चोली के पीछे क्या है!!

Submitted by अश्विनीमामी on 2 April, 2024 - 01:49

परवाच वीकांताला क्रु नावाचा मजेशीर चिक फ्लिक गर्ली चित्रपट बघितला. क्लायमॅक्समध्ये नाट्य मय प्रसंग घडत असताना चोली के पीछे गाण्याची रिमिक्स व्हर्जन आहे. दिल्जित दोसंथ व इतर मंडळी, जास्त रॉकिन्ग संगीत आहे. तेव्हाच घरी गेल्यावर चित्रपटाचा साउंड ट्रॅक स्पॉटिफाय वर ऐकायचे ठरवले होते. तसा तो ऐकला. गाणे छान आहे. पण ओरिजिनलची सर नाही. म्हणून लेखन प्रपंच.

आयटम साँग हा बॉलिवुडचा एक भारी करमणूक प्रकार आहे. ही मला आवडतात. कारण ती कुठेही कधीही येतात. मोस्टली पुरुष प्रेक्षकांसाठी डिझाइन्ड असतात. जमेल तेवढा चावटपणा, थोडी मोकळी ढाकळी, उ भा भाषा, व ते चॅलें ज स्वीकारुन उत्तम पणे निभावुन नेणार्‍या आपल्या
तारका. एखादेच यशस्वी आयटेम साँग ; जे गो ड इनोसंट हिरवीण पुर्वी करु शकत नसे; तारकेला स्टार बनवुन टाकते ओव्हरनाइट. आपल्यातली पॉवर दाखवायची त्यांना एक संधी असते ही. यशस्वी गाणी नुसती बघायला येणारे पण प्रेक्षक असतात. तुम्ही कधी असा मंत्रचळे पणा केला आहे काय? पेश है मेरे टॉप टेन फेवरिट्स.

१) चोली के पीछे क्या है. : नर्तकी माधुरी( आपली) संगीत लक्ष्मिकांत प्यारे लाल व शब्द आनंद बक्षी. गाण्याची
सिचुएशन भन्नाटच आहे. ओजी खलनायक ह्याच्या कडुन माधुरीला काहीतरी सिक्रेट जाणून घ्यायचे आहे त्यासाठी हा नाचाचा प्रपंच!!! तिचा ड्रेस जबरदस्त फ्लेमिन्ग ऑरेंज- लाल रंगाचा आहे. व राजस्थानी दाग दागिने श्रिंगार आहे. त्यात ती ही थोडी लबाड थोडी इनोसंट अ‍ॅक्टिन्ग करते लाजवाब!! मागे काउंटर पार्ट नीना गुप्ता जी अनुभवी जरा वयाने मोठी आहे. व इतर नर्तकी पण हँडलुमचे घागरे चुनरी चोळ्या घालुन आहेत. त्यांच्या दागिन्यांच्या व गोंदणाच्या प्रेमात पडायला होते. गाणे जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा देशाची झोप उडवली होती. अगदी बारीक हिरविणीची ट्रेंड माधुरीनेच आणली. त्या आधीच्या नायिका जरातरी हेल्दी असत. नीना गुप्ताला इला अरुणचा आवाज द्यायची कल्पना पण लै भारी आहे. संगीत तर एकदम एकदम रॉकिन्ग आहे. एस्प. माधुरी गायब झाल्यावरचा तालवाद्यांचा दंगा मुळातुनच ऐकण्यासारखा आहे. मी हे गाणे ऐकते जास्ती. पण झेपेल तेवढे बघा नक्की. पहिल्या कडव्यात माधुरीला एक झकास ढोलकीचा पीस देण्यात आला आहे. एक ही अ‍ॅक्षन व्हलगर नाही. सौतन बना ना जाए, जोगन रहा न जाए!! हा काय प्रॉब्लेम आहे हिचा. खलनायक तिला पन्नासच्या नो टा ऑफर करतो तेव्हा अंमळ हसूच येते. गेला तो जुना काळ .
https://www.youtube.com/watch?v=teCIQnIZXYw

