https://cdn.bmm2024.org/wp-content/uploads/2024/06/BMM-Ebook-25.06.2024.pdf
ह्या लिंक वरून तुम्हाला स्मरणिकेचे ईबुक व्हर्जन डाउनलोड करता येईल.
ही pdf इंटरॅक्टिव्ह आहे. सर्व लेख आणि कवितांच्या शिर्षकाशेजारी एक निळे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक केलत तर त्या लेखाची / कवितेची ऑडिओ लिंक उघडेल आणि तुम्हाला तो लेख/ कविता ऐकता येईल.
ई-बुक आणि ऑडिओ बुक करण्यामागे दोन हेतू होते एक "गो ग्रीन" कागद पर्यायाने झाडांची बचत आणि स्मरणिका संमेलनाला येऊ न शकलेल्या अनेक वाचकांपर्यंत ती पोहोचवता येईल.
******
माबो करान्साठी यात एक विशेष गोष्ट आहे, मायबोली सुरु करणारे "अजय गल्लेवाले" यान्ची मुलाखत..
*******
साठच्या दशकात मराठी माणूस अमेरिकेत आला. हळू हळू स्थिरावला. इकडच्या संस्कृतीत समरस होताना तो आपली संस्कृती जतन करून पुढील पिढीला ती संस्कारमूल्ये देत गेला. त्याला केंद्रस्थानी ठेवून स्मरणिकेचा विषय ठरविला, “मराठी माणसाला अमेरिकेचा रंग, अमेरिकेला मराठी माणसाचा रंग“. मग मुख्य विषयावर आधारित काही उपविषय ठरविले जसे मराठी माणूस इकडे कसा मिसळत गेला, त्याने कर्मभूमीला दिलेलं योगदान, जतन केलेल्या परंपरा, साठीच्या दशकात आलेल्यांनी अनुभवलेली नवलाई. जेणे करून इथे स्थिरावताना आलेले अनुभव इतरांना सांगण्याची संधी मिळेल. अमेरिकेत झेंडा रोवलेल्या प्रतिथयश मराठी माणसांचे कौतुक करता येईल.
तुम्हाला यात
"जपत वारसा परंपरेचा.. " मध्ये अमेरिकेत मराठी संस्कृतीचा वारसा जपणारी काही मंडळी आहेत त्यांच्या प्रयत्नांविषयी काही जाणून घेता येईल.
जसं बे एरियात सुरु केलेली पारंपरिक "विठोबा वारी", निसर्गामध्ये विठ्ठलाचे रूप शोधता शोधता सुरु झालेली "निसर्गवारी", विठोबाच्या अभंगांना सुलेखनासह जगभर पसरवण्याची मनीषा बाळगत सुरु झालेली "अक्षरकला वारी", वडिलोपार्जित मिळालेला वारसा अखंड चालू ठेवलेली कीर्तनपरंपरा, आणि मराठी मनात खोलवर रुजलेली नाट्यपरंपरा इकडेही चालू ठेवणारे नाट्यप्रेमी.
"मराठी पाऊल पडते पुढे.. " मध्ये आपापल्या कार्यक्षेत्रात झेंडा रोवणाऱ्या, इकडील समाजासाठी कार्य किंवा मदत करणाऱ्या, वेगळ्या वाटा शोधणाऱ्या मराठी मंडळींच्या मुलाखती घेतल्या आहेत.
यात आहेत National Medal of Technology and Innovation सन्मानित अशोक गाडगीळ, Top 50 Women in Tech ह्या 'फोर्ब्स' च्या यादीत मनाचे स्थान मिळवलेली नेहा नारखेडे, ड्रग डिलिव्हरीचे अध्वर्यू डॉ. समीर मित्रगोत्री, महाराष्ट्रातून आलेली होतकरू अंतराळवीर अनिमा पाटील, गिफ्टेड मुलांसाठी शिक्षण क्षेत्रात संशोधन करणारे आकाश चौकसे, आणि जगभरातील मराठी लोकांसाठी पाहिलं मराठी पोर्टल चालू करणारे अजय गल्लेवाले.
"रंगुनी रंगात साऱ्या ... " मध्ये अमेरिकेत स्थिरावताना आलेले अनुभव, आंबटगोड आठवणी
"अमेरिकेतील अ आ इ.. " मध्ये १९६० च्या दशकात अनुभवलेली अमेरिका ..
