Submitted by दत्तात्रय साळुंके on 16 June, 2023 - 07:32
साद घालू लागले ते गाव माझे
उमटले मातीत तेथे नाव माझे
पावले रक्ताळली वाटेत केव्हा
मांडले पून्हा तरी मी डाव माझे
लगडले टप्पोर मोती जोंधळ्याला
पेरले मातीत भक्तीभाव माझे
वाहती जखमा जुन्या पून्हा नव्याने
ओळखीच्या माणसांचे घाव माझे
सांडले तू गंध तेथे त्या फुलांचे
आजही घेतात येथे ठाव माझे
© दत्तात्रय साळुंके
वृत्त मंजुघोषा -
गण:- - र त म य- राधिका, ताराप, मानावा, यमाचा
एकाच शब्दात दोन ल एकापाठोपाठ = गा
जोडाक्षरा आधी लघु = गुरू जर लघु अक्षरांवर जोडाक्षराचा आघात होत असेल
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख, मोजक्या शब्दात आणि
सुरेख, मोजक्या शब्दात आणि चित्रदर्शी असा शब्द वापरावासा वाटतो आहे.
पावले रक्ताळली वाटेत केव्हा
मांडले पून्हा तरी मी डाव माझे
लगडले टपोर मोती जोंधळ्याला
पेरले मातीत भक्तीभाव माझे
वाहती जखमा जुन्या पून्हा नव्याने
ओळखीच्या माणसांचे घाव माझे
सांडले तू गंध तेथे त्या फुलांचे
आजही घेतात येथे ठाव माझे
हे अगदी खास!
हे अगदी खास!
हे अगदी खास!
अहो पूर्ण कविताच अगदी खास!
खूप सुरेख!! भावपूर्ण रचना.
खूप सुरेख!! भावपूर्ण रचना.
खूप सुंदर!
खूप सुंदर!
छानच रचना. "सांडले तू गंध
छानच रचना. "सांडले तू गंध तेथे त्या फुलांचे; आजही घेतात येथे ठाव माझे" - हे विशेष आवडलं.
खालील ओळींत र त म य वृत्त जुळत नाही.
१. उमटले मातीवर तेथे नाव माझे - इथे उमटले (१-१-१-२) आणि र्/राधिका(२-१-२) च्या एकूण मात्रा (५) जुळतात म्हणून ठीक आहे. पण मातीवर या शब्दात एक मात्रा जास्त आहे (२-२-१-१) ताराप (२-२-१). पुढचे 'तेथे नाव माझे' पुन्हा बरोबर जुळतात (२-२-२-१-२-२) मानावा यमाचा (२-२-२-१-२-२). मातीवर ऐवजी मातीत (२-२-१) केल्यास सर्व मात्रा जुळतील. किंवा उमटले मातीवरी ते नाव माझे (१-१-१-२ २-२-१ २-२-२ १-२-२) असं केल्यासही सर्व मात्रा जुळतील. उमटले नाही बदललं तरी चालेल.
२. लगडले टपोर मोती जोंधळ्याला - इथे लगडले (१-१-१-२) वरील उमटले प्रमाणेच आहे, ते ठीक आहे. पण पुढे टपोर (१-२-१) मध्ये एक मात्रा कमी आहे (ताराप (२-२-१)). मोती जोंधळ्याला पर्फेक्ट आहे २-२-२-१-२-२. इथे थोडी काव्यात्मक फ्रीडम घेऊन टपोरच्या ऐवजी टप्पोर केल्यास २-२-१ होऊन जाईल आणि सर्व मात्रा जुळतील.
बाकी रचना उत्तम.
निनाद
निनाद
केशवकूल
सामो
sanjana25
अक्षरगण वृत्तातली ही माझी पहिलीच रचना गोड मानून घेतल्या बद्दल मनापासून आभार....
हपा... नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण प्रतिसाद
सुयोग्य बदल सुचवलात... अनेकानेक धन्यवाद...
मातीवर ऐवजी मातीत आणि टपोर ऐवजी टप्पोर करतो.
छान च
छान च
सुंदर शब्दरचना..!
सुंदर शब्दरचना..!
साद पून्हा वाचकांनी घातली अन्
साद पून्हा वाचकांनी घातली अन्
घेउनी प्रतिसाद येई नाव माझे
पुन्हा वाचली गझल आणि पुन्हा तेवढीच मजा आली.
वा क्या बात है ।
वा क्या बात है ।
रणरणत्या ऊन्हात चालती पाऊले।
दाखवू कोणास हे दुःख माझे ।।
अजय सरदेसाई (मेघ)
छानच !
छानच !
साद पून्हा वाचकांनी घातली अन्
साद पून्हा वाचकांनी घातली अन्
घेउनी प्रतिसाद येई नाव माझे
क्या बात है।
पुन्हा वाचली गझल आणि पुन्हा तेवढीच मजा आली.
हपा अनेकानेक धन्यवाद.....
meghvalli
meghvalli
साद
अनेकानेक धन्यवाद....
छान आहे ! सुंदर शब्दरचना.
छान आहे !
सुंदर शब्दरचना.
कुमार सर... खूप धन्यवाद...
कुमार सर...
खूप धन्यवाद...
सुंदर गझलशिल्प. असेच लिहित
सुंदर गझलशिल्प. असेच लिहित रहा आणि आमचे गझलप्रेम वाढवत रहा. शुभेच्छा.