अपेक्षे प्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचनायलय ( Enforcement Directorate ED) ने गुरवारी अटक केली. त्या आधी ED ने त्यांना चौकशीसाठी अनेक समन्स पाठविले होते.
गेल्या १० वर्षांत ED (तसेच CBI ) ने विरोधी विचारांच्या नेत्यांवर PMLA ( Prevention of Money Laundering Act ) तसेच
FEMA ( Foreign Exchange Management Act ) अंतर्गत कारवाई/ अटक करण्याच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास, कोर्टात गुन्हा सिद्ध झाल्यास अपराध्याला शिक्षा करा.
गेल्या दहा वर्षांतला (NDA काळ) डेटा बघितला तर १२१ राजकीय व्यक्तींवर ED ने कारवाई केली आहे. पैकी ११५ विरोधी पक्षातले आहे. कारवाई होणार्यांमधे २६ काँग्रेस, १९ तृणमूल काँग्रेस, ११ राष्ट्रवादी, ८ सेना, ६ डिएमके, ६ बिजू जनतादल, ५ RJD, ५ बसपा, ५ सपा, ५ तेलगू देसम, ३ आप, ३ INLD, 3 YSR काँग्रेस, २ नॅशनल काँन्फरन्स, २ PDP चे नेते आहेत. यामधे आजी/ माजी मुख्यमंत्री, २६ खासदार, २१ आमदार, ५ माजी आमदा रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षाच्या एकाही नेत्यावर कारवाई झालेली नाही.
अटक झालेल्या विरोधी नेत्याने विरोधाची धार कमी केली तर कारवाई मंद होते, उदा- राज ठाकरे. किंवा पक्ष बदलून भाजपामधे प्रवेश केला तर कारवाई चक्क थांबते आणि कधी मंत्रीपद, मुख्यमंत्रीपदही मिळते. उदा- (२०१७ ED ) नारायण राणे, (२०१४ मधे CBI) हेमंत बिसवा सरमा....
या आधी, UPA सरकारच्या काळांत, २६ राजकीय व्यक्तींवर ED ने कारवाई केली होती. यामधे ५ काँग्रेस, ७ तृणमूल काँग्रेस, ४ डिएमके, ३ भाजपा, २ बसपा, १ YSR काँग्रेस, १ बिजू जनतादल चे नेते होते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची संख्या ५ होती तर प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची संख्या ३ होती. या काळांत पक्ष बदलला आणि कारवाई थांबली असे एकही उदाहरण दिसत नाही.
३१ मार्च २०२२ पर्यंत, PMLA अंतर्गत, ५४०० प्रकरणांच्या नोंदी झाल्या, पैकी २३ घटनांत शिक्षा झाली. ED ची efficiency ०.४ % आहे, बजेट वाढविले यामधे शिरायचे नाही आहे. वृत्तपत्रांतून (सकाळ, ET, TOI... ) मिळालेली आकडेवारी बघितली तर केवळ विरोधी विचारांच्या लोकांवर ( राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, समाज सेवक) वरच कारवाया होत आहे हे धक्कादायक चित्र समोर येत आहे आणि हे चिंतेचे कारण आहे. ED कुणावर कारवाई करते याचा पक्ष निहाय डेटा उपलब्द नाही , ठेवला जात नाही. ED किंवा CBI ने कारवाई सुरु केली, आणि काही आठवड्यांत या नेत्याने सत्ताधारी पक्षांत प्रवेश केल्यावर कारवाई थांबल्याचे उदाहरण माहित असल्यास येथे लिहा. उदा - तृणमूल काँग्रेसचे तपस रॉय यांच्या घरावर/ कार्यालयावर १२ जानेवारी २०२४ रोजी ED ने धाड टाकली... ६ मार्च २०२४ तपस रॉय यांचा भाजपा प्रवेश. आपचे संजय सिंग यांना ED ने अटक केली आहे, अजून बधले नाहीत म्हणून तुरुंगांत आहेत.
संजय सिंग किंवा महुआ यांनी संसदेत अभ्यासपूर्ण भाषण करणे, कठिण प्रश्न उपस्थित करणे, आणि म्हणून त्याची शिक्षा त्यांना होत असेल तर ? मोठी शोकांतिका आहे. लोकशाही मधे विरोधी विचारसरणीला पण महत्व आहे, त्यांच्या विरोध करण्याच्या हक्काचे रक्षण व्हायला हवे. विरोधी विचारांना नामशेष करण्यासाठी, एखाद्या स्वायत्त संस्थेचा शस्त्रासारखा वापर करणे, निरोगी लोकशाहीसाठी घातक आहे आणि यावर चर्चा होणे गरजेचे वाटते.
रघु, पोस्ट आवडली
रघु, पोस्ट आवडली
रघू आचार्य , तुमचा प्रतिसाद
रघू आचार्य , तुमचा प्रतिसाद संयत व अभ्यासपूर्ण असला तरीही पटला नाही. Both sides are same हे सर्वथा खरे नसते.
केंद्रिय एजंसीज चा आज होत असलेला गैरवापर हा unprecedented आहे. काँग्रेस ने केलेल्या चुकांशी त्याची तुलना होऊ शकत नाही. स्वातंत्र्या नंतर प्रथमच ED सारख्या संस्थेचा वसूली एजंट सारखा वापर होत आहे. ( प्रमुखांना तीन तीनदा मुदतवाढ) सुप्रीम कोर्ट बेल देणे दूरच, बेल ची सुनावणी ही घ्यायला घाबरत आहे. मेडिया बद्दल तर बोलूच नये. ( अगदी मनमोहन यांच्या काळीही थेट त्यांच्या समोर प्रश्न विचारायची हिंमत पत्रकारांत होती) सैन्य दलांचा राजकारणासाठी वापर करणे काँग्रेस ने कटाक्षाने टाळले होते. तीही मर्यादा आजकाल ओलांडली जाते. तंदूर कांड मधल्या आरोपीचे वडील काँग्रेसमध्ये होते, कांड नंतर त्यांचे करीयर संपले, आज त्याचा भाऊ राज्य सभा सदस्य आहे, कोणत्या पक्षाकडून ? कोणतेही अपराध करा, एकदा गळ्यात भगवे उपरणे घातले की सारे आरोप धुतले जाणार, हे गॅरंटी चिंतनीय आहे.
Both sides are same हे सर्वथा
Both sides are same हे सर्वथा खरे नसते. >>> प्रतिसाद न पटणे हा तुमचा अधिकार आहे. पण त्यातली गोम बाजूला सारून अशा पद्धतीने आपले म्हणणे दामटवणे हे नाही पटले. दोन्ही बाजू समानच आहेत हा निष्कर्ष माझ्या प्रतिसादात नाही. लेसर एव्हील म्हणजे किती लेसर याचे प्रत्येकाचे वेगवेगळे मोजमाप असू शकते. लेसर एव्हील ही कल्पना काही पक्षांच्या बाबतीत भ्रामक आहे. आम्ही काही त्यांच्याइतके गुंड नाही असे दाऊद आणि गवळी हे दोघेही दावे करू शकतात म्हणून यातला एखादा निवडा असा पर्याय ठेवण्यासारखेच आहे हे. भाजपने ही जी मर्यादा ओलांडली आहे ती आम्ही ओलांडली नव्हती हा दावा हास्यास्पद आहे. कधी न कधी काँग्रेसने मर्यादा ओलांडण्याचा श्रीगणेशा केलाच होता. आता त्यांच्यापेक्षा गुंड दोन पावले पुढे गेलाय हे दाखवून आम्ही किती सभ्य हे कसे काय पटवून घ्यायचे ?