"खारीचा वाटा .. " मध्ये कर्मभूमी प्रति दाखविलेले उत्तरदायित्व ..
असे अनेक विषयांवरचे लेख, अनुभव, दोन शहाणपणाच्या गोष्टी, कविता वाचता , ऐकता येतील.
त्या व्यतिरिक्त छोटया मुलांनी सांगितलेल्या मराठी शिकताना होणाऱ्या गमती जमती, काढलेली चित्रे, तरुणांचे मिम्स पाहता वाचता येतील, त्यांची भाषणे, रॅप सॉंग्स ऐकता येतील.
ही स्मरणिका तयार होण्यामागे बऱ्याच जणांचे कष्ट आणि सदिच्छा आहेत. एक विनंती, ही pdf वाचनाची किंवा साहित्याची आवड असणाऱ्या तुमच्या माहितीतील मराठी वाचकांपर्यंत पोहोचवा.
तुम्हाला स्मरणिका आवडली असल्यास
Smaranika bmm2024.org ह्या पत्त्यावर जरूर कळवा.
कशात लपली आहे इबुक डाऊनलोड
कशात लपली आहे इबुक डाऊनलोड लिंक?
Srd लिंक लपली होती खरी..
Srd लिंक लपली होती खरी.. बाहेर काढलं तिला..
लिंक ओपन होत नाहीये मला तरी .
लिंक ओपन होत नाहीये मला तरी ....
Link ४०४ आहे. उघडत नाही
Link ४०४ आहे. उघडत नाही
स्मरणिका डाउनलोड करण्यासाठी
स्मरणिका डाउनलोड करण्यासाठी इथे टिचकी मारा.
मुख्य साईट होम पेजवर लिंक्स
मुख्य साईट होम पेजवर लिंक्स शेवटी खाली सापडल्या
>>SMARANIKA
>>>E BOOK LINK
https://bmm2024.org/smaranika/
३२८ पानांचं(15MB) pdf लेखन आहे आणि अनुक्रमणिकेतून थेट हव्या त्या लेखावर जाता येतंय. वेळ लागेल वाचायला.
पण एकूण सादरीकरण सुंदर आहे. धन्यवाद.
Sorry .. काय झालं माहीत नाही.
Sorry .. काय झालं माहीत नाही.. मी लिंक नुसती टाकली आहे. ती चलत्ये.
३२८ पानांचं(15MB) pdf लेखन
३२८ पानांचं(15MB) pdf लेखन आहे >>> १०९ पानापासून साहित्य सुरू होते.
पण एकूण सादरीकरण सुंदर आहे.>>> धन्यवाद
मा बो कर अजय गल्लेवले ह्यांची मुलाखत पान २१६.
निळ्यावर क्लिक केल्यावर ऑडियो
निळ्यावर क्लिक केल्यावर ऑडियो वगैरे होत नाहीये
हे क्लिक केल्यावरही काही नाही
हे क्लिक केल्यावरही काही नाही का वाजलं??
Audio settings phoneच्या
Audio settings phoneच्या सेटिंग्ज मधून करावे लागते मराठी भाषेचे. मग तसल्या pdf reader मधून उघडल्यावर ऐकता येते. परंतू मराठी वाचन म्हणजे कधीकधी कानडी बोलणारा कुणी मराठी वाचतोय असे उच्चार असतात. पण तो दोष ब्राउजरचा आणि ओएसचा असतो. त्याला उपाय नाही. साईटने अगोदरच ओडिओ फाईल ( वाचन)अपलोड केली असेल वेगळी तर मात्र इतर ओडीओबुकसारखा अनुभव येईल. शक्यता कमी वाटतेय कारण संपूर्ण स्मरणिका लेखन साईज फक्त १५ एमबी आहे.
मला वाटतं लिंक क्लिक केल्यावर
मला वाटतं लिंक क्लिक केल्यावर audio window open होऊन ती वाजायला पाहिजे ... आम्ही बऱ्याच devices वर टेस्ट केलंय.
नाही चाललं तर कळवा.
लिंक क्लिक केल्यावर ऑडिओ
लिंक क्लिक केल्यावर ऑडिओ विंडो उघडते आहे. आणि स्पष्ट मराठीत अभिवाचन ऐकता येते आहे.
