मायबोली वर्षाविहार २०२४

Submitted by ववि_संयोजक on 22 June, 2024 - 00:36

टिझर बघितला की नाही लोकहो? कोणी कोणी इमेज क्लिअर दिसेल म्हणून वाट बघून रिफ्रेश केले? लाजू नका हो असं केलय सांगायला!
कोणाला सांगू नका, कान करा इकडे एक शिग्रेट सांगतो तुम्हाला, “आपल्या माबो ॲडमीननीही केलं होतं रिफ्रेश इमेज क्लिअर दिसावी म्हणून Biggrin

होणार! इमेज रिफ्रेश होणार!
पण त्यासाठी वविला यावं लागतंय बघा.
आणि वविला येण्यासाठी आधी नाव नोंदणी करावी लागतेय ना!

काय म्हणता? त्यासाठी वविचे तपशील हवे?

हे घ्या तपशील. वाचा... लाईक करा… आणि शेअरही करा.

सगळ्यात आधी कॅलेंडरवर “२८ जुलै २०२४ = वविवार” हा आपल्या माबोसाठी राखून ठेवा. का म्हणजे? अहो ववि आहे ना त्या दिवशी.

तारीख राखून ठेवलीत?मग आता यंदाचा आपला क्लिकक्लिकाट आणि किलबिलाट कुठे होणार आहे ते वाचा.

यंदा आपण भेटतोय उत्कर्षाज् रिसॉर्ट, कशेळे, कर्जत येथे!
रिसॉर्ट चं मॅप लोकेशन - https://maps.app.goo.gl/FvUUXCSXpEr2QtYw9

WhatsApp Image 2024-06-22 at 11.35.51 AM.jpeg

काय मंडळी आवडले ना ठिकाण!

नोंदणी करण्यापूर्वी या खालील गोष्टी एकदा वाचून घ्या पटापट:
- वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/ पत्नी/ मुले/ आई - वडील) येऊ शकतात. आपले इतर नातेवाईक/ मित्र-मैत्रिणी यांनाही वविला यायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे मायबोलीचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.
- नावनोंदणीची अंतिम तारीख आहे रविवार, २० जुलै २०२४
- योग्य ते शुल्क mhattalage@okaxis (मनोज हातळगे) या upi वर भरावे व त्यानंतर सगळ्यात खाली दिलेला गुगल फॉर्म भरुन त्यात नोंदणीसाठी आवश्यक ती माहिती नोंदवावी. तुमची वर्गणी आणि गुगल फॉर्म जमा झाल्यावर संयोजक तसे संपर्कातून किंवा ईमेलने पोचपावती देतील.
- काही शंका/प्रश्न असल्यास याच धाग्यावर विचारा किंवा mbvavi2024@gmail.com या पत्त्यावर ईमेल करा.

वर्षाविहार २०२४ ची वर्गणी खाली दिल्याप्रमाणे आहे:
मुंबईसाठी:
प्रौढ : रु. १८५०/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु. १२००/-, बस: रु. ६००/-, सांस्कृतिक समिती: रु. ५०/-)
पुण्यासाठी:
प्रौढ : रु. १८५०/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु १२००/-, बस: रु. ६००/-, सांस्कृतिक समिती: रु. ५०/-)

मुले (वय ५ ते १० वर्षे) : रु. ६००/- प्रत्येकी (रिसॉर्ट फी) आणि बसमध्ये बसायला स्वतंत्र जागा हवी असल्यास बसचे वर दिल्याप्रमाणे मुंबईसाठी रु. ६००/- आणि पुण्यासाठी रु. ६००/-

- ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
- १० वर्षापासून पुढे रिसॉर्टचा पूर्ण आकार लागेल.

- रिसॉर्टच्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा यांचा समावेश आहे.
- वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ३० माणसांप्रमाणे धरला आहे. संख्या कमी झाली तर प्रवास खर्च कदाचित जास्त येऊ शकेल.
- समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केले तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
- स्वतंत्र येणार्‍यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
- मुंब‌ई आणि पुणे सोडून इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.

ववि नोंदणीसाठी गुगल फॉर्म लिंक:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSediAZsNlMopH2Z-us7B66tyuxQMafR...

शुल्क mhattalage@okaxis (मनोज हातळगे) या यूपीआय आयडी वर भरावे

वर्षाविहार २०२४ संयोजन समिती:
मुंबई
मुग्धा कुलकर्णी (मुग्धानंद)
रीना (Reena)
भाग्यश्री देशमुख (चंपा)

पुणे
मनोज हातळगे (अतरंगी)
योगेश कुलकर्णी (योकु)
मल्लीनाथ करकंटी (MallinathK)
चैतन्य जोगदेव (csj)
अतुल पाटील (अतुल.)