काँग्रेसच्या एकूण कारकिर्दीत किती राज्य सरकारे बरखास्त झाली यावर न्यायालयात चर्चा झालेल्या आहेत.
त्यावर अधिक चर्चा करणे, अधिक उदाहरणे देऊन सिद्ध करून नकळत त्याच जाळ्यात अडकणे हे मला करायचे नाही.
काँग्रेस ही तुलनेने जास्त काळ सत्तेत आहे. हुकूमशाहीचे परिणाम काय होतात हे ती कृतीतून शिकलेली आहे. इंदिरा गांधींच्या काळी विरोधकांची फरफट झालीच होती. इंदिराजींना शरण गेल्यावर गुन्हे माफ होत. यासाठी उदाहरणांची जंत्री देण्यात अर्थ नाही. मोदी हे इंदिराजींच्या काळात जगतात. ते त्यांची कारकीर्द कॉपी करतात हे जाणवलेले आहे. आजच्या काळात इंदिराजींचे राजकारण लागू पडेल का ही शंका मोदींनी फोल ठरवली आहे. आजही भारतात असे राजकारण करता येते. जर आताच्या निवडणुकीतही (ईव्हीएम नीट चालतात हे गृहीत धरून) जर मोदी विजयी झाले तर ७०, ८० चे दशक असे कि या सहस्त्रकातले २० आणि ३० चे दशक, लोक बदलले नाहीत हा निष्कर्ष निघतो.
शीख विरोधी दंगलींना न्यायालयाने दोषी ठरवूनही मिळालेले अभय हे चिंताजनक नसेल तर यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. एक सामान्य मतदार आणि पक्षाची (कोणत्याही) बाजू मांडणारे समर्थक यांच्यात या पद्धतीने चर्चा कशी होणार ? पटवून देणे हा माझा उद्देश नाही. मला जे पटलेले आहे ते मी लिहीले.
काँग्रेस बदलल्यानंतरही लालूंवर कारवाई करते पण स्वतःच्या पक्षातल्या बड्या धेंडावर कारवाई करत नव्हती. उलट गैरसोयीच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी विरोधकांना फायली पुरवत होती. शरद पवार यांच्या येरवडा येथील १९१ अ मधील ३.१४ एकर भूखंडाचे प्रकरण तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीच एकनाथ खडसेंकरवी बाहेर आणले होते. विरोधकांचा असा वापर करून घेण्यात काँग्रेस निष्णात होती. जोवर भाजप मधे आपण काही सत्तेत येत नाही, त्यामुळे पदरात पडेल ते घ्यावे असा विचार करणारे नेते होते तोपर्यंत भाजप सत्तेपर्यंत जाऊ शकत नव्हती. खडसे यांचे नाव पवारांनी सेटलमेंट मंत्री असे ठेवले होते. मोदींनी अशा लोकांना दूर ठेवले.
मोदी हुकूमशहा आहेत याबद्दल कोणतीही शंका नाही. त्यांची सत्ता जाणे आवश्यक आहे यातही शंका नाही. पण त्याला पर्याय काँग्रेसच आहे हा नरेटिव्ह पसंत नाही. भाजप जाण्यासाठी काँगेसला मत द्या. मग पुन्हा भ्रष्टाचाराचा मुद्दा होणार. पुन्हा भाजप सत्तेत येणार. मग पुन्हा लेसर एव्हिल म्हणून काँग्रेस. हे चक्र किती काळ चालणार ?
गावागावात काँग्रेसने हुकूमशहा निर्माण केले आहेत. ते आपल्या गटात नसलेल्या लोकांशी, समूहांशी कसे वागतात हे फिरून पहा. महादेव जानकरांसारखे लोक आज नाईलाजाने भाजपकडे वळाले आहेत. ते का याची उत्तरे शोधा. जोपर्यंत या दोन्ही आघाड्या मतदार नाकारत नाही तोपर्यंत भारताचे प्रगल्भ राजकारण पहायला मिळणार नाही.
मायबोलीसारख्या ठिकाणी किमान असे मत व्यक्त करता यावे ही अपेक्षा. त्यामुळे लागलीच महाराष्ट्राचे राजकारण प्रभावित होत नाही.
महादेव जानकर मविआ कडे वळले
महादेव जानकर मविआ कडे वळले आहेत, असे का झाले असावे?
मी भाजप, जानकर किंवा मविआचा
मी भाजप, जानकर किंवा मविआचा प्रवक्ता नाही. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मिळवून इथे द्याल तर ठीक होईल. जानकरांना उद्या अमेरिकेतल्या प़क्षाला पाठिंबा द्यावासा वाटला तरी माझी काहीही हरकत नाही. कारण याचा माझ्या प्रतिसादातल्या मुद्द्यांशी काही एक संबंध नाही.
रघु, पोस्ट आवडली
रघु, पोस्ट आवडली
(No subject)
रघू - पोस्ट विचार करायला
रघू - पोस्ट विचार करायला लावणारी आहे.
काँग्रेस काळांत भ्रष्टाचार झाला होता, त्यावेळी पण राज्यपालांनी विरोधकांची सरकारे बरखास्त केली होती. १९८४ मधे, आंध्रप्रदेश विधानसभेत TDP चे मोठे बहुमत असतांनाही (२९४ पैकी २०२ जागा) NTR रामारावांचे सरकार राज्यपाल रामलाल यांनी बरखास्त केले होते , कुठलेही बहुमत पाठिशी नसणारे भास्करराव यांना नवे मुख्यमंत्री केले. अनेक दिवस ते प्रकरण गाजले होते. आमदार फुटायला नको म्हणून, रामकृष्ण हेगडे यांनी म्हैसूरच्या हॉटेल मधे TDP आमदारांना सुरक्षित ठेवले होते. त्यावेळी हिंसाचार/दंगली झाल्या आहेत. काँग्रेस नेत्यांचा ( HKL भगत, सज्जन कुमार, जरदिश टायटलर... ) १९८४ शिख विरोधी दंगली मधे सहभाग स्पष्ट दिसला होता आणि ते नंतर मंत्रीपदी पदावर पण राहिले आहेत.
आज प्रत्येक क्षेत्रात, भाजपा काँग्रेसच्या दोन पावले पुढे आहे. भाजपाने राज्यपालांना हाताशी धरत, किंवा विरोधक फोडत अनेक राज्यांत सत्तांतरे घडविली. कोश्यारींनी महाराष्ट्रात रामलाल बनले, सत्ता परिवर्तनांत सक्रिय भाग घेतला/ घोळ घातला आहे. भ्रष्टाचारांत काँग्रेसला लाजवेल असे दोन पावले पुढे आहेत. हिंसाचार/दंगली घडविण्यात तर हात कुणी धरणार नाही. पक्ष विस्ताराच्या कामासाठी ED/ CBI रात्रं दिवस काम करत आहे. विरोधकांना नोटिसा येतात, चौकशीचा ससेमिरा लागतो, पण भाजपा प्रवेशा नंतर सगळ्या चौकशा थांबतात असा ट्रेंड आहे. निवडणूक आयोगावर संपूर्ण नियंत्रण आणले आहे, हे चिंताजनक आहे.