२) कजरारे कजरारे: ऐश्वर्या, जास्त सांगणे न लगे. काळे डोळे. अप्रतिम दिसते व वैभवीने कोरिओ ग्राफ केलेला डान्स एकदम छान आहे. अगदी कमी दागिने आहेत. सिनिअर बच्चन एकदम भाव खाउन जातात व ज्युनिअर कमीच पडतो. हे गाणे पिक्चर मध्ये पहिल्यांदा पाहिले तेव्हा आजिबात बोअर झाले होते. काय हे मध्येच. पण मग हळू हळू त्याची जादु डोक्यात चढत गेली. सर्व पोरकट पणात मध्येच हा जालीम तडका येतो. ह्या नंतर अमिताभचा एक लै भारी जोक आहे तो ऐकून चित्रपट बंदच करते मी तर. तेव्हा ती घागरा थोडासा वर करायची अ‍ॅक्षन आधीच पॉप्युलर झाली होती बाबुजी धीरे चलो गाण्यात म्हणून ऐश्वर्याने ती आपण करुन बघावी असा आग्रह धरला असावा हे मा वै म. तन्वांगी सुंदरी व मोहक काळे डोळे. रुपगर्विताच ती. हे गाणे ही श्रवणीय आहे. नुसते बघणीय नाही.

https://www.youtube.com/watch?v=4dsFQFCvVGU

३) मुन्नी बद नाम हुई:
मलाइका अ‍ॅट हर बेस्ट. सुपर एनर्जॅटिक डान्स. व झंडू बाम ची एडिटोरिअल एं डॉर्स मेंट. मध्येच सल्लु भाई शिट्ट्या वाजवत पोलिस गाडीतुन येत असता. ओरिजिनल युपी फ्लेवरः शब्द जरा रिस्के वाटू शकतात पण चित्रपटात एकदम फिट होतात. दबंग ऑफ ऑल थिंग्ज. मलाइका वर छैया छैया पासून प्रेम आहे. मग काय कमी म्हणून सल्लु भाई येतात!!! तु अ‍ॅट्म बाँब हुई मेरे लिए. इंडीड!! गुड फन साँग. देसी पार्टीत नाच करायला मस्त आहे. डिजे ला सांगून ठेवा.

https://www.youtube.com/watch?v=83XfpQQ5qVA

४) बी डी जलाइले: परवा होली पार्टीत हे फार वाजले आमच्या इथे. पब्लिक बेहोश उन्हात नाचत होते. बिपाशा खुपच सॉफिस्टिकेटेड दिसते पण शी ब्रिन्ग्ज हर एनर्जी अँड अपील. गुलझारांचे लिरिक्स असल्याने मी काही बोलायची गरजच नाही. एंजॉय द डान्स. विवेक ऑबेरॉय पण किती तरुण व रसरशीत दिसतो. बिना जुर्म के हजूर मर गये ( बिचारे) सगळी मजा गंमत चालू आहे. पुढचे महाभारत घडायचे आहे. एक प्रणय दृश्य पण आहे. जस्ट वार्निग्न.
https://www.youtube.com/watch?v=XLJCtZK0x5M

५) नमक इस्क का: एकाच पिक्चर मध्ये दोन आयटम सॉन्ग का व ते इतके छान आहेत. हे मला जास्त आवडते. बिपाशा सुरेख सावळी दिसते. व तो घराण्याचा एकमेव दागिना तिने घातला आहे ज्या मुळे पुढचे संशयकल्लोळ नाट्य घडते. गुलझार इन नॉटी फॉर्म.

https://www.youtube.com/watch?v=NJ-N3OjTWA4

६) छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैंजनियां: आपली उर्मिला!!! काय एनर्जी ने नाचते!!. ड्रे स अगदी साधा आहे व ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी. जी तिला फार शोभते. अगदी साधे सेटिन्ग आहे. आजुबाजुला चार म्हातारे नेहमी प्रमाणेच. मी हे लार्ज स्क्रीन वर बघि तले नाही. पण जोरदार इम्पॅक्ट असेल.
https://www.youtube.com/watch?v=1ZnPY1c3u_0

७) गुप चु प गुपचुपः आपली ममता कुलकर्णी. राजस्थानी सेट अप. व एक नॉटी स्टोरी आहे. पण शेवटी तसे काही घडले नाही. नर्तकी इनोसंटच आहे. जीव भांड्यात पडतो. ममता फा र गोड दिसते व नाचते. इथे पण एक जुजा म्हातारी आहे. जी उगीच नावाला पंचनामा करत आहे. जॉनी लिव्हर पण बाईचे कपडे घालुन आहे. व सलमान शारुख मागे काहीतरी बारुद गोळा लावायच्या गडबडीत आहेत. हे व्हिलन इतके कसे लंपट व बावळट. पण ते ही ममताच्या जादु मध्ये हरवुन जातात. इथे पण इला अरुण चा तडका आहे. चोली के पीछे ची धाकटी बहीण म्हणावे असे गाणे आहे.
https://www.youtube.com/watch?v=EvOAmbPkSVs

८) तु लगावेलु जब लिपस्टिकः हे गाणे मी बघत नाही पण ऐकते. मजेशीर वाटते मला भोजपुरी आहे. लिं क देत नाही पण भारतात तरी फारच लोक प्रिय आहे. स्पॉटिफा य वर उपलब्ध आहे.

