Submitted by रघू आचार्य on 27 July, 2024 - 00:46
हल्ली पूर्वी कधीही नव्हती एव्हढी गॅझेट्स उपलब्ध होत आहेत. आपण यातली गॅझेट्स वापरली असतील. अॅक्सेसरीज वापरली असतील. इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल अविष्कार वापरले असतील. त्याची माहिती इथे शेअर करूयात.
हा ग्रुप वाहनांशी संबंधित असला तरी वाहन आणि मोबाईल यांचे नाते वाढत चालले आहे. त्यामुळे वाहनात वापरायचे मोबाईलशी संबंधित गॅझेट, अॅक्सेसरीज ( मोबाईल होल्डर इत्यादी) याच्याशी संबंधित माहिती सुद्धा इथे शेअर करता येईल.
सायकल साठी सुद्धा अनेक वस्तू उपलब्ध आहेत.
यातल्या कोणत्या वस्तू आवश्यक आहेत असे वाटले व कुठले अनावश्यक आहे हे सुद्धा नमूद करावे ही विनंती. वापरले नसेल तरी माहिती द्यायला हरकत नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मोबाईल चार्जिंगसाठी येणारे
मोबाईल चार्जिंगसाठी येणारे स्वस्तातले कार मोबाईल फोन चार्जर वापरू नये असे मत झाले आहे. यामुळे मोबाईल लवकर खराब होतो. त्याऐवजी सरळ पॉवर बॅंक जवळ ठेवावी.
कार मोबाईल चार्जर आवश्यकच असेल तर रॅपिडेक्स एक्स ५ प्लस मधे वेगवेगळे पोर्ट्स आहेत. हे वापरता येईल.
https://www.amazon.in/RapidX-RXX5USBMPL-Plus-Charger-Ports/dp/B07GNSXVLR...
मी स्वतः वापरले नाही, पण
मी स्वतः वापरले नाही, पण आंतरजालावरील अपघातांचे विडिओ पाहून कारमध्ये डॅश कॅम (डॅशबोर्ड कॅमेरा) असावा असे वाटते. अपघात झाला तर कोणाची चूक आहे हे ठरवायला उपयोगी पडत असावे.
कारमध्ये डॅश कॅम (डॅशबोर्ड
कारमध्ये डॅश कॅम (डॅशबोर्ड कॅमेरा) असावा असे वाटते. >> मलाही बसवायचा आहे. यू १००० शॉर्टलिस्ट केले आहे. आणखी कुठले उपयोगी असेल तर कृपया सुचवावे.
ZUS स्मार्ट हेल्थ व्हेहिकल
ZUS स्मार्ट हेल्थ व्हेहिकल मॉनिटर असे एक गॅझेट आहे. खूप जण घेत आहेत. घेताना आपण अपडेट आहोत हे समाधान मिळते.
कारचं हेल्थ मॉनिटरिंग यावर समजते. पण किंमत पाहता नियमित सर्व्हिसिंगच्या वेळी हेल्थ मॉनिटरिंग करून घेतले तर नियमित ग्राहकाला पाचशे रूपयात ही सेवा मिळते. मोबाईलवर रिपोर्ट सुद्धा येतो. त्यामुळे या भानगडीत पडू नये.
https://www.amazon.in/nonda-Wireless-Bluetooth-Real-Time-Dashboard/dp/B0...
त्यापेक्षा सरळ OBD scanner का
त्यापेक्षा सरळ OBD scanner का घेत नाहीत लोकं?
मोबाईल चार्जिंगसाठी येणारे
मोबाईल चार्जिंगसाठी येणारे स्वस्तातले कार मोबाईल फोन वापरू नये असे मत झाले आहे. यामुळे मोबाईल लवकर खराब होतो. त्याऐवजी सरळ पॉवर बॅंक जवळ ठेवावी. >> वापरत असाल तर आठवणीने तो काढून ठेवायची सवय लावा, आपल्या शहरातील रस्ते चार्जरला खिळखिळे करून सोडतात त्यामुळे ते सतत पॉवर खेचत राहतात आणि हळू हळू कार बॅटरी डेड करून टाकतात. विशेषतः जर कार रोज बाहेर पडत नसेल तर नक्कीच करा, नाहीतर गरजेच्यावेळी कार बॅटरी चार्ज नसल्यामुळे सुरु होणार नाही.
QUBOचा डॅश कॅम घ्या,
QUBOचा डॅश कॅम घ्या, installation कंपनी मार्फत होते.
QUBOचा डॅश कॅम घ्या >> मस्त
QUBOचा डॅश कॅम घ्या >> मस्त आहे आणि स्वस्तही.
कारमध्ये डॅश कॅम (डॅशबोर्ड
कारमध्ये डॅश कॅम (डॅशबोर्ड कॅमेरा) असावा असे वाटते>>>
@खंबा >>> नवऱ्याने बरीच RnD करून Teyes Car Monitoring stystem बसवली आहे. त्यात ४ साईडचा व्ह्यू, लाईव्ह टायर प्रेशर, इन्फोटेनमेंट आणिक मला अगम्य असे १०० प्रकार आहेत. पण ही सिस्टीम त्याने युएसमधून मागवली व स्वतः लावली कारण इथे मिळत नाही. सिस्टीम आणल्यास जर तुमच्या कार सर्विसिंगमधे बसवून दिली नाही तर काही एन्थु डिझायनर्स बसवून देतील असं वाटतं.
सिस्टीम आणल्यास जर तुमच्या
सिस्टीम आणल्यास जर तुमच्या कार सर्विसिंगमधे बसवून दिली नाही तर काही एन्थु डिझायनर्स बसवून देतील असं वाटतं
>>
यात कुठेही केबल कट होत असेल तर त्यानी वॉरंटी / एक्सटेंडेड वॉरंटी शून्य होते. त्यामुळे नीट चेक करून लावा.
माझे मन, मस्तच.
माझे मन, मस्तच.
हौसेला मोल नसते असे म्हणतात. व्हिडिओ शूट करा आणि युट्यूबवर टाका. लोक पाहतात.
प्रतिसाद बुकमार्क करायची सोय
प्रतिसाद बुकमार्क करायची सोय माबोवर हवी खरं तर. आता तो क्युबोचा डॅशकॅम वाला प्रतिसाद सेव्ह करून ठेवावा वाटत होता मला..
Submitted by माझेमन on 27
Submitted by माझेमन on 27 July, 2024 - 13:45
<<
जुगाड वाला लोकल ग्यारेजवाला शोधावा लागेल. ३६० डिग्री व्ह्यू वाल्या कॅमेराचे इन्स्टॉलेशन जरा किचकट आहे. यूट्यूबवर व्हिडीओ आहेत पण त्याची डीआय्वाय जरा मुश्किलच आहे.