Submitted by श्रीराम_देशपांडे on 24 April, 2024 - 01:25
स्पर्धकांनी बसू दिले नाही
निंदकांनी हसू दिले नाही
मज कधीही सुखी समाधानी
जीवनाने असू दिले नाही
या समाजात गाव संतांचे
माणसाने वसू दिले नाही
माणसाच्या मनात देवाला
धार्मिकांनी घुसू दिले नाही
भावनांनी मला तुझ्यावरती
एकदाही रुसू दिले नाही
दुखणे जखमेचे खूप होते पण
मी कधी ठसठसू दिले नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गझल कुठल्या वृतात आहे?
छान आहे....
हपांनी समजावल्यावर प्रतिसाद बदलला...
भावनांनी मला तुझ्यावरती
भावनांनी मला तुझ्यावरती
एकदाही रुसू दिले नाही
Jabardast
दत्तात्रय दादा, दुखणे जखमेचे
दत्तात्रय दादा, दुखणे जखमेचे ... ही एक ओळ सोडली तर बाकी गा ल गा गा ल गा ल गा गा गा अश्या लगावलीत फिट्ट बसते आहे.
हपा धन्यवाद....
हपा धन्यवाद....
आवडली रचना. -दिलीप बिरुटे
आवडली रचना.
-दिलीप बिरुटे
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
छान आहे.
छान आहे.