परवाच वीकांताला क्रु नावाचा मजेशीर चिक फ्लिक गर्ली चित्रपट बघितला. क्लायमॅक्समध्ये नाट्य मय प्रसंग घडत असताना चोली के पीछे गाण्याची रिमिक्स व्हर्जन आहे. दिल्जित दोसंथ व इतर मंडळी, जास्त रॉकिन्ग संगीत आहे. तेव्हाच घरी गेल्यावर चित्रपटाचा साउंड ट्रॅक स्पॉटिफाय वर ऐकायचे ठरवले होते. तसा तो ऐकला. गाणे छान आहे. पण ओरिजिनलची सर नाही. म्हणून लेखन प्रपंच.
आयटम साँग हा बॉलिवुडचा एक भारी करमणूक प्रकार आहे. ही मला आवडतात. कारण ती कुठेही कधीही येतात. मोस्टली पुरुष प्रेक्षकांसाठी डिझाइन्ड असतात. जमेल तेवढा चावटपणा, थोडी मोकळी ढाकळी, उ भा भाषा, व ते चॅलें ज स्वीकारुन उत्तम पणे निभावुन नेणार्या आपल्या
तारका. एखादेच यशस्वी आयटेम साँग ; जे गो ड इनोसंट हिरवीण पुर्वी करु शकत नसे; तारकेला स्टार बनवुन टाकते ओव्हरनाइट. आपल्यातली पॉवर दाखवायची त्यांना एक संधी असते ही. यशस्वी गाणी नुसती बघायला येणारे पण प्रेक्षक असतात. तुम्ही कधी असा मंत्रचळे पणा केला आहे काय? पेश है मेरे टॉप टेन फेवरिट्स.
१) चोली के पीछे क्या है. : नर्तकी माधुरी( आपली) संगीत लक्ष्मिकांत प्यारे लाल व शब्द आनंद बक्षी. गाण्याची
सिचुएशन भन्नाटच आहे. ओजी खलनायक ह्याच्या कडुन माधुरीला काहीतरी सिक्रेट जाणून घ्यायचे आहे त्यासाठी हा नाचाचा प्रपंच!!! तिचा ड्रेस जबरदस्त फ्लेमिन्ग ऑरेंज- लाल रंगाचा आहे. व राजस्थानी दाग दागिने श्रिंगार आहे. त्यात ती ही थोडी लबाड थोडी इनोसंट अॅक्टिन्ग करते लाजवाब!! मागे काउंटर पार्ट नीना गुप्ता जी अनुभवी जरा वयाने मोठी आहे. व इतर नर्तकी पण हँडलुमचे घागरे चुनरी चोळ्या घालुन आहेत. त्यांच्या दागिन्यांच्या व गोंदणाच्या प्रेमात पडायला होते. गाणे जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा देशाची झोप उडवली होती. अगदी बारीक हिरविणीची ट्रेंड माधुरीनेच आणली. त्या आधीच्या नायिका जरातरी हेल्दी असत. नीना गुप्ताला इला अरुणचा आवाज द्यायची कल्पना पण लै भारी आहे. संगीत तर एकदम एकदम रॉकिन्ग आहे. एस्प. माधुरी गायब झाल्यावरचा तालवाद्यांचा दंगा मुळातुनच ऐकण्यासारखा आहे. मी हे गाणे ऐकते जास्ती. पण झेपेल तेवढे बघा नक्की. पहिल्या कडव्यात माधुरीला एक झकास ढोलकीचा पीस देण्यात आला आहे. एक ही अॅक्षन व्हलगर नाही. सौतन बना ना जाए, जोगन रहा न जाए!! हा काय प्रॉब्लेम आहे हिचा. खलनायक तिला पन्नासच्या नो टा ऑफर करतो तेव्हा अंमळ हसूच येते. गेला तो जुना काळ .
