चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आचार्य, सचिन जोशी बद्दलची तुमची माहिती थोडी चुकली. अमावसचा निर्माता तो आहे हे बरोबर आहे पण त्याच्या कंपनीचे नाव व्हायकिंग आहे तुमची बहुतेक वायाकोम आणि व्हायकिंग मध्ये गल्लत झाली. Viacom 18 सध्या बऱ्यापैकी रिलायन्सच्या मालकीची आहे. ज्योती देशपांडे त्याच्या प्रमुख आहेत

ते सलीम-जावेद संवाद लिहीलं, ते काय गांजा पिऊन लिहीत होतं कायं >>> Lol
हे भारी होतं.

त्या सलीम जावेदच्या सिनेमात इतर पात्रं स्वतः महत्वाचे नसल्याचे ठाऊक असल्याप्रमाणे नायकाबद्दल बोलत राहतात. इफ्तेकार सुरेश ला सांगतो कि " तुमने इस लडके के तेवर देखें जयचंद ? ये लंबी रेस का घोडा है. ये जिंदगी भर बूट पालिश नही करेगा. जिस दिन इसने जिंदगी कि रफ्तार पकडी, ये सब को पीछे छोड देगा. मेरी बात याद रखना " . ते रेस बद्दल बोलत असतात म्हणून मुलाबद्दल बोलणं ठीक आहे. पण मेरी बात क्यू याद रखना ? म्हणजे सुरेशला रोज तिथे येऊन हा मुलगा जिंदगी कि रफ्तार पकडने पर्यंत लक्ष ठेवणे आलेच.

अर्थात जिथे काय काय महाकाय इग्नोर करायची सवय झालीय तिथे हे किरकोळ म्हणजे काहीच नाही.

माननीय श्री सचिन जोशींजींची महत्वाची ओळख तुम्ही सांगितलीच नाही. गोव्यातील सुप्रसिद्ध किंगफिशर व्हिलाचे ते आजी मालक आहेत. वीरप्पन मूव्हीतही त्यांनी काम (हत्तीचे नाही हो) केले आहे.

गोव्यातील सुप्रसिद्ध किंगफिशर व्हिलाचे >>> बरेच उद्योग होते त्यांच्या वडलांचे.

आधी ते माणिकचंद गुटखा मधे होते. त्यात लागणारा सुगंधी पदार्थ ते पुरवायचे. दोघांच्यात वाद झाला आणि मग यांनी (अंडरवर्ल्डच्या पैशाने) गोवा गुटखा सुरू केलं. त्यानंतर कापड उद्योग, शिक्षण (पांचगणी इथली निवासी शाळा), हॉटेल आणि मनोरंजन इत्यादी मधे गुंतवणूक केली.

मुंबई बनत असताना काही धनाढ्यांनी काही भ्रष्ट ब्रिटीश अधिकार्‍यांना हाताशी धरून चीनला भारतातून अफीम पुरवायचा समांतर उद्योग उभारला होता. त्यात बक्कळ पैसा कमावल्यावर मुंबईत उद्योग उभारले. बहुतेक कापड धंदेवाले त्यात होते पण टाटांचे पूर्वज सुद्धा या धंद्यात होते.

गुटख्यातून साम्राज्य उभारणारे आधुनिक काळातले जोशी हे उद्याचे टाटा झाले असते. नया भारत !
(अवांतर समाप्त)

दोघांच्यात वाद झाला आणि मग यांनी (अंडरवर्ल्डच्या पैशाने) गोवा गुटखा सुरू केलं. --------
वाद मिटवायला पाकिस्तानला गेले होते म्हणे. मांडवली बादशहाला फी म्हणून गुटख्याच्या फॉर्म्युला देऊन आले.
जाता जाता : आपल्याकडे सुरू केलेल्या कंपनीचे नाव गुटखा ठेवले. तिकडच्या कंपनीचे नाव काय ठेवले असेल?? ग्वादार गुटखा?

शानदार लहान मुलांना आवडतो
>>>>
शानदार बद्दल पहिल्यांदा चांगले वाचले. या आधी वाईटच वाचून बघायचे हिम्मत केली नव्हती. आता हे वाचून बघायला हरकत नाही असे वाटते. कारण कलाकार आवडीचे आहेत.

