चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणे एखादं पात्र खूप छान जिंदादिल असलं, शेर अर्ज करत असलं, लोकांना ते आवडत असले तर पुढच्या अर्ध्या तासात ते मरतं हा सिद्धांत परत सिद्ध झाला. >>>
Lol
कारण मग प्रेक्षकांना जास्त वाईट वाटतं. इथं चांगले लिहिणारे लेखक सोडून गेले की वाचक 'या हो, या हो' करून टाहो फोडतात तसं. याहो आणि टाहो वर यमक जुळला. एवढं प्रेम जीवनावर 'आनंद' सिनेमातल्या आनंदनेही केलं होतं, काय झालं त्याचं. लो प्रोफाइल राहिला असता तर जगला असता, उगा आपलं 'जिंदगी कैसी ये पहेली', फुगे घेऊन पळत सुटायचे काय, सगळ्यांना जीव लावायचा काय Lol

मी 'आर्टिकल ३७०' अर्धा बघितला, अमित शहाचा रोल किरण करमरकरने केला आहे. मला ओळखू आला. रामायणातल्या राक्षसा सारख्या भुवया वाटल्या.

किरण करमरकर म्हणजे बायकोने धुतलेला शर्ट पांढरा शुभ्र का नाही निघाला म्हणून चिडून ऑफिसला निघून जाणारा तोच का?

हो, तो सगळ्यावरच चिडायचा आधी. 'दामिनी'मधे प्रतिक्षा लोणकरला आधी महेश मांजरेकर आणि ते तुटल्यावर हा होता. काय पर्याय आहे बघा. भाकरीऐवजी पोळी, मोदक नाहीच. चिडचिडच फक्त जरा डाऊनग्रेड करून. Happy

नेहमीप्रमाणे एखादं पात्र खूप छान जिंदादिल असलं, शेर अर्ज करत असलं, लोकांना ते आवडत असले तर पुढच्या अर्ध्या तासात ते मरतं हा सिद्धांत परत सिद्ध झाला. >>>खरय.
तत्ववादी अर्मी रोल मधे चान कम करतो. ह्याच्या आअधी हन्टर मधे ही आवडलेला पण त्यात ही मरतो. रच्याकने हन्टर मस्त आहे सिनेमा , थोडासा अश्लील आहे पण मस्त आहे.

एवढं प्रेम जीवनावर 'आनंद' सिनेमातल्या आनंदनेही केलं होतं, काय झालं त्याचं. लो प्रोफाइल राहिला असता तर जगला असता, उगा आपलं 'जिंदगी कैसी ये पहेली', फुगे घेऊन पळत सुटायचे काय, सगळ्यांना जीव लावायचा काय >>> Lol

पिक्चरमधल्या कॅरेक्टर्सनी "बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार" हे गदिमांचे वाक्य प्रमाण मानून तसे वागावे. म्हणजे मरायची भीती नाही.
* सध्याच्या जमान्यात गदिमांचे हे वाक्य डिस्क्रिमिनेटरी वाटेल.

या हो, या हो' करून टाहो फोडतात >>> लोल. लोक जंगली मधल्या शम्मी सारखे उड्या मारत, लोळत "याssssss हो" गात आहेत असे इमॅजिन केले.

अरेच्चा , अस्मिता एव्हढी धमाल पोस्ट नजरेतून सुटली कि. Lol

पान बदलले कि पुढच्या पानावरच्या पोस्टस काही काळ (माझ्याकडे) दिसत नाहीत.

बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार" हे गदिमांचे वाक्य प्रमाण मानून तसे वागावे. म्हणजे मरायची भीती नाही.
>>>>> Lol

Dune 2 is available on Amazon prime early access and then on rent. Don't miss great action. Kid friendly. Dune 1 is available on Netflix in case recap is needed.