काँग्रेसने काल केलेल्या चूका अजून एक पातळी खाली उतरत भाजपाने आज कराव्या हे योग्य नाही. सर्वच पातळीवर, कालच्या पेक्षा आज, आणि आजच्या पेक्षा उद्या परिस्थितीमधे सुधारणा दिसायला हवी अशी अपेक्षा ठेवायला हवी. सुधारणा कुठला पक्ष करत आहे याने फरक पडत नाही.
२०१४ च्या आधी, काँग्रेसकाळात भ्रष्टाचार झाल्याचे मोठ मोठे आकडे प्रसिद्ध झाले होते. स्विस बँकेत लाखो कोटी चा काळा पैसा, रॉबर्ट वद्रा... ते निव्वळ आरोप होते, त्या आरोपांपैकी काहीच सिद्ध झालेले नाही. एक रुपया काळा पैसा / बेहिशोबी मालमत्ता परत मिळवता आलेली नाही. नोटबंदी नंतर ९९.३ % पेक्षा जास्त रोख पैसा परत आलेला आहे.
ऑक्टोबर २०१४ मधे- सर्वोच्च न्यायालयात यादी देतांना आजच्या एव्हढाच निरुत्साह केंद्र सरकारने दाखविला होता. आधी ३ नावे, मत ११, शेवटी ६००. कशासाठी? भ्रष्टाचाराचे निव्वळ आरोप करण्यात अर्थ नाही.
चिदंबरम यांच्याबद्दल -
चिदंबरम यांच्याबद्दल - शिकलेले ( LLB, हार्वर्ड MBA) आहेच पण मंत्री होण्या अगोदरही ते गर्भ श्रीमंत घराण्यातून आहेत. त्यांचे आजोबा, सर राजा अण्णामलई चेट्टियार यांनी १९०७ मधे इंडियन बँकेची स्थापना केली तसेच ते Imperial Bank of India (आजची आपली लाडकी SBI) चे पहिले गव्हर्नर होते. व्यावसाय / शिक्षण क्षेत्रांत मोठे काम आहे.
https://en.wikipedia.org/wiki/S._Rm._M._Annamalai_Chettiar
आजोबांनी अण्णामलाई विद्यापीठ स्थापन ( १९२९ ) केले आहे.
https://annamalaiuniversity.ac.in/about_university.php
आपण अगदी सहज पणे म्हणतो १०० कोटी रु मालमत्ता आहे, मलिदा मिळाला असेल... पण राजकारणांत येण्याअगोदरही ते गडगंज श्रीमंत आणि व्यावसायिक घराण्यातून आले आहेत. याचा अर्थ मंत्रीपदावर असतांना त्यांनी भ्रष्टाचार केला नसेल किंवा मुलासाठी नियम वाकविले नसतील असे मला सुचवायचे नाही आहे.
मविआ कडे वळलेले जानकर पुन्हा
मविआ कडे वळलेले जानकर पुन्हा यु टर्न घेऊन महायुती कडे आले आहेत.
अहो दादा, एव्हढा मोठा
अहो दादा, एव्हढा मोठा प्रतिसाद आणि त्यातला आशय फाट्यावर मारून नेमकं जानकर आत्ता कुणीकडे आहे एव्हढ्यावरच का फोकस ठेवलाय ?
जानकरांनी धनगर संघटना बनवली. ती बंद करण्यासाठी कुणी दमदाटी केली, नंतर रिलायन्समधे नोकरीचं आमिष दाखवलं पण ही संघटना बंद करा ही ऑफर कुणी दिली हा इतिहास तपासण्यासंदर्भात होतं ते. आता जानकर मोठे नेता झाले आहेत. आता ते कुठेही वळतील. त्याच्याशी याचा काही एक संबंध नाही. समजलं तर आनंद आहे.
>>मायबोलीसारख्या ठिकाणी किमान
>>मायबोलीसारख्या ठिकाणी किमान असे मत व्यक्त करता यावे ही अपेक्षा. << ++१
पोस्ट आवडली. काँग्रेसींना आरसा दाखवला तर त्यांना ती व्हॉटअबौटरी म्हणुन झटकायची सवय लागलेली आहे. दुसरीकडे भाजपा सुद्धा धुतल्या तांदळासारखी नाहि याची सगळ्यांना पुरेपुर क्ल्पना आहे. काँग्रेसने केलेल्या चूका वेगळ्या स्वरुपात करुन नामानिराळे राहण्याचं कसब त्यांना जमतंय पण ते फार काळ टिकणारं नाहि याची त्यांना देखील कल्पना असावी. एकेकाळी सत्तेकरता कॉग्रेसला पर्याय न्हवता, आता फासे फिरले आहेत. एखादा सक्षम पर्याय निर्माण होइस्तोवर भाजपाला सत्तेवरुन खाली खेचणं मुश्किल हि नहि, नामुमकिन है...
आचार्य, तुमच्या इथल्या सगळ्या
आचार्य, तुमच्या इथल्या सगळ्या पोस्टला +१
काँग्रेस २४ कॅरेट सोने आहे
काँग्रेस २४ कॅरेट सोने आहे असे मी म्हणत नाही, पण
काँग्रेस काळात (आणिबाणी वगळता) प्रत्यक्ष पंप्र ना प्रेस कॉ मध्ये प्रश्न विचारायचे धाडस पत्रकारांमध्ये होते, आज आहे ?
न्यायपलिका आपले स्वतंत्र अस्तित्व राखून होती, आज आहे?
बलात्कारी लोकांचे काँग्रेस ने हारतुरे व पेढे देऊन स्वागत केले असे उदाहरण आहे का?
ईडी सारख्या स्वयत्त संस्थांचा सत्ताधारी पक्षाने इतका प्रच्छन्न वापर केला होता?
सामाजिक व वैज्ञानिक क्षेत्रात घड्याळाचे काटे मागे फिरवायचा प्रयत्न होत होता का?
भाजपही भ्रष्टाचार करतच आहे, पण 'जय श्री राम' च्या गजरात करत आहे ना ? मग ठीक आहे अशीच मानसिकता आहे.
काँग्रेस काळात (आणिबाणी वगळता
काँग्रेस काळात (आणिबाणी वगळता) प्रत्यक्ष पंप्र ना प्रेस कॉ मध्ये प्रश्न विचारायचे धाडस पत्रकारांमध्ये होते, आज आहे ?
न्यायपलिका आपले स्वतंत्र अस्तित्व राखून होती, आज आहे?
बलात्कारी लोकांचे काँग्रेस ने हारतुरे व पेढे देऊन स्वागत केले असे उदाहरण आहे का?
ईडी सारख्या स्वयत्त संस्थांचा सत्ताधारी पक्षाने इतका प्रच्छन्न वापर केला होता?
