Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24
आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा
आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चवळी जरा त्रासदायक च असते पण.
चवळी जरा त्रासदायक च असते पण. छोटी चवळी असेल तर अगदी ६-८ तास भिजवून लगेच करावी, जरा जास्त भिजत ठेवली तर अंबुस वास यायला लागतो. कुकर मध्ये फोडणीस घालून चांगली गिर्र्रर्र शिजवलेली आवडते मला. नाहीतरी टणटणी उसळ वर भारत पाकिस्तान.. टणटणी म्हणजे चावायला विशेष कष्ट आणि भा-पा म्हणजे चवळी वेगळी आणि रस्सा वेगळा.
हो, छोटी चवळी चवीला जास्त
हो, छोटी चवळी चवीला जास्त चांगली. तसेच छोटे मसूर. हे दोन्ही देशी म्हणून मिळतात.
चवळी गरम पाण्यात १५ मि. ठेवली तरी कुकरला व्यवस्थित शिजते.
फोडणीचे नेहमीचे घालून झाले की, लगेच चवळीच परतायची, पाठोपाठ कोथिंबिर आणि गरम मसाला किंवा कांदा-लसूण चटणी. मग कांदा ई.
मसूर आणि मूगपण असे वेगळे लागतात.
मसूर आणि चवळीला मटण मसालापण छान लागतो.
चवळी आणि मसूर न भिजवता
चवळी आणि मसूर न भिजवता डायरेक्ट कुकर मध्ये ही मस्त शिजते. >>> +१
मी चवळी न भिजवता कुकर/
मी चवळी न भिजवता कुकर/ इन्सटा पॉट मधे डायरेक्ट शिजवते नेहमीच. तुरीच्या वरणाइतकाच टाइम पुरतो. आले, लसूण, खोबरे, बडीशेप, कांदा टोमॅटो आणि मालवणी मसाला घातलेली चवळीची उसळ आमच्याकडे फेवरेट आहे सगळ्यांची. त्यामुळे घरात कायम असतेच चवळी.
मी_अनु पांढरी चवळी, हिरवे
मी_अनु पांढरी चवळी, हिरवे वाटाणे, हिरवे मूग(अर्थात हे मोड आणून जास्त भारी लागतात) आणि ते हे .. काय बरं.. मसूर.. मसूर .. हे आपले दोस्त आहेत/असतात.
रात्री झोपताना भिजत घातले नि सकाळी उठून डायरेक्ट फोडणीवर २ शिट्या मारल्या / काढल्या की उसळ तयार!!
नि याउलट काळे वाटाणे, हरभरे राजमा दुकानात छान दिसतात, ते फक्त सासूबाई लेवलच्या व्यक्तींनी शिजवायचे असतात. आपण फक्त हळहळायचे यांची उसळ किती भारी लागते ना ..वगैरे
मसूर .. हे आपले दोस्त आहेत
मसूर .. हे आपले दोस्त आहेत/असतात. >>>> अगदी अगदी.
मसूर रात्री भिजवले तर सकाळी कूकरचीही गरज नाही झाकण लावून कढईतही शिजतात.
डाळ कांद्यासाठी तर मसूर डाळ बेस्ट. पाऊण तास भिजवा आणि भाजी करून मोकळे व्हा.
मसूराबद्दल, सहमत. आवडीचे
मसूराबद्दल, सहमत. आवडीचे कडधान्य.
मी चवळी आणि राजमा आणि काळे
मी चवळी आणि राजमा आणि काळे वाटाणे चॅलेंजड आहे(चवळी काळे वाटाणे आणि ते पोलीस आणि डबलबी हे तसेही घरी आले जात नाही जास्त), बाकी छोले मसूर मटकी मूग या भावांशी चांगली मैत्री आहे.नीट शिजतात.
मोठी चवळी मलाही आवडत नाही.पण जवळ आणि इंस्टामार्ट वर तीच मिळते.
गावरान मसूर केले आहेत.चांगले लागतात.
चवळी माझी आवडती आहे. देशात
चवळी माझी आवडती आहे. देशात असताना तर कोवळी मिळायची ती सोलून भाजी / उसळी साठी उरण्याआधी बरीच तशीच खाल्ली जायची.
भिजवून कुकरला शिजवून घेतली की बऱ्याच प्रकारे करता येते. कांदा लसूण टोमॅटो घालून , गूळ गोडा मसाला आमसूल घालून, लसूण खोबरे घालून अशी वेगवेगळ्या पद्धतींनी केली जाते.
मी चवळी न भिजवता कुकर/ इन्सटा
मी चवळी न भिजवता कुकर/ इन्सटा पॉट मधे डायरेक्ट शिजवते नेहमीच.>>>मऊ शिजते का अशी?मी न भिजवता कधिच केलेली नाहि कुठलिच कडधान्य...इपॉ ला काय सेटिन्गला लावतेस?