थोडे अवांतर.
Dune कथा प्रसिद्ध करायला. कोणी प्रकाशक तयार नव्हता. तेव्हा "मोटारीचे सुट्टे पार्ट " चे मन्युअल प्रकशित करणारया एका कंपनीने हे पुस्तक प्रकाशित करायचे ठरवले. त्याच्याच शब्दात.
You see, Sterling E. Lanier was an editor for Chilton Books, a nonfiction publishing house known for their manuals on auto-repair. Lanier was a science fiction author himself, as well as a mega-fan of “Dune World.” Even before the entire serial was completed, Mr. Lanier reached out to Herbert’s agent with an offer to publish a whole book at Chilton Books. The offer was accepted, and a few months later, in 1965, the auto repair company published its first fiction novel, Dune. According to his son Brian, Frank Herbert would sometimes crack that Chilton may change the title to How to Repair Your Ornithopter.

I want one Ornithopter. Love those. Plus one big spice harvester.!!and one worm to ride on while you are at it. Happy

अमा
मिळेल मिळेल .का नाही मिळणार? सारी कायनात ...
पण त्या वर्मसाठी मात्र माझे दोन अश्रू.

काल पहिला Dune 2.

I want one Ornithopter. Love those. Plus one big spice harvester.!!and one worm to ride on while you are at it. Happy

>>>>> Happy Happy Happy

निषेध आणि तु.क. >> 'गद्य'बद्दल स्वॉरी स्वाती Lol Lol
(गाऊन म्हणायचं ते पद्य आणि बाकीचं गद्य ... असं म्हणून दुसरा तु क ओढवून घेतला जाईल असें दिसतें)

मला रिमझिम गिरे भयंकर आवडते (त्यातला किशोरचा आवाज एकदम सहज वाटतो). मुंबई कर असल्यामूळे गाण्याचे चित्रिकरण पण जबरदस्त आवडते (तो चौपाटी नि मरिन ड्राईव्ह वरचा लाटांचा प्रकार अनुभवल्यावर ते न आवडणे अशक्य आहे) पण का कोण जाणे ते गाणे त्या चित्रीकरणावर ताणून ओढून बसवले आहे असे नेहमी वाटत राहते.

त्वमेव सर्वम ही short film (30 min)पाहिली. डॉ जीवन रजक यांच्या आयुष्यावर बेतली आहे. चांगली आहे. वडीलांच्या रोल मध्ये संजय मिश्रा as usual सहजपणे वावरतो. Sort of 12th Fail ची कथा, वडिलांच्या बाजूने दाखवली आहे

सायलेन्स २ पाहिला. पहिला भाग अजिबात लक्षात नाही.
क्राईम पॅट्रोलच्या नियमित प्रेक्षकांनी कष्ट नाहीत घेतले तरी चालेल. सुरूवातीचा क्ल्यू आणि क्लायमॅक्सचा काही ताळमेळ नाही.
मनोज वाजपेयीचं काम सफाईदार. फारसा स्कोप नाही. प्राची देसाई अजूनही छान दिसते. पोलीस म्हणून शोभत नाही.
क्लायमॅक्स पूर्णच गंडला आहे. काही वेळ उत्कंठावर्धक आहे.
पोलिसांची कॉर्पोरेटला लाजवतील अशी कार्यालयं हा सीआयडीवाल्यांचा पॅटर्न दिसला कि तिथेच प्रेक्षक डिसकनेक्ट होतो.
पोलीस साध्या वेषात कधी तरी फॉर अ चेंज म्हणून ठीक वाटतं. पण इथे ते फॉर अ चेंज म्हणूनही युनिफॉर्म मधे दिसत नाहीत.
किमान फॉर्मल्स मधे तरी दाखवायचे.

काल दिवसभरच्या कामाचा फारच शीण आला होता.
टाईमपास म्हणून Ocean's 8 परत एकदा पाहिला . Mad , अचाट movie.
ती पूर्ण ladies gang आवडते मला. Anna बर्याचदा आवडते. काही डायलॉग्ज फारच crisp आहेत. तिचा Met gala चा +1 म्हणजे Harlen Coben सीरीजमधला धारधार नाकवाला हिरो.

या कि अन्य धाग्यावर श्रद्धांजली चित्रपटाची चर्चा झाली होती.
त्या काळच्या हाताळणीचा दोष पत्करून अर्धा पाहिला.
उत्कंठावर्धक आहे.
राखीचा आवाज तेव्हांपासून पन्नाशीच्या बाईसारखा आहे तर.

