अपेक्षे प्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचनायलय ( Enforcement Directorate ED) ने गुरवारी अटक केली. त्या आधी ED ने त्यांना चौकशीसाठी अनेक समन्स पाठविले होते.
गेल्या १० वर्षांत ED (तसेच CBI ) ने विरोधी विचारांच्या नेत्यांवर PMLA ( Prevention of Money Laundering Act ) तसेच
FEMA ( Foreign Exchange Management Act ) अंतर्गत कारवाई/ अटक करण्याच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास, कोर्टात गुन्हा सिद्ध झाल्यास अपराध्याला शिक्षा करा.
गेल्या दहा वर्षांतला (NDA काळ) डेटा बघितला तर १२१ राजकीय व्यक्तींवर ED ने कारवाई केली आहे. पैकी ११५ विरोधी पक्षातले आहे. कारवाई होणार्यांमधे २६ काँग्रेस, १९ तृणमूल काँग्रेस, ११ राष्ट्रवादी, ८ सेना, ६ डिएमके, ६ बिजू जनतादल, ५ RJD, ५ बसपा, ५ सपा, ५ तेलगू देसम, ३ आप, ३ INLD, 3 YSR काँग्रेस, २ नॅशनल काँन्फरन्स, २ PDP चे नेते आहेत. यामधे आजी/ माजी मुख्यमंत्री, २६ खासदार, २१ आमदार, ५ माजी आमदा रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षाच्या एकाही नेत्यावर कारवाई झालेली नाही.
अटक झालेल्या विरोधी नेत्याने विरोधाची धार कमी केली तर कारवाई मंद होते, उदा- राज ठाकरे. किंवा पक्ष बदलून भाजपामधे प्रवेश केला तर कारवाई चक्क थांबते आणि कधी मंत्रीपद, मुख्यमंत्रीपदही मिळते. उदा- (२०१७ ED ) नारायण राणे, (२०१४ मधे CBI) हेमंत बिसवा सरमा....
या आधी, UPA सरकारच्या काळांत, २६ राजकीय व्यक्तींवर ED ने कारवाई केली होती. यामधे ५ काँग्रेस, ७ तृणमूल काँग्रेस, ४ डिएमके, ३ भाजपा, २ बसपा, १ YSR काँग्रेस, १ बिजू जनतादल चे नेते होते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची संख्या ५ होती तर प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची संख्या ३ होती. या काळांत पक्ष बदलला आणि कारवाई थांबली असे एकही उदाहरण दिसत नाही.
३१ मार्च २०२२ पर्यंत, PMLA अंतर्गत, ५४०० प्रकरणांच्या नोंदी झाल्या, पैकी २३ घटनांत शिक्षा झाली. ED ची efficiency ०.४ % आहे, बजेट वाढविले यामधे शिरायचे नाही आहे. वृत्तपत्रांतून (सकाळ, ET, TOI... ) मिळालेली आकडेवारी बघितली तर केवळ विरोधी विचारांच्या लोकांवर ( राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, समाज सेवक) वरच कारवाया होत आहे हे धक्कादायक चित्र समोर येत आहे आणि हे चिंतेचे कारण आहे. ED कुणावर कारवाई करते याचा पक्ष निहाय डेटा उपलब्द नाही , ठेवला जात नाही. ED किंवा CBI ने कारवाई सुरु केली, आणि काही आठवड्यांत या नेत्याने सत्ताधारी पक्षांत प्रवेश केल्यावर कारवाई थांबल्याचे उदाहरण माहित असल्यास येथे लिहा. उदा - तृणमूल काँग्रेसचे तपस रॉय यांच्या घरावर/ कार्यालयावर १२ जानेवारी २०२४ रोजी ED ने धाड टाकली... ६ मार्च २०२४ तपस रॉय यांचा भाजपा प्रवेश. आपचे संजय सिंग यांना ED ने अटक केली आहे, अजून बधले नाहीत म्हणून तुरुंगांत आहेत.
संजय सिंग किंवा महुआ यांनी संसदेत अभ्यासपूर्ण भाषण करणे, कठिण प्रश्न उपस्थित करणे, आणि म्हणून त्याची शिक्षा त्यांना होत असेल तर ? मोठी शोकांतिका आहे. लोकशाही मधे विरोधी विचारसरणीला पण महत्व आहे, त्यांच्या विरोध करण्याच्या हक्काचे रक्षण व्हायला हवे. विरोधी विचारांना नामशेष करण्यासाठी, एखाद्या स्वायत्त संस्थेचा शस्त्रासारखा वापर करणे, निरोगी लोकशाहीसाठी घातक आहे आणि यावर चर्चा होणे गरजेचे वाटते.
