Submitted by के अंजली on 3 June, 2010 - 04:54
लहानपणी आम्ही नातवंडे जमलो की आजीच्या पोतडीतून एकएक किस्से, गंमतीजमती गाणी आणि छान छान कोडी निघत असत.आजी गेली अन ते सार संपलं,
आज काही काहीच त्यातली कोडी मला आठवताहेत. तुम्हालाही काही माहिती असतील तर मला लिहाल?
एक दोन त्यातली आठवताहेत ती इथे लिहीतेय, उत्तरे सोपी आहेत,पहा!
१. कुट कुट काडी पोटात नाडी
राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी
२. एवढस कार्टं घर कसं राखतं
३. पांढरं पातेल पिवळा भात
न ओळखेल त्याच्या कमरेत लाथ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रत्येक मशिनला नंबर द्या. १,
प्रत्येक मशिनला नंबर द्या. १, २, ३ .... १० असे. १ नंबरच्या मशिननं बनवलेली १ वीट, २ नंबरच्या मशिननं बनवलेल्या २ विटा, ३ नंबरच्या मशिनच्या ३ विटा असं करत करत १० नंबरच्या मशिनच्या १० विटा घ्या. त्यावर त्या त्या मशिन्सचे नंबर लिहायला विसरू नका. या सगळ्या विटा एकूण ५५ असतील.
सगळ्या एकाचवेळी वजनकाट्यावर ठेवा. सगळ्यांचं एकत्रित वजन ५५ किलो = ५५००० ग्रॅम्स भरायला हवं. पण कोणतं तरी एक मशिन १०० ग्रॅम कमी वजनाच्या विटा बनवतंय.
समजा ५५००० पेक्षा १०० ग्रॅम कमी भरलं तर मशिन नंबर १ बिघडलंय. २०० ग्रॅम कमी भरलं तर मशिन नंबर २ बिघडलंय, ३०० ग्रॅम क. भ. त. म. नं. ३ बि. वगैरे वगैरे......
विटांवर नंबर घातले असल्याने त्या विटा सहज बाजूला करता येतील आणि मग इच्छा असल्यास ते मशिन दुरुस्त करता येईल.
वजन करण्याचे मशिन 'दुरुस्त'
वजन करण्याचे मशिन 'दुरुस्त' करून ९०० ग्राम वाली वीट १ किलोची म्हणून खपवता आली तर बघा
मामी लॉजिक बरोबर. फक्त ५५
मामी लॉजिक बरोबर.
फक्त ५५ किलो = ५५००० ग्राम्स
तुम्हाला फक्त फॉल्टी मशीन शोधायला बोलावले आहे. कमी वजनच्या विटा शोधणे अपेक्षित नाही.(super speciality you know) त्यां कशा शोधयच्या, त्यासाठी आणखी कोणाला बोलवायचे, त्यांचे पुढे काय करायचे ते कारखान्याचे मालक बघतील.
हे हे हे माझं मशिन बिघडलेलं
हे हे हे माझं मशिन बिघडलेलं दिसतंय. दुरुस्त करते.
लहाशीक पोरगी, चोळी-पातळ
लहाशीक पोरगी, चोळी-पातळ नेसली
चार-चौघात जावुन बसली....
>>>> चिलीम.
भरत, खडकसिंग, भारी होती ही
भरत, खडकसिंग, भारी होती ही कोडी. मामी, भारीच.. लॉजिक पण भारी.
*
*
उत्तर : चांदणी.
उत्तर : चांदणी.
एक स्त्री एका किराणा
एक स्त्री एका किराणा दुकानातून २०० रुपयांचे सामान खरेदी करते. . स्त्री दुकानदाराला १००० रुपयांची नोट देते.
सुट्टे पैसे नसल्यामुळे दुकानदार शेजारच्या दुकानातून १००० रुपयांचे सुट्टे पैसे आणतो,२०० स्वतः ठेवतो आणि ८०० त्या स्त्री ला देतो...!!!
थोड्यावेळाने दूसरा दुकानदार ती १००० ची नोट घेऊन येतो व किराणा दुकान वल्याला परत देतो व ही नकली नोट असल्याचे निदर्शनास आणून देतो...व तो किराणा दुकानदाराकडून १००० रुपये घेऊन जातो... . .
तर आता तुम्ही सांगा किराणा दुकानदाराला एकूण किती रुपयांचे नुकसान झाले??
साधारण ९६० रुपयान्चे
साधारण ९६० रुपयान्चे नुकसान.
जर २०० रुपयान्च्या मालावर त्याला ४० रुपयाचा फायदा होत असेल तर तो माल साधारण १६० रुपयाचा असावा.
+ ८०० रुपये जे त्याने स्त्रीला दिले.
फायदा 0 पकडावा. आता विचार
फायदा 0 पकडावा. आता विचार करा.
२००० रुपयांचे नुकसान झाले.
२००० रुपयांचे नुकसान झाले. बरोबर?
१००० रुपये नुकसान. बाई: जावकः
१००० रुपये नुकसान.
बाई:
जावकः २०० रु.चं सामान + ८०० रु. परत दिले. = १००० रु.