मला भावलेलं टेक्सास
हो चालते आहे.
हो चालते आहे.
चालली ......
चालली ......
Great! Thanks
Great! Thanks
अतिशय सुरेख रचना आणि मजकूर
अतिशय सुरेख रचना आणि मजकूर असलेला अंक. लहानपणी मोठ्ठा दिवाळी अंक हाती आल्यावर जसा आनंद व्हायचा तसं काहीसं वाटलं अंक पाहून.अभिमानही वाटला.. चवीचवीने सावकाश वाचतेय. अंकासाठी व एकंदर BMM मध्ये मेहनत घेणाऱ्या सर्वांचं कौतुक. srd आणि इतरही ज्यांनी इथे लिंक दिल्यात, त्यांना धन्यवाद. (लेखामधील लिंक उघडली नाही.) छन्दिफन्दि, इथे स्मरणिकेचे सांगितलेत म्हणून आभार.
अतिशय सुबक अंक.... खूप मेहनत
अतिशय सुबक अंक.... खूप मेहनत घेतलीय आणि दर्जेदार अंक प्रकाशित केला आहे... छन्दिफन्दि यांचे विशेष आभार
प्रतिसादाबद्दल मनापासून
प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! तुमचे प्रतिसाद टीम पर्यंत पोहोचवते. त्यांना नक्कीच छान वाटेल.
छन्दिफन्दि,
छन्दिफन्दि,
स्मरणिकेबद्दल इथे सांगितले यासाठी आभार.
छान आहेत काही लेख.
धन्यवाद ऋतुराज!
धन्यवाद ऋतुराज!
अतिशय सुरेख रचना आणि मजकूर
अतिशय सुरेख रचना आणि मजकूर असलेला अंक. लहानपणी मोठ्ठा दिवाळी अंक हाती आल्यावर जसा आनंद व्हायचा तसं काहीसं वाटलं अंक पाहून.अभिमानही वाटला.. चवीचवीने सावकाश वाचतेय. अंकासाठी व एकंदर BMM मध्ये मेहनत घेणाऱ्या सर्वांचं कौतुक. srd आणि इतरही ज्यांनी इथे लिंक दिल्यात, त्यांना धन्यवाद. (लेखामधील लिंक उघडली नाही.) छन्दिफन्दि, इथे स्मरणिकेचे सांगितलेत म्हणून आभार.>>>+१ सगळ्यात आधी अजय गल्लेवाल यांची मुलाखत वाचून काढली. बाकी अंक जस्ट स्क्रोल केला. बरच काही आहे वाचायला. आता हळू हळू एकेक वाचेन वेळ मिळेल तसा.
सगळ्यात आधी अजय गल्लेवाल
सगळ्यात आधी अजय गल्लेवाल यांची मुलाखत वाचून >>
कविन, thank you !
अंक सर्व वाचला.
अंक सर्व वाचला.
मंडळाचा उपक्रम आवडला.
Srd धन्यवाद!
Srd धन्यवाद!
ई - बुक व ऑडिओ असे करता येईल
ई - बुक व ऑडिओ असे करता येईल का शीर्षक?
ॠणप्रभारित अनुकणान्वित पुस्तक
ॠणप्रभारित अनुकणान्वित पुस्तक आणि श्राव्य पुस्तक असेही करता येईल.
स्मरणिकेतील हा लेख.
स्मरणिकेतील हा लेख. गेल्यावर्षी पहिल्यांदाच बे एरियामध्ये झालेल्या वारीविषयी..
उत्तर अमेरिकेत मराठी संस्कृती आणि वारसा जपणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी हा एक लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळालेला एक उत्सव!
Bmm2024 व्ह्या स्मरणिकेतील हा लेख. गेल्यावर्षी पहिल्यांदाच बे एरियामध्ये झालेल्या वारीविषयी..
उत्तर अमेरिकेत मराठी संस्कृती आणि वारसा जपणाऱ्या अनेक उपक्रमांपैकी हा एक लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळालेला एक उत्सव!
गेल्यावर्षी अनुभवलेली ही सॅन होजे तील वारी ह्या वर्षी नक्कीच दुप्पट उत्साहात आणि जल्लोषात पार पडली असणार ह्यात शंका नाही.
