चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बट्रे वर वेगळा धागा निघण्याइतका वाईट नाही म्हणून इथे बचाव कार्य लिहिले होते. पण खरंच वेगळा धागा काढायचा असेल तर संध्याकाळी घरी आल्यावर पाहतो. Happy
निरू Happy

माझेमन, साधना आणि अनु Lol
मी पण कमी आंबटशौकीन नाही, अनफिल्टर्ड लिहिण्यास कारण की -
बोगदा फार लांब पल्ल्याचा असेल तर 'सलाम ए इश्क'च होईल असेल नाही, आयुष्मान व भूमी यांचा 'शुभमंगल सावधान' होण्याची शक्यताही गृहित धरून चला. Lol
मलाच म्हातारीला सगळे सांगावे लागते.

आचार्य, मस्त पोस्ट. Happy
दक्षिणा Happy

पंचायतचा तिसरा हंगाम बघितला, फारच रटाळ वाटला. कथेत काहीच दम नव्हता. हा हंगाम प्रल्हाद (फैजल मलिक) याने खाल्ला. प्रल्हादचे काही सीन मात्र अफलातून आहेत. GoW २ नंतर कदाचित हाच परफॉर्मन्स बघितला. अधेमधे या कलाकाराचे काही बघितले नव्हते. या पूर्ण हंगामातील हेच तेवढे बघण्यासारखे वाटले.

मला सिझन 3 ची टेस्ट डेव्हलप झाली.प्रहलाद(हे प्रधान च्या आवाजात) चा अभिनय, प्रधान, मंजुदेवी,विकास, अभिषेक, प्रल्हाद यांच्यात निर्माण झालेले इंटर्नल मतभेद, भूषण आणि त्याचे पंटर हे सगळं आवडलं.भूषण आणि क्रांतीदेवी मधली केमिस्ट्री पण.
म्हणजे 1 आणि 2 मस्त असले तर 3 तितका खास नाही, पण कथेला पुढे नक्की नेतोय.

मराठी चित्रपटांना बोगद्याचं महत्त्व कधीचंच कळलं होतं.

बोगद्यात गाडी जाता होई अंधार
अंधारात प्रीत घेता प्रीतिचो आधार

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
सांग गो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट

आचार्य, मी_अनु, माझेमन, अस्मिता : धमाल लिहीताय सगळे Rofl
लाल साडी, बोगद्याखाली अंधार, कचटतप किर्र >>> Rofl Rofl

पण मुळात कोणाकडे तरी लाल कपडा निघेल हे गृहीतक का? का आशा सचदेवला डोक्यात ठेवून केलेलीच अनाऊन्समेंट आहे? Wink

आचार्य : १०० किमी वेग पाहिजे ना ब्रिटीश मानकाप्रमाणे?

१०० किमी वेग पाहिजे ना ब्रिटीश मानकाप्रमाणे? >> ब्रिटीशांचा मैल असतो. एसआय मधे आपण किमी म्हणतो.

ब ट्रे वर अजून काही लिहीणार होतो, पण आता हाताची घडी तोंडावर बोट. Lol
एव्हढा मस्त आयडी घेतला पण ओळखायचं ते ओळखलंच, ते ही अनेकांनी.
( शॉफॉ टेम्प्टिंग असावा याकडे लक्ष दिलं होतं )

Lol धमाल आहेत द बर्निंग ट्रेनवरच्या पोस्टी Happy

या पिक्चरवर मी जुन्या माबोवर लिहीले होते.

याव्यतिरिक्त या लेखातही यातल्या काही अचाट सीन्सचा उल्लेख आहे.
https://www.maayboli.com/node/64331

अरेच्चा! माबोवर शोधा सुविधा चालत नाही बहुतेक. सर्च मधे दिसला नाही हा बाफ. तेच म्हटलं कसा काय सुटला हा सिनेमा?

