वेशसंकल्पनाबद्दल दोन पुरस्कार

Submitted by नीधप on 25 March, 2024 - 04:06

नमस्कार,
मी एक कॉश्च्युम डिझायनर आहे. गेले काही वर्षे हे काम हळू हळू बंद करत आणले होते पण गेल्या वर्षी एक सुरेख प्रोजेक्ट आले समोरून. एक्झिक्युशनची जबाबदारी न घेता नुसते डिझायनिंग केलेले चालणार होते त्यामुळे आणि पिरियड ड्रामा असल्याने मी हे प्रोजेक्ट घेतले.
मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ऑगस्ट 2023मध्ये 'चाणक्य' हे नाटक ओपन झाले. तेच हे प्रोजेक्ट. या नाटकाची वेशभूषा मी केलेली आहे.
नुकतेच म्हणजे 6 आणि 7 मार्चला या वर्षीचे झी नाट्य गौरव आणि मटा सन्मान हे दोन्ही पुरस्कार सोहळे संपन्न झाले. या दोन्ही ठिकाणी चाणक्य नाटकाच्या वेशभूषेसाठी मला आधी नॉमिनेशन आणि मग पुरस्कार मिळाले.
हे दोन्ही पुरस्कारांच्या वेळेचे फोटो
IMG_20240325_131432.jpg

हे दोन्ही सोहळे त्या त्या चॅनेल्सवर कधीतरी दाखवले जातील/गेले असतील. झी नाट्य गौरव अर्थातच झी मराठीवर आणि मटा सन्मान कलर्सवर. माझ्याकडे टिव्ही नसल्याने त्यांचे प्रक्षेपण कधी वगैरे मला अजिबातच माहिती नाहीये. कुणाला माहिती असल्यास शेअर करा.

चाणक्य नाटकाच्या वेशभूषेबद्दल फोटोसकट तपशिलात लिहिणार आहे वेळ मिळाला की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मटा सन्मान विजेत्यांच्या यादीत तुमचे नाव वाचून अभिनंदनाचा विपू करणार होतो पण काही कारणांनी राहीले. आता तुम्ही झी नाट्यगौरव पुरस्कारही जिंकल्याचे वाचून आनंद द्विगुणीत झाला.

तुमचे मनापासून अभिनंदन. ह्यापुढेही अश्याच अनेक पुरस्कारांच्या तुम्ही मानकरी ठराव्यात हीच सदीच्छा!

नी, अभिनंदन पुन्हा एकदा! तुला कितपत शेअर करता येईल माहित नाही पण या नाटकाच्या वेषभूषा संकल्पना, अ‍ॅक्चुअल कपडे याची झलक बघायला नक्कीच आवडेल..

सर्वांचे आभार!
खूप गडबड गोंधळ, प्रवास, आजारी पडणे असं सगळं चालू आहे. जरा नॉर्मल झालं की नक्की लिहिणार आहे वेशभूषेबद्दल. तेव्हा फोटोजही शेअर करेन.
तूर्तास जे भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहतात त्यांनी आपल्या जवळच्या नाट्यगृहात प्रयोग नक्की बघा.
शैलेश दातार निर्मित, रूपांतरित आणि त्यांचीच मुख्य भूमिका असलेल्या मराठी चाणक्यचे प्रयोग सध्या विविध ठिकाणी होत आहेत. येत्या वीकेंडला रामकृष्ण मोरे, पिं चि आणि भरत, पुणे येथे प्रयोग आहेत.

अभिनंदन.
लेख लिहाच
तुमचे लेख आणि त्याचे विषय आवडतात

अभिनंदन.
फोटो छानच आहेत.
पुढेही नवनवीन कल्पना व प्रयोग यांतून यश वृद्धिंगत होवो..

>>>>>>जरा नॉर्मल झालं की नक्की लिहिणार आहे वेशभूषेबद्दल. तेव्हा फोटोजही शेअर करेन.
जरुर. एकदम हटके फिल्ड आहे त्यामुळे वाचायला आवडेल.

दोन्ही पुरस्कारांचं प्रक्षेपण दिनांक 7 एप्रिल रोजी संध्याकाळी असणार आहे. झी नाट्य गौरव अर्थात झी मराठीवर संध्याकाळी 7 वाजता तर मटा सन्मान सन मराठी वर संध्याकाळी 6 वाजता.

याच कामासाठी अजून एक बक्षीस नुकतेच जाहीर झालेय.
महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धेत आमच्या चाणक्य या नाटकाला सांघिक सह एकूण सात बक्षिसे जाहीर झालीयेत. त्यात वेशभूषेसाठी प्रथम क्रमांकाचे मला जाहीर झालेय.
ही संपूर्ण निकालाची यादी.
IMG-20240806-WA0001.jpg

दोन्ही पुरस्कारांबद्दल अभिनंदन!

आज मी सहज सगळे धागे दाखवणारा पर्याय पाहिला तर हा धागा दिसला. मी फेसबुकवर या नाटकातील वेशभूषेचे एक दोन फोटो पाहिले होते. ज्यांना कॉस्च्युम्स मधले फार कळत नाही अशांनाही लक्षात येतील असे एकदम देखणे होते ते.

नी पुरस्कारांसाठी मनापासून अभिनंदन! जरा उशीराच बघितलं पण तरी
>>>अभिनंदन पुन्हा एकदा! तुला कितपत शेअर करता येईल माहित नाही पण या नाटकाच्या वेषभूषा संकल्पना, अ‍ॅक्चुअल कपडे याची झलक बघायला नक्कीच आवडेल..>>> हे वाचायला/ बघायला आवडेल

Pages