Submitted by webmaster on 17 July, 2024 - 06:31
ठिकाण/पत्ता:
मल्टीस्पाईस,
हर्षल पार्क, ४६/२ म्हात्रे पूल, सिद्धी गार्डनच्यासमोर, वकील नगर एरंडवणे , पुणे. ४११०५२
पुण्यात सहज शक्य असेल तर मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. जमलं तर येत्या शनिवारी , २० जुलै , २०२४ ला सकाळी ९:३० ला भेटूया.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, July 20, 2024 - 00:00 to 02:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फा
फा
आणि हा ट्रॅक सापडला नसता तर
आणि हा ट्रॅक सापडला नसता तर आपण आजचे आज नसतो.>> अगदी खरं आणि अशा गटग ला गेलं की हे प्रकर्षाने जाणवते.
मद्यलोक >> पूर्वी पाठ्य पुस्तकात गद्य विभाग पद्य विभाग असत तसा मायबोलीवर नवीन विभाग चालू करण्याची नांदी अशा रीतीने होत आहे अशी कुणकुण मला लागत आहे आज या ठिकाणी.
छान गटग वृतांत आणि
छान गटग वृतांत आणि प्रकाशचित्रे
आजपर्यंत कोणत्याही माबोकरास व्यक्तीश्या भेटलो नाही.
पण एक आपलेपणा वाटतो माबोवर
आयडी मागच्या व्यक्ती पाहून छान वाटले
पूर्वी पाठ्य पुस्तकात गद्य
पूर्वी पाठ्य पुस्तकात गद्य विभाग पद्य विभाग असत तसा मायबोलीवर नवीन विभाग चालू करण्याची नांदी अशा रीतीने होत आहे अशी कुणकुण मला लागत आहे आज या ठिकाणी. >>
त्या त्या टाईमझोनमधल्या
त्या त्या टाईमझोनमधल्या सायंकाळच्या विशिष्ट पोस्टी (ही धरून) वाचून सापडतो हा विभाग.
'आज या ठिकाणी' ने वाक्याचा
'आज या ठिकाणी' ने वाक्याचा शेवट! आशू तू निवडणुकीला उभी रहात्येस की काय?
पूर्वी पाठ्य पुस्तकात गद्य
पूर्वी पाठ्य पुस्तकात गद्य विभाग पद्य विभाग असत तसा मायबोलीवर नवीन विभाग चालू करण्याची नांदी >>> टोटली. गद्य विभागातले उतारे लोक पद्य विभागातले असल्यासारखे म्हणू लागले की समजावे ते मद्य विभागात जाउन आले आहेत
'आज या ठिकाणी' ने वाक्याचा शेवट! आशू तू निवडणुकीला उभी रहात्येस की काय? >>

अरे वा! गटग, वृत्तांत, वेमा
अरे वा! गटग, वृत्तांत, वेमा आणि जुजा माबोकर........ जगात भारी!!
वेबमास्तरांना भेटायला गटग हा
वेबमास्तरांना भेटायला गटग हा धागा पाहिल्यावरच या गटगला जाणे जमवायलाच हवे हाच पहिला विचार मनात आला.
माझ्या साठी हे फक्त गटग नव्हतं तर जी वेबसाईट माझ्या दैनंदिन आयुष्याचा भाग आहे, ज्या वेबसाईटने मला ईतकं काही दिलं त्याच्या संस्थापकांना प्रत्यक्षात भेटायची सुवर्णसंधी होती. साजिराने लिहिल्या प्रमाणे मायबोली नसती तर “आय वुड हॅव मिस्ड अ बिग चंक ऑफ द लाईफ..” त्यामुळे वेमांना भेटायला जायलाच हवे होते.
मी पोचलो तेव्हा सगळेजण येऊन गप्पा टप्पा चालू झाल्या होत्या. मी जाऊन शांतपणे एक कोपरा पकडला नी बसलो. मास्तरांच्या उपस्थितीत जसे बसायला हवे तसा शांत बसलो होतो. मधेच मास्तरांनी मला बघितलं नी ऊठून माझ्याकडे येऊन हस्तांदोलन करून स्वत:चा परिचय करून दिला. ही नम्रता, हे gesture मला चांगलेच भावले.
नेहमीप्रमाणे माबो, माबोवरचे लेख, आयडी त्यांच्या गमती जमती या गप्पा चालूच होत्या. काही सुपरहिट आयडी, माबोचे internal जोक्स, ड्युआयडींच्या चर्चा हे होतेच.मी नेमका जुन्याजाणत्या माबोकरांच्या बाजूला येऊन बसलो होतो, त्यांच्या गप्पा चालू असताना मी फक्त श्रवणभक्ती करत होतो. (ओळख परेड मधे कळले की मी या सर्वांपेक्षा जुना आहे). या गटगला आलेल्या काहींना मी सहकारनगर गटगला भेटल्यामुळे परिचय होता. साजिराला आधी एका गटगला भेटलो होतो पण ते त्याला लक्षात नसावं.
