चोली के पीछे क्या है!!

Submitted by अश्विनीमामी on 2 April, 2024 - 01:49

परवाच वीकांताला क्रु नावाचा मजेशीर चिक फ्लिक गर्ली चित्रपट बघितला. क्लायमॅक्समध्ये नाट्य मय प्रसंग घडत असताना चोली के पीछे गाण्याची रिमिक्स व्हर्जन आहे. दिल्जित दोसंथ व इतर मंडळी, जास्त रॉकिन्ग संगीत आहे. तेव्हाच घरी गेल्यावर चित्रपटाचा साउंड ट्रॅक स्पॉटिफाय वर ऐकायचे ठरवले होते. तसा तो ऐकला. गाणे छान आहे. पण ओरिजिनलची सर नाही. म्हणून लेखन प्रपंच.

आयटम साँग हा बॉलिवुडचा एक भारी करमणूक प्रकार आहे. ही मला आवडतात. कारण ती कुठेही कधीही येतात. मोस्टली पुरुष प्रेक्षकांसाठी डिझाइन्ड असतात. जमेल तेवढा चावटपणा, थोडी मोकळी ढाकळी, उ भा भाषा, व ते चॅलें ज स्वीकारुन उत्तम पणे निभावुन नेणार्‍या आपल्या
तारका. एखादेच यशस्वी आयटेम साँग ; जे गो ड इनोसंट हिरवीण पुर्वी करु शकत नसे; तारकेला स्टार बनवुन टाकते ओव्हरनाइट. आपल्यातली पॉवर दाखवायची त्यांना एक संधी असते ही. यशस्वी गाणी नुसती बघायला येणारे पण प्रेक्षक असतात. तुम्ही कधी असा मंत्रचळे पणा केला आहे काय? पेश है मेरे टॉप टेन फेवरिट्स.

१) चोली के पीछे क्या है. : नर्तकी माधुरी( आपली) संगीत लक्ष्मिकांत प्यारे लाल व शब्द आनंद बक्षी. गाण्याची
सिचुएशन भन्नाटच आहे. ओजी खलनायक ह्याच्या कडुन माधुरीला काहीतरी सिक्रेट जाणून घ्यायचे आहे त्यासाठी हा नाचाचा प्रपंच!!! तिचा ड्रेस जबरदस्त फ्लेमिन्ग ऑरेंज- लाल रंगाचा आहे. व राजस्थानी दाग दागिने श्रिंगार आहे. त्यात ती ही थोडी लबाड थोडी इनोसंट अ‍ॅक्टिन्ग करते लाजवाब!! मागे काउंटर पार्ट नीना गुप्ता जी अनुभवी जरा वयाने मोठी आहे. व इतर नर्तकी पण हँडलुमचे घागरे चुनरी चोळ्या घालुन आहेत. त्यांच्या दागिन्यांच्या व गोंदणाच्या प्रेमात पडायला होते. गाणे जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा देशाची झोप उडवली होती. अगदी बारीक हिरविणीची ट्रेंड माधुरीनेच आणली. त्या आधीच्या नायिका जरातरी हेल्दी असत. नीना गुप्ताला इला अरुणचा आवाज द्यायची कल्पना पण लै भारी आहे. संगीत तर एकदम एकदम रॉकिन्ग आहे. एस्प. माधुरी गायब झाल्यावरचा तालवाद्यांचा दंगा मुळातुनच ऐकण्यासारखा आहे. मी हे गाणे ऐकते जास्ती. पण झेपेल तेवढे बघा नक्की. पहिल्या कडव्यात माधुरीला एक झकास ढोलकीचा पीस देण्यात आला आहे. एक ही अ‍ॅक्षन व्हलगर नाही. सौतन बना ना जाए, जोगन रहा न जाए!! हा काय प्रॉब्लेम आहे हिचा. खलनायक तिला पन्नासच्या नो टा ऑफर करतो तेव्हा अंमळ हसूच येते. गेला तो जुना काळ .
https://www.youtube.com/watch?v=teCIQnIZXYw

