लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे.
आठवेल तसे संपादित करत जाइन.
फारच धमाल झाली की पुढे इथे
फारच धमाल झाली की पुढे इथे
फारएण्ड पंक्तीत पूर्ण गोल फिरणारे स्टूल्स ठेवायचे. वाढपी आला, बटन दाबले की स्टूल गोल फिरू लागेल १८० अंशावर जरा पॉज घेईल आणि ३६० अंश पूर्ण करेल. पंक्तीचे व्हिडीओ/फोटो शूट होतच असल्याने सर्व अंशातुन प्रत्येकीचे चित्रणही होईल.
आणि हे रोटेशन अनेक वेळा होत असल्याने नंतर व्हिडीओ पहात असताना "अगं, त्या निळ्या साडीतलीचा नवरा म्हणजे तो आपल्या यांचा पुतण्याच ना?" असं विचारलं विचारलं तर व्हिडिओ मागे नेण्याची गरज नाही, पुढल्या रोटेशनमध्ये पाहुन "अगं, हो की!" करता येईल.
फारच धमाल झाली की पुढे इथे >>
फारच धमाल झाली की पुढे इथे >> +१
इथे भयंकर प्रकार चालू आहेत.
इथे भयंकर प्रकार चालू आहेत. कोण्या वेडिंग प्लॅनर ने पाहिले तर प्रत्यक्षात येतील पण
आम्ही लग्नात मिळालेले फ्राईंग पॅन, एक राईस कुकर अजून वापरला नाहीये.
अनु.., :फिदि:
अनु..,
लग्नात आलेल्या गिफ्ट्स हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे!
गिझर बंद पाडा आणि सकाळी गॅसचे
गिझर बंद पाडा आणि सकाळी गॅसचे तिन्ही बर्नर्स स्वयंपाकास लागतील असा बेत काढा. मग अंघोळीचे पाणी तापवायला राईस कुकर वापरता येईल.
नको बाबो. इतके व्याप करण्या
नको बाबो. इतके व्याप करण्या पेक्षा एक दिवस गार पाण्याने आंघोळ करू.आम्ही पुण्यात राहतो, पेनोंग ला नाही.
Ricecooker मध्येमसालेभात छान
Ricecooker मध्येमसालेभात छान होतो.
पण तेवढ्यासाठी तो लावणे म्हणजे task आहे.
Rice cooker recipes आहेत तू नळी वर खूप साऱ्या.
मी सांगतेय पण मागच्या दोन वर्षांत मीही वापरला नाही.
राकु (राकुल प्रीत नव्हे राईस
राकु (राकुल प्रीत नव्हे राईस कुकर) वापरण्या पेक्षा धुणे हा १ मेजर टास्क असतो

कूकटॉप असताना वापरलाय.. बराच सा भात भांड्या ला चिकटून वाया जातो, असो. धागा भरकटतोय
हास्यजत्रावाले द्विअर्थी आणि
हास्यजत्रावाले द्विअर्थी आणि कमरेखालचे विनोद करतात आणि म्हणतात, सहकुटुंब हसुया. विशेषतः लोलीच्या स्किटमध्ये असतात असे विनोद. मुलांना असे विनोद समजले नाहीत आणि त्यांनी विचारले तर काय सांगणार?
एक तर असे विनोद करा किंवा कौटुंबिक कार्यक्रम आहे असे म्हणा. दोन्ही एकदम नको.
हास्यजत्रावाले द्विअर्थी आणि
हास्यजत्रावाले द्विअर्थी आणि कमरेखालचे विनोद करतात >> फारसे नसतात. मेन म्हणजे साड्या नेसून पुरुष कलाकार येत नाहीत, फालतू जोक्स ना लाफ्टर ट्रॅक लाऊन नाही पकवत.
हवा येऊ द्या पेक्षा खूप बरंय.
मेन म्हणजे साड्या नेसून पुरुष
मेन म्हणजे साड्या नेसून पुरुष कलाकार येत नाही >>> जर त्यात अश्लीलता नसेल तर हरकत नसावी.