९) सलामे इश्कः ओजी रेखा व अमित. हा माझा सर्वा त फेवरिट मुजरा आहे. रेखे ने उमराव जान मध्ये एक वरची लेव्हल गाठली आहे.
इथे लता व किशोर आहे. दिल की चोट खाये हो तो गाना जरुर पसंद आयेगा. ऑसम लिरिक्स.

https://www.youtube.com/watch?v=0N6enWBR-FM

१०) महबुबा महबुबा: १९७५ मधील शोलेतील हेलेन चे नृत्य. इथे पण धरम पाजी व अमित मागे काही कारवाया करत आहेत. आम्हा ममव मुलांना हा एकदम कल्चर शॉक होता. हेलनचे उत्फुल्ल नृत्य. आर्डीचा आवाज. एकंदर नशीला माहौल. हा एकच रिलीफ आहे इंटरव्हल नंतर पुढे सर्व वाइटच होत जाते. जलाल आगा उत्तम फॉइल. दिलरुबा घेउन नाचतो. गब्बर च्या डोळ्यात सर्व पॅशन भरलेली आहे. वॉट अ व्हिलन बॅड गाय धिस वन. असे सौंदर्य नेहमी हाताबाहेर असते.

https://www.youtube.com/watch?v=ajIn2W5ZBi4

ऑनरेबल मेन्शनः झूठ बोले कौवा काटे डिंपल. कोळी मुलीच्या गेटप मधे असे दिलखेचक नृत्य केले आहे की भान हरपते. काय ती ज्वेलरी, काय तो आत्मविश्वास. तरी पहिलाच पिक्चर!!!

तर मं डळी एंजॉय करा ही प्ले लिस्ट. भर टाका पण काही आक्षेपार्ह लिहू नका ही विनंती. हे सर्व कलाकार आहेत लव्ह देअर पर्फॉरमन्स.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा ! मायबोली पडलीय म्हणून यायचंच सोडून दिलं होतं तर अचानक हा धागा दिसला.
खूपच मस्त धागा आहे हा.

आत्ता वेगळी गाणी आठवायला वेळ नाही. वरच्या लिस्टमधल्या गाण्यात ज्याला आयटेम साँग म्हणता येईल त्यात माझ्याकडून
मेहबूबा मेहबूबा हे गाणं ऑल टाईम हिट म्हणून पहिल्या नंबरला.
छम्मा छम्मा दुसर्‍या नंबरला. ( डबल मिनिंगच्या शब्दांचं वावडं नक्कीच नाही, पण या गाण्यातल्या शब्दात नाद आहे,पैंजण वगैरे पुन्हा संगीत.कोरिओग्राफी पण कवायत प्रकारात नाही कि अंगावर येणारे नृत्य नाही)
कजरारे हे तिसर्‍या क्रमांकाला. ऐश्वर्या आहेच. पण बच्चन्सनी जान ओतलीय. कोरिओग्राफी पेक्षा तिघांनी धमाल उडवून दिलीय.

यादीत नसलेलं झूट बोले कौआ काटे आजही धमाल वाटतं.

चोली के पीछे हे ऐकून ऐकून हिट झालेलं आहे. गोडवा अजिबातच नाही. डबल मीनिंग मुळे लक्ष वेधून घेतलेलं.
बीडी जलाईले पण असंच.

मुंगडा मुंगडा हे हवं होतं, तसंच दबंग १,२ मधली दोन्ही गाणी.

सलाम ए इश्क आणि मुझे नौलखा मंगा दे रे ही वरच्या गाण्यांच्या कॅटेगरीतली वाटत नाहीत. यांच्या साठी वेगळाच धागा पाहीजे.उमराव जान मधली गाणी , प्राण बिंदूने अजरामर केलेलं राज की बात कह दू तो, हमने सनम को खत लिखा अशी गाणी यात येऊ शकतील. पाकिझा पण.