२) कजरारे कजरारे: ऐश्वर्या, जास्त सांगणे न लगे. काळे डोळे. अप्रतिम दिसते व वैभवीने कोरिओ ग्राफ केलेला डान्स एकदम छान आहे. अगदी कमी दागिने आहेत. सिनिअर बच्चन एकदम भाव खाउन जातात व ज्युनिअर कमीच पडतो. हे गाणे पिक्चर मध्ये पहिल्यांदा पाहिले तेव्हा आजिबात बोअर झाले होते. काय हे मध्येच. पण मग हळू हळू त्याची जादु डोक्यात चढत गेली. सर्व पोरकट पणात मध्येच हा जालीम तडका येतो. ह्या नंतर अमिताभचा एक लै भारी जोक आहे तो ऐकून चित्रपट बंदच करते मी तर. तेव्हा ती घागरा थोडासा वर करायची अ‍ॅक्षन आधीच पॉप्युलर झाली होती बाबुजी धीरे चलो गाण्यात म्हणून ऐश्वर्याने ती आपण करुन बघावी असा आग्रह धरला असावा हे मा वै म. तन्वांगी सुंदरी व मोहक काळे डोळे. रुपगर्विताच ती. हे गाणे ही श्रवणीय आहे. नुसते बघणीय नाही.

https://www.youtube.com/watch?v=4dsFQFCvVGU

३) मुन्नी बद नाम हुई:
मलाइका अ‍ॅट हर बेस्ट. सुपर एनर्जॅटिक डान्स. व झंडू बाम ची एडिटोरिअल एं डॉर्स मेंट. मध्येच सल्लु भाई शिट्ट्या वाजवत पोलिस गाडीतुन येत असता. ओरिजिनल युपी फ्लेवरः शब्द जरा रिस्के वाटू शकतात पण चित्रपटात एकदम फिट होतात. दबंग ऑफ ऑल थिंग्ज. मलाइका वर छैया छैया पासून प्रेम आहे. मग काय कमी म्हणून सल्लु भाई येतात!!! तु अ‍ॅट्म बाँब हुई मेरे लिए. इंडीड!! गुड फन साँग. देसी पार्टीत नाच करायला मस्त आहे. डिजे ला सांगून ठेवा.

https://www.youtube.com/watch?v=83XfpQQ5qVA

४) बी डी जलाइले: परवा होली पार्टीत हे फार वाजले आमच्या इथे. पब्लिक बेहोश उन्हात नाचत होते. बिपाशा खुपच सॉफिस्टिकेटेड दिसते पण शी ब्रिन्ग्ज हर एनर्जी अँड अपील. गुलझारांचे लिरिक्स असल्याने मी काही बोलायची गरजच नाही. एंजॉय द डान्स. विवेक ऑबेरॉय पण किती तरुण व रसरशीत दिसतो. बिना जुर्म के हजूर मर गये ( बिचारे) सगळी मजा गंमत चालू आहे. पुढचे महाभारत घडायचे आहे. एक प्रणय दृश्य पण आहे. जस्ट वार्निग्न.
https://www.youtube.com/watch?v=XLJCtZK0x5M

५) नमक इस्क का: एकाच पिक्चर मध्ये दोन आयटम सॉन्ग का व ते इतके छान आहेत. हे मला जास्त आवडते. बिपाशा सुरेख सावळी दिसते. व तो घराण्याचा एकमेव दागिना तिने घातला आहे ज्या मुळे पुढचे संशयकल्लोळ नाट्य घडते. गुलझार इन नॉटी फॉर्म.

https://www.youtube.com/watch?v=NJ-N3OjTWA4

६) छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैंजनियां: आपली उर्मिला!!! काय एनर्जी ने नाचते!!. ड्रे स अगदी साधा आहे व ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी. जी तिला फार शोभते. अगदी साधे सेटिन्ग आहे. आजुबाजुला चार म्हातारे नेहमी प्रमाणेच. मी हे लार्ज स्क्रीन वर बघि तले नाही. पण जोरदार इम्पॅक्ट असेल.
https://www.youtube.com/watch?v=1ZnPY1c3u_0