पुढाकार घेऊन आयोजन करणाऱ्या Bhaskar Ranade , Veena Uttarwar , आणि Mmba SF च्या सर्व कार्यकर्त्यांच खूप अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद!!
***
अवघे गर्जे पंढरपूर…सॅन होजे!
_____________________________________________________
वारीची आठशे वर्षांची परंपरा यावर्षी पासून कॅलिफोर्नियाच्या बे एरियामध्ये सुरू करण्यात आली आणि शेकडो मराठी लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. आपण अमेरिकेत आहोत आणि “ग्यानबा तुकाराम” ऐकत आहोत यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. पहिल्याच वर्षी दिसून आलेला तरुणांचा उत्साह, हा वारसा येथील मराठी पिढी जपेल आणि पुढे चालवेल ह्याची खात्री पटवत होता
_____________________________________________________
“त्या विठूचा गजर, हरी नामाचा झेंडा रोविला…त्या विठूचा…”
विठू नामाच्या गजरात तल्लीन होऊन, विठ्ठलाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने, पाऊले नाचवित निघालेला लाखोंचा जनसागर म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात वसलेली पंढरीची वारी. देहू-आळंदीहून निघालेल्या पालख्या २१ दिवस प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपुरी पोहचतात. केवळ महाराष्ट्राच्याच काना-कोपऱ्यातून नव्हे तर बाहेरील देशातील मराठीजनही ह्या वारीत मोठया संख्येने सामील होतात.
यंदा सॅनफ्रान्सिस्को बे एरियातील काही मंडळी पंढरपूरच्या वारीला निघणार होती. त्यानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमात प्रथमच बे एरिया मधील वारीची बीजं रुजली गेली. MMBA (महाराष्ट्र मंडळ बे एरिया) चे अध्यक्ष भास्कर रानडे आणि वीणाताई उत्तरवार ह्यांना ही वारीची धाडसी कल्पना सुचली.
धाडसी अशासाठी की, वारीला प्रतिसाद मिळेल की नाही, लोकं वीकएंडना इतक्या सकाळी उठून येतील का ? असे अनेक किंतु मनात होते. कोणी बरोबर आले तर ठीक. नाहीतर आपण तरी सुरुवात करू ह्या विचाराने पहिली पावले उचलली गेली.
असे ठरले की - १० जूनला, ज्या दिवशी आळंदीहून वारीला प्रारंभ होतो त्याच दिवशी बे एरिया वारीला सुरुवात करायची. आणि त्यानंतर आषाढी एकादशीपर्यंत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी, एकूण 3 वीकएंडना सकाळी सात वाजता रिव्हरव्यू पार्क, सॅन होजे पासून वारीला सुरुवात करून, साधारण साडेतीन मैलांवर असलेल्या बालाजी मंदिरात सांगता करायची. मग अमेरिका स्टाइल अत्यावश्यक त्या परवानग्या घेणे, लोकांना सहभागासाठी डिजिटली निमंत्रित करणे ही सगळी कामे सुरू झाली. वारीचा बराचसा मार्ग एका पार्कमधील पायवाटेवरून असल्याने आजूबाजूच्या लोकाना त्रास होण्याचा किंवा रहदारीला अडथळा येण्याचा तसा फारसा त्रास उद्भवणार नव्हता.
