वेशसंकल्पनाबद्दल दोन पुरस्कार

Submitted by नीधप on 25 March, 2024 - 04:06

नमस्कार,
मी एक कॉश्च्युम डिझायनर आहे. गेले काही वर्षे हे काम हळू हळू बंद करत आणले होते पण गेल्या वर्षी एक सुरेख प्रोजेक्ट आले समोरून. एक्झिक्युशनची जबाबदारी न घेता नुसते डिझायनिंग केलेले चालणार होते त्यामुळे आणि पिरियड ड्रामा असल्याने मी हे प्रोजेक्ट घेतले.
मराठी व्यावसायिक रंगभूमीवर ऑगस्ट 2023मध्ये 'चाणक्य' हे नाटक ओपन झाले. तेच हे प्रोजेक्ट. या नाटकाची वेशभूषा मी केलेली आहे.
नुकतेच म्हणजे 6 आणि 7 मार्चला या वर्षीचे झी नाट्य गौरव आणि मटा सन्मान हे दोन्ही पुरस्कार सोहळे संपन्न झाले. या दोन्ही ठिकाणी चाणक्य नाटकाच्या वेशभूषेसाठी मला आधी नॉमिनेशन आणि मग पुरस्कार मिळाले.
हे दोन्ही पुरस्कारांच्या वेळेचे फोटो
IMG_20240325_131432.jpg

हे दोन्ही सोहळे त्या त्या चॅनेल्सवर कधीतरी दाखवले जातील/गेले असतील. झी नाट्य गौरव अर्थातच झी मराठीवर आणि मटा सन्मान कलर्सवर. माझ्याकडे टिव्ही नसल्याने त्यांचे प्रक्षेपण कधी वगैरे मला अजिबातच माहिती नाहीये. कुणाला माहिती असल्यास शेअर करा.

चाणक्य नाटकाच्या वेशभूषेबद्दल फोटोसकट तपशिलात लिहिणार आहे वेळ मिळाला की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह
अभिनंदन तुझे !!!!!
लेख हवाच.

अभिनंदन नीधप!
चाणक्य नाटकाच्या वेशभूषेबद्दल फोटोसकट तपशिलात लिहिणार आहे वेळ मिळाला की>> नक्की लिहा. लेखाच्या प्रतिक्षेत आहे.

अभिनंदन नी..

रच्याकने...फोटोतील तुझ्या दोन्ही साडया सुंदर!!

Pages