Submitted by अवल on 16 March, 2024 - 05:05
तास भराच्या योगा नंतर
सगळी गात्र दमली, थकली
आता सगळं हलकं हलकं
मन शांत, एकाग्र ध्यान.
अलगद बंद चंक्षु समोर
एक अलवार ढग तरंगतोय
अन त्यासमोर मी निश्चल.
आसपासचा थंड गार वारा
एक भरून राहिलेली तृप्तता
शांतीचा तो अविरत अनुभव
अस्तित्वा शिवाय लहरत असणं.
हलकेच ढग पुढे येतो
त्याचा न कळणारा स्पर्श
तरीही तन मनाला जाणवणारं
हलकेच अलवार एक चुंबन!
एक तरल अनोळखी अनुभूती
अन लगेच वास्तवाची जाणीव
प्रखर, उन्नत, धगधगती जाग.
एक क्षण थरथरलं मन
शरीर उसासलं, हृदय धडधडलं
तक्क्षणी जाणवंलं, आहे आहे,
अजून जिवंत आहे मी!
अन मग गेलेला क्षण,
तो पुन्हा आठवू पहातेय.
शक्यता आहे, तयार करतेय
माझी मलाच मी, त्यासाठी.
किती मजेशीर आहे हे,
हे सगळं जाणणं जमलं.
याची देही, हृदयी अनुभवला
मनी झेलला, पचवला तो
किस ऑफ द डेथ!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अफाट सुंदर आणि प्रत्ययकारी !
अफाट सुंदर आणि प्रत्ययकारी !
धन्यवाद हर्पेन
धन्यवाद हर्पेन
सुंदर !
सुंदर !
हर्पेनला +१
हर्पेनला +१
कविनला +1
कविनला +1
साद, कविन, धनवन्ती धन्यवाद
साद, कविन, धनवन्ती धन्यवाद
जबरी!
जबरी!
खुप सुंदर !
खुप सुंदर !
सर्वांगसुंदर… विपश्यना आठवली…
सर्वांगसुंदर… विपश्यना आठवली…
छानच..!!
छानच..!!
यु फाउंड अ पोर्टल टु एन्टर
यु फाउंड अ पोर्टल टु एन्टर अनादर रिल्म.
एका वेगळ्याच तंद्रालोकामध्ये जायचे दालन, तुमच्याकरता खुले झाले. भाग्यवान आहात.
छान. पंण हे डेंजर आहे बाबा!
छान. पण हे डेंजर आहे बाबा! सांभाळून!
शीर्षक वाचुन आधी हॅरीच आठवला.
ध्यानाचा अनुभूती आहे. पोचली.
ध्यानाची अनुभूती आहे. पोचली.
धन्यवाद मित्र मैत्रिणींनो
धन्यवाद मित्र मैत्रिणींनो
अजून एका मित्रालाही हॅरी आठवला
पण मी हॅरी वाचलाच नाही, सो नो घाबर
जोक्स अपार्ट भितीदायक नव्हतं ते फिलिंग, मजेशीर होतं
जस्ट अक्सेप्ट व्हॉट इट इज, असं काहीसं.
सामो, थँक्यु, पण या जर्नी कडे अध्यात्म म्हणून न पहाता ( कारण वह मेरे बस की बात नहीं) मेंदूतला रोज न वापरला जाणारा90% भाग अनुभवणं असंच बघतेय
मस्त.
मस्त.
आपल्या अस्तित्वाची जाणीव हरवण्याचा किंचित अनुभव एकदा ध्यानात आला होता. फार हलकं वाटलं होतं. ( झोप नसावी ती).
>>>>>>पण या जर्नी कडे
>>>>>>पण या जर्नी कडे अध्यात्म म्हणून न पहाता ( कारण वह मेरे बस की बात नहीं) मेंदूतला रोज न वापरला जाणारा90% भाग अनुभवणं असंच बघतेय Happy
छानच की.
सुंदर!
सुंदर!
खूप छान
खूप छान
भरत भारीच
भरत भारीच
वावे, किल्ली धन्यवाद
खूप सुंदर,व तरल लिहिलं आहे.
खूप सुंदर,व तरल लिहिलं आहे. मला दोनदा वाचावे लागले नक्की काय म्हणायचे आहे ते समजायला !
भरत, तुमचा अनुभव जरा सविस्तर वाचायला आवडेल....