ठरलेल्या ठिकाणी सकाळी पावणेसात पासूनच साड्या, पंजाबी ड्रेस, पांढरे-भगवे कुडते, डोक्यावर पांढऱ्या टोप्या, उपरणी आदी पारंपरिक पोषाखातील बायामाणसे, मुलं-मुली यांचा मेळा भरायला सुरुवात झाली. उंचावलेले भगवे झेंडे, झांजांची किणकिण, स्वागताला लावलेला चंदनाचा उर्ध्वपुंड्र वैष्णव टिळा आणि आसमंतात पसरलेला उत्साह नवोदितांना चटकन आपल्यात सामावून घेत होता. महाराष्ट्रापासून हजारो मैल दूर, कॅलिफोर्नियातील बे एरियात, सगळी मंडळी वारीला जमली होती. मराठी माणूस महाराष्ट्राच्या बाहेर गेला तरी त्याच मराठीपण तो त्याच्याबरोबर घेऊनच जातो त्यामुळे ही मराठी मनं वारीकडे नाही धावली तरच नवल. वयस्कर मंडळी, त्यांना सावकाश घेऊन जाणारी त्यांची मुलं-मुली, सुना-जावई, stroller मध्ये किंवा पाठुंगळी लेकरांना घेऊन पायी निघालेले लेकुरवाळे आईबाप, काही आजीआजोबा नातवंडांसोबत आणि जोशात मार्गक्रमण करणारी तरुण पिढी.. ह्या सगळ्यांना जोडणारा एकच समान धागा होता तो त्या पांडुरंगाच्या भक्तीचा. एव्हढ्या मोठ्या संख्येने, काहीतरी गात, वाजवत तरीही शिस्तीत उजव्या बाजूने जाणारी मंडळी बघून नेहेमीच्या मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंगसाठी आलेली स्थानिक गोरी मंडळीही अचंबित होऊन, हसून छानस अभिवादन करून जात.
डोक्यावर तुळशीची कुंडी, हातात छोटी विठ्ठल रखुमाईची मूर्ती, भगवे झेंडे, मुखी हरिनामाचा गजर, अगदी भक्तिमय वातावरणात मार्गस्थ झालेली दिंडी ...आपण अमेरिकेत नाही तर प्रत्यक्ष आळंदी-पंढरपूरच्या वाटेवर आहोत, असे भासवत होती. सकाळच्या गारव्यात, झांजांच्या गजरात, विठूमाऊलीच्या, ग्यानबा-तुकारामाच्या जयघोषात, साडेतीन मैलाचे अंतर अगदी सहज पार पडे.
मंदिराच्या आवारात पोहोचल्यावर, अंगणातल्या तुळशी वृंदावनासमोर विठोबा रखुमाईच्या अतिशय रेखीव मूर्तींची पूजा मांडून भोवती रिंगण केले जाई. पुनः एकदा बालाजी मंदिराचा परिसर ज्ञानोबा, तुकोबा आणि पांडुरंगाच्या नामात न्हाऊन जाई. मग गाभाऱ्यात सुंदर भजने, अभंग म्हंटले जात. ह्या गायनात अगदी इकडेच वाढलेली ७-८ वर्षांची मुले ते पंढरपूरवारीचा अनुभव गाठीशी असलेले वारकरी आजोबा अगदी सारख्याच उत्साहाने सामील होत असत. त्यानंतर होणाऱ्या साग्रसंगीत आरत्यानी अवघा गाभारा दुमदुमून जाई तर पसायदानाच्या पवित्र धीरगंभीर सुरांनी अवघा आसमंत पवित्र होई. अकराच्या दरम्यान प्रसाद घेऊन मंडळी मार्गस्थ होत. पहिल्या दिवशीच्या वारीला स्थानिक स्पार्टन ढोल-ताशा पथकाने कडकडीत सलामी दिली आणि या मंगल दिनाची सांगता झाली.
दर वारीच्या दिवशी कोणी आपापल्या घराच्या बागेतून जमतील तितकी फुले - दुर्वा - तुळशी आणत, पाच सहा जणी मिळून त्याचा हार करीत, तर कोणी दिडएकशे माणसांसाठी प्रसाद बनवून आणे. अगदी गावच्या उत्सवाला सगळ्या गावाने मिळून तयारी करावी तसेच काहीसे निर्मळ आणि उत्साहीत वातावरण असे.
जिथे कोणी येईल की नाही अशी शंका वाटत होती तिथे तीन शनिवार आणि रविवारी मिळून झालेल्या या वारीत सातशेहून जास्त लोकांनीं सक्रिय सहभाग घेऊन एक सुखद धक्काच दिला.
आषाढी एकादशीला, २९ जूनला, बालाजी मंदिरात वारीची सांगता झाली. त्या दिवशी मंदिराच्या प्रांगणात संस्कार भारतीची छान रांगोळी काढली गेली होती. आठवड्याचा मधला दिवस असूनही , दुपारी दोन पासूनच, छान पारंपरीक पाचवारी-नऊवारी साड्या, नथी, अलंकार लेवून आलेला महिला वर्ग, परकर-पोलकें घातलेल्या छोट्या चिमुरड्या रुख्मिणी, कुडते धोतर घातलेले बाल-विठोबा ह्यांनी अवघा परिसर फुलून गेला होता.
