चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

ते ही जाताना २६ आणि येताना ३२ का काय होतात. तशी तयारी असलेली बरी! >>> Lol

जाताना वेगळा नंबर व येताना वेगळा यावरून हे आठवले Happy तिसरे कडवे Happy इथल्या विषयाशी अजिबात अवांतर नाही.

ते ही जाताना २६ आणि येताना ३२ का काय होतात. तशी तयारी असलेली बरी! >>> Proud

इथल्या विषयाशी अजिबात अवांतर नाही >>> अगदी अगदी Lol

'It's about the journey and not the destination' या वाक्याला नवीन आयाम मिळाला. >> Lol

नवीन व्यायाम पण मिळाला! >> ही बेकरी नाही Lol

खंडाळा ते कर्जत मधे २६ बोगदे आहेत. >> >> मोजलेसुद्धा फा ? Lol

ते आयाम आणि व्यायाम राहिलेच. दोन्ही सुपरलोल आहे Happy

अब क्या बच्चेकी जान लोगे क्या >>> Lol

मोजलेसुद्धा फा ? >> ऑफ कोर्स. पण कुतुहलाने मोजणारे वेगळे आणि त्या माहितीचा वापर करायचा असल्याने मोजणारे वेगळे Happy

नवीन व्यायाम पण मिळाला! <<

व्यायाम कसला..?
ते २६ आणि ३२ वाचून शेवटच्या बोगद्यातून गाडी बाहेर आल्यावर मनामधे चट्टेरी पट्टेरी अर्ध्या चड्डीतील, शरीर खंगलेलं, डोळे बाहेर आलेलं, लटपटणाऱ्या माणसाचं कार्टून डोळ्यांसमोर आलं..

पार रसिक>> Rofl
बोगद्यातून पार गेल्यामुळे पार रसिक.

आता कोणी लांब पल्ल्याची गाडी म्हटले की नको नको त्या गोष्टी आठवणार Sad

तिकिट बूक करताना पंचाईत आता अप्पर बर्थ , लोअर बर्थ , मिडल बर्थ

दरड कोसळल्याने सर्व गाडय़ा आज रद्द करण्यात येत आहेत. गैरसोयीबद्दल भारतीय रेल्वे दिलगिरी व्यक्त करत आहे.

चावट आहात सगळे Lol
उगीच का नाव दिलंय असल्या ईश्कला सलाम
दुसरे काय नाव शोभल असतं का?
Biggrin

बोगदेच्छुकांना>>>>> Biggrin
इथली ट्रेनच्या बोगद्यांची चर्चा वाचून रस्त्यावरील बोगद्यात स्टंट करू नये.

मुंबई ते पुणे च्या ऐवजी पुणे ते मुंबई रेल्वे ने प्रवास करावा, असं सुचवताय का सगळे??? >> नाही नाही! झेपेल तेच कर रे! घाट उतरताना पाय घसरायचा. उगा उंटाच्या शेपटीचा मुका नको.
बाकी हल्ली डब्यांची संख्या वाढल्यापासून मुंबईहुन पुण्याला जाताना पळसदरीला गाडी थांबली की शेवटचा डबा बोगद्यात थांबतो म्हणे.

झेपेल तेच कर रे! घाट उतरताना पाय घसरायचा. उगा उंटाच्या शेपटीचा मुका नको. >>>> हाहाहा ... माझ्यासाठी नाही रे, बोगदेच्छुकांसाठी ......

बाकी हल्ली डब्यांची संख्या वाढल्यापासून मुंबईहुन पुण्याला जाताना पळसदरीला गाडी थांबली की शेवटचा डबा बोगद्यात थांबतो म्हणे. >>> म्हणजे शेवटच्या डब्यातच बसायचं ..... बोगदे मोजायला ...... Lol

सर्व बोगदेच्छुकांना नम्रपणे आठवण देऊ इच्छिते की बोगद्यामध्ये लाईट्स असतात. >> रसभंग केल्याबद्दल तुम्हाला मुंबईहून पुण्याला जाणार्‍या गाडीत शेवटच्या डब्यात जागा मिळणार नाही अशी शिक्षा ठोठावण्यात येत आहे Lol

म्हणजे शेवटच्या डब्यातच बसायचं ..... बोगदे मोजायला ..... >> शांत गदाधारी भीम शांत Lol

बोगदेच्छुक >>> Lol Lol

अश्विनी वैष्णवना रेल्वेचे उत्पन्न वाढविण्याठी बोगद्याच्या एन्ट्री व एक्झिट पॉईंटला स्पॉन्सर करण्याची आयडीआ द्यावी का? उक्षी टनेलमे आपकी आनंदमयी यात्रा के साथी है अमुकतमुक!!
नितीन गडकरी यापासून इन्स्पिरेशनघेऊन एका टोलबुथवर एक बोगदा फ्री असे हायवे तर बांधणार नाहीत ना?

असल्या ईश्कला सलाम >>>> प्लीज नोट हे मिळमिळीत ईश्क़ नसून ‘इष्काची इंगळी डसली’ असे झन्नाट वॅरीयंट आहे.

मवा वीक पॉईण्ट असल्याने भैय्याजी पाहिला.
हा गुणी अभिनेता कोणत्याही भूमिकेत जीव ओततो. पण सिनेमा एव्हढा महाबंडल , साऊथ चा रीमेक वाटावा असा हिंसाचार, बाहुबलीतलं युद्ध वगैरे.
मवा ला साऊथ स्टाईल स्टंट्स करताना पाहून लोळण घेतली.
कुणी तरी पीसं काढा स्वतंत्र धाग्यावर.

Pages