रघु आचार्य, काँग्रेसने चुका
रघु आचार्य, काँग्रेसने चुका केल्या नाहीत अस कोण म्हणतय? त्यांनी चांगल्या गोष्टीही केल्यात. तसच भाजपाचही आहे. प्रश्न हा आहे की ७ किंवा १३ तारखेला जेंव्हा मतदान करायला जाऊ त्यावेळेस कोणाला मत द्यायचं? असलेल्या पर्यायांपैकी त्यातल्यात्यात जो बरा वाटतोय त्याला द्यावं असं माझ तरी मत आहे. मतदानच करायचं नसेल तर मग प्रश्नच नाही.
केजरीना जमीन मिळण अवघडच आहे. ED CHYA १० summons ला केराची टोपली दाखवल्यावर कोर्ट तरी काय करेल.
इथे तुम्ही प्रत्येक धाग्यावर
इथे तुम्ही प्रत्येक धाग्यावर मतदानाला जायचंय हे डोक्यात ठेवून चर्चा करत असाल अशी आशा करतो. शुभेच्छा तुम्हाला.
विरोधकांना नेस्त नाबूत
विरोधकांना नेस्त नाबूत करण्यासाठी भाजप = मोशा वापरत असलेल्या सरकारी यंत्रणांची यादी करता येईल.
काँग्रेसची बँक खाती गोठवल्यानंतर आयकर खात्याने आणखी १८३२. कोटी रुपयांची नोटिस पाठवली आहे
काँग्रेसच्या रामटेक मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांंचं जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द केले आहे.
नवनीत राणा यांनी आपलं जात प्रमाणपत्र खोटे कागदपत्र देऊन बनवलं असा उच्च न्यायालयाचा निकाल जून २०२१ मध्ये आला होता. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. नवनीत राणा यांना भाजपने अमरावतीतून तिकीट दिले आहे.
<< ED CHYA १० summons ला
<< ED CHYA १० summons ला केराची टोपली दाखवल्यावर कोर्ट तरी काय करेल. >>
------- ED च्या पहिल्याच समन्सला गांभिर्याने घेतले असते तर परिस्थिती मधे काही फरक पडला असता अशी वाटण्याची परिस्थिती नाही आहे.
ज्यांनी पहिलेच समन्स गांभिरयमे ने घेतले त्यांची काय परिस्थिती आहे? कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नसतांना सिसोदीया यांना एक वर्ष तुरुंगांत डांबून ठेवले आहे. चौकशीसाठी एव्हढा मोठा काळ हवा असतो?
महुआ मोईत्राला ED ने
महुआ मोईत्राला ED ने चौकशीसाठी दिल्लीला बोलाविले आहे. समन्स जारी झाले आहे.
Communist Party of India has
Communist Party of India has received income-tax notice to pay 'dues' of Rs 11 crore for using old PAN card: Sources
भरत, तुम्हाला -मला ही नोटीस
भरत, तुम्हाला -मला ही नोटीस येईल बहुधा
भ्रमर अगदी
भ्रमर अगदी
मी व्हॉअ गृपसवर फार लिहिते. मीही तयारीत रहावं का?
अरविंद केजरीवाल यांनी
अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे
https://twitter.com/niiravmodi/status/1773394195748962481
मी व्हॉअ गृपसवर फार लिहिते >>
मी व्हॉअ गृपसवर फार लिहिते >> तुम्हाला तर तिहार वगैरे
अरविंद केजरीवाल यांनी
अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे >> त्या आदरणिय न्यायाधीश अशा ऐकत आहेत, की तू काहीही बोल, तुला सोड्णार नाहीच्चे!
मी व्हॉअ गृपसवर फार लिहिते.
मी व्हॉअ गृपसवर फार लिहिते. मीही तयारीत रहावं का? >> तरी त्यातल्या त्यात भाजप आयटी ऍक्ट अमेंडमेंट नुसार फॅक्ट चेक युनिट आणून सोमोवर मत व्यक्त केल्याने अटक होण्यासारखी एक निष्ठुर सजा देण्याची प्रथा मोडीत काढायचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण मेलं ते दळभद्री सुप्रीम कोर्ट, एडिटर्स गिल्ड आणि तो कुणाल कामरा.....लोकांचं भलं झालेलं पाहवतच नाही त्यांना...एक नंबर चे प्रतिगामीवादी आहेत लेकाचे....
