Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हो.बर्निंग ट्रेन अश्या बऱ्याच
हो.बर्निंग ट्रेन अश्या बऱ्याच बाबीत विनोदी आहे.ते नवविवाहित जोडपं मरतं तो सीन पण.
ते नवविवाहित जोडपं मरतं तो
ते नवविवाहित जोडपं मरतं तो सीन पण >> अरेरे ! इथपर्यंत अजून पोहोचलो नाही. पण चित्रपटीय विधीलिखितानुसार सुहागच्या रक्षणासाठी तिने बहुमताचा आदर केला नाही तर तिचा सुहागच राहणार नाही हा अंदाज आलाच होता.
ते जोडपे ट्रेनमध्येच हनिमुन
ते जोडपे ट्रेनमध्येच हनिमुन करते ते मला तेव्हा विनोदी वाटलेले पण नंतर त्यांना मरताना पाहुन कळले की शादीका मक्सद पुरा केल्याशिवाय मेले असते तर भुत बित झाले असते त्यामुळे भरधाव ट्रेनमध्ये त्यांना घाईघाईत काम उरकावे लागले.
'सलाम ए इश्क'(?) मधे अरबाज
'सलाम ए इश्क'(?) मधे अरबाज आणि ईशा कोप्पीकर नवीन लग्न झालेले असूनही घरी 'उपासमार' झाल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेत प्रत्येक बोगद्याखाली एक याप्रमाणे तीन 'हनिमून' उरकतात. मग त्यांच्या जीवाला गारवा मिळतो. बोगद्याखाली अंधार..!
अस्मिता हसून लोळले मी
अस्मिता हसून लोळले मी
तर भुत बित झाले असते >>>
तर भुत बित झाले असते >>>
भूतपूर्व या इच्छा राहिलेल्या असतात त्यांची भूतं सॉलीड खंग्री बनतात.
बोगद्याखाली अंधार..! >>
अरबाज म्हणजे तोच ना सिद्धार्थ कपूरचा हमदर्द?
ब ट्रे सारखा यांनी सेपरेट
ब ट्रे सारखा यांनी सेपरेट कुपे बुक केला असेल तर ठिकाय पण जनरलमधुन जात असतील आणि बोगदा आला की काम करायचे असेल तर कठिण आहे…
असे बोअर युजर एक्सपिरियन्स
असे बोअर युजर एक्सपिरियन्स घेण्यापेक्षा ते न घेतलेले बरे
अरबाज ऐवजी सोहेल असेल कदाचित
अरबाज ऐवजी सोहेल असेल कदाचित पण हे नगाला नगच आहेत. शेवटी 'हनिमून' महत्त्वाचा
बोगदा आला की काम करायचे असेल तर कठिण आहे…
>>>
कामेच्छाइच्छा तेथे मार्ग...शंभर मैल (ब ट्रे वाले ब्रिटिश
शंभर मैल (ब ट्रे वाले ब्रिटिश मानके वापरतात) वेगाने धावत्या ट्रेनमधून लाल कपडा फेकायचा तर ट्रेनचे वस्तुमान, वाऱ्याची दिशा, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची स्पेसिफिक डेन्सिटी, ट्रेनचा क्रॉस सेक्शनल एरिया आणि कापडाचे वस्तुमान, घनता, स्पेडे इ. विचारात घेऊन न्यूटनच्या नियमाप्रमाणे ट्रेन किती अंतर पुढे गेल्यावर कापड फेकले असता ते वाऱ्याच्या शक्तीने उडून बरोब्बर फलाटावर पडेल हे सुद्धा चीफ इंजीनियर सांगायला हवे होते. किंवा नेहमी अशा प्रसंगात कुणी डॉक्टर आहे का च्या चालीवर कुणी मेकॅनिकल इंजिनिअर आहे का असा प्रश्न विचारायला पाहिजे.
त्याचे गणित होईपर्यंत प्लॅटफॉर्म कुठल्या दिशेला येईल हे इंजिनिअर नसलेल्या व व्यवहारज्ञान तुंबळ असलेल्या कुणीही पाहून ठेवायला हवे नाहीतर सगळे मुसळ (इथे साडी) अक्षरशः केरात!!
साडी, दुपटं, फडकं जे काही
साडी, दुपटं, फडकं जे काही फेकलं ते नीट जड बॉल करून फेकायला हवं. एकंदर भौतिकशास्त्र सगळं संशयास्पद आहेच.तो स्लोप वेगाने बांधला तेही.