इंपॉ हाय प्रेशर सेटिंग ला ११
इंपॉ हाय प्रेशर सेटिंग ला ११-१२ मिनिट. व्यवस्थित मऊ शिजते. उसळ अगदी दाट मिळून येण्याइतपत.
थॅन्क्स मै! आता अशी करुन बघते
थॅन्क्स मै! आता अशी करुन बघते
मला ना हे सारखं चवळी चवळी
मला ना हे सारखं चवळी चवळी वाचून सतीश तारे यांचं एक स्किट आठवलं...बहुतेक फु बाई फू मधल...बहुतेक सविता मालपेकर यांच्याबरोबर..त्यात एक वाक्य होत...
आधी चवळी पडली मग कवळी पडली....जाम हसले होते तेव्हा..
थोड विषयांतर झालं...
मला ना हे सारखं चवळी चवळी
.
अंजली कुल, तुझ्या
अंजली कुल, तुझ्या प्रतिसादावरून आपण सगळे राजमा शिजत नाही म्हणून घर बदलायला निघालो होतो तसं 'आता काय काळे वाटाणे नीट शिजावे म्हणून स्वतः सासू बनायचं की काय'
झालं.
काल रात्री ( तोच तो फेमस)
काल रात्री ( तोच तो फेमस) राजमा भिजवला. सकाळी छोट्या कूकरमधे 4 शिट्ट्यात मस्त शिजला. इतक्या पटकन शिजल्यामुळे तो राजमा नसावाच अशी शंका येतेय.
किंवा माझ्या पत्रिकेत कुठलेतरी ग्रह उच्च असणार.
माझ्या पत्रिकेत कुठलेतरी ग्रह
माझ्या पत्रिकेत कुठलेतरी ग्रह उच्च असणार >>> तुला राज(मा)योग असेल बघ पत्रिकेत
ऐकीव आणि स्व-खातरजमा
ऐकीव आणि स्व-खातरजमा केल्यानंतरची एक टीप - अल्युमिनियमच्या कुकर मध्ये रात्रभर भिजवलेले राजमा आणि छोले उत्तम आणि पटकन शिजतात. बेबी कुकरमध्ये डायरेक्ट शिजवायचे. स्टील कुकरला हि मंडळी फार नाठाळपणा करतात. माझ्याकडे एक अल्युमिनियम कुकर फक्त राजमा आणि छोल्यांसाठी ठेवला आहे.
का माहिती नाही पण करून बघा.
आणि हो, जम्मू राजमा (छोटा डार्क रंगांचा) किंवा मोठा भुऱ्या रंगाचा (ज रा नाहीच मिळाला तरच ) वापरावा. मोठ्या डार्कचा मोडेन, वाकेन पण शिजणार नाही हा बाणा असतोय!
ओके.हे बरोबर वाटतंय.ज्यात
ओके.हे बरोबर वाटतंय.ज्यात गोष्टी त्यातल्या त्यात चांगल्या शिजल्या तो अल्युमिनियम कुकर आहे.
आजच छोले भिजवलेत.होऊन जाऊदे दूध का दूध पानी का पानी.
हो चवळीला तिच्या मोड वर जाऊ
हो चवळीला तिच्या मोड वर जाऊ द्यायची गरज नाही
(ईस मोड पे जाते है..) असे वाईट जोक सुचतात कधीकधी 
पण बिन भिजवता मी तरी द्विदल हाफ डाळी सोडून कढधान्य कधी केलेली नाहीत, पोटाला त्रास होऊ शकतो असे आई म्हणायची..
अॅल्युमिनियम कुकर बद्दल १ डाव मापी द्याल समजून बोलते..अर्रे अल्युमिनियम हद्दपार करत आहात ना स्वैपाकघरातून?? इतके मजबूर झालात राजमा शिजवायला की अल्यु. कूकर काढलात
आयुष्यात असे निर्णय घ्यावेच
आयुष्यात असे निर्णय घ्यावेच लागतात
टणटण राजमा आणि स्टील निवडायचे की अल्युमिनियम आणि मऊ राजमा. सोफीज चॉईस 
राजमा मऊ शिजायसाठी इथे लोक घर आणि शहर बदलायला तयार आहेत,कुकर बहुत छोटी चीज.
पण मला एक समजत नाही, तुम्ही
पण मला एक समजत नाही, तुम्ही लोक करवंटीचा तुकडा का नाही आणून ठेवत घरात? खरंच करवंटीचा तुकडा, यू नो, अॅक्ट्स अॅज अ कॅटॅलिस्ट! मी छोले, काळे वाटाणे ही मंडळी त्या तुकड्याच्या जिवावर आरामात ३-४ शिट्ट्यांत शिजवली आहेत. सोडा नाही न काही नाही नि कटकट नाही. माझा स्टील कुकर आहे. साबांनी हौसेने अगदी सपाट बुडाचा, पुढेमागे इंडक्शन घेतलं तर असूदे असा विचार करून वगैरे घेतला होता ८-१० वर्षांपूर्वीच. इंडक्शन नाही, पण एरवी रोजचा भात त्यातच होतो.