आवकः ० रु.
-----------------------
नेटः १००० रु.
शेजारचा दुकानदारः
आवकः १००० रु.
जावकः १००० रु.
--------------------
नेटः ० रु.
मलाहि 2000 च बरोबर वाटते. पण
मलाहि 2000 च बरोबर वाटते. पण माझा मित्र म्हणतो 1000 उत्तर आहे. आता हे कसं आलं कलत नाही.
समजा , १ जगातले १ % लोक एच आय
समजा ,
१ जगातले १ % लोक एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत.
२ एक एच आय व्ही टेस्ट उपलब्ध आहे जी ९९% अॅक्युरेट आहे ( ९९% रिझल्ट्स बरोबर असतात)
एका माणसाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. तो खरेच एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे याची शक्यता किती?
१०००
१०००
९९%
९९%
बाई: जावकः २०० रु.चं सामान +
बाई:
जावकः २०० रु.चं सामान + ८०० रु. परत दिले. = १००० रु.
आवकः ० रु.
शेजारचा दुकानदारः
आवकः ० रु. नकली नोट.
जावकः १००० रु.
2000 नुकसान.
शेजारचा दुकानदार त्याने
शेजारचा दुकानदार त्याने दिलेले खरे १००० परत घेऊन जातो...म्हणून ते १००० रू.चे नुकसान झाले असे होत नाही.
दुकानदाराने २००रू.चे सामान आणि ८००रू. त्या स्त्रिला दिले. तेव्हढेच त्याचे नुकसान झाले.
१००० रू.चे नुकसान झाले हे
१००० रू.चे नुकसान झाले हे बरोबर आहे.
finally got it....
2000 नुकसान 800रूपये बाईला
2000 नुकसान
800रूपये बाईला देतो + 200 चा माल देतो हे झाले 1000
1000 बाजूच्या दुकानदाराला देतो
याच्या हातात 1000 ची खोटी नोट येते आणि 1800 रूपये खरे वाटतो खणि 200चा माल देतो
वाकडं तिकडं आलं र बाप्पा ,
वाकडं तिकडं आलं र बाप्पा , मोठं डोकं , लांब शेपुट पळं र बाप्पा !
कोण ओळखतो ?
800रूपये बाईला देतो + 200 चा
800रूपये बाईला देतो + 200 चा माल देतो हे झाले 1000
>> अरे ते ८०० रुपये शेजारच्या दुकान्दारचे होते ना? ते नुकसान कसे +
त्याला २०० च्या मालासाठी पण २०० रुपये शेजारच्या दुकानदाराने दिले ते त्याचे काही नुकसान नाही!
शिवाय सध्याच्या काळात तो २०० रुपयावर ४० रुपये तरी नफा लावणार
९६० चा तोटा. फायदा ० असेल तर १००० धरा.
मी वर लिहिलेले बरोबरच मुळी!
200 var 40रूपये नफा? सुट्टे
200 var 40रूपये नफा?
सुट्टे घेतले ते काय फुकट दिले का 1000ची नोट घेतली ना? मग 1000 खर्च झालेच आणि परत खोटी निघाली म्हणून 1000 अजून दिले
सुट्टे घेतले ते काय फुकट दिले
सुट्टे घेतले ते काय फुकट दिले का 1000ची नोट घेतली ना?
>> हो ती नकली नोट बाईकडुन आली त्याच्या गल्ल्यातुन नाही.
बाईला ८०० दिले ते शेजारच्या किराण्याच्या गल्ल्यातुन आले. उर्वरीत
२०० खरे खुरे त्याच्या गल्ल्यात गेले.
फक्त १००० चे नुकसान!
_____________________________________________
200 var 40रूपये नफा?
४० रुपये निव्वळ नफा नाही काही ऑपरेटिन्ग कॉस्ट मध्ये पण जातो पण तोट्यात मोजता येणार नाही.
आणि साधारण असे लिहिले आहे. नफा ० असेल तर १००० रुपये असे पण लिहिले आहे, जरा वाचा की राव!
___________________________________________________________________
.
.
प्रत्यक्ष करून बघा कळेल
प्रत्यक्ष करून बघा कळेल उत्तर
practical करून बघा
2000च नुकसान आहे
१००० हेच बरोबर की. इथे लोक २
१००० हेच बरोबर की. इथे लोक २ घटनां मधे घोळ करत आहेत.
घटना १ - ट्रॅन्झॅक्शन पूर्ण झाले कुणाचे काही नुकसान नाही . मालावरचा नफा पकडलेला नाही
घटना २- दुकानदार क्र.१ कडील १००० ची नोट खोटी निघाली.
दॅट्स इट! १००० चे नुकसान. बाकीची माहित अवांतर आहे
maitreyee | 11 August, 2015 -
maitreyee | 11 August, 2015 - 11:20 नवीन
दॅट्स इट! १००० चे नुकसान. बाकीची माहित अवांतर आहे
>>
+१
चित्रमय कोडं.ओळखा बघू
चित्रमय कोडं.ओळखा बघू
Pages