फोटो सेशन झाल्यावर ज्यांना घाई होते ते निघाले नी आम्ही परत आत येऊन बसलो सर्वांना एकत्र गप्पा मारता आल्या. वेमा मला दोन तीन वेळी म्हणाले की अरे तू ईतका शांत का बोलत का नाहीस. पण साक्षात वेमा, साजिरा, आशुडी, मनीष, कुमारसर, मध्यलोक असे रथी महारथी बोलत असताना आपण काय बोलावे, शांतपणे ऐकावे.
वेमांनी जवळ जवळ तीन चारवेळा वविला यायची ईच्छ असून जमणे अवघड आहे हे आवर्जुन सांगितले. साजिरा व हिमस्कुल यांनी डायरेक्ट वविला येतो तिथे भेटू असे सांगितले आहे ( हे ईथे पब्लिकली डिक्लेअर केले की त्यांच्यावर प्रेशर राहील ववि ॲटेंड करायचे
)
गटगला सगळ्यांनाभटून छान वाटले. लवकरच पुढचे गटग डिक्लेअर व्हावे, तसेच वेमांचे स्टॅंडअप शो बघायचे भाग्य लाभावे. हीच सदिच्छा!
मद्यलोक
मद्यलोक
पोस्टपण रात्री ११.५१ ची आहे त्यामुळे समजून घेण्यासारखे आहे…..
खरंच खूप छान वाटले सर्वांना
खरंच खूप छान वाटले सर्वांना भेटून. खूप आनंद झाला.
साजिरा ने अगदी मनातले लिहिले आहे.
मायबोली ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे, कारण आपल्या दैनंदिन आयुष्यात जे जे असते ते सगळे मायबोलीवर आहेच!
मायबोलीवर असल्याने बहुश्रुत असल्याचे चारचौघात मिरवता येते...!!
कालचे जुजा लोकांचे आणि
कालचे जुजा लोकांचे आणि त्यातही वेमा असलेले गटग अगदीच भारी झाले. माझ्यासारख्या नवख्या माणसालाही सामील करून घेतले आणि काही जुन्या धाग्यांचे उल्लेख करून आम्हाला (तितक्या active नसलेल्या) सभासदांना मार्गदर्शन मिळाले हे बेस्ट काम झाले. आता तो अकबर धागा शोधवाच लागणार आहे.
साजिरा यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी जसे बरीच गटग व्हायचे तसे आताही व्हावे म्हणजे अजून मंडळींना भेटता येईल गप्पा गोष्टी होतील. लिखाण आणि विचारांची देवाणघेवाण होईल. त्यामुळे पुढील गटग लवकर ठरविण्यात यावे अशी ईच्छा व्यक्त करतो.
आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद, भेटून छान वाटले
वेमा आणि स्टँड अप ॲक्ट: हे
वेमा आणि स्टँड अप ॲक्ट: हे केव्हा झाले. मी मिस केलं हे.
वेमा आणि स्टँड अप ॲक्ट हे
वेमा आणि स्टँड अप ॲक्ट हे बहुतेक आपण गेल्यानंतरच्या 'चहा' सेशन मध्ये झालं असावं. आधी गप्पा मारताना वेमा मला म्हणाले होते की ते आयटी सोडून अन्य क्षेत्रात काहीतरी करू पाहताहेत. तेंव्हा मला वाटलेले हॉटेलिंग किंवा टुरिझम वगैरे क्षेत्रे असतील. कारण माझ्या माहितीत बऱ्याच आयटी वाल्यांनी तसे निर्णय घेतले आहेत. पण कलेच्या क्षेत्रात अजमावून पाहण्याचा हा निर्णय खूप मस्त आहे. थांबलो असतो तर वेमांकडून ऐकायला खूप आवडले असते.
*वेमा आणि स्टँड अप ॲक्ट >>>
*वेमा आणि स्टँड अप ॲक्ट >>>
मित्रांनो,
काल असा काही प्रयोग वगैरे झालेला नाही. पण ते या कलेत पारंगत आहेत एवढे त्यांच्याकडून समजले. आम्ही सर्वांनी त्यांच्यासह खुर्चीवर बसूनच चहा प्यायला.
पण कलेच्या क्षेत्रात अजमावून
पण कलेच्या क्षेत्रात अजमावून पाहण्याचा हा निर्णय खूप मस्त आहे > +१
अर्रे, बरेच दिवसांनी
अर्रे, बरेच दिवसांनी मेंब्रांचे दर्शन झाले. वेमा, ज्युमा, मनीष, साजिरा आहे तसेच आहेत. हां, आता थोडे केस इकडे तिकडे चालतायत. हिम्याला फक्त मी फोटोतच बघितलंय. बाकीचे नवे सदस्य दिसतात.
साजिरा म्हणला तसा, माबोचं आयुष्यात एक स्थान आहेच. मी माबो नसती तर कधीच लिहिती झाले नसते. बर्याच जणांशी आज जी मैत्री आहे ती झाली नसती. वेमा, अॅडमिन सगळ्यांना यासाठी कायमच धन्यवाद दिलेले आहेत.