https://www.youtube.com/watch?v=teCIQnIZXYw
२) कजरारे कजरारे: ऐश्वर्या, जास्त सांगणे न लगे. काळे डोळे. अप्रतिम दिसते व वैभवीने कोरिओ ग्राफ केलेला डान्स एकदम छान आहे. अगदी कमी दागिने आहेत. सिनिअर बच्चन एकदम भाव खाउन जातात व ज्युनिअर कमीच पडतो. हे गाणे पिक्चर मध्ये पहिल्यांदा पाहिले तेव्हा आजिबात बोअर झाले होते. काय हे मध्येच. पण मग हळू हळू त्याची जादु डोक्यात चढत गेली. सर्व पोरकट पणात मध्येच हा जालीम तडका येतो. ह्या नंतर अमिताभचा एक लै भारी जोक आहे तो ऐकून चित्रपट बंदच करते मी तर. तेव्हा ती घागरा थोडासा वर करायची अॅक्षन आधीच पॉप्युलर झाली होती बाबुजी धीरे चलो गाण्यात म्हणून ऐश्वर्याने ती आपण करुन बघावी असा आग्रह धरला असावा हे मा वै म. तन्वांगी सुंदरी व मोहक काळे डोळे. रुपगर्विताच ती. हे गाणे ही श्रवणीय आहे. नुसते बघणीय नाही.
https://www.youtube.com/watch?v=4dsFQFCvVGU
३) मुन्नी बद नाम हुई: मलाइका अॅट हर बेस्ट. सुपर एनर्जॅटिक डान्स. व झंडू बाम ची एडिटोरिअल एं डॉर्स मेंट. मध्येच सल्लु भाई शिट्ट्या वाजवत पोलिस गाडीतुन येत असता. ओरिजिनल युपी फ्लेवरः शब्द जरा रिस्के वाटू शकतात पण चित्रपटात एकदम फिट होतात. दबंग ऑफ ऑल थिंग्ज. मलाइका वर छैया छैया पासून प्रेम आहे. मग काय कमी म्हणून सल्लु भाई येतात!!! तु अॅट्म बाँब हुई मेरे लिए. इंडीड!! गुड फन साँग. देसी पार्टीत नाच करायला मस्त आहे. डिजे ला सांगून ठेवा.
https://www.youtube.com/watch?v=83XfpQQ5qVA
४) बी डी जलाइले: परवा होली पार्टीत हे फार वाजले आमच्या इथे. पब्लिक बेहोश उन्हात नाचत होते. बिपाशा खुपच सॉफिस्टिकेटेड दिसते पण शी ब्रिन्ग्ज हर एनर्जी अँड अपील. गुलझारांचे लिरिक्स असल्याने मी काही बोलायची गरजच नाही. एंजॉय द डान्स. विवेक ऑबेरॉय पण किती तरुण व रसरशीत दिसतो. बिना जुर्म के हजूर मर गये ( बिचारे) सगळी मजा गंमत चालू आहे. पुढचे महाभारत घडायचे आहे. एक प्रणय दृश्य पण आहे. जस्ट वार्निग्न.
https://www.youtube.com/watch?v=XLJCtZK0x5M
५) नमक इस्क का: एकाच पिक्चर मध्ये दोन आयटम सॉन्ग का व ते इतके छान आहेत. हे मला जास्त आवडते. बिपाशा सुरेख सावळी दिसते. व तो घराण्याचा एकमेव दागिना तिने घातला आहे ज्या मुळे पुढचे संशयकल्लोळ नाट्य घडते. गुलझार इन नॉटी फॉर्म.
https://www.youtube.com/watch?v=NJ-N3OjTWA4
६) छम्मा छम्मा बाजे रे मेरी पैंजनियां: आपली उर्मिला!!! काय एनर्जी ने नाचते!!. ड्रे स अगदी साधा आहे व ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर ज्वेलरी. जी तिला फार शोभते. अगदी साधे सेटिन्ग आहे. आजुबाजुला चार म्हातारे नेहमी प्रमाणेच. मी हे लार्ज स्क्रीन वर बघि तले नाही. पण जोरदार इम्पॅक्ट असेल.