लापता लेडीज - नेफ्लि वर आला आहे. मस्त हलका फुलका फील गुड सिनेमा!!
स्टोरीचा जर्म अगदी छोटासा, लग्न करून नवर्‍यासोबत पहिल्यांदाच सासरी जाणर्‍या बिहार मधल्या कुठल्यातरी खेड्यांमधल्या २ रँडम नव्या नवर्‍या चुकीच्या ( वेगवेगळ्या) स्टेशन वर उतरतात आणि सगळीच चुकामूक होते. मग त्यांची योग्य ठिकाणी पोचण्याची धडपड, आणि त्यांना मदत करणारे , अडथळा आणणारे गावकरी, स्टेशनवरचे चायवाले, स्टेशन मास्तर, पोलिस इ. असा एकूण प्लॉट.
एक दोन ओळखीचे चेहरे सोडले तर सगळे अप्रसिद्ध आणि नॉन ग्लॅमरस कलाकार धमाल काम करून गेलेत. कपडे, बोलणे चालणे इतके अकृत्रिम आहे की चाललंय ते सगळे खरेच चालू आहे असे वाटते. नाही म्हणायला एक बारीकसे गालबोट म्हणजे त्या रड्या अरिजित चे एक रडगाणे अनावश्यक वाटले.

मै +१
हलकाफुलका आणि संवादातून फोल प्रथा परंपराना चिमटे काढणारा आहे.
ती स्टेशनवरची आज्जी आपली सैराट मधली हैदराबादची डोशाची गाडीवाली मावशी आहे ना?
दीपक जया आणि फूल,त्याचे आई बाबा भावजय सगळेच एकदम लाघवी आणि त्या गावचेच दिसले एकदम. सकारात्मक शेवटही आवडला. जुन्या विचारांचे लोक आहेत, पण कोणी व्हिलन नाही, सारासार विचार जागृत असलेले आणि बदल फायद्याचा दिसतोय तर स्वीकारणारे आहेत. जुने म्हणजे विकृत असं सोपं समीकरण नाही.
मध्यंतरी वास्तव दाखवायचं तर दुर्दैवी/ दुःखद/ अन्यायकारक पण तसच घडत असल्याने वास्तव सिनेमे यायचे. ते ही चांगलेच असायचे, पण कधीकधी त्याने कॉन्फरमेशन तर होत नसेल असं वाटायचं. असे सुखद बदल स्वीकारणारे ही छान वाटतात. आणि येत रहावे.
सुरुवातीला मला भीष्म/ अंबा/ शल्व प्रकार होतो का काय भिती वाटलेली क्षणभर.

‘तेरीं बातोंमें ऐसा उलझा ज़िया’ पाहिला. साय-फाय जॉनरमधली आपली पट्टी ‘वह लाल बटन दबातेंहीं’ किंवा ‘ओम, ओम, ओम, ओम‘ इतपतच असताना एकदम रोबोटिक्स, एआय वगैरे विषयांना हात घालू नये असं वाटलं.

व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे मालफंक्शन होऊन आऊट ऑफ कंट्रोल गेलेल्या रोबॉटला, तलवारीच्या मुठीचे दोन तडाखे दिले असता, तो थंडावतो हे नवीन ज्ञान मिळालं. कुणाच्या काँप्युटरवर ती निळी स्क्रीन आल्यावर लॅपटॉपला दोन टपल्या मारून बघाव्या. अर्थातच जगात घडणार्या सगळ्या गोष्टी जश्या भारतात आधीच घडून गेलेल्या असतात त्या न्यायानं, किक मारून चालू न होणार्या स्कूटरला तिरकी करून चालू करण्याच्या प्रक्रियेतच ह्या बिघडलेल्या रोबॉटला दोन फटके देऊन ताब्यात आणण्याच्या प्रक्रियेचं मूळ असावं.

लापता लेडीज Netflix वर पाहिला. खूप नैसर्गिक अभिनय आहे सगळ्यांचा !! फुल आणि जया दोघी खूप आवडल्या . एक हलकाफुलका चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले .

लापता लेडीज बघतोय. त्यात पोलीस स्टेशन मध्ये एक बाई फार सुंदर ठुमरी की दादरा गातेय "रंगी सारी गुलाबी चुनरिया रे, मोहे मारे नजरिया सावरीया रे". मी पहिल्यांदाच ऐकले हे आणि पॉज करून शोधले हे गाणे युट्युबवर तर सगळे नव्या गायीकांचे व्हिडिओ दिसताहेत. कुणाला माहिती आहे का ही ठुमरी कुण्या प्रसिद्ध गायक/गायिकेने गायलेली?