गजांत लक्ष्मी (जी आशूने आतल्या आत पाडून दाखवली होती) आपण समीरला दिली होती ना? ज्या गटगमध्ये लिंब्याने त्याच्या शेतातले लय भारी तांदूळ वाटले होते. का वेमांना पण दिली होती कुठल्या अन्य गटगात?
हॉटेलं-टपर्या बदलत बदलत किमान अर्धा दिवस चाललेली गटग आठवून मजा आली. एकदा मस्पा, त्याच्यासमोरची एखाद दोन अशी पदयात्रा करत करत शेवटी कलिंगला गेलेलो आठवतेय.
मस्त वृत्तांत सगळ्यांचे..
मस्त वृत्तांत सगळ्यांचे.. फारा वर्षांनी गटगला जाऊन मजा आली. वेमांना "अजयबाबा मायबोलीवाले" असं मी एक नाव सुचवलं पण त्यांनी काही ते फार मनावर घेतलं नाही.
छान व्रुतात!
छान व्रुतात!
जे लोक्स वेमाना भेटायला गेले
जे लोक्स वेमाना भेटायला गेले ते एकतर खूपच साधेभोळे आहेत नाहीतर खूप धाडसी तरी आहेत कारण वेमाना कोणाचे किती डू आयडी आहेत हे माहीत असणार. यावरून मला एक किस्सा आठवला. आमच्या इथे एक ज्योतिष सांगणारे थोडीफार सिध्दी असणारे बाबा आहेत ते आपल्या मनात काय विचार चालू आहेत ते लगेच सांगतात. माझा एक मित्र त्याच्या बाबांसोबत त्यांच्याकडे गेला होता. म्हणजे हा अभ्यास करायचा नाही म्हणून त्याच्या बाबांनीच त्याला नेलं होतं. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मित्राला समजलं ते मनकवडे आहेत. मग काय विचारताय याच्या मनात ज्योतिषी बाबांबद्दल वेडे वाकडे विचार यायला लागले. ज्योतिषी बाबा रागाने याच्याकडे बघत होते तसे याचे विचार पण वाढत होते. शेवटी कसाबसा घामाघूम होऊन तो परत आला.
बोकलतच तर .................
बोकलतच तर ................. नाहीत ना ?
आजपर्यंत कोणत्याही माबोकरास
आजपर्यंत कोणत्याही माबोकरास व्यक्तीश्या भेटलो नाही. >> असं काय करता? आपण भेटलो आहोत की !!
अजयबाबा मायबोलीवाले
अजयबाबा मायबोलीवाले
>>>
य, ब, ल असा कन्फ्यूजिंग अनुप्रास झाला आहे. इतकं कॉम्प्लिकेटेड कसं चालेल? पब्लिक फिगर आहे यार. कुछ सिंपल बट स्टिल इंप्रेसिव्ह करो. कॅरेक्टर ऍस्टेब्लिश करना है. टाइम कम है. चलो फटाफट सब रीसेट करो. मस्पा, साउंड बंद. माबोकर्स, ॲक्शन बंद. कॅमेरा, शटाप.
(वेमा इन द डेबू फिल्म डायरेक्टड बाइ अनुराग कश्यप)
मी माबो नसती तर कधीच लिहिती
मी माबो नसती तर कधीच लिहिती झाले नसते. बर्याच जणांशी आज जी मैत्री आहे ती झाली नसती. वेमा, अॅडमिन सगळ्यांना यासाठी कायमच धन्यवाद दिलेले आहेत.
अगदी.
>>>>+१
धन्यवाद वेबमास्तर. कृतज्ञ /\
सर्व फोटो मस्त आणि वृत्तांतही धमाल लिहिले आहेत.
साजिरा, राजा रवी वर्म्याचे हे चित्र भेट म्हणून दिलेले फार आवडले.
सुंदर वृत्तांत आणि सुंदर फोटो
सुंदर वृत्तांत आणि सुंदर फोटो.
आशु डी तू किती सुंदर दिसते आहेस साडीत.
इथे अनेकांनी मायबोलीबद्दल
इथे अनेकांनी मायबोलीबद्दल व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत.
वेमा मायबोलीवाले बाबा आहेतच.
साजिर्या, वाढदिवसाच्या
साजिर्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
इथे फिरकशीलच, म्हणुन देऊन ठेवतो
धन्यवाद रे दादा.
धन्यवाद रे दादा.
आअ होता का वाढदिवस साजिरा ?
आअ होता का वाढदिवस साजिरा ? अनेकोनेक शुभेच्छा !!
कालचा मुहूर्त हुकला.
सगळे वृत्तांत धमाल आणि फोटो
सगळे वृत्तांत धमाल आणि फोटो छानच. वृ वाचून प्रचंड फोमो आला असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते
फोटोतल्या माणसांपैकी फक्त वेमांना भेटले आहे आजपर्यंत. बाकीच्यांना भेटायला पण खूप आवडेल. पुढच्या वेळी पुणे ट्रिपच्या आधी इथे एक धागा काढावा काय?
अजयबाबा मायबोलीवाले >>>
साजिरा, चहा नाही मिळाला त्याचा इतका परिणाम?
मद्यलोक >>>>
साजिरा : तुझी पोस्ट विशेष पटली.
Pages