सामाजिक व वैज्ञानिक क्षेत्रात घड्याळाचे काटे मागे फिरवायचा प्रयत्न होत होता का?
भाजपही भ्रष्टाचार करतच आहे, पण 'जय श्री राम' च्या गजरात करत आहे ना ? मग ठीक आहे अशीच मानसिकता आहे.
Submitted by vijaykulkarni on 24 March, 2024 - 20:52
>>>
जबरदस्त प्रश्न विजयजी, तुम्ही आधी लिहिलेले मुद्दे पुन्हा एकदा सिद्ध करत आहात, म्हणजे पुन्हा पुन्हा तेच विषय, पुन्हा पुन्हा तीच उजळणी, तरी वानगीदाखल काही उदाहरणे देतो, तुम्ही ती मान्य करणार नाहीत म्हणा तरीही एकदा विचार करा
काँग्रेस काळात (आणिबाणी वगळता) प्रत्यक्ष पंप्र ना प्रेस कॉ मध्ये प्रश्न विचारायचे धाडस पत्रकारांमध्ये होते, आज आहे ? >>> काँग्रेस काळात, दरबारी पत्रकार होते (जुन्या काळात भाट असायचे तसे, राजाच्या मर्जित असणारे). विदेश टूर मोफत, मंत्री सोबत जंत्री, असंख्य पर्क्स आणि भेटवस्तू. बरं हे कमी नाही म्हणून प्रेस कॉन्फरन्स मध्ये आधीच ठरलेली प्रश्नावली द्यायची आणि मग त्याचीच उत्तरे द्यायची वर सांगायचे आम्ही पत्रकार परिषद घेतली
न्यायपलिका आपले स्वतंत्र अस्तित्व राखून होती, आज आहे? >>> 1973 ला काँग्रेस च्या काळात केशवनंद भारती केस मध्ये सरकार च्या विरुद्ध निकाल आल्यावर माननीय इंदिराजींनी 3 न्यायाधिशांना सस्पेंड केले होते व ए एन राय यांची भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. एम एच बेग यांची ADM जबलपूर केस, रंगनाथ मिश्रा यांचे 1984 दंगलीचे व्हर्दिक्ट काँग्रेस च्या बाजूला झुकल्याने त्यांना दिलेले झुकते माप (बढती, पद इत्यादी)
बलात्कारी लोकांचे काँग्रेस ने हारतुरे व पेढे देऊन स्वागत केले असे उदाहरण आहे का? >>> 1984 शीख दंगलीतील आरोपी निर्दोष मुक्त, जगदीश टायटलर यांना हार तुरे नाही तर थेट मंत्रीपद
ईडी सारख्या स्वयत्त संस्थांचा सत्ताधारी पक्षाने इतका प्रच्छन्न वापर केला होता? >>> याच जगदीश यांना CBI कडून पुढे क्लीनचिट. तर 2013 मध्ये नायायलाने भाष्य केले होते की "CBI हा UPA चा "पिंजऱ्यातील पोपट" आहे"
सामाजिक व वैज्ञानिक क्षेत्रात घड्याळाचे काटे मागे फिरवायचा प्रयत्न होत होता का? >>> विजयजी, चांद्रयान, मंगलयान, आदित्य, अग्नी, Navic इत्यादी मध्ये आपण वैज्ञानिक क्षेत्रात पुढेच जातोय. सामाजिक प्रगती सुद्धा बरीच आहे.
भाजपही भ्रष्टाचार करतच आहे, पण 'जय श्री राम' च्या गजरात करत आहे ना ? मग ठीक आहे अशीच मानसिकता आहे. >>> जय श्री राम ने लोकांना इतकी का मिर्ची झोंबते हेच कळत नाही.
आचार्य यांनी वर लिहिलं आहेच की evil or lesser evil असा काय साध्य प्रकार आहे आणि तुम्ही लिहिताय काँग्रेस किती भारी आहे/होता त्यांच्या काळात असे काहीच होत नव्हते. अहो थोडा विचार तुम्हीच करा. मी म्हणत नाहीये की भाजपला सपोर्ट करा वगैरे पण जसे त्यांना डोळे झाकून सपोर्ट करणारे अंधभक्त आहेत तसे काँग्रेस ला डोळे झाकून सपोर्ट करणारेही अंधभक्तच आहेत.
आणि पुन्हा एकदा लिहितोय की पुन्हा पुन्हा तेच तेच मुद्दे आणायचे हे इथल्या लोकांनी बंद करायला हवे.
निवडणूक आयोगाच्या
निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबद्दल मोट्ठे प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. हे जास्त चिंताजनक आहे.
आजपर्यंत या संस्था स्वायत्त होत्या, निवडणूक आयोग निष्पक्ष राहिलेला नाही. पहिल्यांदाच होत आहे. नुकतीच दोन आयुक्तांची नेमणूक झाली. निवड प्रक्रियेतून CJI ना बाजूला केले. पंतप्रधान मोदी, त्यांनी नेमलेला एक प्रतिनिधी ( केंद्रात मंत्री), लोकसभेतील विरोधी पक्षनेता अधिर रंजन चौधरी . एक दिवस आधी, विरोधी पक्ष नेत्याला २०० नावांची यादी मिळते, आणि केवळ दहा मिनीटे आधी १० लोकांची शॉर्ट लिस्ट मिळते. एव्हढ्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर नेमणूक करतांना विरोधी सदस्याला केवळ दहा मिनीटे? किती मोठी थट्टा आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/6-names-given-10-mins-before-m...
ED/ CBI तर भाजपाची शाखा असल्यासारखे वागत आहे. जे कडक कायदे देशविघातक शक्तीं विरोधात वापरायचे ते राजकीय गणिते सोडवण्यासाठी वापरल्या जात आहेत.
Submitted by उदय on 24 March,
Submitted by उदय on 24 March, 2024 - 22:05
निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेबद्दल मोट्ठे प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. हे जास्त चिंताजनक आहे
>>>
टी एन सेशन, भारताचे माजी निवडणूक आयुक्त, यांना काँग्रेसने लालकृष्ण अडवाणी विरुद्ध गांधीनगर येथून तिकीट दिले होते. त्यांच्या पदाचा मोबदला म्हणून तेव्हा निवडणूक आयोग निष्पक्ष होते का याचा ही विचार करा
CBI तर भाजपाची शाखा असल्यासारखे वागत आहे.
>>>
वरच लिहिले की UPA काळात CBI "पिंजऱ्यातील पोपट" होता त्यामुळे जिसकी लाठी उसकी भैसं असा प्रकार पूर्वीपासून आहे.
पुन्हा तेच होतंय, आरोप - प्रत्यारोप. यांनी हे केले त्यांनी ते केले. त्यामुळे evil or lesser evil असाच काय तो चुरशीचा सामना
चांद्रयान, मंगलयान या
चांद्रयान, मंगलयान या गोष्टींचे श्रेय आधीच्या सरकारांना जास्त आहे. ISRO च्या योजना किमान दहा वर्ष आधी तयार झालेल्या असतात. जे काही दिसले आहे ते आधी तयार केलेल्या योजना आहेत, यात भाजपाचे योगदान काही नाही.