त्यासाठी घरात नारळ आणल्यावर
त्यासाठी घरात नारळ आणल्यावर लक्षात ठेवलं पाहिजे
नाहीतर आजूबाजूला नारळवाले
नाहीतर आजूबाजूला नारळवाले किंवा दुकानात नारळ विकणारे जे नारळ फोडूनही देतात त्यांच्याकडून (नाहीतर देवळातून
) ४-५ तुकडे आणून ठेवायचे करवंटीचे. (मग ते दुकानदार जर पक्के गुज्जु मारवाडी वगैरे असतील तर त्या तुकड्यांचापण बिझनेस करतील!
)
आता नक्की लक्षात ठेवेन
आता नक्की लक्षात ठेवेन
तुम्ही लोक करवंटीचा तुकडा का
तुम्ही लोक करवंटीचा तुकडा का नाही आणून ठेवत घरात? >> याने काय होईल
तो तुकडा टाकतात बहुतेक राजमा
तो तुकडा टाकतात बहुतेक राजमा/छोले बरोबर कुकरमधे शिजताना.
असं नको व्हायला नाहीतर तो तुकडाच शिजायचा आणि राजमा/छोले करवंटीसारखे
तुम्ही लोक करवंटीचा तुकडा का नाही आणून ठेवत घरात >>>> माकाचु मधे हा प्रश्न यायला वाव होता. मी करवंटीचा तुकडा आणून ठेवला घरात पण तरी छोले शिजले नाही... माकाचु
मी करवंटीचा तुकडा आणून ठेवला
मी करवंटीचा तुकडा आणून ठेवला घरात पण तरी छोले शिजले नाही >>>
(No subject)
नाहीतर तो तुकडाच शिजायचा आणि
नाहीतर तो तुकडाच शिजायचा आणि राजमा/छोले करवंटीसारखे >>
(No subject)
आणून ठेवला घरात पण तरी छोले
आणून ठेवला घरात पण तरी छोले शिजले नाही... माकाचु
लोल करंवटी घरात आणून ठेवली
लोल करंवटी घरात आणून ठेवली पण राजमा शिजला नाही..
करवंटीचा तुकडा घालून पण राजमा नाही शिजला तर? करवंटीचा एकच तुकडा पुन्हा पुन्हा वापरू शकतो का दर वेळी नवीन वापरायचा?
मी तर राजमा, छोले, काळे वाटाणे आणि हरभरे यांच्यापासून कायमची फारकत घेतली आहे. हेच कारण मला शिजवता येत नाहीत नीट. त्यातल्या त्यात मूग, मसूर, मटकी, पिवळे वाटाणे, आणि कधी मधी चवळी... इतकंच..
सगळ्या पोस्ट रोल ! मी बारा
सगळ्या पोस्ट रोल ! मी बारा तास भिजवलेले छोले राजमा घड्याळ लावून बारीक गॅसवर ५० मि शिजवणे. ही टीप ह्यापूर्वी दिलीये...
तुम्ही बारा तास भिजवलेले
तुम्ही बारा तास भिजवलेले राजमा सगळ्यांना कसे मिळणार?

घड्याळ लावायलाच हवं का? किचन टायमर किंवा फोनचा टायमर चालणार नाही का?
तुम्ही बारा तास भिजवलेले
तुम्ही बारा तास भिजवलेले राजमा सगळ्यांना कसे मिळणार?
तुम्ही लोक करवंटीचा तुकडा का
तुम्ही लोक करवंटीचा तुकडा का नाही आणून ठेवत घरात >>>> माकाचु मधे हा प्रश्न यायला वाव होता. मी करवंटीचा तुकडा आणून ठेवला घरात पण तरी छोले शिजले नाही... माकाचु>>>
अरे काय !
करवंटीचा तुकडा कठीण अशा कडधान्याबरोबर शिजायला ठेवला की कडधान्य मऊ शिजतं. एक तुकडा २-३ वेळा वापरू शकतो. त्याहून जास्त मी वापरला नाही कारण आमच्या कामाच्या ताईंनी तो झपाट्याने टाकून एक काम उरकलं दरवेळी. आणि मला ८-१० दिवसाला एक नारळ लागतोच त्यामुळे मीपण जास्त लोड नाही घेत. नवीन तुकडा असतोच.