भ्रमर : खोखो: का हो म्या
भ्रमर : खोखो: का हो म्या म्हातारीला जेलात पाठवता
प्रो. साईबाबा ला सडवलं
प्रो. साईबाबा ला सडवलं ,तुम्ही त्याच्यापेक्षा तरुण असाव्यात
हे हे, चार वर्ष मोठीच आहे मी
हे हे, चार वर्ष मोठीच आहे मी
अर्थात त्यांचं जे सोसलं ते भयानक आहे __/\__
तुम्ही अवलिया आहात म्हणायला
तुम्ही अवलिया आहात म्हणायला हवं तर
अवल तुम्ही फार काळजी करू नका,
अवल तुम्ही फार काळजी करू नका, जे काही सत्तर ऐंशी कोटी असतील ते इकडे पाठवून द्या. मी सांभाळेन.
विकु : हाहा:
विकु
बाय द वे ही चर्चा जरूर ऐका
https://youtu.be/ipEK3jA6ohE?si=iukFWJaRrbTfl9CW
सिब्बल, जस्टिस लोकूर, सेंच्युरी आणि अरुणकुमार यांनी खूप सविस्तर मांडलय. पुढे काय यावरही.
https://youtu.be/CXpCkSF87-A
https://youtu.be/CXpCkSF87-A?si=vRS-YjvyAOXNXVm1
घ्या खापर स्टेट बँकेवर फुटलं
क्षमस्व, धागा चुकला. वरच्या
क्षमस्व, धागा चुकला. वरच्या दोन्ही पोस्ट इ बॉड वर आहेत
आता फक्त अटक करणार नाही,
आता फक्त अटक करणार नाही, गुन्हा कुठलाही असो, काळया पाण्याची शिक्षा आणि कोलू ओढण्याची शिक्षा अनिवार्य करणार. माफी मागायचा पर्यायही असेल अशी आशा करूया.
अरविंद केजरीवाल यांचे नांव
अरविंद केजरीवाल यांचे नांव गोवण्यात महत्वाची भुमिका निभावणारे माफीचे साक्षीदार ( approver) राघव मगुंठा रेड्डी यांच्या वडिलांना (मित्र पक्ष TDP मार्फत ) लोकसभेसाठी तिकीट मिळाले आहे.
https://indianexpress.com/article/political-pulse/magunta-reddy-gets-tic...
आयकर खात्यातर्फे
आयकर खात्यातर्फे काँग्रेसच्या खिशावर डल्ला मारला. आता तेच कारण देऊन निवडणूक आयोगातर्फे काँग्रेसची मान्यता रद्द केली जाऊ शकते.
तसं झालं की काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न पाहणार्यांचं अभिनंदन!
मोदीजी ची पत्रकार परिषद चालू
मोदीजी ची पत्रकार परिषद चालू आहे. लगेच टिव्ही लावा.
मोदीजी ची पत्रकार परिषद चालू
मोदीजी ची पत्रकार परिषद चालू आहे. लगेच टिव्ही लावा.>>>>
पंतप्रधान मोदी आणि पत्रकार परिषद हे दोन शब्दसमुच्चय, आणि ते ही एका वाक्यात??
एप्रिल फूल म्हणून का असेना ,
एप्रिल फूल म्हणून का असेना ,।मोदी पत्रकार परिषद घेतोय ही आनंद साजरा करण्यासारखीच गोष्ट आहे.
धृव राठीचा आजचा व्हिडियो अगदी
धृव राठीचा आजचा व्हिडियो अगदी बघाच
https://youtu.be/JyJd111Ym7U?si=fM2ljEB7YVw76f7k
खासदार संजय सिंग यांना जामिन
खासदार संजय सिंग यांना जामिन मिळाला...
https://indianexpress.com/article/india/sanjay-singh-bail-aap-delhi-exci...
कुठलाही ठोस पुरावा नसतांना केवळ विरोधी पक्षाचा आहे, अभ्यासू आहे, संसदेत जनतेचे प्रश्न मांडतो, सत्ताधार्यांना जाब विचारतो आणि मुख्य म्हणजे आपमधे उभी फूट पाडायला स्पष्ट नकार देतो म्हणून तब्बल सहा महिने त्यांना ED ने तुरुंगांत ठेवले होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, “कुणी
सदाभाऊ खोत म्हणाले, “कुणी काहीही म्हणू द्या, पण देवेंद्र फडणवीस यांना मानतो. लोक म्हणतात काही झालं तरी ईडी मागे लावतात. पण मी म्हणतो ईडीची गती वाढवा. गडी एकतर आपल्यात आला पाहीजे. नाहीतर घाबरून मेला पाहीजे.”
मोदी का परिवार मधल्या अजून
मोदी का परिवार मधल्या अजून एका बलात्काऱ्याचा पर्दाफाश: प्रज्वल रेवन्ना
3000 व्हिडीओ आहेत, व्हिडीओ नसलेले किती असतील कुणास ठाऊक.
bjp म्हणजे बलात्कारी जनता पार्टी
Pages