किस ऑफ द डेथ!

Submitted by अवल on 16 March, 2024 - 05:05

तास भराच्या योगा नंतर
सगळी गात्र दमली, थकली
आता सगळं हलकं हलकं
मन शांत, एकाग्र ध्यान.
अलगद बंद चंक्षु समोर
एक अलवार ढग तरंगतोय
अन त्यासमोर मी निश्चल.
आसपासचा थंड गार वारा
एक भरून राहिलेली तृप्तता
शांतीचा तो अविरत अनुभव
अस्तित्वा शिवाय लहरत असणं.
हलकेच ढग पुढे येतो
त्याचा न कळणारा स्पर्श
तरीही तन मनाला जाणवणारं
हलकेच अलवार एक चुंबन!

एक तरल अनोळखी अनुभूती
अन लगेच वास्तवाची जाणीव
प्रखर, उन्नत, धगधगती जाग.
एक क्षण थरथरलं मन
शरीर उसासलं, हृदय धडधडलं
तक्क्षणी जाणवंलं, आहे आहे,
अजून जिवंत आहे मी!
अन मग गेलेला क्षण,
तो पुन्हा आठवू पहातेय.
शक्यता आहे, तयार करतेय
माझी मलाच मी, त्यासाठी.
किती मजेशीर आहे हे,
हे सगळं जाणणं जमलं.
याची देही, हृदयी अनुभवला
मनी झेलला, पचवला तो
किस ऑफ द डेथ!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही कल्पना नाही. त्यांनी स्वतः होऊन जीवन संपवलं म्हणून असेल का?
(सुधारणा - त्यांनी प्रायोपवेशन नव्हतं केलं.)

स्वाती, अगदी बरोबर.म्हणूनच मी> >>एकाग्रतेमुळे आपण मेंदूला विचार "करायला लावणं" थांबवतो.<<< करायला लावणं हे इनव्हर्टेड कॉमामधे लिहिलं Happy

>>>हा किस ऑफ डेथ नाही खरंतर किस ऑफ लाईट आहे. डेथ नंतर येते हजारो वेळा येते तरी जे मरत नाहीत ते तेजस्वी होऊन बाहेर पडतात<<<
मला जो काही अनुभव आला त्यात स्पष्ट जाणीव होती की समोर मृत्यूचच रुप आहे. अन म्हणूनच समजून उमजून हा शब्द प्रयोग केला. मेबी तुम्ही जी अनुभूती म्हणताय ती ही नसेलही. तसही प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही वेगळा.

मूळात माझा अन अध्यात्माचा दूर दूर संबंध नाही Wink
मी आपलं असं मानते की आपण नेहमी फक्त 10% मेंदू वापरतो. मेडिटेशन करताना उरलेला 90% मेंदूचा काही भाग आपल्याला जाणवू शकतो. तिच ही प्रोसेस.
मला वाटतं आपण नेहमी जन्म, जीवन हे सर्वसाधारण मानतो. पण मृत्यू मात्र तितका सहज मानत नाही. मृत्यू ही अतिशय सहज प्रक्रिया आहे, ती तितकीच सहज स्विकारता आली पाहिजे. मला मेडिटेशन करताना हे जाणवलं. की तीही अगदी सहज असेल, एक वेगळी, शक्य आहे की एक चांगली अनुभूतीच असेल. त्या पर्यंत पोहोचतानाचा मार्ग एकवेळ खडतर असेल, कधी क्लेशकारक वा दु:ख देणाराही असेल. पण ती शेवटची अनुभूती असेल, जी आपण अनुभवणार आहोत. तर तीही अतिशय मोकळ्या मनाने, स्वागताच्या भावनेने स्विकारता आली तर किती छान होईल Happy
लिहिलय म्हणून जमेलच असं नाही; पण किमान त्या करिता मनाला तयार करण्याचा प्रयत्न तर नक्की करू शकतो न आपण Happy

Happy हो, अवलताई. तुझ्या भावना खऱ्याच आहेत. ही फक्त वेगळी बाजू मांडली आहे.‌ अध्यात्माचा आणि ध्यानाचा संबंध असेलच असे नाही. माणूस अन आध्यात्मिक/ नास्तिक/अधार्मिक असला तरी त्याला फक्त त्याची असलेली अनुभूती येतेच. ती एकच जागा आहे जिथं भेदभाव नाही. ध्रूवपद आहे नं ते Happy

सामो Lol
बाय द वे, छान चर्चा चालू आहे. मजा येतेय. थँक्यु सगळ्यांना Happy

डिल्यूजनल, आळशी, घाबरट, शाब्दिक फाटे फोडणाऱ्या लोकांचा >> कुठल्या बकेट मध्ये मी बसतो? Lol १. नंबर नक्की. कदाचित चार ही. दोन तर आपला जगण्याचा मूलमंत्र आहे. थोडक्यात झालं गेलं गंगेला मिळतं तसं सगळं शेवटी डिल्युजनलाच मिळतंय. हेच खरं.
हा माझा मार्ग नाही हे माहित आहेच. खाली काळंकुट्टं आहेच. पण आहे हे असं आहे, आनंदात जगतोय, सुखाचा पाठलाग करतोय पण त्यातही आनंदच आहे. नाही मिळालं काही तर आता कितपत दु:खी व्ह्यायचं याची अक्कल आली आहे (अगेन, असं वाटतंय.. म्हणजे परत डिल्युजनलच)
जोवर ठोकर बसत नाही, तोवर याच्या मागे कशाला लागायचं याचं मनाला पटेल असं उत्तर (आता फाटे फोडणे इन्स्टिंग्ट आलं) मिळत नाही तोवर जाणार नाही. तोवर बराच उशीर झाला असेल तर होऊद्या. (घाबरट नक्की नाही. पण परत ते डिल्युजनल असू शकतं)
जाऊद्या.... माझी पोस्ट न वाचता पुढे जा. मला वाटतं या वरच्या चार मध्ये इम-मच्युअर हा एक पाचवा नंबर वाढवा.

अमित, सगळ्यांचं सांसारिक व्हर्जन सारखंच असतं. Happy
पोस्ट उडवली आहे. आता स्वैपाक करते, परमसत्याच्या नादात सबवे खावं लागायचं.

Pages