अशी काय जादू होत असेल या
अशी काय जादू होत असेल या
अशी काय जादू होत असेल या करवंटीच्या तुकड्याने >> काही तरी एन्झाइम्स असतील. मटणाला कच्च्या पपईच्या किसाने मॅरीनेट करतात तसं काही असेल.
Heat observe होऊन स्लो बुकिंग
Heat observe होऊन स्लो बुकिंग होतं असावं... जसं दूध आठवताना लाकडी चमचा टाकतात दूध उतू जाऊ नये म्हणून..
भरत,
मी करवंटीचा तुकडा आणून ठेवला
मी करवंटीचा तुकडा आणून ठेवला घरात पण तरी छोले शिजले नाही... माकाचु Wink>>>>>
घरात ठेऊन शिजणार नाही.. कुकरात छोल्यांच्या सोबत ठेवा, खालुन गॅस सुरु करा आणि शिट्ट्या मोजा…
माबोवर असे उत्तर मिळायचे चाण्सेस जास्त आहेत.
तुकड्याचं अणकुचीदार टोक
तुकड्याचं अणकुचीदार टोक शक्यतो आग्नेयेला तोंड करून हवं.म्हणजे मग अग्नीला छेद जाऊन अग्नी योग्य त्या ठिकाणी थांबून राजमा एकदम मऊ शिजतो.
आई आई गं आई!! बेक्कार हसले ह
आई आई गं आई!! बेक्कार हसले ह ह पु वा पेक्षा जास्त..! डेंजर आहात तुम्ही एकेक .. करवंटीच्या तुकड्याचे नाटक करून बघायला हवे खरेच, इतके सगळे सांगतायत तर!! मला तरी ऍल्युमिनिअमच्या कुकरचा असा अनुभव आला नाहीय बॉ! कितीतरी वेळा हरभरे त्यात उकडलेले आहेत ६-६ शिट्या केल्या तरी okok शिजतात .. आणि याउलट चुकून एका ऐवजी २ शिट्या झाल्या तर मुगाचे मेण होते ..!
आता या छोले राजमा काळे वाटाणे व करवंटी च्या नादात नालासाठी घोडा गेला असे करावे लागणार आहे मला
आवरा
आवरा
तरी माझे नशीब अत्यंत जोरावर
तरी माझे नशीब अत्यंत जोरावर असल्याने इथे(जर्मनीत)टिनpacked boiled छोले व boiled राजमा मिळतात
पण ते राजमा दरवेळी taccos किंवा तत्सम मेक्सिकन गोष्टी बनवायलाच वापरले आहेत कधी पंजाबी राजमा करायचे डोक्यातच आले नाही!! छोले मात्र weekly एकदा केले जातात पंजाबी style. अगदी मऊसूत छान शिजलेले असतात
राजमा जरा अति शिजलेला किंवा पाणचट दिसतो.. त्याचे पंजाबी राजमा करताना राजमा पिठले असा नवीन पदार्थ जन्माला येईल असे वाटते
मुगाचे मेण
मुगाचे मेण
करवंटी तुकडा आई वापरायची.
करवंटी तुकडा आई वापरायची. लवकर न शिजणाऱ्या गोष्टींसाठी, तो पदार्थ शिजवताना सोबत टाकायची (घालायची), हे मलाही आठवतंय. पदार्थ नीट शिजयचा हे ही आठवतंय.
मी मात्र हा प्रयोग कधी केला नाही.
@anjali-kool तुमच्या इथल्या
@anjali-kool तुमच्या इथल्या राजमा विकाणाऱ्याने अनेको करवंट्या ढकलल्या असतील राजमा शिजवताना precaution म्हणून,त्यामुळे जास्त शिजले असतील.स्वानुभाव आहे,मी पण precaution म्हणून अति भिजवते, आणि अति शिट्या काढते.टन टणा टण पेक्षा पिठलं बर म्हणून
@अंजली, मीही ते प्री cooked
@अंजली, मीही ते प्री cooked छोले वापरलेत बऱ्याचदा पण त्या सोबतच्या पाण्यात एक चिकटपणा जाणवतो म्हणून खूप वेळा धुते, किंवा इथे बऱ्याच टर्किश दुकानात जाडे भरडे छोले मिळतात ते आणून भिजवते, दिवसातून दोन वेळा पाणी बदलते आणि मग च शिजवते ( थोडीक्यात बरेच पाणी वाया घालवते)
अशी काय जादू होत असेल या
अशी काय जादू होत असेल या करवंटीच्या तुकड्याने >> काही तरी एन्झाइम्स असतील. मटणाला कच्च्या पपईच्या किसाने मॅरीनेट करतात तसं काही असेल.
आमच्याकडे मटण नीट शिजत नसेल तर करवंटीचा तुकडा टाकतात. मी स्वतः सुद्धा हेच करते. चांगले शिजते मटण.
Pages