“ अशी तर मोठी यादी होईल. मोरा नादान बालमा - उजाला,” - येस!! बरोबर आहे मानवजी. १९५० च्या दशकाच्या आधी सिनेमात व्हँपने केलेली नृत्यं असायची. ‘तवायफ‘ चे ‘मुजरे’ असायचे. ५० च्या दशकाच्या सुरूवातीला (१९५१) प्रदर्शित झालेल्या ‘आवारा‘तल्या ‘एक दो तीन, आजा मौसम हैं’ ने क्लब च्या सेटिंगमधे त्या व्हँपला नाचायला आणि गायला लावलं. १९५२ मधे ‘आन’ मधे कुक्कू चं च आणखी एक ‘आयटम साँग‘ होतं (‘आग लगीं तन मन में). ह्याच कुक्कूने तिच्या मैत्रिणीच्या मुलीला - हेलन ला - हिंदी सिनेसृष्टीत आणलं. तुम्ही उल्लेख केलेला उजाला १९५९ मधे आला होता (ज्यात शम्मी कपूरला मुकेश चा प्लेबॅक आहे - दुनियावलोंसे दूर, जलानेवालोंसे दूर).

मस्त लेख अमा. छान गाणी जमलीयेत. मी काही ही मुद्दाम ऐकायला जाणार नाही पण कधी ऐकायला, बघायला मिळाली तर आवडतात.

हे गाणे पिक्चर मध्ये पहिल्यांदा पाहिले तेव्हा आजिबात बोअर झाले होते. काय हे मध्येच. पण मग हळू हळू त्याची जादु डोक्यात चढत गेली. >>> हे एकदम परफेक्ट आहे.

या माही वे, मोहब्बताँ सचीयाने, मंगदा नसीबा कुछ और है हे पण जोडा.

रच्याकने, कुटं कुटं जायाचं हनिमूनला हे मराठीतलं आयटेम साँग आहे.

किमाम ही केवळ मुखशुद्धी असती तर तिला आवळा सुपारी म्हटले नसते काय >>> Lol

झल्ला वल्ला (इशक्जादे) >>> मस्त आहे.

सगळ्या मराठी लावण्या ( 'कशी नशिबाने थट्टा आज मांडली' कॅटेगरी सोडून) आयटम सॉंग्स होत्या की. एक रिप्रेझेंटीटीव्ह म्हणून 'आता वाजले कि बारा'

यावरून एक अपनापन मधलं आठवलं. फिर गंगुबाई की चाल देखो. तेव्हा आदमी मुसाफिर है च्या खालोखाल हे हिट झालं होतं, >>>
या वरून त्याच काळी फेमस झालेलं (आणि चालीत बरचसं साधर्म्य असलेलं) 'दरिया किनारे एक बंगलो पोरी जै हो जै' हे फरिदा जलाल आणि विनोद मेहेरावर चित्रित झालेलं कोळी गीत आठवलं.
तसं पाहिलं तर सगळीच कोळी गीतं या आयटम सॉंग प्रकारात मोडतील!

अजून काही:
- कोई जाए तो ले आये
- काले काले बाल गाल गोरे गोरे
- छम छम करता है ये नशीला बदन
- हवा हवा
- तेरे चुम्मे मे च्यवनप्राश है

मस्त धागा. छैंया छैंया & हम्मा हम्मा, छम्मा छम्मा सर्वांची अलग मजा & नशा आहे Happy
चने के खेत में आलं नाही वर. ते पण आयटम साँग च म्हणता येईल. पुर्ण गाणं जोरजबरदस्ती वरच आहे Sad पण ठेका ताल धरायला लावतो.

तुफान रातों मे
जब तू नही आता
तेरे बिना आज लगता है
छाया सन्नाटा

या गाण्याचा टेंपो वाढवला आणि सुनिधी चौहान / नेहा कडकड कडून पॉप / विशाल ददलानी शैलीत गाऊन घेतलं, जमिनीवर सरपटणारे स्त्री पुरूष अशी कोरियोग्राफी केली तर जबरदस्त आयटम साँग बनेल.

'चोली के पीछे' मध्ये, माधुरी इन हर सेन्श्युअल मोस्ट!!
ही नाचणारी, त्याच्या तोंडावर पैसे फेकुन 'मेरी गुलामी करले, होगा तू होगा कोई बादश्शा' - काय अभिनय आहे त्या क्षणाला. निव्वळ माधुरी करु जाणे. अन्य कुणा हिरॉइअनला हा माज शोभलाही नसता कदाचित Happy

रात का नशा अभि, आईये आजाईये (लज्जा), ये रात (अक्स, थँक्स मी-अनु), भरो मांग मेरी भरो.. ही मला “गाणी “ म्हणुन आवडणारी गाणी, जी रुढार्थाने आयटम नसतील पण तशा स्टेप्स दिल्या तर होऊ शकतील अशी आहेत.
मामी, माही वे मलापण फार आवडतं.