https://www.youtube.com/watch?v=1ZnPY1c3u_0
७) गुप चु प गुपचुपः आपली ममता कुलकर्णी. राजस्थानी सेट अप. व एक नॉटी स्टोरी आहे. पण शेवटी तसे काही घडले नाही. नर्तकी इनोसंटच आहे. जीव भांड्यात पडतो. ममता फा र गोड दिसते व नाचते. इथे पण एक जुजा म्हातारी आहे. जी उगीच नावाला पंचनामा करत आहे. जॉनी लिव्हर पण बाईचे कपडे घालुन आहे. व सलमान शारुख मागे काहीतरी बारुद गोळा लावायच्या गडबडीत आहेत. हे व्हिलन इतके कसे लंपट व बावळट. पण ते ही ममताच्या जादु मध्ये हरवुन जातात. इथे पण इला अरुण चा तडका आहे. चोली के पीछे ची धाकटी बहीण म्हणावे असे गाणे आहे.
https://www.youtube.com/watch?v=EvOAmbPkSVs
८) तु लगावेलु जब लिपस्टिकः हे गाणे मी बघत नाही पण ऐकते. मजेशीर वाटते मला भोजपुरी आहे. लिं क देत नाही पण भारतात तरी फारच लोक प्रिय आहे. स्पॉटिफा य वर उपलब्ध आहे.
९) सलामे इश्कः ओजी रेखा व अमित. हा माझा सर्वा त फेवरिट मुजरा आहे. रेखे ने उमराव जान मध्ये एक वरची लेव्हल गाठली आहे.
इथे लता व किशोर आहे. दिल की चोट खाये हो तो गाना जरुर पसंद आयेगा. ऑसम लिरिक्स.
https://www.youtube.com/watch?v=0N6enWBR-FM
१०) महबुबा महबुबा: १९७५ मधील शोलेतील हेलेन चे नृत्य. इथे पण धरम पाजी व अमित मागे काही कारवाया करत आहेत. आम्हा ममव मुलांना हा एकदम कल्चर शॉक होता. हेलनचे उत्फुल्ल नृत्य. आर्डीचा आवाज. एकंदर नशीला माहौल. हा एकच रिलीफ आहे इंटरव्हल नंतर पुढे सर्व वाइटच होत जाते. जलाल आगा उत्तम फॉइल. दिलरुबा घेउन नाचतो. गब्बर च्या डोळ्यात सर्व पॅशन भरलेली आहे. वॉट अ व्हिलन बॅड गाय धिस वन. असे सौंदर्य नेहमी हाताबाहेर असते.
https://www.youtube.com/watch?v=ajIn2W5ZBi4
ऑनरेबल मेन्शनः झूठ बोले कौवा काटे डिंपल. कोळी मुलीच्या गेटप मधे असे दिलखेचक नृत्य केले आहे की भान हरपते. काय ती ज्वेलरी, काय तो आत्मविश्वास. तरी पहिलाच पिक्चर!!!
तर मं डळी एंजॉय करा ही प्ले लिस्ट. भर टाका पण काही आक्षेपार्ह लिहू नका ही विनंती. हे सर्व कलाकार आहेत लव्ह देअर पर्फॉरमन्स.
रावडी राठोड मधील
रावडी राठोड मधील
आ रे , प्रीतम प्यारे
सुश्मिता च दिलबर दिलबर
अरे ग़ज़ब ! Rocking song list
अरे ग़ज़ब ! Rocking song list !
पहिले तर एकदम फेव गाणे. Vulgar न होता माधुरी रॉक्स ! टिम कुक मुंबईत आले तेव्हा त्यांचे आणि माधुरीचे मीम्स होते कुक कुक कुक वरून आणि गाण्यात ते इला अरुण चे मधेच “ओ छोरी” मजा आणते.
गुपचुप गुपचुप मधे मधेच अमरीश पुरी चे लुक्स - आंबट चिंच खाल्ल्यासारखे - फारच फनी आहेत.
माया गोविंद चे “अटरिया पे लोटन कबूतर” राहिले. ते पण खूप पॉप्यूलर झाले होते ना ?
