पुण्यात, शनिवारी २० जुलैला वेबमास्तरांबरोबर गटग

Submitted by webmaster on 17 July, 2024 - 06:31
ठिकाण/पत्ता: 
मल्टीस्पाईस, हर्षल पार्क, ४६/२ म्हात्रे पूल, सिद्धी गार्डनच्यासमोर, वकील नगर एरंडवणे , पुणे. ४११०५२

पुण्यात सहज शक्य असेल तर मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. जमलं तर येत्या शनिवारी , २० जुलै , २०२४ ला सकाळी ९:३० ला भेटूया.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 20, 2024 - 00:00 to 02:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Btw बोकलत इच्छा तेथे मार्ग.
एका पायावर यायची काही गरज नाही..
आरामात दोन पायावरच या (चालत) गोग्रास वाडीत. मग तिकडून एकत्र जाऊ पुण्याला.

आरामात दोन पायावरच या (चालत) गोग्रास वाडीत>>> अरे बापरे तुम्ही पण डोंबिवलीकर का? गोग्रास वाडीत रोज येतो मी, कंपनीत जायचा तोच रस्ता आहे माझा.

वेबमास्टर, खिशात थोडे पैसे ठेवा. पुणेकर तुमचे बिल देतीलच याची खात्री नाही.
मला मात्र अनेSSक वर्षांपूर्वी पुणेकरांनी वैशाली का कुठल्याश्या हॉटेलात फुकट चहा व बटाटे वडा दिला होता.
तुम्हालाहि देतील अशी आशा आहे.

पार्किंगची काय स्थिती असेल तिथे? मल्टीस्पाईस च्या रिव्ह्यूज मध्ये
Ample parking space असे अनेकांनी लिहिलेले दिसत आहे, तरीही विकेंड आहे म्हणून विचारत आहे.

मी पण येणार.

फक्त ९.३० जमणे अवघड आहे. दहा किंवा सव्वा दहा पर्यंत पोचेन.

अतुलदा पार्किंगला काही प्रॅाब्लेम नाही. मिळेल.

तुम्हाला किमया मध्ये पण खाऊ घातलं होतं पुणेकरांनी, विसरलात की काय? >>> सिरीयसली! आणि त्या बहुचर्चित वैशाली गटगला सुद्धा आधी वाडेश्वर मधे जागा नाही कळाल्यावर तेथून वैशाली पर्यंत खणलेले फुटपाथ, पाण्याचे की कचर्‍याचे टँकर्स या गराड्यातून सिक्रेट सर्विसच्या लोकांसारखे सर्व बाजूनी कव्हर करून नेले होते. नंतर बहुधा साजिर्‍याने गाडीने घरपोच सोडले ही होते.

मस्त बातमी वेमा! मी येऊ शकेन उद्या. भेटू.
खूप वर्षांपूर्वी याच जागी याच कारणासाठी झालेले गटग आठवले तेव्हा वेमांना गजांत लक्ष्मी आणि पगडी ची भेट दिली होती. बिलाचे काय घेऊन बसलात. एकदा गजांत लक्ष्मी दिली की कुठलेही बिल भरायची भीती नसते त्या माणसाला. Lol

वैशाली पर्यंत खणलेले फुटपाथ, पाण्याचे की कचर्‍याचे टँकर्स या गराड्यातून सिक्रेट सर्विसच्या लोकांसारखे सर्व बाजूनी कव्हर करून नेले होते>> अर्र. तुझ्या अजून लक्षात आले नाही? एफसी रोड वर या लोकांनी तुला कव्हर केले... कुणापासून.. तिथं तुम्हाला कचऱ्याचे आणि पाण्याचे टँकरच दिसतील अशी फिल्डींग लावली असणार. जेलस रे जेलस Lol

मला यायचं होतं पण एका कंटाळवाण्या कामात अडकले आहे. रविवारी मला (खरंखुरं) प्रेझेंटेशन द्यायचं आहे.
मी वेमांना संभाजी पार्क गटगला भेटले होते. आशूडी, हर्पेन, सई (दक्षिणाची ताई) हे सगळे होते. उसाचा रस प्यायलो होतो.
त्यावेळी बहुतेक साजिरापण होता. (किंवा मग मी आणि साजिरा गंधर्व गटगला भेटलो होतो. आठवत नाही. वय झालं. माझं. )

एकदा गजांत लक्ष्मी दिली की कुठलेही बिल भरायची भीती नसते त्या माणसाला >>>> खरी जुमा शोभत्येस. डायरेक्ट वेमांच्या गळ्यात बिल मारत्येस !!!! Lol

खरी जुमा शोभत्येस. डायरेक्ट वेमांच्या गळ्यात बिल मारत्येस !!!! Lol>> वेमा पुढच्या स्टॅन्ड अप कॉमेडीत ते एन्कॅश करतील Lol

अर्र. तुझ्या अजून लक्षात आले नाही? एफसी रोड वर या लोकांनी तुला कव्हर केले >>> Lol

वेमांना गजांत लक्ष्मी आणि पगडी ची भेट दिली होती. >>> मी होतो बहुतेक त्या गटगला. तीन रेस्टॉरंट्स मधे ते गटग झाले होते. जेथे जेवायला बसलो होतो तेथे वरून पाण्याचे फवारे मारले जात होते ("आता उठा" अशा अर्थाने नव्हे, पण मंगल कार्यालयात ही आयडिया वापरता येइल).

>>>"आता उठा" अशा अर्थाने नव्हे,
Lol Lol

मी मुंबईला एक अ त्यंत जवळचे लग्न अटेंड केले होते तिथे गुलाबपाण्याचे फवारे होते. पंख्यामधुन गुलाबजल बरसत होते. फार मेमरेबल आहे. काय सुगंधी व गार मस्त होते एकदम.

इतक्या वेळा मल्टी स्पाईसला गेलो असेन , पण पोस्टाचा पत्ता इथे पहिल्यांदाच समजला.
मल्टीस्पाईस, डीपी रोड, हार्वेस्ट क्लब च्या समोर किंवा जास्तीत जास्त पटवर्धन बागेच्या पुढे या इतकाच पत्ता माहिती होता.
सर्व्हे क्रमांक, वकील नगर हे शब्द पहिल्यांदाच कानी पडले आहेत. पुण्यात राहून.
जुने हार्वेस्ट क्लब हेच प्रसिद्ध होते आता त्याची जागा सिद्धी गार्डनने घेतली आहे. मल्टी स्पाईस पण गजबजले आहे.
सकाळी सुद्धा गर्दी असते.

नसतेच जमले यायला. उद्या मुलीच्या मैत्रिणींचे आईवडील त्यांच्या फ्लॅटवर येणार आहेत. गेट टूगेदर आहे.
पण त्यांना व्हायरल प्रसाद नको म्हणून तिकडेही जाणार नाही. त्यांनाही येऊ नका असे सांगितले आहे.

Pages