त्या दिवशी या महासोहळ्याची सुरुवात धार्मिक प्रथेनुसार, मंत्रोच्चारासहित अत्यंत मंगल वातावरणात होमहवनाने झाली. पवित्र होमाला नमस्कार करून, पीठाधिपती नारायणानंद स्वामीजींचे आशिर्वचन झाले. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊलीची सुंदर सजविलेली पालखी नाचवत प्रांगणात आणली गेली. पालखीच्या अग्रस्थानी होते चिमुकले गोजिरवाणे विठ्ठल-रखुमाई. बे एरियातच राहून शास्त्रीय संगीताच्या तालमीत तयार झालेल्या मुलामुलींनी आपल्या अभंग गायनाने सर्व रसिकांना भक्तिरसात न्हाऊन टाकले.
विठ्ठल मंदिरात अभिषेक, भगवंताचे ऐश्वर्य स्नान झाले, पंचामृताचा पूर लोटला होता. पूजाविधी व वस्त्रालंकार लेवून अत्यंत दैदिप्यमान, नेत्रदीपक मूर्तीही दर्शनोत्सुक भक्तांच्या भेटीसाठी कर कटेवरी ठेवून विटेवरी उभ्या झाल्या होत्या. त्या पाउलांवर माथे टेकून, ‘सर्वेत्र: सुखिन: सन्तु।’ ही इच्छा करून, पंढरपूरच्या वारकऱ्यांसारखाच आनंदाचा, सुखाचा ठेवा सोबत घेऊन प्रत्येक भक्त मंदिरातून बाहेर पडला.
महाराष्ट्रात अनेक वर्षे राहूनही वारी प्रत्यक्ष न अनुभवलेले बरेच लोकं सातासमुद्रापार पहिल्यांदाच यानिमित्ताने वारीचा अनुभव घेत होते. सहज ३-४ लोकांच्या डोक्यात कल्पना आली म्हणून सुरु केलेली ही वारी त्या पांडुरंगाच्या भक्तीपोटी कर्णोपकर्णी पसरत शेकडो लोकांना आपल्यात सामावून घेती झाली.
आजकाल एखादी चांगली गोष्ट ट्रेण्ड व्हायला वेळ लागत नाही. मग ही भारताबाहेरील वारी ट्रेण्ड न झाली तरच नवल. ह्या वारीला सोशल मिडियावरही लोकांनी उचलून घेतले - चार मिलियनसहून अधिक व्यूज मिळाले , महाराष्ट्रातील मुख्य वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या. आणि जोडीला अमेरिकेत आणि अमेरिकेच्या बाहेरील मराठी लोकांकडून कौतुकाचा वर्षाव झाला.
ह्या वारीचे अजून एक वैशीष्ट्य म्हणजे यामध्ये बाल आणि युवा पिढीचा सक्रिय सहभाग होता. इथे राहणाऱ्या मुलांना ऐकून माहीत (न) असलेले टिळा, पताका, टाळ, वारकरी म्हणजे काय हे प्रत्यक्ष पहायला आणि अनुभवायला मिळाले.
वारीत सहभागी झालेली इकडची स्थायिक पिढी, लहानपणापासून त्या संस्कारात वाढलेली, आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगणारी आहे. ही आपली समृध्द संस्कृती, तो वारसा आपल्या ह्या पुढच्या पिढीकडे जावा, कमीतकमी तोंडओळख तरी व्हावी यासाठी कायम प्रयत्न करत राहणारी असते. तो हेतु या वारी प्रकल्पाने निश्चितच साधला. आपली संस्कृती या मातीत रुजवायला या खारीच्या वाट्याची नक्कीच मदत होणार आहे.
आबालवृद्धांचा सहभाग, तिचे मोठ्या प्रमाणावर झालेले कौतुक, लोकांकडून वारी कल्पनेचे झालेले स्वागत आणि मुख्य म्हणजे तरुणाईने हिरीरीने केलेले नियोजन हे सर्व, यापुढे ही वारीची परंपरा दरवर्षी अशीच चालू राहणार ह्याची ग्वाही देत होती.
बोला, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय!
***
येणाऱ्या आषाढी एकाशीनिमित्त...