क्या बात है, अमा नूना! जबरी
क्या बात है, अमा नूना! जबरी आढावा घेतला आहे. ह्यातली कजरारे, बीडी, सलामे इश्क आणि मेहबूबा आवडती गाणी आहेत. त्यातलं कजरारे हे तर फॅमिली साँग आहे.
<<सिनिअर बच्चन एकदम भाव खाउन जातात व ज्युनिअर कमीच पडतो. हे गाणे पिक्चर मध्ये पहिल्यांदा पाहिले तेव्हा आजिबात बोअर झाले होते. काय हे मध्येच. पण मग हळू हळू त्याची जादु डोक्यात चढत गेली. >> सगळ्याला +१. त्यातल्या कोरिओग्राफीची रचनाही तशीच केलेली आहे. म्हणून तर शेवटी सिनियरचा <<एक लै भारी जोक >> 'मॅडम, आयॅम युवर ओन्ली अॅडम' येतो. गाण्याचे शब्दही या जोकला साजेसेच आहेत 'आँखें भी कमाल करती हैं, पर्सनल से सवाल करती हैं' किंवा 'तेरी बातों में किमाम की खुशबू है' (इथे तंबाखूच्या वासाची उपमा देणे गुलजारच जाणे!).
माझ्या आवडीचं अजून एक म्हणजे गुलालमधलं 'राणाजी म्हारे':https://www.youtube.com/watch?v=9Vjj1b_ivDs
राणाजींच्या संतापाने आयटम-गीत बाईंना जे भ्या वाटतं, त्याचं वर्णन 'जैसे दूर देस के टावर में घुस गए रे एरोप्लेन'! अहाहा! लाजवाब!! बाकी नंतर इराक, अफगानिस्ताँ वगैरेमध्ये इंग्लिस्मॅनने केलेले कारनामे, डिमोक्रसी के लगने लग गयो बैंड वगैरे आंतर्राष्ट्रीय राजकीय सामाजिक परिस्थितीवरही बाई भाष्य करून जातात हा बोनस.
मस्त लिहिलंय अमा.यातलं नामक
मस्त लिहिलंय अमा.यातलं नमक इशक सोडून सगळी गाणी बघायला आवडतात(म्हणजे, ते अजून पहिलंच नाहीये, त्यामुळे आवडतं की नाही माहीत नाही.फक्त सरोज खान चा एम टीव्ही डान्स अलॉंग पाहिलाय.)
कजरारे तर खूप ऐकायचो.
Hi harpa. Great. When the
Hi harpa. Great. When the kajarare song is over. They all come out and bunti bubbli ask Amitabh if he is a police man. And he says toh kya tumhe gubbarewala lagta hu? Smartest line ever.
हमको आज कल राहिले
हमको आज कल राहिले
मुंगळा ??
मुंगळा ??
अरे वाह..मस्त लिस्ट आहे..
अरे वाह..मस्त लिस्ट आहे..
याना गुप्ताचे .. बाबूजी जरा धीरे चलो बिजली खडी यहा बिजली खडी... हे सुद्धा येईल यात.. याचे दोन वर्जान होते.. एक उडत्या चालीचे तर एक सेक्सी..
ऐश्वर्या आणि शाहरूखचे.. शक्ती
ऐश्वर्या आणि शाहरूखचे.. शक्ती चित्रपटात.. कर दे मुश्कील जीना.. ईश्क कमीना.. सुद्धा चांगले होते.. त्यातली हूक स्टेप मस्त होती.
आणि रावण चित्रपट कितीही बन्डल असला तरी छम्मक छल्लो गाणे आजसुद्ध ऐकतो मी.. मस्त बीट्स आणि म्युजिकस आहेत.
व्हाई शूड गर्लस हॅव ऑल द फन म्हणत शाहरूखने बिल्लू बार्बर मध्ये तीन तीन आयटम साँग केलेले.. तिन्ही छान उडत्या चालीचे होते...
काल चित्रपटात सुद्धा टायटल साँग केले होते...
वास्तव मधील जवानी से जंग अब
वास्तव मधील जवानी से जंग अब होने लगी.. ये चोली मेरी तंग होने लगी.. हे सुद्धा आमच्याईथे तेव्हा हिट होते..