७) गुप चु प गुपचुपः आपली ममता कुलकर्णी. राजस्थानी सेट अप. व एक नॉटी स्टोरी आहे. पण शेवटी तसे काही घडले नाही. नर्तकी इनोसंटच आहे. जीव भांड्यात पडतो. ममता फा र गोड दिसते व नाचते. इथे पण एक जुजा म्हातारी आहे. जी उगीच नावाला पंचनामा करत आहे. जॉनी लिव्हर पण बाईचे कपडे घालुन आहे. व सलमान शारुख मागे काहीतरी बारुद गोळा लावायच्या गडबडीत आहेत. हे व्हिलन इतके कसे लंपट व बावळट. पण ते ही ममताच्या जादु मध्ये हरवुन जातात. इथे पण इला अरुण चा तडका आहे. चोली के पीछे ची धाकटी बहीण म्हणावे असे गाणे आहे.
https://www.youtube.com/watch?v=EvOAmbPkSVs

८) तु लगावेलु जब लिपस्टिकः हे गाणे मी बघत नाही पण ऐकते. मजेशीर वाटते मला भोजपुरी आहे. लिं क देत नाही पण भारतात तरी फारच लोक प्रिय आहे. स्पॉटिफा य वर उपलब्ध आहे.

९) सलामे इश्कः ओजी रेखा व अमित. हा माझा सर्वा त फेवरिट मुजरा आहे. रेखे ने उमराव जान मध्ये एक वरची लेव्हल गाठली आहे.
इथे लता व किशोर आहे. दिल की चोट खाये हो तो गाना जरुर पसंद आयेगा. ऑसम लिरिक्स.

https://www.youtube.com/watch?v=0N6enWBR-FM

१०) महबुबा महबुबा: १९७५ मधील शोलेतील हेलेन चे नृत्य. इथे पण धरम पाजी व अमित मागे काही कारवाया करत आहेत. आम्हा ममव मुलांना हा एकदम कल्चर शॉक होता. हेलनचे उत्फुल्ल नृत्य. आर्डीचा आवाज. एकंदर नशीला माहौल. हा एकच रिलीफ आहे इंटरव्हल नंतर पुढे सर्व वाइटच होत जाते. जलाल आगा उत्तम फॉइल. दिलरुबा घेउन नाचतो. गब्बर च्या डोळ्यात सर्व पॅशन भरलेली आहे. वॉट अ व्हिलन बॅड गाय धिस वन. असे सौंदर्य नेहमी हाताबाहेर असते.

https://www.youtube.com/watch?v=ajIn2W5ZBi4

ऑनरेबल मेन्शनः झूठ बोले कौवा काटे डिंपल. कोळी मुलीच्या गेटप मधे असे दिलखेचक नृत्य केले आहे की भान हरपते. काय ती ज्वेलरी, काय तो आत्मविश्वास. तरी पहिलाच पिक्चर!!!

तर मं डळी एंजॉय करा ही प्ले लिस्ट. भर टाका पण काही आक्षेपार्ह लिहू नका ही विनंती. हे सर्व कलाकार आहेत लव्ह देअर पर्फॉरमन्स.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुटखा खात असेल तर उभंही राहवत नाही >>> हो अगदीच.. म्हणूनच गुटख्याचे नाव घेतले. एक काळ होता जेव्हा उंचे लोग उंची पसंद माणिकचंद आणि त्यानंतर गोवा गुटख्याने एक पिढी बरबाद केली होती..
असो. हा अवांतर विषय झाला...

किमाम हे निव्वळ तंबाखू नसून त्यात केशर, वेलची,कस्तुरी मिसळलेली असते.त्यामुळं 'तुझ्या बोलण्याला माऊथ फ्रेशनर/लिस्टरीन किंवा सुगंधी मुखशुद्धी चा मोहक सुगंध आहे' हे जास्त योग्य Happy

व्वा मस्त धागा.
दिव्या भारतीच सात समुंदर पण टाका यादीत.. त्यातलं हॉ हॉ हा हा करायला मजा यायची. मस्त बॅकग्राऊंड म्युझिक आणि भारी डान्स स्टेप्स.