कोरोना काळांत टाळी वाजवा, दिवे लावा, गोमूत्र किंवा विज्ञान संमेलनांत थापा मारणे ( गणपती - जगातली पहिली प्लॅस्टिक सर्जरी, test tube बेबी - कौरव पांडवांचा जन्म, wireless tech - आजचे इंटरनेट.... ) आणि कुठे डार्विनला तर कधी periodic table ला अभ्यासक्रमातून काढणे याचे सर्व श्रेय एकहाती भाजपाला.
(GDP च्या तुलनेत) विज्ञानाला आधी किती फंडिंग होते आणि आज किती आहे ?
बलात्कारी लोकांचे काँग्रेस ने
बलात्कारी लोकांचे काँग्रेस ने हारतुरे व पेढे देऊन स्वागत केले असे उदाहरण आहे का? >>> खालील बातमी वाचली म्हणून राजकारणाच्या कुठल्या thread वर काही उल्लेख आहे का बघायला लॉगिन केले. धाग्याचे फक्त शेवटचे पान उघडले व वाचले.
https://twitter.com/SalmanNizami_/status/1770442210200420836?t=WXV9S2LYd...
असिफाच्या बलात्काऱ्याला सपोर्ट करणाऱ्या (तेव्हा BJP मध्ये असणाऱ्या) लाल सिंगला राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये घेवून लोकसभेसाठी तिकीट पण दिले आहे. बहुतेक उधमपूर candidate. उधामपूरहून BJP चे डॉ जितेंद्रसिंग आहेत ना?
असो, politicians ना कोणाची फिकीर नसते. कुठलीही घटना हत्यार म्हणून वापरली जाते दोन्ही बाजूनी.
बाकी कसे आहात सगळे? काही नविन आयडीही दिसत आहेत.
<< टी एन सेशन, भारताचे माजी
<< टी एन सेशन, भारताचे माजी निवडणूक आयुक्त, यांना काँग्रेसने लालकृष्ण अडवाणी विरुद्ध गांधीनगर येथून तिकीट दिले होते. त्यांच्या पदाचा मोबदला म्हणून तेव्हा निवडणूक आयोग निष्पक्ष होते का याचा ही विचार करा>>
----- शेषन १९९६ मधे निवृत्त झाले. निवृत्त झाल्यावर ३ वर्षांनी लोकसभेसाठी निवडणूक लढवली होती. लोकांनी नाकारले. येथे मोबदला काय मिळाला आणि त्यांनी काँग्रेससाठी आयुक्त असतांना झुकते माप दिले होते काय? सर्वांनाच बडगा दाखविला होता.
आज भाजपाने ( पंतप्रधान, त्यांचा एक मंत्री, विरोधी नेता) दोन निवडणूक आयुक्त नेमले आहेत. २०१९ मधे ३० तक्रारी आल्या होत्या , बहुतेक तक्रारींना २-१ ने केराची टोपली दाखविली. ज्याने विरोधी मतदान केले होते त्या आयुक्ताला नंतर त्रास दिला. आता असे काही नाही. ३-०, क्लिन चिट ची ग्यारेंटी.
पुन्हा एकदा.
पुन्हा एकदा.
आमचा दाऊद / गवळी बरा होता हो, ते किमान दरबार तरी भरवत होते, चांगल्या लोकांना शूट करत नव्हते यातून बाहेर पडूयात.
यातल्या प्रत्येक प्रश्नाला होकारार्थी आणि नकारार्थी अशी दोन्हीही उत्तरे आहेत. मी यापूर्वी भाजपच्या कारभाराबाबत भरपूर लिहीलेले आहे.
मुद्दा फक्त भाजप घटनात्मक संस्थांचा गैरवापर करते का हा असेल तर त्यावरचे माझे मत मांडलेले आहे. पीएम पत्रकार परिषदा घेतात कि नाही हा त्याचा प्रतिवाद होऊ शकत नाही. तो एका स्वतंत्र डिबेटचा विषय आहे असे मला वाटते.
पीएम पत्रकार परिषदा घेत नाहीत कारण ते भित्रे आहेत हे मी अनेकदा सांगितलेले आहे. हुकूमशहा भित्रेच असतात.
याचा अर्थ काँग्रेसच्या काळात आलबेल होते असे नाही. त्यांच्या काळात एकच सरकारी दूरदर्शन होते ज्याच्या नेमणुका या काँग्रेस सरकारच्या मेहरबानीने होत असत. प्रिंट मीडीया मधे अडवाणींनी जनता पक्षाच्या काळात संघाची माणसे बसवली. ही माणसे अधून मधून डोके वर काढत. एरव्ही काँग्रेस सरकारची मर्जी सांभाळत. त्यांचा गवगवा निष्पक्ष पत्रकार म्हणून केला जात असे. मात्र बोफोर्सच्या काळात अशाच एका पत्रकाराने काँग्रेसला खिंडीत गाठले. कमलनाथ , कमलाकर सोनटक्के सारखे चाटू पत्रकार तेव्हांही होतेच ( शब्दाबद्दल माफी).
फिल्म्स डिव्हीजन कि भेट हा कार्यक्रम चित्रपटाआधी दाखवणे बंधनकारक होते आणि त्यात सरकारची कामगिरी, पंतप्रधानांचे दौरे दाखव्ले जात. दूरदर्शन सुरू झाल्यावर तिकडेही हेच दिसत असे.
भाजपने इथेही function at() { [native code] }ई केले. म्हणून काँग्रेस उत्तम काम करत होती असे म्हणणे ही फसवणूक आहे.
आपल्याला निकोप लोकशाही हवी असेल तर या गोष्टी मान्य करून पुढे जायला पाहिजे. लगेच २०२४ मधे क्रांती होईल असे काही म्हणणे नाही.
पण दाऊद विरूद्ध गवळी या बालीश युद्धातून आपण बाहेर पडूयात.
Submitted by रघू आचार्य on 24
Submitted by रघू आचार्य on 24 March, 2024 - 22:44
>>>
पूर्ण अनुमोदन
अश्विनी के, तुम्हांला बर्याच
अश्विनी के, तुम्हांला बर्याच महिन्यांनंतर पाहून आनंद झाला.
चौधरी लाल सिंगची बातमी गेल्या तीन चार दिवसांतली दिसते. त्याला पक्षात घेतल्याबद्दल आणि वर उमेदवारी दिल्याबद्दल काँग्रेसचा निषेध. ट्विटरवर काँग्रेस समर्थकांनीही या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केलेली दिसते. राजस्थानमध्ये अशाच एका चुकीच्या व्यक्तीला काँग्रेसने दिलेले तिकीट मागे घेतले. इथेही तेच व्हावे अशी अपेक्षा आहे.
अश्विनी के, मधल्या काळात मणिपूर नग्न धिंड, महिला कुस्तिगिरांचे लैंगिक शोषण अशी काही प्रकरणे घडली. अजूनही मिटलेली नाहीत. त्याबद्दल तुम्हांला लिहिता आलं नसावं. बिल्किसच्या बलात्कारी + तिच्या कुटुंबीयांच्या खुन्यांना ऐन स्वातंत्र्यदिनी त्यांची शिक्षा माफ करून सोडण्ण्यात आलं. त्याबद्दल इथे अनेकदा लिहिलं गेलं होतं. असो.