बाकी दोन्ही कडे दारूचे विनोद भरपूर आहेत. दारू पिणे हे आता सर्वमान्य झाले आहे.
दारूच्या विनोदांचे मार्केट
दारूच्या विनोदांचे मार्केट आहे. बहुत करून लोक विनोदावर नव्हे तर दारू बद्दल काहीतरी असेल तर हसायचं असतं म्हणुन हसत असावेत.
मेन म्हणजे साड्या नेसून पुरुष
मेन म्हणजे साड्या नेसून पुरुष कलाकार येत नाहीत, फालतू जोक्स ना लाफ्टर ट्रॅक लाऊन नाही पकवत.
हवा येऊ द्या पेक्षा खूप बरंय.>>> अगदिच अस नाहिये म्हणजे त्याचे यावरचे स्किट झालेत पण किमान त्याला एक पॅटर्न असतो....चला हवा येउ द्या सारख रोजच नाही...हवा येवु द्या पेक्षा नक्किच बराच चान्गला आहे.
लॉलीच स्किट मलाही आवडत नाही..
साड्या नेसून पुरुष कलाकार <<
साड्या नेसून पुरुष कलाकार << हे मला कळत नाही. कपिल च्या शो मधे ही आहे. बायकांच्या भुमिकेत बायकाच घेतल्यात तर काय प्रोब्लेम आहे? त्यांना त्या स्किल च्या बायका मिळत नाहीत की पुरुषाच्या भुमिकेतील विनोद कमी असतात की बायकांची वेषभुषा करण हाच विनोद असतो?
हवा येऊ द्या पेक्षा तर खूप
हवा येऊ द्या पेक्षा तर खूप चांगलं आहे हस्याजत्रा. काही skits नसतात एवढे चांगले पण ओव्हर ऑल दर्जा नक्कीच चांगला आहे, कलाकार पण चांगले असतात. नवीन चेहऱ्यांना संधी देतात. हवा येऊ द्या कद्धीच आवडलं नाही. हास्यजत्रा आम्ही lockdown मध्ये खूप पाहिलं. तेव्हापसूनच फॅन झालोय.
की बायकांची वेषभुषा करण हाच
की बायकांची वेषभुषा करण हाच विनोद असतो? >>>> बरोबर. त्यातल्या विसंगतीमुळेच विनोद निर्माण होतो. त्या पुरुषाची ते कपडे सांभाळताना उडणारी तारांबळ, आवाज बदलण्याचा प्रयत्न, हावभाव, बोलण्यात व वागण्यात होणाऱ्या चुका, इत्यादी मुळे विनोद निर्माण होतो. योग्य प्रकारे केले तर चांगली विनोद निर्मिती होते व कुटुंबासोबत व मुलांसोबत पाहता येते. उदा. अशी हि बनवाबनवी.
लॉलीच स्किट मलाही आवडत नाही.. >>>> मला आवडते. पण त्यातले काही विनोद कुटुंबासोबत व मुलांसोबत पाहावेत असे नसतात. तो माझा आक्षेप आहे.
दारूच्या विनोदांचे मार्केट आहे. बहुत करून लोक विनोदावर नव्हे तर दारू बद्दल काहीतरी असेल तर हसायचं असतं म्हणुन हसत असावेत. >>>> खरे आहे. CHYD मधले बरेच विनोद हे दारू पिणे हे लपविण्याचा प्रयत्न यातून होणारे 'तरी आहेत. पण हास्यजत्रा मधील एका स्किट सिरीज मध्ये चक्क लोक गच्चीवर दारू पार्टी करताना दाखविलेत. बर, असेही नाही कि ते लोक वाईट व्यक्तींची भूमिका करतात कि जे दारू पितात. या भूमिका चांगल्या मध्यमवर्गीय लोकांच्या आहेत. यातून काय संदेश जात असेल. पडद्यावर धूम्रपानाच्या बद्दल नियम आहेत, पण दारूबद्दल आनंदी आनंदच दिसतो. आता सहकुटुंब हसण्यासाठी बसलेल्यांची मुले काय घेत असतील यातून.