काजरारे बद्दल थोडं

कुठेतरी गुलजारच्या इंटरव्ह्यू मधे वाचलं की ऐकलं होतं की या गाण्याची ओरिजिनल सिच्युएशन होती की बंटी बबली पोलिसांपासून पळताना दिल्ली बॉर्डर च्या एका ढाब्यावर रात्रीच्या जेवणासाठी थांबतात, कर्म धर्म संयोगाने दशरथ सिंग पण तिथेच दारू पीत बसलेला असतो. तिथले रेग्युलर कस्टमर, ट्रक ड्रायव्हर लोकं, ट्रक च्याच प्लॅटफॉर्म च्या स्टेज वर नाचणाऱ्या बालेचा नाच अन् गाणं एन्जॉय करत असतात.
मला हे गाणं असंच बघायला आवडलं असतं. पंचतारांकित हॉटेल चा सेट कुठेतरी गाण्याच्या रॉ अपील ला खाली आणतो.

बाकी लिस्ट भन्नाट
चोली के पीछे ला ट्रिब्यूट म्हणून बनवलेलं अलका अन् ईला अरुण नी गायलेलं स्लम डॉग मिलियनेर मधलं रिंग रिंग रिंगा पण धमाल आहे

वर कुणीतरी बिल्लू मधल्या तीन आयटम साँग्ज बद्दल उल्लेख केलाय. मला मरजानी इतर दोन गाण्यांपेक्षा जास्त आवडतं (पुन्हा गुलजार)

एंजॉययेबल प्ले लिस्ट आहे.

किमी नि बच्चनचे जुम्मा चुम्म, नासीर चे ओये ओये , सोनाली चे हम्मा, रवीनाचे शहर कि लडकी, करिष्माचे सुंदरा पण घाला. आप जैसा कोई नि लैला ओ लैला पण येतील का ह्यात ?

नीना गुप्ताला इला अरुणचा आवाज द्यायची कल्पना पण लै भारी आहे. >> चने के खेत मधे पण तिचा आवाज मधे असा वापरला आहे बहुतेक.

सलामे इश्क हे आयटेम साँग म्हणून पटत नाही. तसेच "अगदी बारीक हिरविणीची ट्रेंड माधुरीनेच आणली." ये बात भी कुछ जमी नही.

गुलजारच्या बंटी ऑर बबली बद्दल अजून गोष्ट म्हणजे बर्‍याच गाण्यांमधे इंग्लिश शब्द एव्हढे चपखल घातले आहेत कि बस्स. उदा. पर्सनल से सवाल करती है,

छैया छैया बद्दल लिहिताना संतोश सिवनच्या सिनेमॅटोग्राफीचा उल्लेख न करणे हा करंटेपणा आहे राव. त्या गाण्यातली फ्रेम न फ्रेम ही यादगार बनवललेली आहे त्या अ‍ॅम्गल्स नी.

मस्त धागा.

या धाग्यात व प्रतिसादांमधली काही गाणी अनेक वर्षे (ड्रंक) आयटम साँग्स प्लेलिस्ट मधे होती. ती आणि लगेच बाकीची आठवलेली काही.....

नमक ईस्क का

चिकणी चमेली

हमको आज कल है...

दिलबर दिलबर

ओ साकी साकी

तु चिज बडी है. ( रिमिक्स)

झल्ला वल्ला

बेबी डॉल

सोने का पानी ( बदलापुर)

हि पोरी साजुक तुपातली

हि व अशी गाणी कधी कोणासमोर ऐकली नाहीत / आवडतात म्हणून सांगितली नाहीत. पण याची सेपरेट प्ले लिस्ट होती.