चला तर मग, आजच नोंदणी करा आणि टिझरचा फोटो २८ जुलैला रिफ्रेश करा!
याबरोबरच लाईक, शेअर करायलाही विसरु नका.

ववि संयोजक टीम

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेम ओवर !
एवढ्या पावसाळ्यात नेमकी जी नको होती तीच तारीख आली.

तरी योगायोगाने तुमचे आणि आमचे रिसॉर्ट एकच आले तर भेटू...

असो, आता मोठ्या संख्येने जमा आणि भिजा... आणि इथे फोटोसह वृत्तान्त शेअर करा..

किल्ली, आपल्याला साधारणपणे रीसॉर्ट वर ९३० च्या सुमाराला पोहोचायला हवं. त्यानुशंगानी आधीची वेळ ठरते. यात कुठल्या लोकेशन वरून बस सुटतेय, कुठले थांबे घेतोय हे पण अ‍ॅड्तं. तरी, ढोबळमानानं ७३०-८ पर्यंत रस्त्याला लागता येइल अशी काहीशी वेळ असेल. तसेही संयोजकांचे फोन नंबर्स दिलेले असतात सो बस सुटल्यापासून चे अपडेट्स कळतात Happy

उदाहरणादाखल मागच्या काही वर्षांच्या ववि ची रूपरेषा खालच्या लिंक्स वर पाहाता येइल -
मायबोली वर्षाविहार २०२३ - बस मार्ग आणि रूपरेषा
मायबोली वर्षाविहार २०१६ - बस मार्ग

@ अतुल

योगायोग जुळणे तसे कठीण आहे.

एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम तर दुसरीकडे अ-सांस्कृतिक धिंगाणा..

एकीकडे भज्या आणि चहापान, तर दुसरीकडे चखणा आणि मद्यपान..

एकीकडे रिल्स, तर दुसरीकडे नागीण डान्स..

एकीकडे गाण्यांच्या भेंड्या, तर दुसरीकडे शिव्यांचे वाक्यप्रचार..

एकीकडे स्विमिंगपूल मध्ये बॉलचे खेळ, तर दुसरीकडे चिखलात फूटबॉल आणि क्रिकेट..

एकीकडे मायबोली टी-शर्ट घातलेली बायका पोरे आणि फॅमिली, तर दुसरीकडे तीस पस्तीस उघडबंब पोरे Happy

मुलांनो, मुलींनो...

आत्ताच क्न्फर्म न्युज आली आहे, या ववि ला एक स्पेशल सरप्राईझ आहे.

एक एकदम फेमस सेलिब्रेटी पण यंदा वविला येणार आहे.

आम्हाला सगळ्यांनाच त्यांना भेटायची ओढ लागली आहे. तुम्हाला पण त्यांना व आम्हाला भेटायचं असेल तर पटापट नावनोंदणी करुन टाका.

एकीकडे भज्या आणि चहापान, तर दुसरीकडे चखणा आणि मद्यपान.. >>>>

बघ हीच वेळ आहे तुझा निषेध नोंदवायची. बहिष्कार घाल असल्या मद्यपानास उद्युक्त करणार्‍या कार्यक्रमांवर. नको जाउस.

वविला ये.
तुला चहा व भजी माझ्यातर्फे....

आत्ताच क्न्फर्म न्युज आली आहे, या ववि ला एक स्पेशल सरप्राईझ आहे.

एक एकदम फेमस सेलिब्रेटी पण यंदा वविला येणार आहे.>> हायला! कोन हाय तरी कोन यो शेलेब्रिटी. पावसाने नाव नोंदणी केली की काय स्वतःची Proud

बहिष्कार घाल असल्या मद्यपानास उद्युक्त करणार्‍या कार्यक्रमांवर
>>>>

त्या साठीच जातो.. मित्रांना मद्यपानापासून शक्य तितके रोखता कसे येईल हे बघतो. Happy

हे काय बरोबर नाही
स्विमिंग पूल फोटो टाकायचे नाही हा नियम तोडला / बदलला तुम्ही...
मला गेल्या वेळी टाकू दिले नव्हते..
त्यामुळे माझ्या मित्रयादीतील लोकांना वाटले मी कुठल्यातरी स्विमिंग पूल नसलेल्या खुराड्यात फिरून आलो..

MBVaVi2024JIF.gif

वर्षाविहार धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/85290
मायबोली वर्षाविहार २०२४ नावनोंदणीचा गुगल फॉर्म - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSediAZsNlMopH2Z-us7B66tyuxQMafR...
मायबोली वर्षाविहार २०२४ चे शुल्क mhattalage@okaxis (मनोज हातळगे) या यूपीआय आयडी वर भरावे

कर्जत वाट पाहतंय Happy

Maayboli_Wawi_2024_advert_1.gif

Pages