अन्य भाषेतून, प्रदेशातून हिंदी चित्रपटात / हिंदी चित्रपटातून अन्य भाषेत गाण्यांची उसनवार

Submitted by ------ on 9 May, 2021 - 15:36

हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी / बंगाली / इंग्रजी / इटालियन / दाक्षिणात्य / पाकिस्तानी चित्रपटातील, अल्बम मधील गाणी उचललेली आहेत. काही काही रीमेक आहेत, काही परवानगीने घेतलेली आहेत. काहींचे श्रेय दिले जाते तर काहींचे श्रेय अजिबात दिले जात नाही.
अशा गाण्यांबद्दल बोलूयात.
पहिल्यांदा कुठले गाणे आहे त्याचा तपशील अथवा लिंक आणि नंतरच्या ओळीत ते कुठून उचलले आहे (स्त्रोत) त्याचा तपशील अथवा लिंक द्यावी.
उदा.

1) अलग अलग या चित्रपटात आर डी बर्मन यांनी किशोरकुमार कडून गाऊन घेतलेले एक गाणे खूप गाजले.
कभी बेकसी ने मारा, कभी बेबसी ने मारा
https://youtu.be/hXs6fnJ2UDs

हे गाणेच नव्हे तर त्यातील दृश्ये या पाकिस्तानी गाण्यावरून जशीच्या तशी उचलली गेली आहेत. शब्दांचा फेरफार केला गेला आहे फक्त.

(2) अखलाख अहमद - पाकिस्तानी गाणे (मूळ गाणे)
https://youtu.be/dSAfJpRXgew

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानवदादा Lol
सलमानच नृत्य(?) असलेलं सिटी मार. दिशालाच भोवती फिरवून नाचाचा आभास निर्माण केला आहे. या वयातही म्हणू नका प्लीज !! आपलं तुणतुणे घेऊन करायचे गाणे निवडायचे/उचलायचे असते की मगं. Wink

अल्लू अर्जुनची मूळ शिटी , जबरी फुटवर्क व किलर शूज...

याचा तुलनात्मक अभ्यास करणारा गमतीदार विडिओ.... हहपुवा.

सलमान चे जास्त चांगले आहे.. सिम्पल स्टेप्स.. भाई म्हणूनच ग्रेट आहे..आलू अर्जुन पेक्षा यंग दिसतो भाई अजूनही... स्किन कसली टाईट आहे... सिक्स पॅक.. क्या बात भाई...

एक असा हिंदी चित्रपट आला होता ज्यात सर्वच्या सर्व गाणी सुपरहीट होती. पण ती सर्वच चोरलेली होती. त्यातल्या एकाचं नाव संगीतकार म्हणून लावण्याची पाळी आली तर दुस-याने कोर्टात खेचलं आणि खटला जिंकला.

तो चित्रपट कोणता ?

मराठीतील ‘काजळ रातीनं ओढून नेला’ हे ‘हा खेळ सावल्यांचा’ मधलं गाणं ‘माया मेमसाब’मधे ‘खुद से बातें करते रहना’ म्हणून घेतलय. एकाच चालीवर दोन वेगवेगळ्या मुड्सची गाणी.
तसंच ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी’ हे हिंदी ‘मशाल’मधे ‘होली आयी, होली आयी देखो होली आयी रे’ असं होतं. होळीचा मुड एकदम मस्त पकडलाय. त्यातही ‘तुम हो तो हर रात दिवाली’ ची जागा खासच घेतलीय.

चारही गाणी ह्रदयनाथ मंगेशकरांची, त्यामुळे चोरी, श्रेय वगैरे वादात जायला नको.

छुं कर मेरे मन को (लिंक देत नाही)

हे गाणं बंगालीत भलतंच फेमस आहे. खूप वेगवेगळी गाणी आहेत,
पण सर्वांचे मूळ गाणे हे
तोमार होलो शुरू, आमार होलो सारा
https://www.youtube.com/watch?v=dWq_uTQMJyc
रूपांकरचे खूपच सुंदर आहे
https://www.youtube.com/watch?v=gqc02ShnlzA

बंगालीतून भरपूर गाणी घेतली आहेत.

चालीच नाही तर शब्द पण उचलले आहेत. बॉलिवूड साँग्ज कॉपीड फ्रॉम पाकिस्तान! पाच भाग आहेत ह्या सिरीज चे.

https://www.youtube.com/watch?v=w2y3Cr4jofY

https://www.youtube.com/watch?v=HyT3tG6Kg5w

https://www.youtube.com/watch?v=qm0Nnu-u_tA

https://www.youtube.com/watch?v=guOkuD-Zm1o

https://www.youtube.com/watch?v=dOhGUGikiX8

बम्बई का बाबूचे शीर्षक गीत:

https://www.youtube.com/watch?v=-0dPCZencLo

मूळ गाणे: 'रोजूलू मराई' ह्या तेलुगु चित्रपटातील वहिदा रहमानचे ' कल्लाकपट्टम' गाणे:

https://www.youtube.com/watch?v=VH72kvy0y98&t=4s

सूलू_८२, मूळ गाणे लोकगीत आहे . https://www.youtube.com/watch?v=-7-eHJz39A0

The soundtrack was composed by Master Venu.[6] "Eruvaaka Sagaroranno Chinnanna" was inspired by the folk song "Ayyo Koyyoda", popularised by Valluri Jagannatha Rao. It was later adapted into many other songs, such as "Summa Kidantha Sothuku Nashtam" from the Tamil film Madurai Veeran (1956) and "Dekhne Me Bhola Hai Mera Salona" from the Hindi film Bombai Ka Babu (1960).[2]

ह्याा विषयावर अजुनही धागे असतील पण हा पटकन सापडला म्हणुन मी इथेच लिहिते.

इन्स्त्टावर रिल बघताना सोबत वाजणारे गाणे ओळखीचे वाटले…. Sad

https://youtu.be/TYtdYslLY9I?feature=shared

>>
१. एन्नि एन्नी परका मनम हे वैजयंती मालाचं तमिळ गाणं

२. हिंदीमध्ये खूप खुप चडे हो बरुर कोई जात है रहेमान आणि सुरय्या.
<<
ह्यातले चुप चुप खडे हो जरुर कोई बात है हे गाणे जास्त जुने आहे. तमिळ गाणे थोडे नवे आहे आणि म्हणून हिंदी गाणे मूळ असावे.
ह्यातल्या तमिळ गाण्याचे वैशिष्ट्य असे की ह्या गाण्याचे जवळपास जसेच्या तसे चित्रीकरण बहार ह्या वैजयंती मालाच्या पहिल्या हिंदी सिनेमातले सैया दिल मे आना रे ( आवाज : शमशाद बेगम) ह्या गाण्यात बघायला मिळते. नायकाचा फोटो घेऊन नाच, मग कबुतर हातात पकडून ते हवेत सोडण्याचा सीन, हुबेहुब कॉपी! बहुधा बहार हा हिंदीतला रिमेक आहे. (अवांतर: दोन्ही सिनेमात वैजयंती माला कमालीची सुंदर दिसली आहे!)