काल रात्री मॅच जिंकल्यावर
काल रात्री मॅच जिंकल्यावर सोसायटीतील काही लोकांनी फटाके फोडले व आरडाओरडा केला. झोपमोड झाली. सेलिब्रेशन समजू शकतो, पण वेळ-काळ आणि जागा सुद्धा पाहायला हवी.
बरं मग इथेच लिहीते -
बरं मग इथेच लिहीते -
भेंडीची देठे तोडत तोडत सो कॉल्ड निवडक भाजी शोधणारे, मागच्या लोकांकरता बिना नाकाच्या भेंडी सोडून चालते होणारे लोक आवडतच नाहीत.
डिड यु वेन्ट वगैरे चूका सर्रास आढळतात. अशा चूका डोक्यात जातात आय लाइक्ड वन ऑफ द बुक इन लायब्ररी अशाही
इथे डिड यु गो हवे.
इथे आय लाईक्ड वन ऑफ द बुक्स हवे.
बरं मग इथेच लिहीते >> सामो,
बरं मग इथेच लिहीते >> सामो, यू आर वन ऑफ दि ऑथर ऑफ धिस धागा. देन व्हाय डिड यू थॉट ट्वाइस अबाऊट व्हेयर टू राईट?
भेंडीबद्दल एकदम सहमत.एक
भेंडीबद्दल एकदम सहमत.एक भेंडीचं टोक तोडून पूर्ण सॅम्पल साईझ ची परीक्षा पूर्ण झाल्यावर ती बिननाकी भेंडी पण आपल्या विकत घेतलेल्या भाजीत समावायला हवी.शिवाय दरवेळी तोडुनच बघावं लागतं असं नाही.नुसतं बघून पण ताजी आहे का कळतं.
आता कालच बनलेला पेट पीव्ह: हॉटेलमध्ये बातलीतलं पाणी नको, रेग्युलर वॉटर पाहिजे म्हटल्यावर 4 वेगवेगळ्या वेटर्स कडून विचारून 'बॉटल वॉटर नको का' खात्री करून घेणे.(बॉटल विकेंड च्या कस्टमर गर्दीत देणं पाणी जगात भरून देण्यापेक्षा सोपं असावं.)
ह पा व्हाय डिड यु थॉट नाही,
ह पा व्हाय डिड यु थॉट नाही, व्हाय डिड यु थिंक..
सामो - अनेकांपैकी एक असं म्हणताना ९९% लोक हि चूक करतात. वन ऑफ माय फ्रेंड.... हे तर मी इतक्यांदा ऐकलं आहे कि थोड्या दिवसांनी मी बरोबर इंग्लिश विसरून जाईन आणि मी वन ऑफ माय फ्रेंड्स असं म्हटलं तर ते लोक मला मुर्खात काढतील असं वाटतं.
सीझर दे ना... नाही सीझर्स दे...
आपण दुकानात उभे असतो आणि
आपण दुकानात उभे असतो आणि दुकानदार आपल्याला काही देणार असतो तत्पूर्वी तो आपल्या आधी आलेल्या ग्राहकाचे पैसे घेत असतो, सुटे परत देत असतो... यात आपल्या मागून आलेल्या ग्राहकाला आप कतार में है हे समजत नसावं. धाडकन येऊन ओ हे केवढ्याला, ते कसं दिलं सुरु होतं. मग आपल्याला वाटतं.. "म्हणजे आम्ही येडे... इथं इतका वेळ वाट बघत बसलोय ते.
म्हणजे आम्ही येडे... इथं इतका
म्हणजे आम्ही येडे... इथं इतका वेळ वाट बघत बसलोय ते.>>
अलीकडेच हा अनुभव आला बेडशीट्स घ्यायला गेलो तेव्हा. दोन माणसे दोन गिऱ्हाईकांसोबत व्यग्र होती आणि मी वाट बघत उभा राहिलो.
मग मागून एक बाई आली एवढ्या मोठ्याने मला हे दाखवा ते दाखवा, कोणी नाही का इथे म्हणायला लागली आणि मग एक गिऱ्हाईक काउंटरकडे गेला तसा तो सेल्समन मला सोडुन तिच्याकडे वळला.