कुठेतरी गुलजारच्या इंटरव्ह्यू मधे वाचलं की ऐकलं होतं की या गाण्याची ओरिजिनल सिच्युएशन होती की बंटी बबली पोलिसांपासून पळताना दिल्ली बॉर्डर च्या एका ढाब्यावर रात्रीच्या जेवणासाठी थांबतात, कर्म धर्म संयोगाने दशरथ सिंग पण तिथेच दारू पीत बसलेला असतो. तिथले रेग्युलर कस्टमर, ट्रक ड्रायव्हर लोकं, ट्रक च्याच प्लॅटफॉर्म च्या स्टेज वर नाचणाऱ्या बालेचा नाच अन् गाणं एन्जॉय करत असतात.
मला हे गाणं असंच बघायला आवडलं असतं. पंचतारांकित हॉटेल चा सेट कुठेतरी गाण्याच्या रॉ अपील ला खाली आणतो. >>>>

+१
गाण्यातल्या डान्स स्टेप, हावभाव वगैरेंचा विचार करता याप्रकारे चित्रित केलेले गाणे जास्त रिलेव्हंट वाटले असते. .....

मस्त लिस्ट!
सगळी गाणी आवडतात. कोणी प्लेलिस्ट बनवलीत/ शेअर केलीत तर तीच लावेन. Happy

माय नेम इज शीला ह्या गाण्यावरून एक किस्सा आठवला.इथेच मायबोलीवर एका गावाच्या बाफवर घडला होता. अशीच आमची काही चर्चा सुरू होती, तेव्हा एक मैत्रीण म्हणाली, 'मला वाटायचं की ही शीला सिंधी असेल , म्हणून ती गाणं म्हणते - " माय नेम इज शीला, शीला केजवानी " आम्ही बाकीचे हसून हसून मेलो होतो. Lol

शीला केजवानी Lol

आमच्या सोसायटी मध्ये केजवानी आणि अजवानी आहेत.. आता हेच आठवेल Proud

छैया छैया बद्दल लिहिताना संतोश सिवनच्या सिनेमॅटोग्राफीचा उल्लेख न करणे हा करंटेपणा आहे
>>>>>
कोरीओग्राफी लिहिलंय ओ.. त्यात सगळे आले.. इतके कुठे आपल्याला डिटेल ज्ञान असते Happy

कोरीओग्राफी लिहिलंय ओ.. .. त्यात सगळे आले >> कोरीओग्राफी नि सिनेमॅटोग्राफी ह्या शाहरुख खान नि कमाल खान ह्यांच्या एव्हढा मोठा फरक असतो. डिटेल ज्ञान नाही तर कशाला बोलायचे उगाच ?

हमको आज कल है..
>>
या गाण्याची मजा म्हणजे यात मुख्य हिर्विण अन् गायिका फक्त मुखडा गाते.कडवी बॅकग्राऊंड डान्सर अन् कोरस च्या आवाजात...

छान लिस्ट .. चोली के पीछे जेंव्हा आलं तेंव्हा घरी नवीनच केबल पण आली होती. आणि टॉप टेन मध्ये हे गाणं बरेच दिवस एक नंबर ला होते. खलनायक विशाल, पिंपरीला बघितला होता आणि ह्या गाण्यावर लोक चक्क पैशाची नाणी फेकत पडद्यावर. माधुरी आणि सरोज खान ची गाणी मस्त आहेत, जरा उन्निस बिस झालं तर लगेच vulgar ठरली असती. क्रू नंतर ओरिजनल एवढ्यात पाहिलं परत, एक गोष्ट एकदम जाणवली ती म्हणजे ह्यातले मेल साईड/ ग्रुप डान्सर आहेत ते पण बेस्ट नाचलेत, एकही बीट न चुकवता.