काल मर्डर मुबारक पाहिला. अगदी खिचडी केली आहे. इतके कलाकार, सुरुवातीला बराच वेळ कोणाचा कोण तेच शोधण्यात जातो. आणि एकदम संथ आहे, कंटाळा येऊन बंद करायचा मोह होत होता पण नेटाने बघितला. डिंपलबद्दल उत्सुकता होती पण तिला अगदीच नगण्य रोल आहे. संजय कपूर आणि करिश्मापण काही प्रभाव पाडत नाहीत. इतक्या उच्चभ्रू क्लबमधले सगळेच लोक बोलण्यात इतक्या शिव्या वापरत असतील, प्रत्येकाची सिक्रेट भानगडी असतील ते जरा जास्तच वाटले. विजय वर्मा आणि सारा अली खान तर अगदी मंद ठोकळे आहेत. विजय वर्मा खरं तर आवडतो पण यात एकदमच निरुत्साही दाखवला आहे. साराला अजिबात अभिनय येत नाही. एकटा पंकज त्रिपाठी किती प्रयत्न करणार. खरं तर मूळ प्लॉट बरा होता. पण थोडा fast-paced केला असता आणि साराऐवजी दुसरी अभिनेत्री घेतली असती तर चांगला होऊ शकला असता. अनेक गोष्टी संदर्भ सोडून वाटल्या,सुरुवातीला ती मांजर शोधणारी मुलगी कोणाची होती ते शेवटपर्यंत मला उमगले नाही.

‘खुफिया’ पाहिला नेफ्लिवर. स्पाय थ्रिलर असल्याने व तत्कालीन राजकारणाचे पैलू कुशलतेने गुंफल्याने मध्यंतरापर्यंत आवडला. नंतर मात्र मुळ कथेपासून फारकत घेतली आहे. तिही ठीकच आहे. फक्त त्यात तब्बूची सांसारिक गाथा, आजकाल मँडेटरी असलेले एलजीबीटीक्यू प्रेमप्रकरण इत्यादिंची ठिगळे नसती तरी चाललं असतं. अलि फजल, तब्बू, आशिष विद्यार्थी, नवनिंद्रा बहल, छोट्याश्या भुमिकेतला अतूल कुलकर्णी, खूप दिवसांनी दिसलेला ललित परिमु या सर्वांची कामं चांगली आहे, पण वामिका गब्बी हे माझ्यासाठी रिव्हिलेशन होते. तिच्याकडे यशस्वी होण्यासाठी लूक्स, बऱ्यापैकी अभिनय, कहानी की मांग पूरी करनेका जजबा सर्व आहे. तिला अजून एखाद्या रोलमध्ये पहायला आवडेल.
विशाल भारद्वाजचे संगीत व पार्श्वसंगीत विशेष आवडले नाही. कॅलगरीचे चित्रण सुंदर आहे. अर्थात विशालच्या चित्रपटांची ती खासियत असतेच.

गेल्या वर्षापासून नेटाने सिनेमे बघतोय. बरेचसे सिनेमे घरचे सगळे बघून मोकळे होतात. माझा धीरच होत नाही. पुष्पा पासून घरच्यांसोबत थिएटरला जाऊन सिनेमे पाहिले. बाहेर आल्यावर सिनेमा पाहिलाय असे वाटलेच नाही. बायकोला तर कलंक सुद्धा आवडला होता. मग सर्वांना आवडतात ते सिनेमे आवडावेत यासाठी जिद्दीने सी किंवा डी ग्रेड सिनेमे पहायला सुरूवात केली. यामागे लॉजिक साधेच आहे, काँग्रेस चांगली वाटायची असेल तर भाजपला एकदा तरी संधी दिली पाहीजे.

गेल्या आठवड्यात अमावस सुद्धा पाहिला. आरस्पानी सौंदर्याची खाण नर्गिस फाक्री (हाच उच्चार आहे ना ?) सचिन जोशी सोबत नायिका आहे. हे इतकं अपील झालं कि आपणच पडद्यावर गेलोय असे वाटले. कोण सचिन जोशी हा प्रश्न सुद्धा पडला नाही. अगदी ती त्याच्या पेक्षा फूटभर उंच आहे, तो धावताना बदकासारखा वाटतो , मारामारी करताना विनोदी दिसतो, रोमान्स करताना शिकाऊ वाटतो वगैरे खटकले नाही. पण तरीही सचिन जोशीने या आवडून घेण्याच्या मधे आड येत अभिनय सुद्धा भयाण केलाय.

