परवाच वीकांताला क्रु नावाचा मजेशीर चिक फ्लिक गर्ली चित्रपट बघितला. क्लायमॅक्समध्ये नाट्य मय प्रसंग घडत असताना चोली के पीछे गाण्याची रिमिक्स व्हर्जन आहे. दिल्जित दोसंथ व इतर मंडळी, जास्त रॉकिन्ग संगीत आहे. तेव्हाच घरी गेल्यावर चित्रपटाचा साउंड ट्रॅक स्पॉटिफाय वर ऐकायचे ठरवले होते. तसा तो ऐकला. गाणे छान आहे. पण ओरिजिनलची सर नाही. म्हणून लेखन प्रपंच.
आयटम साँग हा बॉलिवुडचा एक भारी करमणूक प्रकार आहे. ही मला आवडतात. कारण ती कुठेही कधीही येतात. मोस्टली पुरुष प्रेक्षकांसाठी डिझाइन्ड असतात. जमेल तेवढा चावटपणा, थोडी मोकळी ढाकळी, उ भा भाषा, व ते चॅलें ज स्वीकारुन उत्तम पणे निभावुन नेणार्या आपल्या
तारका. एखादेच यशस्वी आयटेम साँग ; जे गो ड इनोसंट हिरवीण पुर्वी करु शकत नसे; तारकेला स्टार बनवुन टाकते ओव्हरनाइट. आपल्यातली पॉवर दाखवायची त्यांना एक संधी असते ही. यशस्वी गाणी नुसती बघायला येणारे पण प्रेक्षक असतात. तुम्ही कधी असा मंत्रचळे पणा केला आहे काय? पेश है मेरे टॉप टेन फेवरिट्स.
१) चोली के पीछे क्या है. : नर्तकी माधुरी( आपली) संगीत लक्ष्मिकांत प्यारे लाल व शब्द आनंद बक्षी. गाण्याची
सिचुएशन भन्नाटच आहे. ओजी खलनायक ह्याच्या कडुन माधुरीला काहीतरी सिक्रेट जाणून घ्यायचे आहे त्यासाठी हा नाचाचा प्रपंच!!! तिचा ड्रेस जबरदस्त फ्लेमिन्ग ऑरेंज- लाल रंगाचा आहे. व राजस्थानी दाग दागिने श्रिंगार आहे. त्यात ती ही थोडी लबाड थोडी इनोसंट अॅक्टिन्ग करते लाजवाब!! मागे काउंटर पार्ट नीना गुप्ता जी अनुभवी जरा वयाने मोठी आहे. व इतर नर्तकी पण हँडलुमचे घागरे चुनरी चोळ्या घालुन आहेत. त्यांच्या दागिन्यांच्या व गोंदणाच्या प्रेमात पडायला होते. गाणे जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा देशाची झोप उडवली होती. अगदी बारीक हिरविणीची ट्रेंड माधुरीनेच आणली. त्या आधीच्या नायिका जरातरी हेल्दी असत. नीना गुप्ताला इला अरुणचा आवाज द्यायची कल्पना पण लै भारी आहे. संगीत तर एकदम एकदम रॉकिन्ग आहे. एस्प. माधुरी गायब झाल्यावरचा तालवाद्यांचा दंगा मुळातुनच ऐकण्यासारखा आहे. मी हे गाणे ऐकते जास्ती. पण झेपेल तेवढे बघा नक्की. पहिल्या कडव्यात माधुरीला एक झकास ढोलकीचा पीस देण्यात आला आहे. एक ही अॅक्षन व्हलगर नाही. सौतन बना ना जाए, जोगन रहा न जाए!! हा काय प्रॉब्लेम आहे हिचा. खलनायक तिला पन्नासच्या नो टा ऑफर करतो तेव्हा अंमळ हसूच येते. गेला तो जुना काळ .