तुझ्या बोलण्याला माऊथ फ्रेशनर/लिस्टरीन किंवा सुगंधी मुखशुद्धी चा मोहक सुगंध आहे >> अरेरे! हे फारच सात्विक झालं. किमाम ही केवळ मुखशुद्धी असती तर तिला आवळा सुपारी म्हटले नसते काय? Wink

तिला आवळा सुपारी >>> इथले पुढचे दोन शब्द एकत्र वाचायचे आहेत याचा खुलासा वेळेवर केला पाहिजे Wink

मस्त लेख अमा. मला ही गाणी फार वाटली नाहीत कधीच आणि चोली के पीछे वगैरे युपी माहौल मधली "बायांना नाचवणारी" छाप तर कधीच आवडली नाहीत. पण या गाण्यांमधल्या काहीकाही लाइन्स मजेदार आहेत. तेरा आना भी गरमियों की लूँ है किंवा ले झंडू बाम हुई मधे ती बाम शब्द जसा उच्चारते ते. त्या राणाजी गाण्यात ममता व अमरीश पुरी दोघांचे हावभाव धमाल आहेत. एक फायर ब्रिगेड वाले पण आयटेम साँग आहे ना?

'कजरारे' त्या ट्रक स्टॉप वर जास्त सूट झाले असते हे टोटली बरोबर आहे. "चोर बजारी" गाण्यात अशा सेट अप मधे दीपिका आणि सैफचा एक सीन आहे, तसे काहीतरी दाखवायला हवे होते.

अमा - लेख मस्त आहेच. पण सलाम-ए-इश्क यात का धरले? ते काही आयटेम साँग नाही. मुंगळा एक वेळ बरोबर आहे

वरच्या प्रतिसादातले “झल्ला वल्ला” मस्त गाणं आहे.
मंगल पांडे मधलं “मै वारी वारी” पण फार सुंदर आहे. ते आयटम मधे घेता येईल की नाही माहिती नाही पण तो जुन्या काळातला आयटम प्रकारच झाला.

छान लेख/ यादी. शीर्षक एकदमच झणझणीत झाले.

असामी आणि ॲन्की, मस्त पोस्टी. Happy

वरील पोस्टींमधे मखना दिसले नाही.
१. मखना
https://youtu.be/YfQ-3d5cFeo?si=cQPH-zQa9TP2bjha
तिघेही उताराला लागलेले असताना कमाल नाचलेत, त्यांनाही मजा आली आहे असे वाटते. काहीही आगापिछा नसलेली निरुद्देश धमाल.

२. वन टू थ्री फोर चेन्नई एक्सप्रेस
https://youtu.be/W9mrvDWUR9g?si=MRZAB4u88pic859n
शाहरुखनी धमाल आणली, त्यातल्या तमिळ ओळीही एकदम ठेक्यात.

३. मुन्नी बदनाम
https://youtu.be/Jn5hsfbhWx4?si=TWdGijYtEIPuumaE
जबरदस्त नाचली आहे मलैका आणि सोनू सूदही पर्फेक्ट चीप व्हिलन. 'शिल्पासा फिगर बेबोसी अदा, बेबोसी अदा
है तेरे झटकेमें फिल्मी मजा', अशा युपीमय ओळींनी झणझणीत झाले आहे.

४. अफगाण जलेबी
https://youtu.be/zC3UbTf4qrM?si=cu6gg1yTLg0pO3fj
मला याचा अफगाणी ठेका आवडतो. 'बंदूक दिखादिखाके क्या प्यार करेगी' पर्फेक्ट.

५. लुंगी डान्स
https://youtu.be/69CEiHfS_mc?si=wLOwVbujHGBXFW35
धमाल आहे. आमच्या कोकोनटला 'कोकोनटमे लस्सी मिलाके आजाओ सारे मूड बनाके' चिडवतो. देशी फालतू डॉगी करायचे आहे त्याला.