तसेच सरफरोश मधील ये जवानी हद कर दे... त्याच पठडीतले आहे.
हेलनची मग अशी बरीच गाणी निघतील... ती आयटम साँगच म्हणायला हवीत.
जर शाहरूख आणि मलायकाचे
जर शाहरूख आणि मलायकाचे छैय्या छैय्या हे आयटम साँग धरले तर ते माझे आजवरचे सर्वात फेवरेट आयटम साँग ठरेल.
म्युजिक डान्स शब्द कोरीओग्राफी आणि शाहरुख मलायका रेहमान... सारेच बेस्ट!!
(हे गाणे गात नाचायचे मला प्राईज मिळाले आहे )
मराठीत सुद्धा आहेत आयटम साँग
मराठीत सुद्धा आहेत आयटम साँग
पटकन आठवणारे जत्रा पिक्चरमधील... ये गो ये, ये मैना, पिंजरा बनाया सोनेका.. अंकुश चौधरी.. बेस्ट..
आणि त्याच पिक्चरमधील कोंबडी पळाली... त्याचेच हिंदीत कतरीनाने चिकनी चमेली केले..
कतरीना वरून आठवले.. माय नेम इझ शीला, शीला की जवानी सुद्धा मस्त होते
Mi pan all time fan chhaiyya
Mi pan all time fan chhaiyya chhaiyya. Dance cha video taaka runmesh
'बिडी जलाईले' आणि 'नमक इस्क
'बिडी जलाईले' आणि 'नमक इस्क का' आवडतात. 'सलाम-ए-इश्क़' गाणं आवडतं पण आयटम सॉन्ग नाही वाटत. दिलबर दिलबर (ओरिजिनल) पण आवडतं. 'मेहबूब मेरे', 'इश्क समुंदर' आणि ममताबाईंचे 'कोई जाये तो ले आये', सरफरोशमधलं 'ये जवानी हद कर दे' कसले जबरदस्त आहे.
ऐकायलाच आवडणारी आणखी काही गाणी
बेबी डॉल, साकी साकी, 'प्यार तेरा दिल्ली कि सर्दी'
'उ ला ला' येईल का या कॅटेगरीत? आणि 'हाय रामा'साठी खास कॅटेगरी करावी लागेल बहुतेक..
मस्त धागा अमा. उत्साही वाटलं
मस्त धागा अमा.
उत्साही वाटलं
तेरी बातों में किमाम की खुशबू
तेरी बातों में किमाम की खुशबू है' (इथे तंबाखूच्या वासाची उपमा देणे गुलजारच जाणे! >> हे गुलजार यांचं आहे माहीत नव्हतं .. सगळे आपापल्या क्षेत्रातले मास्टर्स एकत्र आले त्यामुळे एवढा सुरेख मास्टरपीस निर्माण झाला असावा , कोरियोग्राफी , शब्द , गायन , अभिनय .. सगळं वरची लेव्हल आहे ... आयटम सॉंग वाटतच नाही पीस ऑफ आर्ट वाटतं ..
किमाम की >> मी काहीतरी वेगळंच
किमाम की >> मी काहीतरी वेगळंच ऐकत आणि समजत होते हा शब्द
माया गोविंद चे “अटरिया पे
माया गोविंद चे “अटरिया पे लोटन कबूतर” राहिले. ते पण खूप पॉप्यूलर झाले होते ना ?>> अगदी पहिल्यांदा हे गाणं माझ्या डोक्यात वाजलं.. दलाल चित्रपटातलं हे गाणं त्याकाळी खूपच हिट होतं . नवरात्रेत हमखास वाजायचं..
लिस्ट मस्त आहे सगळ्या गाण्यांची...!
कजरारे, बिडी जलाइले, छम्मा- छमा गाणी फेवरेट आहेत अजूनही..!