https://www.youtube.com/watch?v=teCIQnIZXYw
२) कजरारे कजरारे: ऐश्वर्या, जास्त सांगणे न लगे. काळे डोळे. अप्रतिम दिसते व वैभवीने कोरिओ ग्राफ केलेला डान्स एकदम छान आहे. अगदी कमी दागिने आहेत. सिनिअर बच्चन एकदम भाव खाउन जातात व ज्युनिअर कमीच पडतो. हे गाणे पिक्चर मध्ये पहिल्यांदा पाहिले तेव्हा आजिबात बोअर झाले होते. काय हे मध्येच. पण मग हळू हळू त्याची जादु डोक्यात चढत गेली. सर्व पोरकट पणात मध्येच हा जालीम तडका येतो. ह्या नंतर अमिताभचा एक लै भारी जोक आहे तो ऐकून चित्रपट बंदच करते मी तर. तेव्हा ती घागरा थोडासा वर करायची अॅक्षन आधीच पॉप्युलर झाली होती बाबुजी धीरे चलो गाण्यात म्हणून ऐश्वर्याने ती आपण करुन बघावी असा आग्रह धरला असावा हे मा वै म. तन्वांगी सुंदरी व मोहक काळे डोळे. रुपगर्विताच ती. हे गाणे ही श्रवणीय आहे. नुसते बघणीय नाही.
https://www.youtube.com/watch?v=4dsFQFCvVGU
३) मुन्नी बद नाम हुई: मलाइका अॅट हर बेस्ट. सुपर एनर्जॅटिक डान्स. व झंडू बाम ची एडिटोरिअल एं डॉर्स मेंट. मध्येच सल्लु भाई शिट्ट्या वाजवत पोलिस गाडीतुन येत असता. ओरिजिनल युपी फ्लेवरः शब्द जरा रिस्के वाटू शकतात पण चित्रपटात एकदम फिट होतात. दबंग ऑफ ऑल थिंग्ज. मलाइका वर छैया छैया पासून प्रेम आहे. मग काय कमी म्हणून सल्लु भाई येतात!!! तु अॅट्म बाँब हुई मेरे लिए. इंडीड!! गुड फन साँग. देसी पार्टीत नाच करायला मस्त आहे. डिजे ला सांगून ठेवा.
https://www.youtube.com/watch?v=83XfpQQ5qVA
४) बी डी जलाइले: परवा होली पार्टीत हे फार वाजले आमच्या इथे. पब्लिक बेहोश उन्हात नाचत होते. बिपाशा खुपच सॉफिस्टिकेटेड दिसते पण शी ब्रिन्ग्ज हर एनर्जी अँड अपील. गुलझारांचे लिरिक्स असल्याने मी काही बोलायची गरजच नाही. एंजॉय द डान्स. विवेक ऑबेरॉय पण किती तरुण व रसरशीत दिसतो. बिना जुर्म के हजूर मर गये ( बिचारे) सगळी मजा गंमत चालू आहे. पुढचे महाभारत घडायचे आहे. एक प्रणय दृश्य पण आहे. जस्ट वार्निग्न.
https://www.youtube.com/watch?v=XLJCtZK0x5M
५) नमक इस्क का: एकाच पिक्चर मध्ये दोन आयटम सॉन्ग का व ते इतके छान आहेत. हे मला जास्त आवडते. बिपाशा सुरेख सावळी दिसते. व तो घराण्याचा एकमेव दागिना तिने घातला आहे ज्या मुळे पुढचे संशयकल्लोळ नाट्य घडते. गुलझार इन नॉटी फॉर्म.
https://www.youtube.com/watch?v=NJ-N3OjTWA4
६) छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैंजनियां: आपली उर्मिला!!! काय एनर्जी ने नाचते!!. ड्रे स अगदी साधा आहे व ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी. जी तिला फार शोभते. अगदी साधे सेटिन्ग आहे. आजुबाजुला चार म्हातारे नेहमी प्रमाणेच. मी हे लार्ज स्क्रीन वर बघि तले नाही. पण जोरदार इम्पॅक्ट असेल.
https://www.youtube.com/watch?v=1ZnPY1c3u_0
७) गुप चु प गुपचुपः आपली ममता कुलकर्णी. राजस्थानी सेट अप. व एक नॉटी स्टोरी आहे. पण शेवटी तसे काही घडले नाही. नर्तकी इनोसंटच आहे. जीव भांड्यात पडतो. ममता फा र गोड दिसते व नाचते. इथे पण एक जुजा म्हातारी आहे. जी उगीच नावाला पंचनामा करत आहे. जॉनी लिव्हर पण बाईचे कपडे घालुन आहे. व सलमान शारुख मागे काहीतरी बारुद गोळा लावायच्या गडबडीत आहेत. हे व्हिलन इतके कसे लंपट व बावळट. पण ते ही ममताच्या जादु मध्ये हरवुन जातात. इथे पण इला अरुण चा तडका आहे. चोली के पीछे ची धाकटी बहीण म्हणावे असे गाणे आहे.
https://www.youtube.com/watch?v=EvOAmbPkSVs
८) तु लगावेलु जब लिपस्टिकः हे गाणे मी बघत नाही पण ऐकते. मजेशीर वाटते मला भोजपुरी आहे. लिं क देत नाही पण भारतात तरी फारच लोक प्रिय आहे. स्पॉटिफा य वर उपलब्ध आहे.