जुन्या मायबोलीवर सुद्धा बरीच धमाल झालेली आहे की!
तपशीलवार लिहीले आहे. सुरुवात पुन्हा लक्ष देऊन पहायला हवी. डॅनी ची.हेअरसाटाईल लहान मुलाला Happy
बारीक निरीक्षणे इहेत.

विख ला कॉमेडी जमत नाही हे अचूक आहे. आतून डबे कनेक्टेड असताना बाहेरून का लटकत असतात हा प्रश्न पडलेला आहेच. छतावर चढणे सुद्धा कशासाठी?

पूर्ण लेख धमाल आहे. जून्या मायबोलीवर प्रतिसाद देता येत नाही म्हणून इथे दिला आहे.
उर्वरित लेख वाचून घेतो.

बोगदा फार लांब पल्ल्याचा असेल तर 'सलाम ए इश्क'च होईल असेल नाही, आयुष्मान व भूमी यांचा 'शुभमंगल सावधान' होण्याची शक्यताही गृहित धरून चला>>>>>

Rofl

लस्ट स्टोरीज मधला विकी कौशल पण एक शक्यता आहे १,२,३,४,५. Lol

अतरंगी, हो. Happy
ह्या परिस्थितीत तर बोगद्याची गरजही नाही. Lol

माझेमन, कमाल आहे. ती गोष्ट धमाल आहे. 'कभी खुशी कभी गम' गाण्याचा काय वापर केला आहे.

पुरे करते कारण असंच लिहीत राहिले तर erotica सुचायची, 'फिफ्टी शेड्स ऑफ भारतीय रेल्वे'.. Wink
---------

फारएण्डचा धागा वाचला होता बहुतेक. आचार्य, लेख वाचेन. Happy

सलाम ए इश्क बघायला लागणार आता Lol

अस्मिता >> जास्त काही नाही लिहीलेलं. इथल्याच पोस्टी आहेत, किंचित भर घातलीये स्वतंत्र धाग्यासाठी. Happy

'सलाम ए इश्क'(?) मधे अरबाज आणि ईशा कोप्पीकर नवीन लग्न झालेले असूनही घरी 'उपासमार' झाल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेत प्रत्येक बोगद्याखाली एक याप्रमाणे तीन 'हनिमून' उरकतात. >>> Lol यांना कोणीतरी योग्य (लोह)मार्ग दाखवा. खंडाळा ते कर्जत मधे २६ बोगदे आहेत. आणि गाडी बोगद्यांमधून बाहेर येते तेव्हा बहुतांश लोक बाहेरचे निसर्गसौंदर्य बघत असतात. एकदम सेफ. इथे सेफ म्हणजे प्रायव्हसीच्या अर्थाने.

असे बोअर युजर एक्सपिरियन्स घेण्यापेक्षा ते न घेतलेले बरे >>> मला वाटले मी_अनु ने इथे फाको केली आहे. बोगदा खणायला बोअरिंग मशीन वापरून ड्रिल करतात म्हणून.

याला माहितेय अटेंडंट जीव गेला तरी पांढरी चादर फेकू देणार नाही. तशीच खात्री त्याला ‘यात्रींयों से निवेदन है। यात्रीगण कृपया ध्यान दे, दिल्ली से मुंबई जानेवाली ११४७८ डाऊन आज निर्धारित समय &~<>>%^^कचटतप &>>$£ प्लॅटफॉर्म क्रमांक &~<>>%^ किर्र से जाएगी’ >>> Lol

मलाच म्हातारीला सगळे सांगावे लागते. >>> Lol

खंडाळा ते कर्जत मधे २६ बोगदे आहेत. >>> अब क्या बच्चेकी जान लोगे क्या Lol
इथे सेफ म्हणजे प्रायव्हसीच्या अर्थाने. >>> Lol
'It's about the journey and not the destination' या वाक्याला नवीन आयाम मिळाला.

Pages