जड बॉल करून फेकायला >> सुपर
जड बॉल करून फेकायला >> सुपर एक्स्प्रेसचा पहिला बळी फलाटावर उभा असलेला प्रवासी झाला असता.
फेकणारा धर्मेंद्र असल्याने आणि अनेक सिनेमात त्याने पूलावरून खाली धावत्या रेल्वे वर अचूक उडी मारलेली असल्यानेच कार्य सिद्धीस जाते. म्हणतात ना, त्याच्या अंगातच गाणे आहे, तसे त्याच्या अंगातच पदार्थ विज्ञान आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरला दुसरे काम देता येईल.
हनुमान कपलला बोगद्यात लांबी, ट्रेन चा वेग याचे गणिते करून कपलला सांगायचे कि, आपके पास... सेकंदस है और आपका समय शुरू होता है अब...
टिक टिक १.२,३............
'सगळे बोगदे पारसिक
'सगळे बोगदे पारसिक बोगद्याच्या लांबीचे का नाहीत, सरकार नक्की काय करतंय?इतके छोटे बोगदे बनवून पैसे नक्की कोणी खाल्ले?संतप्त जोडप्याचा सवाल'
मोदीजींनी Skill development
मोदीजींनी Skill development नावाचा प्रोग्राम जाहीर केलेला आहे.
बोगद्याखाली अंधार >>> फारच
ट्रेनपेक्षा तुफान सुटलेत इथे सगळे

बोगद्याखाली अंधार >>> फारच फाष्ट काम दिसतंय.
आउट ऑफ द बॉक्स आयडिया म्हणतात त्या ह्याच. नाहीतर आमची कोकण रेल्वे...एवढे बोगदे आहेत. पण एक्काला सुचलं नाही की नवी स्कीम डिक्लेअर करावी - गोव्याचं तिकीट काढा नी प्रवास व हनिमून एकाच तिकिटात उरका. २०२४ पासून काश्मीरही अव्हेलेबल.
अरबाज नाही, सोहेल आहे तो. पण काय फरक पडतो? आमची आज्जी म्हणाली असती "थोडा आचरट आहे पण भारी कामसू हो पोरगा."
मेरा कोई सुहाग नही है, और ना ही आगे होगा >>> सुहाग नाही ठीकाय. पण दिल्लीवरून रेल्वेने मुंबईला येताना लगेज नाही? लाल ब्लाउज आणि पेटीकोटवर पुढचा प्रवास? का मॅचिंग साडी नसेल तर नेसणार नाही असा बाणा होता? बरं नाही तिच्याकडे लगेज. गरीब घरची, अंगावरच्या वस्त्रानिशी प्रवास करतेय समजू. पण बाकी अक्ख्या रेल्वेत एकाही बाईकडे एखादी एक्सट्रा साडी, ओढणी, शाल, सलवार कमीज नाही जो आशा सचदेव वापरू शकेल? कलंक आहेत या बाईपणाच्या नावावर. आणि पुरुष इतर ठिकाणी बायांना अगदी आपल्या अंगातले जॅकेट काढून देतात मग हिला का नाही? मेल्यांनो वर जायची वेळ आलेय पण मोह सुटत नाही का? दूरवरच्या जंगलात रात्र काढायला सापडलेल्या झोपडीत अंगावर गुंडाळायला चादरी बऱ्या सापडतात. रेल्वेत झोपायच्या चादरी राष्ट्राची संपत्ती म्हणून तिजोरीत ठेवल्यात की काय?
लाल कपडे की अनाउन्समेंट ज्याच्या रेडिओवर ऐकू येते त्या मुलाच्या अंगात लाल स्वेटर, शाळेच्या ट्रीपच्या मुलांच्या अंगावर लाल ब्लेझर्स आहेत बरं का.
मुळात ऐकू येतंय की नाही हे कळण्यासाठी लालच कपडा कशाला हवाय? पांढरी रेल्वेची चादर मेसेज लिहून फेकली तर चालणार नाही? पुढच्या बजेटात कम्युनिकेशन सेस वाढवा हवं तर...
बोगद्याखाली अंधार>>>
बोगद्याखाली अंधार>>>

माझी मैत्रिण सोहेल खान च्या नाकाला रेल्वे चा बोगदा म्हणायची ते किती लागू होतय इथे
लाल ब्लाउज आणि पेटीकोटवर
लाल ब्लाउज आणि पेटीकोटवर पुढचा प्रवास? का मॅचिंग साडी नसेल तर नेसणार नाही असा बाणा होता? > अगदी अगदी
(No subject)
आता आले का पुन्हा सलाम-ए-इष्क
आता आले का पुन्हा सलाम-ए-इष्क बघणे.