९) सलामे इश्कः ओजी रेखा व अमित. हा माझा सर्वा त फेवरिट मुजरा आहे. रेखे ने उमराव जान मध्ये एक वरची लेव्हल गाठली आहे.
इथे लता व किशोर आहे. दिल की चोट खाये हो तो गाना जरुर पसंद आयेगा. ऑसम लिरिक्स.
https://www.youtube.com/watch?v=0N6enWBR-FM
१०) महबुबा महबुबा: १९७५ मधील शोलेतील हेलेन चे नृत्य. इथे पण धरम पाजी व अमित मागे काही कारवाया करत आहेत. आम्हा ममव मुलांना हा एकदम कल्चर शॉक होता. हेलनचे उत्फुल्ल नृत्य. आर्डीचा आवाज. एकंदर नशीला माहौल. हा एकच रिलीफ आहे इंटरव्हल नंतर पुढे सर्व वाइटच होत जाते. जलाल आगा उत्तम फॉइल. दिलरुबा घेउन नाचतो. गब्बर च्या डोळ्यात सर्व पॅशन भरलेली आहे. वॉट अ व्हिलन बॅड गाय धिस वन. असे सौंदर्य नेहमी हाताबाहेर असते.
https://www.youtube.com/watch?v=ajIn2W5ZBi4
ऑनरेबल मेन्शनः झूठ बोले कौवा काटे डिंपल. कोळी मुलीच्या गेटप मधे असे दिलखेचक नृत्य केले आहे की भान हरपते. काय ती ज्वेलरी, काय तो आत्मविश्वास. तरी पहिलाच पिक्चर!!!
तर मं डळी एंजॉय करा ही प्ले लिस्ट. भर टाका पण काही आक्षेपार्ह लिहू नका ही विनंती. हे सर्व कलाकार आहेत लव्ह देअर पर्फॉरमन्स.
चोली के पीछे मध्येच रेशम का
चोली के पीछे मध्येच रेशम का लेहेंगा मेरा लाईन वरच्या स्टेप फक्त माधुरीच करू जाणे. त्यातले पाय आणि हातांचे रोटेशन इतके भन्नाट आणि अफलातून आहे की बास.. मागच्या डान्सर मध्ये एकीला पण त्या स्टेप झेपल्या नाहीत.
तबुचे मुझे रंग दे पण भारी आहे, फारच डिप्रेस्ड वाटत असेल तर हे गाणे पाहिले की एकदम मुड बदलून जातो.. एकदम हसून बेजार. नुसत्या काठी ने पण बरा नाच केला असता..
हो ऊ अन्टवा जबरी आहे! सॉल्लेट
हो ऊ अन्टवा जबरी आहे! सॉल्लेट कोरिओग्राफी बाय गणेश आचार्य!
साउथ इंडियन चा विषय निघाला अहे तर - रा रा रक्कम्मा पण मस्त आहे. मस्त स्टेप्स . जॅकलीन फर्नांडिस आहे. बघितले नसल्यास बघा:
https://www.youtube.com/watch?v=I3t9agGhWyI
खरंय, तबुला नाचता येत नाही.
खरंय, तबुला नाचता येत नाही.
मेल आयटम सॉंग मध्ये पृथ्वीराज
मेल आयटम सॉंग मध्ये पृथ्वीराज सुकुमारन चं ड्रीमम वेकपम घेता येईल.
अनु खरच गं
अनु खरच गं
वॉव सॉल्लिड धागा आणि स्गळे
वॉव सॉल्लिड धागा आणि स्गळे आयटम साँग्स!
