
एक गांव रस्त्याच्या कडेला, नुसतेच वसले आहे
कुणी पाहुणा गावांत येत नाही म्हणून रुसले आहे
एक काळ होता जेव्हा त्या गावांत लोकांची वर्दळ होती
तारुण्य पळाळे शहरात आता ,वृद्धत्व तिष्ठत पडले आहे
एक वृद्ध आज्जी तिच्या झोपडीत अंथरुणाला खिळलेली
अंग फणफणले आहे तापाने डोळ्यांतून अश्रू झरत आहे
कावळा कुणाची पाही वाट विद्युत खांबा वर बसुन हताश
एखादी एसटी येते नि जाते ,अजून न कुणीच उतरले आहे
धुळीने माखलेल्या रस्त्यांना कसली आतुर ही अपेक्षा
रणरणत्या उन्हात इथे का कधी कोण फिरकले आहे
राखणदाराची जत्रा जवळ आली,वृद्ध डोळे लागले वेशिवर
ते सळसळतं तारुण्य परतेल , मनास अजून व्यर्थ आस आहे
एक गाव रस्त्याच्या कडेला धुळीत सुस्तावलेले आहे
एक कुत्रं भर रस्त्यात बिनधास्त लवंडून निजले आहे
गुरुवार, १४/०३/२०२४ , ९:५१ PM
अजय सरदेसाई (मेघ)
https://meghvalli.blogspot.com/
छान!
छान!
छान. विषण्ण!!
छान. विषण्ण!!
छान!
छान!
छान!
छान!
धन्यवाद @छंदीफंदी @सामो
धन्यवाद @छंदीफंदी @सामो @sharmilaR @कुमार१