पारंपरिक ठुमरी (होरी) आहे.
शोभा गुर्टू
कौशिकी
उस्ताद शुजात खान

लापता लेडीज मस्त आहे, फार आवडला.
‘चमकीला’सुद्धा आवडला - या (खऱ्या) गायकाबद्दल माहीत नव्हतं.
सिनेमा सेन्सॉरशिप, फीमेल सेक्शुआलिटी इत्यादींबद्दल करतो ते भाष्य अजूनही रिलेव्हन्ट आहे.
दिजीत दोसान्जचं काम आवडलं.

लापता लेडीज पाहिला.खूप विषय हाताळले आहेत.आवडला.थोड्या पंचायत व्हाईब्स आल्या.सर्व कलाकारांनी खूप गोड कामं केली आहेत.आवडला.
पिक्चर मधला काळ 2000-2005 च्या दरम्यान चा दाखवला असावा.गाणी जुनी वाजत आहेत, सर्वांकडे मोबाईल नाहीत, ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे अँटेना वाले हँडसेट आहेत.

लापता लेडीज - एकदम मस्त हलकाफुलका पिक्चर..फारच आवडला... शेवटच्या त्या पोलिस स्टेशन मधल्या देहराडून च्या वाक्याला फुटलेच...,,रवी किशन चा इन्स्पेक्टर मस्त..
सगळ्यांचाच अभिनय १ नंबर...त्या दीपक ला आधी कुठेतरी पहिल्या सारखं वाटतंय...पण आठवत नाहीये....

**** स्पॉइलर ****
मला तो इन्स्पेक्टर ब्राइबचे पैसे (निदान काही पार्ट) जयाला देईल अशी आशा वाटली होती - पण ते बहुधा फारच गुडीगुडी झालं असतं.

ला ले मस्त आहे, आवडला. २००१ छान उभ केलय. कहो ना प्यार है लागलेला दाखवला आहे, शेवटी पोलिस स्टेशन सीन मध्ये अटल बिहारींचा एक छोटा फोटो पण आलाय, डिटेलिंग अन् कामे आवडली..

मस्स्स्स्स्स्त सिनेमा. स्टेशनवर जया जाताना ‘तु ही जा साथमें‘ सीन मी पाचवेळा पाहिला. रविकिशन बेष्ट. मुली, छोटु, गाडीवाली, मोठी जाऊ, तिचा छोटा , मुलं सगळीच भारी आहेत.

अरे सही पिक्चर आहे
लापता लेडीज.. शीर्षक सुद्धा एकदम समर्पक.. जे चित्रपटातून पोहोचवायचे आहे.
12th फेल नंतर पाहिलेला त्या तोडीचा हिंदी पिक्चर..
बायकोच्या बहिणीने बघून सुचवलेले तेव्हा बघा म्हणून.. पण जमले नव्हते.. श्या, जमवायला हवे होते.

धन्यवाद अमितव, स्वाती.
तिघांच्याही आवाजात ऐकली तिन्ही छान पण शोभा गुर्टुंची मला जास्त भावली.

हलका फुलका चित्रपट आवडला, मूड फ्रेश झाला.
सगळ्यांचीच कामे मस्त झालीत. खेड्यातील पात्रांचे रोल करणे अवघड असावे असे मला वाटते. वेशभूषेव्यतिरिक्त उठणे, बसणे, चालणे, हावभाव, ओठांच्या हालचाली यातील कुठल्याही एकात जरी मेळ नाही जमला तर खटकतं यात तसं जाणवलं नाही.

ती फुल कुमारी किती लहान आहे!! 16 वर्षांची.पण सर्व अभिनय सुंदर केलाय.रवी किशन चं पात्र पण मस्त.पैसे दिले नाहीत पण किमान बांगड्या स्वतःकडे ठेवू दिल्या.त्याच्याकडून हेच बक्षीस.
यात पंचायत मधला बनराकस भूषण पण आहे कॉन्स्टेबल.
रिपोर्ट मध्ये जया चं श्रेया करणं धमाल आहे Happy एकंदर सगळं तत्वात आणि नियमात नीट बसलं पाहिजे.

Pages