बरं हा चौधरी लाल सिंग भाजपमधून बाहेर पडल्यावर त्याच्याही मागे ईडीचा फेरा आला. हे
भाजपच्यामोदीशाच्या कार्यपद्धतीला साजेसेच आहे. पण तेवढ्यावरून काँग्रेसला त्याच्याबद्दल प्रेम वाटायला नको..-----
महाराष्ट्रात सत्ताबदल होताच भाजपच्या किरीट सोमैया, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या विरोधातील चौकश्या पोलिसांनी तक्रारीत तथ्य नाही म्हणून मागे घेतल्या.
तेच संजय राऊत आणि अनिल देशमुख हे दोघे महिनोन महिने तुरुंगात पडले होते. संजय राऊत यांच्या पत्रा चाळ प्रकरणी न्यायालयाने विचारले की विकासक, म्हाडाचे अधिकारी यांचा प्रत्यक्ष संबंध होता, त्यांच्यावर काहीच कारवाई नाही आणि दिवाणी प्रकरणात संजय राऊत यांना कोठडी का?
अनिल देशमुख यांच्या विरोधातली हफ्ता वसुलीची तक्रार म्हणजे ब म्हणतो, अ मला असे म्हणाला, दुसरा काही पुरावा नाही. तर क म्हणतो, अ मला असे म्हणाला, अशा आहेत. तक्रारदारांवरच गंभीर गुन्हे आहेत. एकावर चक्क खुनाचा गुन्हा. आणि तो इथे माफीचा साक्षीदार होतो.
--
अजित पवार, छगन भुजबळ , कृपाशंकर सिंग यांच्या क्लीन चिट्सच्या सुरस कथा अनेकदा लिहिल्या. फक्त आठवण ताजी करूया.
---
हो. काँग्रेसनेही विरोधकांच्या मागे चौकशा लावल्या. जगन मोहन रेड्डी मोठं उदाहरण आहे. पण आकडेवारी काय सांगते ? उदय यांनी मूळ लेखात दिली आहे. ए राजा, कनिमोळी, सुरेश कलमाडी हे लोक युपीएच्याच काळात तुरुंगात होते. अशोक चव्हाण, पवन बन्सल अशा अनेकांना पाय उतारव्हावे लागले होते. इथे ऑलिंपिक गाजवणार्या महिला कुस्तिगीरांचं लैंगिक शोषण करण्याचा आरोप असलेल्या खासदारा विरोधात साधा एफ आय आर नोंदवावा यासाठी महिनोनमहिने आंदोलन करावं लागतं आणि सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावावं लागतं. तरीही लोकांना भाजप आणि काँग्रेस सारखेच वाटत असतील वाटो,, भाजप आवडत असेल, तर आवडो बापडा.
---
एल्गार परिषद प्रकरणी अनेक लोक वर्षानुवर्षे तुरुंगात आहेत. त्यांची आता निर्दोष सुटका होऊ लागली आहे. एकाची सुटका मृत्यूनेच केली. पण ज्यांनी ही एल्गार परिषद आयोजित केली त्यांची साधी चौकशी तरी एन आय ए ने केली का? एक सदस्यीय न्यायमूर्तींच्या चौकशी आयोगाने त्यांना बोलावलं होतं एवढं वाचलं.
---
केंद्रीय चौकशी संस्थांनी धरलेल्या राजकीय व्यक्तींचे जामीन अर्ज हल्ली सर्वोच्च न्यायालयाच्या ज्या खंडपीठापुढे जातात त्यावर बेला त्रिवेदी या न्यायाधीश असतातच असं एक निरीक्षण आहे. हे अर्ज अर्थातच फेटाळले जातात. या मोदीच्या गुजरात सरकारमध्ये कायदा खात्याच्या सचिव होत्या. बिल्किस बानोच्या गुन्हेगारांच्या सजामाफीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात यांच्या पीठापुढे आले असता, त्यांनी त्यातून अंग काढून घेतले.
एल्गार परीषद आणि भीमा कोरेगाव
एल्गार परीषद आणि भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणी पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद असे स्टेटमेण्ट पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार आणि अनेक नेत्यांनी दिले होते. उद्धव ठाकरे तेव्हां भाजपसोबत सत्तेमधे होते.आज फुटून निघालेल्या एका मंत्र्याचा हात त्या प्रकरणात होता. एन आय ए च्या भूमिकेवर संशय व्यक्त केला गेला. हे प्रकरण राज्य सरकारच्या अखत्यारितले आहे असेही मत काँग्रेस राष्ट्रवादीने व्यक्त केले. अन्य काही पक्षांनीही असे मत व्यक्त केले.
२०१९ ला मविआचे सरकार आले.
त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांनी भीमा कोरेगाव चे प्रकरण एन आय ए कडे देण्याचा निर्णय घेतला. अजितदादा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या वतीने या निर्णयाचे समर्थन केले.शरद पवार यांनी या निर्णयाला कुठेच विरोध केल्याचे ऐकिवात नाही.
तसेच पुणे पोलिसांच्या ज्या अहवालावरून रान पेटवले त्यावर नव्याने चौकशी सुरू केली नाही. उलट ज्या पोलीस अधिकार्याने हा दूषित अहवाल तयार केला त्यांना मुंबईच्या आयुक्तपदी बढती मिळाली.
दंगलीच्या वेळी शरद पवारांनी भिडेंवर आरोप केले होते. सत्तेत आल्यावर चौकशी आयोगापुढे मी भिडेला ओळखत नाही असे त्यांचे स्टेटमेण्ट मीडीयात प्रकाशित झाले होते. वेगळे स्टेटमेण्ट असेल तर माहिती नाही.
जयंत पाटील यांनीही भिडे यांना वाचवणारी साक्ष दिली.
वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी पश्चिम महाराष्ट्रात जयंत पाटील, आर आर पाटील आणि पतंगराव कदम व त्यांचे पुत्र यांच्यामुळेच संभाजी भिडेंचे संघटन वाढल्याचे लिहीलेले आहे. त्यांच्या मुलाखती सुद्धा आहेत. ही मंडळी संविधान वाचवणारी असल्याने भिडेंना सोबत घेत असावीत. संविधान वाचवणे,लोकशाही वाचवण्याचा एक भाग म्हणून वसंतदादा पाटलांच्या घराण्याचा प्रभाव वाढू न देणे, बंटी पाटील आणि
(दिवंगत) दिग्विजयसिंह पाटील यांना आपसात झुंजवत ठेवणे, याशिवाय मंडलीक विरूद्ध महाडीक वादात काड्या टाकणे ही कामे निगुतीने पार पाडली जातात. दौंड मधे कुल कुटुंबाला आधी अपक्ष म्हणून निवडून आणायचे (त्याचे रहस्य पुढच्या प्रतिसादातल्या लिंक मधे), नगरला आधी पवार कुटुंबातला आणखी एक नातू उभा राहणार म्हणून विखे पाटलांशी वाद, मग ते भाजपमधे गेल्यावर आयताच भाजपला फायदा होणे, हर्षवर्धन पाटलांना पाडण्यासाठी आधी बंडखोर उभे करून राष्ट्रवादीचे संघटन वाढवणे त्यातून ते भाजपमधे जाणे (जाताना माझ्यावर धाड घाला अशी विनंती केल्याचे बोलले जाते). हे सर्व मूल्यांसाठीच होत असते.