सिनेमा संपला की उत्सुकतेने आयटम साँगसाठी थांबणार्यांपैकी मी आहे कारण यातले स्पेशल बीट्स, एक्स्प्रेशन्स प्रचंड आवडतात. अगदी सगळे आयटम साँग्स आवडीचे नसले तरी हि माझी लिस्ट
१. स्त्री मधलं हिल्ला दे हिल्ला दे - हुक स्टेप, नोरा चा नखरा
२. मेरे फोटो को सिने से - अगेन हुक स्टेप आणि पॅटरोल से, ओव्हरॉल से असे अजब लिरिक्स मजा आणतात.
३. बिडीचा उल्लेख आलाच आहे वर - सुखविंदरचा आवाज आणि सैफचे चीप एक्स्प्रेशन्स! त्यात जस्से पाहिजे तस्सेच
४. चम चम करता है ये नशीला बदन - वैशाली सामंत मै रसभरी, चुसकी वगैरे शब्द म्हणते ते भन्नाट रसिले वाटतात.
५. छम्मा छम्मा मधली उर्मिला च बास बाकी काय बोलावं!
६. कजरा रे - आलिशाचा अक्ख्या गाण्यात लागलेला तो मधाळ आवाज... ओहो!
७. आस्था गिल आणि बादशाह ची बरीच
८. जे मैनु यार ना मिले तो मर जावां
९. कॅरेक्टर ढीला है - डान्ससाठी मस्त बीट्स
अरे हां नोरा चं हाय गर्मी आणि
अरे हां नोरा चं हाय गर्मी आणि दिलबर राहिलंच.
परम सुंदरी
परम सुंदरी
या रेट ने तर खूपच सगळी गाणी
या रेट ने तर खूपच सगळी गाणी आयटेम साँग्ज म्हणता येतील.
आयटेम साँग म्हणजे काय नक्की?
१. ते भडक, प्रक्षोभक , उडत्या चाली चे असले पाहिजे.
२. मुख्य हिरोईन त्यात शक्यतो नसते.
३. कहाणीच्या फ्लो शी गाण्याचा तसा काही संबंध नसतो. असलाच तरी तो..खलनायक किती दुष्ट आहे हे ठसवून देण्यापुरता !
असे माझे मत होते ...
ही काही निरीक्षणे झाली.
ही काही निरीक्षणे झाली फक्त.
नाचणारी व्यक्ती (sexually provocative) आयटम म्हणुन प्रमोट केली असेल तर ते आयटम साँग.
मेल आयटम साँग्स आहेत का कोणती
मेल आयटम साँग्स आहेत का कोणती ?
>>
I hate you, like I love you...
मानव ची व्याख्या बरोबर वाटते
मानव ची व्याख्या बरोबर वाटते.कोणीही(मुख्य पात्र/पाहुणा कलाकार) उत्तेजक हावभाव करत असेल, कॅची चाल आणि नृत्य असेल आणि गाण्याचा मूळ कथेशी विशेष संबंध नसेल तर ते आयटम नंबर.
युपी बिहार लुटणारी शिल्पा
युपी बिहार लुटणारी शिल्पा कुठं दिसत नाही ती
चोली के पिछे...ना तिचा डान्स,
चोली के पिछे...ना तिचा डान्स, एक्स्प्रेशन्स पण काहीतरी विचित्रं विनोदी आहेत तिची,सेक्सी/सेन्शुअल वगैरे अजिबातच जललं नाहीये माधुरीला>>>> दिपांजली चिकनी चमेली मधे तर कत्रिना ने झिरो एक्स्प्रेशन्स दिलेत ज्याची त्याची आवड
माधुरी इज नॉट एव्हरी वन्स कप ऑफ टी. तिच्या अदा, अभिनय, अपिल, नाच ह्यावर फिदा असलेले फॅन्स लाखो आहेत.
तिचा ड्रेसींग सेन्स (कपडेपट वाला) तेवढा विचित्र होता.
तबुचे मुझे रंग दे पण भारी आहे
तबुचे मुझे रंग दे पण भारी आहे, फारच डिप्रेस्ड वाटत असेल तर हे गाणे पाहिले की एकदम मुड बदलून जातो.. एकदम हसून बेजार. नुसत्या काठी ने पण बरा नाच केला असता..
>>> अगदी अगदी. तब्बूला अजिबात नाचाचे अंग नाही. त्यात तिची उंची आणि तो ड्रेस यामुळे तो डान्स अजून ऑकवर्ड झालाय. तिच्याएवढीच उंची असलेल्या क्रिती नि सुश्मिता चांगल्या नाचतात आणि त्यांचे कपडे फ्लॅटरिंग असतात.
