टिझर बघितला की नाही लोकहो? कोणी कोणी इमेज क्लिअर दिसेल म्हणून वाट बघून रिफ्रेश केले? लाजू नका हो असं केलय सांगायला!
कोणाला सांगू नका, कान करा इकडे एक शिग्रेट सांगतो तुम्हाला, “आपल्या माबो ॲडमीननीही केलं होतं रिफ्रेश इमेज क्लिअर दिसावी म्हणून ”
होणार! इमेज रिफ्रेश होणार!
पण त्यासाठी वविला यावं लागतंय बघा.
आणि वविला येण्यासाठी आधी नाव नोंदणी करावी लागतेय ना!
काय म्हणता? त्यासाठी वविचे तपशील हवे?
हे घ्या तपशील. वाचा... लाईक करा… आणि शेअरही करा.
सगळ्यात आधी कॅलेंडरवर “२८ जुलै २०२४ = वविवार” हा आपल्या माबोसाठी राखून ठेवा. का म्हणजे? अहो ववि आहे ना त्या दिवशी.
तारीख राखून ठेवलीत?मग आता यंदाचा आपला क्लिकक्लिकाट आणि किलबिलाट कुठे होणार आहे ते वाचा.
यंदा आपण भेटतोय उत्कर्षाज् रिसॉर्ट, कशेळे, कर्जत येथे!
रिसॉर्ट चं मॅप लोकेशन - https://maps.app.goo.gl/FvUUXCSXpEr2QtYw9
काय मंडळी आवडले ना ठिकाण!
नोंदणी करण्यापूर्वी या खालील गोष्टी एकदा वाचून घ्या पटापट:
- वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबिय (पति/ पत्नी/ मुले/ आई - वडील) येऊ शकतात. आपले इतर नातेवाईक/ मित्र-मैत्रिणी यांनाही वविला यायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतंत्रपणे मायबोलीचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे.
- नावनोंदणीची अंतिम तारीख आहे रविवार, २० जुलै २०२४
- योग्य ते शुल्क mhattalage@okaxis (मनोज हातळगे) या upi वर भरावे व त्यानंतर सगळ्यात खाली दिलेला गुगल फॉर्म भरुन त्यात नोंदणीसाठी आवश्यक ती माहिती नोंदवावी. तुमची वर्गणी आणि गुगल फॉर्म जमा झाल्यावर संयोजक तसे संपर्कातून किंवा ईमेलने पोचपावती देतील.
- काही शंका/प्रश्न असल्यास याच धाग्यावर विचारा किंवा mbvavi2024@gmail.com या पत्त्यावर ईमेल करा.
वर्षाविहार २०२४ ची वर्गणी खाली दिल्याप्रमाणे आहे:
मुंबईसाठी:
प्रौढ : रु. १८५०/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु. १२००/-, बस: रु. ६००/-, सांस्कृतिक समिती: रु. ५०/-)
पुण्यासाठी:
प्रौढ : रु. १८५०/- प्रत्येकी. (रिसॉर्ट: रु १२००/-, बस: रु. ६००/-, सांस्कृतिक समिती: रु. ५०/-)
मुले (वय ५ ते १० वर्षे) : रु. ६००/- प्रत्येकी (रिसॉर्ट फी) आणि बसमध्ये बसायला स्वतंत्र जागा हवी असल्यास बसचे वर दिल्याप्रमाणे मुंबईसाठी रु. ६००/- आणि पुण्यासाठी रु. ६००/-
- ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही.
- १० वर्षापासून पुढे रिसॉर्टचा पूर्ण आकार लागेल.
- रिसॉर्टच्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचा चहा यांचा समावेश आहे.
- वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ३० माणसांप्रमाणे धरला आहे. संख्या कमी झाली तर प्रवास खर्च कदाचित जास्त येऊ शकेल.
- समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केले तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
- स्वतंत्र येणार्यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
- मुंबई आणि पुणे सोडून इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.
ववि नोंदणीसाठी गुगल फॉर्म लिंक:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSediAZsNlMopH2Z-us7B66tyuxQMafR...
शुल्क mhattalage@okaxis (मनोज हातळगे) या यूपीआय आयडी वर भरावे
वर्षाविहार २०२४ संयोजन समिती:
मुंबई
मुग्धा कुलकर्णी (मुग्धानंद)
रीना (Reena)
भाग्यश्री देशमुख (चंपा)
पुणे
मनोज हातळगे (अतरंगी)
योगेश कुलकर्णी (योकु)
मल्लीनाथ करकंटी (MallinathK)
चैतन्य जोगदेव (csj)
अतुल पाटील (अतुल.)
चला तर मग, आजच नोंदणी करा आणि टिझरचा फोटो २८ जुलैला रिफ्रेश करा!
याबरोबरच लाईक, शेअर करायलाही विसरु नका.
ववि संयोजक टीम
झोपच उडाली
झोपच उडाली
ववि जोरदार होऊ द्या!
ववि जोरदार होऊ द्या!
सुप्रभात,
सुप्रभात,
दोन्ही "कर" एकमेकांसमोर कर जोडण्यासाठी मार्गस्थ....
सर्वांना शुभेच्छा, एन्जॉय.
सर्वांना शुभेच्छा, एन्जॉय.
मजा करा , मंडळी!
मजा करा , मंडळी!
लोकहो , मजा करा !!
लोकहो , मजा करा !!
मज्जा करा आणि जोरदार हैदोस वृ
मज्जा करा आणि जोरदार हैदोस वृ द्या इथे..
नैतर व्हाट्सपवरच कराल हैदोस
आज वर्षा नाहीये, पण विहार
आज वर्षा नाहीये, पण विहार नक्की एन्जॉय करा
Pages