मराठीमधली कोडी

Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54

लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागे एक कोडं आहे
आई तरुणी, मुलं म्हातारी >>> उत्तर - चिंचेचं झाड आणि चिंचा

असंच एक कोडं -
पाटील बसले पारावर, त्यांचे पाय घरावर

वडाचं झाड बरोबर आहे उत्तर

चित्रकोड्याचा आणखी एक क्ल्यू.
मॉनिटर हलवा म्हणजे खाऊ नाही. हलवा म्हणजे टू शेक.

शेक्सपीअरचं नाटक आहे. त्याच्या नावाची हिंट शेक वरून मिळेल असं वाटलं. टू शेक = हलवा.

मी दिलेल्या कोड्याचे उत्तर आहे " आलं ( स्वयंपाक घरात वापरतो ते ) व आचारी लोक वापरतात तो मोठा पळा
( पळी ची मोठी आकारातील वस्तू ) . त्याला ' पळं ' असंही म्हणतात.

ते १००० रुपये नुकसानीचे कोडे समजावण्याचा माझ्यामते सोपा प्रकार म्हणजे,
फायदा = नुकसान

फायदा बाईचा १००० रुपये जे तिने १००० ची नोट खपवली. (बदल्यात २०० चे सामान आणि ८०० ची कॅश मिळवली.)
हेच आणि एवढेच नुकसान दुकानदाराचे.
शेजारचा दुकानदार आपलेच हजार रुपये परत घेऊन गेला. ना नुकसान ना फायदा.

..

एका माणसाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. तो खरेच एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे याची शक्यता किती?
>>>>>>>
९९ टक्के .. जी टेस्टची ऎक्युरसी आहे .. बाकी जगात किती लोकांना एडस झालाय की नाही आपल्याला काय करायचेय Happy

मी लहान असताना ऐकलेली कोडी.
झावरा कुत्रा देवावर मुत्रा.
खालून थोरला भाऊ वरुन धाकटा भाऊ मधी लाल लुगड्याची आऊ.
इथे होती कुठे गेली.
थाळाभर लाह्या तुझ्या बापाला मोजता येईना माझ्या बापाला मोजता येईना.

हिमालयातील अतिशय अवघड वळणावर वळणाच्या रस्त्यावर रात्री एक ट्रक जात होता, अचानक दरीत कोसळून ट्रकचे तुकडे तुकडे झाले तरीही ट्रकचा लाईट बंद व्हायचा नि विझायचा. असे कसे काय शक्य झाले असेल.

१. इसवीसन, शके, संवत्सर, इत्यादि नमुद केलेले नाही. जर २०२२ व २०२३ साल असतील वेगवेगळ्या कालगणनेनुसार नुसार असतील ज्यांच्यात ८१/८२ वर्षांचा फरक आहे.
२. २०२२ मध्ये जन्मला मोठा झाला मग त्याने बाजूचा २०२३ क्रमांकाचा फ्लॅट स्वतः खरेदी केला आणि त्या फ्लॅटमध्ये ८२ वर्षांनी त्याचा मृत्यू झाला.
३. 2022 Hrs ला जन्मला आणि ८२ वर्षांनंतर 2023 Hrs ला मरण पावला.

मानव क्र. २ बरोबर आहे.
इतर तर्कशुद्ध शक्यतांसाठी __/\__

घर क्र. २०२२ मधे आईचं माहेर होतं आणि २३ मधे सासर. तो आजोळी जन्मला आणि स्वतःच्या घरात मरण पावला.

>>>>>>>हिमालयातील अतिशय अवघड वळणावर वळणाच्या रस्त्यावर रात्री एक ट्रक जात होता, अचानक दरीत कोसळून ट्रकचे तुकडे तुकडे झाले तरीही ट्रकचा लाईट बंद व्हायचा नि विझायचा. असे कसे काय शक्य झाले असेल.

बंद व्हायचा नि विझायचा ना? शक्यच आहे की.

Pages