'चोली के पीछे' मध्ये, माधुरी इन हर सेन्श्युअल मोस्ट!! >>> मला ती हमको आजकल है इंतजार मध्ये खूपच आवडते. तिची ती सडसडीत अंगकाठी कसली लवचिकपणे हलते.

>>>>>सडसडीत अंगकाठी कसली लवचिकपणे हलते.
मामी ती माधुरी नाही गं ती सोनेरी खवल्याखवल्यांची इंद्रधनुषी मासोळी आहे Happy
पोट किती पातळ असावं.

मेरे पियॉन गये रंगून
किया हय वहान से टेलिफुन
तुम्हारी याद सताती है
( आयटम साँग आहे कि नाही ?)

अमांच्या लिस्ट मधली सगळीच गाणी आवडती आहेत फक्तं ‘चोली के पिछे’ मात्रं नावडतं, एकदमच मिळमिळीत.
‘बीडे जलायले ‘ सर्वात धमाका, एकदम दंगा गाणं आहे , भट्टी जमून आली आहे + अस्ली मिट्टी कि खुशबु आहे गाण्यात !
चोली के पिछे सर्वत बेकार, ना कोरिओग्राफी खास ना तिचा डान्स, एक्स्प्रेशन्स पण काहीतरी विचित्रं विनोदी आहेत तिची,सेक्सी/सेन्शुअल वगैरे अजिबातच जललं नाहीये माधुरीला , संजय दत्त पण असह्यं !
इला अरुणचा आवाज आणि नीना गुप्ता ऑन स्क्रीन या त्यातल्या त्यात जमेच्या बाजु !
जांबाझ मधलं ‘प्यार दो प्यार लो‘ पण धमाका आहे पण वन्स अगेन रेखानी टोटली वाया घालवलय ऑन स्क्रीन !
अमा, चिकनी चमेली विसरलात का ? टोटली रॉकिंग !
शिल्पा शेट्टीचं ‘आयी हूं युपी बिहार लुटने‘ पण भारी आहे.

माधुरीच्या धकधक बद्दल कोणीच लिहिले नाही. कसलं भयानक गाजलं होतं ते. तितकं दुसरं कोणतं गाजलेलं मला आठवेना.

मलाही चोली के पीछे फारसे नाही आवडले कधी.
बिडी जलाइले एकदम रॉकिंग्,वर कुणीतरी लिहिले तसा विवेक ओबेरॉय तरूण वगैरे दिसतो पण एकदम फ्लॅट लूक. त्यापेक्षा सैफ ने २-३ च मूव्ज केल्यात पण लंगडा त्यागीची फुल्ल पर्सनॅलिटी दाखवली आहे त्यात पण!! जबरा एक्सप्रेशन्स !
मेल आयटम साँग्स आहेत का कोणती ? Happy

मेल आयटम साँग्स आहेत का कोणती ?
<<<<<
देसी बॉइजचं ‘सुबह होने ना दे शाम खो ना दे‘ , एकच पुरुषांना ‘आयटेम’ म्हणून ऑब्जेक्टिफाय करणारं गाणं आठवतय पटकन !
https://youtu.be/Y7G-tYRzwYY?si=8ObhfctsvWXo1p6r

हम दोनों है अलग अलग
तू चीज बडी है मस्त
अ ओ जाने जाना ( थ्री पीस सूट मधे सलमान खान)
बख्तमीज
दुनियाको खुद से अलग करके, रख लुंगा तुम्हे हग करके ( हे पण थ्री पीस सूट)
देसी बॉईज ( थ्री पीस सूट वर ओव्हर कोट आणि शाल )
इश्क कमीना
मिशन कश्मीरची दोन गाणी
बेशरम (रणवीर कपूर)

पुष्पा मधलं सॅमंथाचं ‘उ अन्ता वा मा मा‘ रिसेन्ट टाइम मधलं सर्वात हॉट आयटेम साँग आहे.
सॅमंथा इतकाच किंवा त्याही पेक्षा जास्तं अमेझिंग डान्स अल्लु अर्जुनचा आहे , स्वॅग !
बॉलिबुड मधे तरी इतकं जबराट साँग आलच नाहीये इतक्यात!
जुन्यां मधे प्रि.चो चं ‘राम चाहे लीला‘ पण भारी आहे.

Pages