त्याला म्हटले "मी काय मिस्टर इंडिया झालोय की काय? माझा आवाज ऐकू येत असेल तर लाल दिवा लावा मी दिसेन." मग दोघेही क्षणभर आश्चर्यचकीत झाले आणि त्यांच्या डोक्यातला लाल दिवा लागला. "हे आधी आलेत मॅडम" असे म्हणुन तो माझ्याकडे वळला आणि तिनेही ओके ओके म्हणुन परवानगी दिली.
दक्षिणा
दक्षिणा
सामो यांची दोन्ही पेटपिव्हं एकापाठोपाठ वाक्यात घ्यायचा प्रयत्न केला मी. वन ऑफ दि ऑथर आणि डिड थॉट. खरंच डोक्यात गेली असतील तर सॉरी सामो.
सेलिब्रेशन समजू शकतो, पण वेळ
सेलिब्रेशन समजू शकतो, पण वेळ-काळ आणि जागा सुद्धा पाहायला हवी.>>>>हा मास हिस्टेरिया चा प्रकार आहे. इथे स्थलकालाचे भान रहात नाही. जणू काही आपण स्टेडियममधेच आहोत असे समजून ते आनंदाच्या किंकाळ्या फोडतात. क्रिकेट फूटबॉल वेळी हे प्रकार उच्चभ्रु सोसायटीत देखील घडतात.
डिड यु वेन्ट वगैरे चूका
डिड यु वेन्ट वगैरे चूका सर्रास आढळतात. अशा चूका डोक्यात जातात >>> अगदी अगदी. दोन पास्ट टेन्स एका वाक्यात येऊ शकत नाही हे लहानपणी इंगजीच्या बाईंनी घोटून घेतले होते.. त्यामुळे अशी सर्रास चुकीची वाक्यं त्रासदायक वाटतात.
हा मास हिस्टेरिया चा प्रकार
हा मास हिस्टेरिया चा प्रकार आहे. > खरंय. पुण्यात चालत्या पीएमटी वर चढून काहीजण नाचत होते असा व्हिडिओ पाहिला. मास हिस्टेरियात पोलीस पण मध्ये पडत नाहीत.
"I can't be able to.."
"I can't be able to.."
This is non sense
जवळचे लोक, नातेवाईक, मित्र
जवळचे लोक, नातेवाईक, मित्र वगैरे काही दिवस बोलतात व नंतर विसरतात. आपल्यासारखे इतर लोकं हा व्हीडीओ 2-3 वेळा बघतात, जवळच्यांना fwd करतात, मुलांवर लक्ष ठेवायला पाहिजे ही नोंद घेतात व नंतर हे चेहरे ( सांगितले असेल तर नाव पण )विसरून जातात.
२५ फेब ला ही मी कॉमेंट टाकली होती. बर्याच जणांनी ड्रग घेतलेल्या मुलींचे चेहरे झाकावेत वगैरे असा सल्ला दिला होता. मी चेहरा दाखवल्याने काहीही फरक पडत नाही असे मत मांडले होते.
आज किती जणांना ते चेहरे व त्या मुलींची नावे लक्षात आहेत हे तो व्हीडीओ परत न बघता सांगा. मला तरी अजिबात लक्षात नाही.
त्याला म्हटले "मी काय मिस्टर
त्याला म्हटले "मी काय मिस्टर इंडिया झालोय की काय? माझा आवाज ऐकू येत असेल तर लाल दिवा लावा मी दिसेन>>>> नशिब एवढं समजलं त्यांना……
माझा पण हा पेट पीव्ह आहे. आपण शहाण्या बाळासारखं वाट बघत थांबतोय हे चुकीचं आहे की काय असं वाटतं कधी कधी.
बाय द वे, हा वीकेंड मी_अनु फेम खवले मांजर इमारतीजवळ घालवला. त्या रस्त्याला रोडवेज टू हेल हे नाव जास्त शोभून दिसेल असं वाटतं. एमआयडीसीला जाणारा रस्ता मोजून साडेतीन लेनचा बनवण्यामागे पीडब्ल्यूडीचा काय छुपा उद्देश असेल?
Pages