मग विचार केला कि या नर्गिस फाक्रीला इतके वाईट दिवस का आले असतील ? तिचा लहान भाऊ वगैरे गुंडांनी पळवून नेऊन सचिन जोशीसोबत काम कर म्हणून धमकी तर दिली नसेल ? सचिन जोशी बद्दल सर्च करताना कळले कि तो व्हायकॉम १८ या प्रॉडक्शन हाऊसचा सर्वेसर्वा आहे. आता व्हायकॉम १८ च्या मागे कोणती ताकद आहे हे सांगायला नकोच. त्याला वाटले असते कि कतरीना, करीना आपली हिरवीन असावी तर त्यांची काय टाप ? पण अदृश्य शक्तीला प्रेक्षकांवर सक्ती करता आलेली दिसत नाही.

कालच मुलीने शानदार नावाचा सिनेमा पूर्ण पाहिला. मी येता जाता शेवटची पंधरा मिनिटे पाहिला. बहुधा ब्लॅक ह्युमर आहे. पण हिंमत झाली नाही.
शेवटी जेवणानंतर मुखवास असतो तसा दीवार कितव्यांदा तरी लावला.
आनंद बाबू चोर है, मेरा बाप चोर है..
मां हम दोनो तो इतना कमा सकते है ना कि रवी पढ सके
अगले हफ्ते एक और कुली हफ्ता देने से इन्कार करने वाला है
पीटर तुम मुझे वहां ढूंढ रहे थे, और मै तुम्हारा यहां इंतजार कर रहा था..
अब ये चाबी तुम्हारी जेब से निकालकर दरवाजा खोलूंगा

मैने कहा था ना, दरवाजा मै खोलूंगा...

इथपर्यंत पाहिल्यावर मग चित्रपट पाहिल्याचे समाधान वाटले. मस्त झोप लागली.

शानदार लहान मुलांना आवडतो
त्यात शाहिद कपूर, आलीया आणि बरीच रंगीत रंगीत(काही वेळा मशरूम खाऊन 'हाय' रंगीत) गाणी आहेत.
हा अमावस कोणता पिक्चर आहे, कधी आला आणि सचिन जोशी कोण आहे हे माहीत नव्हतं.मायबोली प्रवासाने मनुष्या चातुर्य येते ते हे असे.

गोवा गुटखा या सुप्रसिद्ध पवित्र उद्योगसमूहाचे सीईओ स्व. जगदीश मोहनलाल जोशी यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांच्या पेक्षा पवित्र उद्योगांनी त्यांना जीवनयात्रा संपवायचा आदेश दिला होता. या उद्योगातून मिळालेल्या प्रचंड पैशातून जगदीश जोशी यांच्या पत्नीने मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. मात्र १८ हा आकडा असलेल्या त्यांच्या मनोरंजन उद्योगाला सर्वात देशातल्या मोठ्या उद्योगसमूहाने मांडीवर घेतले आहे.

दीवार कितव्यांदा तरी लावला. >>> मला यूट्यूब सतत सजेस्ट करत असते त्यातल्या क्लिप्स. पण त्या क्लिप्स पब्लिकला तोंडपाठ असताना त्या क्लिप्सवर सलीम-जावेदच्या संवादाचे टायटल न वापरता स्वरचित वाक्य वापरून टाकणारे सवाई-सलीम-जावेद लोक कोण आहेत कोणास ठाऊक.

ही दोन उदाहरणे Happy क्लिपचे टायटल बघा Happy
https://www.youtube.com/watch?v=IOFCcTUUtkQ

https://www.youtube.com/watch?v=-30yohuR1Aw

पुलंच्या रावसाहेबांसारखे त्यांना "ते सलीम-जावेद संवाद लिहीलं, ते काय गांजा पिऊन लिहीत होतं कायं" असे विचारायला पाहिजे Happy

सीनमधेच काय पण पिक्चरमधेही नसलेले हे कोट्स यांनी कोठून शोधून काढले कोणास ठाऊक.

Pages