५. कॅरेक्टर ढीला है
https://youtu.be/ruEQPQX90fI?si=9e3tgNZLIazllz9m
'आपला तो बाब्या लोकांचं ते कार्ट' या वाक्प्रचारावर अख्खं आयटम साँग आहे. सगळ्यांनी सगळ्यांना सगळ्यांकरिता ऑब्जेक्टिफाय केले तर त्याला ऑब्जेक्टिशाही म्हणता येईल का? Wink

६. दिलं मेरा मुफ्त का.... एजन्ट विनोद. ( हा आमचा एजन्ट? )
https://youtu.be/UZCOnDuL6pM?si=BYyysdc69vmqFElX
हल्ली मुजरा फक्त गुलशन ग्रोवरनेच बघितला आहे. याने पदार्पण केले तसे व्हिलन मंडळींनी 'माड्या चढणे' बंद केले. काय दाखवायचे ते खालीच दाखवा म्हणू लागले. आता गुडघे दुखीसाठी 'संधीसुधा' विकत असावेत. व्यायाम महत्त्वाचा !

७. झल्ला वल्ला (इशक्जादे)
https://youtu.be/fqjXS7X9_5s?si=cE04Oozm0WW3VJC_
हे माझं पर्सनल फेवरेट, 'हमने समझा था गोल्डन जुबली जिसे, वो तो मॅटिनी दिखाकरके चुम्मा ले गया' एकंदरीत भलतंच नॉटी टाईप. युपीचा झटका.

८. शरारा शरारा
शमिता शेट्टीचं फक्त एवढंच आठवते.

९. धटिंग नाच (फटा पोस्टर निकला हिरो)
शाहिद काय नाचलाय, नर्गिस फाकरी अजिबात लवचिक नाही. काहीही नाचली नाही. शाहिद मात्र 'कटकली नचनिया'.
https://youtu.be/NBw5Gdmb1Pg?si=Hl4c2zv-jJJd1aG0

१०. मस्त कलंदर ( हे बेबी)
https://youtu.be/TNLNV20aMGU?si=SJX8KdAmCQKlLiWB
शाहरुख एकदम काळ थांबवतो.

११. मनोहरी (बाहुबली)
हे तेलुगूतच छान वाटते. बेस्ट कोरिओग्राफी. मागे याबद्दल लिहिले होते. यात महेंद्र बाहुबली ऐवजी बल्ला हवा होता. अशी कोरिओग्राफी आणि असे सिंक्रोनायझेन क्वचित बघायला मिळते.‌
https://youtu.be/snpV6awcBPo?si=tVKL6cMW2KVYk8nD

सलामे इश्क मलाही 'आयटम' वाटले नाही. रेखाचे 'परिणीता' मधे 'कैसी पहेली है ये जिंदगी' आहे आयटम नंबर. छानच वाटले होते ते. मला हा सेट 'मुलान रूजची'( moulin rouge) आठवण करून देतो.
https://youtu.be/-6Y8hMyEoV8?si=LcRK2BwehNUMo9uI

नाही हो हपा. केशर, कस्तुरी,वेलची,मुखशुद्धी हे (सनरुफ प्रमाणे) व्हॅल्यू ऍड फिचर.पण मूळ शिरा काढलेली तंबाखू हे (सेफ्टी बॅग किंवा 360 डिग्री कॅमेरा प्रमाणे) मूळ उपयुक्त फिचर Happy संदर्भ गुगल.

थँक्यू अनु Happy

'आपला तो बाब्या लोकांचं ते कार्ट' या वाक्प्रचारावर अख्खं आयटम साँग आहे >> हाहा

‘बाँबे’ मधलं ‘हम्मा’ ह्यात येऊ शकेल का?

कुक्कू वर चित्रीत झालेलं ‘आवारा‘तलं ‘एक दो तीन, आजा मौसम हैं रंगीन‘ हे हिंदीतलं आद्य आयटम साँग. Happy

फेफ अशी तर मोठी यादी होईल. तेरा जलवा जीसने देखा, मोरा नादान बालमा - उजाला, मेरा नाम है शब्बो...
यावरून एक अपनापन मधलं आठवलं. फिर गंगुबाई की चाल देखो. तेव्हा आदमी मुसाफिर है च्या खालोखाल हे हिट झालं होतं, रेडिओ, गाणी वाजवतात असा कुठला कार्यक्रम असो की सण ज्यात लाऊडस्पीकरवर गाणी लावतात त्यात हे असायचं.
आता किती आऊटडेटेड वाटतंय.

Pages