मुख्य कथेशी संबंध नसेल तर हा क्रायटेरिया जरा लूज केला तर 'जवान जानेमन' बसेल या कॅटेगरीत. आणि 'रात बाकी, बात बाकी' पण. परवीन बाबी नी झीनी बेबीने व्हॅम्प आणि नायिकेच्या सीमारेषा धूसर करून टाकल्या. त्या आउट अँड आउट ग्लॅमरस होत्या. जोडीला आरडी आणि आशा असले की बस....
आणि कुणाला 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे' आठवत नाही का? त्याचे म्युझिक, डान्स, मुमताजची साडी, मुख्य म्हणजे नाचणारी जोडगोळी 'हॉट' आणि 'आयटम' दोन्ही कॅटेगरीत अगदी फिट्ट बसते
कथेशी संबंध असो/नसो, आयटम
कथेशी संबंध असो/नसो, आयटम सॉंग ते आयटम सॉंग.
ये मेरा दिल, कथेशी संबंध नाही असे म्हणता येणार नाही. डॉनला गुंतवून ठेवायला ती नाचते/गाते.
बहुतेक चित्रपटात कथेशी संबंध नसतो, हे एक निरीक्षण.
ज्या चित्रपटाचा कथेशी संबंध
ज्या चित्रपटाचा कथेशी संबंध नाही, त्या चित्रपटात नसलेल्या कथेत घुसखोरी केलेले आणि चित्रपटात चाललेल्या घटनाक्रमात दिसणाऱ्या पात्रांपैकी नसणारे पात्र जेव्हा टाळ्या शिट्ट्यांचा शो सादर करते त्यास आयटेम सॉंग म्हणावे असे म्हणता येईल का?
उदा बॉंबे टू गोवा मधे कथानायक देखा ना हाय रे सोचा ना हे गाणे सादर करतो. ते कथेच्या ओघात आलेले आहे. सिनेमातील कलाकारानेच सादर केले आहे तर ते आयटम सॉंग नाही.
त्यातले किशोरकुमार चे बम बम बॉंबे टु गोवा हे किंवा
तेव्हाची सुधा नायर हॉटेलमधे पॉप गाणं सादर करते ते...
यातले एक आयटम साँग बनेल का?
बहुधा आयटम सॉंग चा एक निकष
बहुधा आयटम सॉंग चा एक निकष शारीरिक संबंध सूचक हावभाव/हातवारे,द्वर्थी शब्द असलेले उत्तेजक नृत्य अनोळखी/जुजबी ओळखीच्या बऱ्याच क्राऊड असलेल्या प्रेक्षकांत करणे हा असावा.इथे आयटम सॉंग म्हणून आता जी गाणी सुचवली जात आहेत त्यांना माझा सविनय विरोध आहे.
बऱ्याच क्राऊड असलेल्या
बऱ्याच क्राऊड असलेल्या प्रेक्षकांत करणे>>
हं, हा क्रायटेरिया सुद्धा बरोबर वाटतो.
पण अनोळखी/जुजबी ओळखीच्याच का?
त्याच गाण्यात ओळखीचे प्रेक्षक असले तर ते आयटम सॉंग रहाणार नाही का?
अंग प्रदर्शनाचा निकष लावता
अंग प्रदर्शनाचा निकष लावता मेल आयटम साँग मध्ये ओम शांती ओम चे दर्दे डिस्को सुद्धा येईल..
त्यात शाहरूखच्या सहा की आठ पॅकची तेव्हा फार चर्चा झालेली..
तसेच पठाण मधील बेशरम रंग मध्ये वयानुसार अजून दोनचार पॅक वाढलेले आढळले.
त्यात शाहरुख आणि दिपिका दोघांनी अंगप्रदशन केल्याने ते स्त्री-पुरुष समानता असलेले आयटम साँग बोलू शकतो.
अशी अजून गाणी आहेत का?