या शिवाय भाजपचे गेल्या अनेक टर्मचे खासदार संजय काका पाटील यांना निवडून आणण्यात याच मंडळींचा हात असतो. जसा रावेरला एकनाथ खडसे यांच्या सूनबाईंना राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. या नेते मंडळींचे आपसातले नातेसंबंध आणि सोयरीक अशी आहे कि कुठे भाजपाला पाठिंबा, कुठे शिवसेनेला. कुठे शेकापला हे ज्यांना हे सगेसोयरे ठाऊक आहे त्यांनाच सांगता येते.
मराठा मोर्चाच्या एका
मराठा मोर्चाच्या एका बांधवाकडून आलेला हा फॉर्वर्ड आहे.
अवश्य वाचा
शरद पवार - प्रा.एन.डी. पाटील.
शंकरराव मोहिते-पाटील - बाळासाहेब देसाई.
दिलीपराव देशमुख (विलासराव देशमुखांचे बंधू) - माजी राज्यमंत्री अजित घोरपडे
हे परस्परांचे साडू-बंधू
अजित पवार यांची पत्नी - सुनेत्रा पवार या खासदार पद्मसिंह पाटील यांची धाकटी बहीण आहे.
जयंत पाटील यांची बहीण - माजी आमदार अहमदनगर जिल्ह्यातील प्रसाद तनपुरे यांची पत्नी आहे. (मेहुणे)
जयंत पाटील - शिराळ्याचे सत्यजीत देशमुख (परस्परांचे साडू-बंधू).
आमदार विलासराव शिंदे यांची बहीण - शिवाजीराव देशमुख (सभापती) यांची पत्नी आहे.
आमदार शिवाजीराव नाईक (शिराळा) यांची पत्नी - सांगलीचे मंत्री मदन पाटील यांच्या मातोश्री ह्या सख्ख्या बहिणी आहेत.
प्रमोद महाजन + गोपीनाथ मुंडे = मेहुणे.
(प्रमोद महाजनांची बहिण गोपीनाथ मुंडेंच्या सौ. आहे.)
शरद पवार + बाळासाहेब ठाकरे = व्याही. (शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे ही बाळासाहेब ठाकरेंच्या सख्ख्या बहिणीची सूनबाई, भाचा सदानंद सुळे यांच्या सौभाग्यवती आहे.)
सचिन पायलट + फारूक अब्दुल्ला = जावई.
(केंद्रीय मंत्री सचिन पायलट जम्मू काश्मिरचे फारूक अब्दुल्ला यांचे जावई).
कलमाडी + निंबाळकर राजघराणे = व्याही.
(निंबाळकर घराण्याची मुलगी सुरेश कलमाडी यांच्या घराच्या सुनबाई).
शरद पवार + सुशीलकुमार शिंदे = साडू-बंधू.
(शरद पवारांच्या सौ. प्रतिभा पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या सौ. उज्ज्वला शिंदे ह्या सख्ख्ख्या बहिणी).
स्व. विलासराव देशमुख + डिसुझा + भागनानी + हुसैन = व्याही.
(विलासराव देशमुख यांच्या तीनही सुनबाई ३ वेगवेगळ्या धर्माच्या आहेत.
जेनेलिया डिसुझा क्रिस्तिअन, एक सुनबाई मुस्लिम कम हिंदू आणि एक सुनबाई हिंदू मारवाडी फिल्म डिरेक्टर वासू भागनानी यांची मुलगी).
मोहिते-पाटील हे घराणे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे घराणे समजले जाते.
विजयसिंह मोहिते-पाटलांची थोरली बहीण बाळासाहेब देसाईंच्या घरात दिल्याने शिवसेनेचे पाटणचे माजी आमदार शंभूराजे देसाई हे विजयसिंह यांचे भाचे आहेत.
विजयसिंह यांच्या मामांची मुलगी ही शंभूराजेंची पत्नी, तर मोहित्यांच्या मामांची दुसरी मुलगी ही विलासकाका पाटील-उंडाळकर यांची सून.
विलासकाका पाटील हे फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांचे सासरे. (चिमणराव कदमांची मुलगी ही संभाजीराव काकडे यांची सून).
पूर्वी पुणे जिल्ह्यात शरद पवार आणि संभाजीराव हे परस्परांचे मोठे विरोधक होते. त्या काकडेंचे भाऊ बाबालाल यांचीही मुलगी बाळासाहेब देसाई यांच्या घरात दिल्याने काकडे मोहिते यांचे नाते.
शिवाय, विजयसिंहाची आत्या ती बाबालाल काकडे यांची पत्नी. इतकेच नव्हे तर विजयसिंहाची एक बहीण अॅड. विराज काकडे यांची पत्नी आहे.
कोल्हापूरचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिग्विजय खानविलकर यांच्या मुलाला विजयसिंहांच्या भावाची मुलगी दिल्याने दोघेही सोयरे झाले...!
दिग्विजय खानविलकरांची मुलगी कोल्हापूरच्या शाहूराजेंच्या घरात दिली असून काँगेसचे विद्यमान आमदार मालोजीराव यांची पत्नी.
राष्ट्रवादी काँगेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांची पत्नी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी या दोघी चुलत भगिनी.
शरद पवार यांची एक मेहुणी ना.म.जोशींच्या घरात दिली असून त्याच घरात रामराजेंची बहीणही दिली आहे.
पृथ्वीराज चव्हाणांची मावशी ही दादाराजे खर्डेकर यांची पत्नी. दादाराजे खर्डेकर यांची बहीण ही दिवंगत माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांची पत्नी.
दादाराजेंचे भाऊ बंटीराजे यांची मुलगी ही सातारचे शिवेंद्रराजे यांची पत्नी.
कोल्हापूरचे सदाशिवराव मंडलिक याची बहीण चंदगडचे आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांची पत्नी असल्याने दोघेही मेहुणे लागतात.
कृषीमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे आमदार राजीव राजळे हे मामा-भाचे.
(राजळे यांची आई ती थोरातांची बहीण).
राजीव राजळे यांची बहीण ही यशवंतराव गडाखांची सून आणि नेवासे येथील राष्ट्रवादीचे शंकरराव गडाख यांची पत्नी.
नाशिकचे राष्ट्रवादीचे नेते स्व. डॉ. वसंत पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे जावई.
अहमदनगर जिल्ह्यात आबासाहेब निंबाळकर हे माजी मंत्री काँग्रेसचे नेते होते. त्याची नात ही नारायण राणे पुत्र माजी खासदार निलेश राणे यांची पत्नी.
जामखेडचे काँगेसचे बापूसाहेब देशमुख व उद्योगमंत्री नारायण राणे हे दोघे व्याही.