छम्मा छम्मा गाण्याची मस्त डान्स प्रॅक्टीस करूनही ऐनवेळी ' 'होठो मे ऐसी बात मै दबाके चली आयी.' ह्या 'ज्वेल थीफ ' गाण्यावर नृत्य करून एका cultural प्रोग्राम मध्ये नंबर मिळवला होता. .. दोन्ही गीतांची तुलना होऊच शकत नाही.. पण एकेकाळी 'छम्मा छम्मा' सुपरहीट गाणं होतं..
तू चीज बडी है मस्त मस्त पण
तू चीज बडी है मस्त मस्त पण भारीये, ऑल टाईम फेव्हरिट
ब्रिन्ग इट ऑन चे हिंदी
ब्रिन्ग इट ऑन चे हिंदी व्हर्जन.
कोई जाये लेकरं आये मेरी लाख
कोई जाये लेकरं आये मेरी लाख दुवाए पाये - ममता कुलकर्णी
किमाम की >> मी काहीतरी वेगळंच
किमाम की >> मी काहीतरी वेगळंच ऐकत आणि समजत होते हा शब्द >>>> काय होता तो? आता उत्सुकता लागून राहिली आहे.
'आता कशाला उद्याची बात'
'आता कशाला उद्याची बात' भारतीय चित्रपटविश्वातील आद्य आयटेम साँग म्हणता यावे
तेरी बाते मिकी मामु की खुशबू
तेरी बाते मिकी मामु की खुशबू है?
मूळ शब्द किमाम आहे की किवाम?
हाहा. त्यावरून इथेच टाका तंबू
हाहा. त्यावरून इथेच टाका तंबू हेही आयटेम साँग आठवलं. विशेषतः नवीन गोळाबेरीज चित्रपटात ते अगदीच आयटम करून टाकलं आहे.
धमाल लेख!
धमाल लेख!
पुष्पामधील समंथाचे "ऊं अंटावा मावा" हे पण टाका की लिष्टीत.
आमचा एक मित्र अगदी कॉन्फिडन्स
आमचा एक मित्र अगदी कॉन्फिडन्स ने 'तेरे बातोमे हमाम की खुश्बु है, तेरा न्हाना भी गरमीयोंकी बू है' असं गायचा. त्याला किती वेळा सांगितलं की ते प्रेयसी/ मुलगीला उद्देशुन कौतुक करण्यासाठी गायलेलं गाणं आहे त्यात तिला कोणी तरी तू आलीस की हमाम साबणाचा वास येतो असं का म्हणेल? त्यावर तो म्हणायची मी झेंडुबाम आहे असं कोणी म्हणु शकतं तर तुझ्या अंगाला हमाम साबणाचा वास येतो हे कोणी का म्हणु शकणार नाही? मग एका मित्राने किमाम शब्द आणि त्याचा तंबाकू हा अर्थ सांगितला त्यावर त्याने 'तंबाकू पेक्शा हमाम साबण बरा' हा युक्तीवाद केलेला.
तेरे बातोमे हमाम की खुश्बु है
तेरे बातोमे हमाम की खुश्बु है, तेरा न्हाना भी गरमीयोंकी बू है >> आवडलं
त्याने 'तंबाकू पेक्शा हमाम
त्याने 'तंबाकू पेक्शा हमाम साबण बरा' हा युक्तीवाद केलेला.
>>>
ज्याची त्याची चॉईस वेगळी असू शकते. पण बहुतांश मुलांना तंबाखू पेक्षा हमाम वासाची मुलगीच आवडेल.
उगाच मुलांना आवडते या गैरसमजातून मुलींनी गुटखा खायला सुरुवात करू नये म्हणून हे क्लिअर केले.
उगाच मुलांना आवडते या
उगाच मुलांना आवडते या गैरसमजातून मुलींनी गुटखा खायला सुरुवात करू नये >>>>
मूळ किमाम/किवाममध्ये अस्सल केशर असते (म्हणे) सो अगदीच तंबाखूचा वास नसेल. काहीतरी भन्नाट, इंटॉक्झिकेटिन्ग असू शकेल. आजूबाजूला कुणी नुसताच तंबाखू खात असेल तर एवढा त्रास होत नाही. पण गुटखा खात असेल तर उभंही राहवत नाही.
Pages