100% फक्त ओळखीच्या प्रेक्षकात
100% फक्त ओळखीच्या प्रेक्षकात केल्यास ते फ्रेंडली फॅमिली पार्टी मधले नृत्य बनेल.(सध्या सीमांतपूजन/संगीत नाईट ला अनेक वधू-वर पक्षातल्या मुली आयटम सॉंग,किंवा त्यात जास्त नृत्य स्किल दाखवता येईल असे नृत्य आणि लोकप्रियता/प्रेक्षकांचा पटकन चांगला रिस्पॉन्स यामुळे सादर करतात. पण त्यांना आपण आयटम गर्ल्स म्हणत नाही कारण क्राऊड ओळखीचा/नातेवाईक).ओळखीचे प्लस अनोळखी किंवा सर्व अनोळखी असा निकष.
दरदे डिस्को हे चित्रपटात चित्रपट गाणं म्हणून बिन ऑन स्क्रीन प्रेक्षक शूट होणारं नृत्य आहे.त्यात स्टेज किंवा ऑन स्क्रीन पिटातले प्रेक्षक नाहीत त्यामुळे ते क्वालिफाय होऊ नये.
मला वाटते आपण संस्कृती आणून
मला वाटते आपण संस्कृती आणून असं केल्यास आयटम सॉंग सादर करताना संकोच वाटेल इत्यादि इमॅजीन करू नये.
If it is performed as item song it is item song.
मग चित्रपटातले प्रेक्षक कोणीही असोत.
सविनय विरोध >>>
सविनय विरोध >>>
त्यात शाहरुख आणि दिपिका दोघांनी अंगप्रदशन केल्याने ते स्त्री-पुरुष समानता असलेले आयटम साँग बोलू शकतो. >>>
पण ते दोघेही आयटम वाटत नाहीत ना. कमी-अधिक प्रमाणात कळकट्ट वाटतात.
नाही हो, हे उदाहरण 'फॅमिली
नाही हो, हे उदाहरण 'फॅमिली फ्रेंडली पार्टीत सादर करणे' याबद्दल दिले होते.डिसेंट कपडे असणे, कॅमेराचे आक्षेपार्ह अँगल नसणे, बघणारा प्रेक्षकवर्ग लग्नाच्या मूड मध्ये असून अशी नृत्ये फक्त मनोरंजन कार्यक्रम म्हणून पाहत असणे हा फरक आहे.नॉट जजिंग.
(तुमचा मुद्दा कळला.ओळख काय अनोळखी काय आयटम सॉंग आयटम सॉंग आहे.पण व्याख्या मनात बरीच स्पष्ट होते आहे, याचे श्रेय या काथ्याकूटाला द्यावे लागेल.)
आता कशाला उद्याची बात
आता कशाला उद्याची बात
हे आयटम साँग आहे का?
हो, आहे, सर्व निकष पूर्ण
हो, आहे, सर्व निकष पूर्ण होतायत.
1. आजूबाजूला प्रेक्षक
2. तत्कालीन काळात उच्चशृंखल मानली जाणारी (सॉरी सॉरी मला गुगल इंडिक वर हा शब्द बरोबर लिहिता आला नाहीये.कसा लिहितात हे माहिती आहे) फुग्याच्या बाह्या, पाचवारी, केशभूषा
3. प्रेक्षकांशी तत्कालीन काळात स्वीकार्य नसलेली सलगी
आज हे गाणे पाहिले तर भजनाईतकेच निर्भेळ व पवित्र वाटते.अजून 20 वर्षांनी पब्लिक ला चिकणी चमेली पण सात्विक वाटेल.
मी_अनु
मी_अनु
मस्त खुमासदार प्रतिसाद आहे हा.
यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का?
हे त्या काळातील लैला मै लैला असावं
(सत्यम शिवम सुंदरम म्हणणार होतो पण आज ते एक मंगलमय भजन झाले आहे).
यमुनाजळी नाही.कारण ते ऑन
यमुनाजळी नाही.कारण ते ऑन स्क्रीन नायक नायिका यांचे खाजगीतले गाणे आहे.ऑन स्क्रीन प्रेक्षकांसाठी सादर केलेला तमाशा नाही.
इथे आयटम सॉंग म्हणून आता जी
इथे आयटम सॉंग म्हणून आता जी गाणी सुचवली जात आहेत त्यांना माझा सविनय विरोध आहे.>>>>
+१
बरोबर.
बरोबर.
संस्कारी प्रेक्षक या गाण्याला डोळे मिटून घेतो.
समर्थांनी म्हटलेच आहे.
प्रणय पाहात उभा राहे | तोडविना कौतुक पाहे |
खरें अस्ता खोटें साहे | तो येक मूर्ख ||६७||
Pages