिजत (पचत) असावे.
B T W : हे जोशी नावाचे सद्गृहस्थ अशाच चमत्कृतीपूर्ण फॉरवर्ड्स साठी WA / सोमि वर प्रसिद्ध आहेत.
मी दादर च्या एका दुकानातून
मी दादर च्या एका दुकानातून काळे वाटाणे घेते ते खरंच चांगले शिजतात. करवंटी , सोडा कसलीच गरज नाही.
इथे नाव देऊन ठेवते
Kalyanji Laxmichand Provision Stores in Dadar West, इथले सफेद वाटाणे , राजमा पण चांगले शिजतात.
मुंबई च्या मुलींनी इथून घेऊन बघा .
कुठ- काय--कधी चांगले मिळेल असा एखादा धागा हवा आता.
हे फॉरवर्ड अगदी उत्तम काकाफॉ
हे फॉरवर्ड अगदी उत्तम काकाफॉ मटेरियल आहे.
अरे पण गुरुआज्ञा 'उगाळ'
अरे पण गुरुआज्ञा 'उगाळ' असताना जोश्या करवंटीतलं पाणी का पितोय! मला वाटलं करवंटीचा तुकडा रात्रभर पाण्यात राहिला की वज्राहुन मऊ वगैरे होण्याची रेसिपी असेल पुढे. तर हा शोर्टकटजोशी निघाला!
काकाफॉ.... म्हणजे काय?
काकाफॉ.... म्हणजे काय?
या जोशीकाकांना मी अजिबात ओळखत
या जोशीकाकांना मी अजिबात ओळखत नाही याची समस्त माबोकरांनी नोंद घ्यावी ही (करवंटी घालून शिजलेल्या कडधान्यासारख्या मऊ पडलेल्या मनाने, नम्र) विनंती __/\__
Pages