अंकुशराव टोपे त्यांचे चिरंजीव व विद्यमान मंत्री राजेश टोपे आणि कर्जतचे निंबाळकर यांचे नातेसंबध असल्याने टोपे आणि राणे हेही सोयरे धायरे.
भाजपाचे खा.रावसाहेब दानवे यांची मुलगी शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव यांना दिलेली आहे...
ूहे सगळे एका ताटात जेवतात म्हणून कोणाकडेही सत्ता गेली तरी ती सत्ताधारी सारे एकच...!
वरील नातेसंबंध समजुन घेवुन जनतेने आपला भाऊ/नातेवाईक/मित्र पहावा, राजकारणासाठी एकामेकांवर लाठ्या काठ्या घेवून डोकी फोडू नयेत.. यांच्यासाठी आपापसात भांडू नये....
माझे समाज बांधव आपल्या नेत्यासाठी भावाभावात , मित्रात, नात्यात वैमनस्य निर्माण करून नाती तोडतात व एकमेकाची डोकी फोडतात....
तेंव्हा राजकारण हे काय व कसं आहे हे आपणच ओळखावे.
जो ते शिकला.. तोच टिकला..
टीप :
या फॉर्वर्ड मधे
शरद पवार + सुशीलकुमार शिंदे = साडू-बंधू.
(शरद पवारांच्या सौ. प्रतिभा पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या सौ. उज्ज्वला शिंदे ह्या सख्ख्ख्या बहिणी) हे चुकीचे आहे.
सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी या माहेरच्या वैद्य आहेत. त्यांच्यात आणि सदू शिंदे यांच्या कुटुंबात नाते असावे पण माहिती नाही.
वरील फॉर्वर्डचा आणि
वरील फॉर्वर्डचा आणि बीबीसीच्या या रिपोर्टचा एकत्रित विचार केला तर..
https://www.bbc.com/marathi/india-62106687?fbclid=IwAR1hhqUM7KG941SCahdc...
तसेच टिव्ही ९ चा हा रिपोर्ट.
https://www.tv9marathi.com/politics/sunetra-pawar-six-relatives-in-loksa...
एखादा पक्ष एखादे घराणे मोठे करते तेव्हां त्यांचे दोन तीन सदस्य निवडणूक लढवतात हे समजून घ्यावे लागते. घराणेशाहीचा आरोप अगदीच काटेकोरपणे करण्यासारखी अव्यवहार्य जनता सुद्धा राहिलेली नाही. पण ही संघटीत घराणेशाही पक्ष, विचारधारा यांच्या पलिकडे आहे.
निवडणुकीच्या वेळी आपल्या पक्षाचा डमी उमेदवार देऊन भाजप सेनेचे उमेदवार निवडून आणायचे हे सातत्याने होत आलेले आहे. या शिवाय पक्षात नव्याने उभे होत असलेले नेतृत्व पाडण्यासाठी विरोधकांना मदत , बंडखोर उभे करणे हे राजकारण तपशीलवार सांगावे लागणार नाही हा विश्वास आहे. बरंचसं रिपोर्टिंग तर वर्तमानपत्रातून सुद्धा झालेलं असतं.
False claim: Bal Thackeray’s
False claim: Bal Thackeray’s sister is Sharad Pawar’s daughter Supriya Sule’s mother-in-law
२०२२ साली लोकसत्तेत आलेला अ
२०२२ साली लोकसत्तेत आलेला अॅड प्रतीक राजूरकर यांचा लेख
ईडी'ची व्याप्ती वाढली, विश्वासार्हतेचे काय?
ठळक मुद्दे
१. २०१८ सालापासून ईडीचे हात कायदा, न्यायालयापेक्षा लांब झाले आहेत. ईडीकडे न्यायालयापेक्षा अधिक अधिकार आले आहेत.
२. २०२२ मध्ये केंद्र सरकारने ईडीची व्याप्ती वाढवून ईडीला १५ आणखी यंत्रणांसोबत माहितीची देवाणघेवाण करण्याची अनुमती देण्यात आली. पूर्वी १० यंत्रणांचा या यादीत समावेश होता.
३. पी एम एल ए कायद्यात सात वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यातल्या बहुतांश २०१४ नंतर आणि विशेषतः विरोधकांवर प्रभावी रीत्या वापरत्या येतील अशा.
४. २०१४- २२ या आठ वर्षांत ईडीकडून ३०१० वेळा छापे टाकण्यात आले. २००४ ते १४ च्या तुलनेत हा आकडा २७ पट आहे. पी एम एल ए कायद्यातील ५४२२ प्रकरणांत केवळ २३ आरोपींना शिक्षा झाली. केवळ ९९२ प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले. शिक्षेचे प्रमाण तब्बल ०.०५ % इतके आहे. - यातले राजकीय नेत्यांवरचे छापे, चौकशा किती आणि त्यातले किती भाजपच्या वळचणीला गेले ही आकडेवारी अधिक रोचक आणि महत्त्वाची असेल. ईडी, सीबीआय इ..चे हेच खरे यश म्हणावे.
५. ई सी आय आर Enforcement Case Information Report (ECIR) म्हणजे कोणत्या स्वरूपाचे आरोप आहेत हे दर्शविणारी प्रत आरोपींना देण्याची पद्धत या कायद्यात नाही.
६ पी एम एल ए कायद्यातील कलम ४५ प्रमाणे आरोपींना जामीन देण्यास अप्रत्यक्षपणे प्रतिबंध करण्यात आला आहे.
७ आता ईडी कारवाईसाठी एफ आय आर नोंदविणेही गरजेचे नाही.
८. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ साली जामिनाची ( जामीन न मिळण्याची? ) तरतूद असंवैधानिक ठरवली. त्यानंतर केंद्राने तात्काळ दुरुस्ती करून ती क्लिष्ट करून ठेवली. (process itself is punishment)१०९ सर्वोच्च न्यायालयाने २०२२ मध्ये या दुरुस्त्या संवैधानिक असल्याचा निकाल दिला (न्यायाधीश कोण होते?) पण केंद्राच्या पद्धतीला आक्षेप घेतला.
१० पी एम एल ए कायद्यातील दुरुस्त्या मनी बिलच्या माध्यमातून करण्यात आला. राज्यसभेच्या संमतीची गरज नाही.
आर्थिक घोटाळ्यांच्या चौकशी संबंधी इतक्या कडक तरतुदी, चौकशी यंत्रणांना अमर्याद अधिकार असताना ललित मोदी, विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी हे आणि यांच्यासारख्या अनेक घोटाळेबाजांविरोधात कारवाई होताना दिसते का? नसेल तर का नाही?
(न्यायाधीश कोण होते?) नंतर
(न्यायाधीश कोण होते?) नंतर ते बक्षिस म्हणून कोणत्या संविधानिक पदावर नेमले गेले ? त्यांनी सर्वात आधी महुआ मोइत्रांवर छापा टाकायचा आदेश दिला ! हिज मस्टर्स व्हॉइस !
दत्ता खंडागळे वजरधरी संपादक
दत्ता खंडागळे वजरधरी संपादक हा माझा मावस भाऊ आहे.
अभिमान वाटला
Pages