आमची कोकण रेल्वे...एवढे बोगदे
आमची कोकण रेल्वे...एवढे बोगदे आहेत. >>>>
काय कामाचे??? एक तो उक्शीचा सोडला तर बाकिचे आले आले म्हणताना संपतात पण… हनिमुन मधला ह म्हणेपर्यंत बोगदा संपला आणि मनातले मांडे मनातच राहिले असे व्हायचे..
ऑल इंडीया रेडीयो द्वारा
ऑल इंडीया रेडीयो द्वारा प्रवाशांशी संभाषण करण्याचा निर्णय विनोद खन्ना (चीफ इंजिनीयर) घेतो. >>>>
तो बरोबर करतोय. अ गुड लीडर नोज स्ट्रेंथ ॲन वीकनेसेस ऑफ हिज टीम.
त्याला माहितेय अटेंडंट जीव गेला तरी पांढरी चादर फेकू देणार नाही. तशीच खात्री त्याला ‘यात्रींयों से निवेदन है। यात्रीगण कृपया ध्यान दे, दिल्ली से मुंबई जानेवाली ११४७८ डाऊन आज निर्धारित समय &~<>>%^^कचटतप &>>$£ प्लॅटफॉर्म क्रमांक &~<>>%^ किर्र से जाएगी’ असल्या उद्घोषणा करणाऱ्या अनाउन्सरबद्दल आहे. म्हणून तो करतो अनाउन्समेंट.
हनिमुन मधला ह म्हणेपर्यंत
हनिमुन मधला ह म्हणेपर्यंत बोगदा संपला आणि मनातले मांडे मनातच राहिले असे व्हायचे..
>>>
साधना असं आपल्याला वाटतं. सोहेल खान 'आज करे सो अब' वर विश्वास ठेवतो. तो ख्रिस्तोफर नोलनसारखाच काळ, काम वेगाच्या बंधनांना मानत नाही.
सगळे धमाल सुटलेत
सगळे धमाल सुटलेत

माझेमन काय ऐकत नाय आज.
@माझे मन, संपूर्ण पोस्ट धमाल
@माझे मन, संपूर्ण पोस्ट धमाल आहे.
&~<>>%^^कचटतप &>>$£ प्लॅटफॉर्म क्रमांक &~<>>%^ किर्र >>
ही मायबोलीवर त अक्षराला येते तशी काही भानगड आहे कि खर खर आवाजात होणाऱ्या अनाउन्समेंटला न्याय मिळवून देण्यासाठी आहे?
Find me falling इंग्रजी
Find me falling इंग्रजी नेटफ्लिक्सवर
एक रिटायर्ड रॉकस्टार..एका आयलंड वर घेऊन गर्दी ओळखीपासून दूर निवांत राहायला म्हणून येतो..पण इथंही लोक त्याचा पिछा सोडत नाहीत.. जुनं प्रेम,भुतकाळ समोर येतो... एक हलकाफुलका फिलगुड सिनेमा.. सिंपल आहे ..छान आहे..गाणी पण मस्त आहेत.रोमान्स, कॉमेडी सिनेमा.
Vanished into the night इंग्रजी नेटफ्लिक्सवर
आई बाहेरगावी गेली असताना..वडिलांच्या देखरेखीखाली असणारी दोन लहान मुलं रात्री झोपली असताना बेडरूममधून गायब होतात... सुरू होते शोधाशोध, गुंता आणि डोक्याला खुराक.. ठिकठाक आहे सिनेमा..थ्रीलर सिनेमा.
माझेपणमन काय ऐकत नाय आज
माझेपणमन काय ऐकत नाय आज

आबा
आबा
आयडीच असा घेतलाय कि कोट केला कि हिट विकेट होतोय.
ब.ट्रे.च्या सगळ्या पोस्टी
ब.ट्रे.च्या सगळ्या पोस्टी
आता दुसऱ्या कुठल्या
आता दुसऱ्या कुठल्या चित्रपटाचा विषय न काढता चर्चा मूळ चित्रपटावरच (बर्निंग ट्रेन) ठेवावी.
आदेशावरुन..
इकडे आधीही बर्निंग ट्रेन वर
इकडे आधीही बर्निंग ट्रेन वर बरीच धमाल चर्चा झालीय
फक्त मला सापडत नाहीये.(बहुतेक अचाट अतर्क्य किंवा गाडी बुला रही है धाग्यावर असेल)
Pages