आंबय गोड धन्यवाद
आंबट गोड धन्यवाद
हो जरा व्हेग झाली खरी...
>>>>>>भरत, तुमचा अनुभव जरा
>>>>>>भरत, तुमचा अनुभव जरा सविस्तर वाचायला आवडेल....
+१
किती हळुवार मृत्युस्पर्श..
किती हळुवार मृत्युस्पर्श.. सुरेख जमलीये कविता. 'अविरत शांतता' - अनुभवण्याची उत्सुकता निर्माण झाली यामुळे.
प्राचीन धन्यवाद
प्राचीन धन्यवाद आणि शुभेच्छा
>>>>>>भरत, तुमचा अनुभव जरा
>>>>>>भरत, तुमचा अनुभव जरा सविस्तर वाचायला आवडेल.... +1
त्यातलं फार लक्षात नाही. ठळक
त्यातलं फार लक्षात नाही. ठळक असं काही जाणवलं नव्हतं.
मी ब्रह्मविद्येचा अभ्यासक्रम केला आहे. त्यात श्वसन - व्यायाम प्रकारांसोबत ध्यानही शिकवतात. ध्यानासाठी त्यांनी सीडीही दिली आहे. सकारात्मक विचारांचे पाठ आहेत.
तर एकदा रात्री उशिरा ही सीडी लावून ध्यान करत होतो. खुर्चीवर बसलो होतो. रस्त्याने वाहनांच्या हॉर्नचे आवाज, कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येत होतं. आधी सगळं शरीर रिलॅक्स करायचं. मग श्वासोच्छ्वासावर लक्ष द्यायचं. मग त्या सीडीतल्या पाठावर. खरं तर मला त्या पाठातला मजकूर तेव्हा तरी फारसा पटत नव्हता. कल्टसारखं वाटत होतं. पण मेंदूला आराम द्यायचा म्हणून रिअॅक्ट न होता त्यावर लक्ष देत होतो. मध्ये कधीतरी तेही ऐकू येईनासं झालं. काही वेळानं भान आलं तेव्हा सीडीमधला पुढचा ट्रॅक सुरू झाला होता. डोकं अगदी हलकं तर शरीर जड झाल्यासारखं वाटलं. ती जाणीव फार छान होती.
माझ्या (बहुतेक आपल्या सगळ्यांच्याच) डोक्यात एका वेळी अ ने क गोष्टी सुरू असतात. मेंदूला विश्रांती आवश्यक आहे , हे पटलं आहे. अधूनमधून मन निर्विचार करणं गरजेचं आहे.
खूपच गरजेचे आहे. तसेच कठीणही
खूपच गरजेचे आहे. तसेच कठीणही !
भरत अगदी अगदी.लाख मोलाचं
भरत छान मांडलत. अनेकदा अगदी अगदी असं झालं वाचताना . शेवटचा पॅरा - लाख मोलाचं लिहिलत.
मलाही खरं तर पारंपरिक पद्धती वैचारिक लेव्हलला पटत नाही. म्हणजे त्यात जे गुरु/ मंत्र/ प्रार्थना यांना शरण जाणं अपेक्षित असतं ते पटत नाही, जमतही नाही. योगासनांमुळे पूर्ण शरीराचा व्यायाम, दमणं सगळं होतं. अन नंतर प्राणायामामुळे, त्यातल्या एकाग्रतेमुळे आपण मेंदूला विचार "करायला लावणं" थांबवतो. स्वाभाविकच त्याला जागृत अवस्थेतही आराम देतो. सक्रिय आराम याचा नक्की फायदा होतोय. या सगळ्यात त्या मागचे गुरु, मंत्र , इ. सहजी बाजूला करून हा फायदा मिळवणं हा प्रयत्न चालू आहे.
हो. मला एकदा ध्यानाची सवय
हो. मला एकदा ध्यानाची सवय झाली की सीडीची गरज पडू नये.
इन्टरेस्टिंग अनुभव अवल आणि
इन्टरेस्टिंग अनुभव अवल आणि भरत दोघांचेही.
>>> मन निर्विचार करणं गरजेचं आहे
मी थोडं धार्ष्ट्य करून याबद्दल बोलू का?
मन 'निर्विचार' जिवंतपणी आणि जागेपणी होत नाही. पीरिअड!
'निर्विचार' होणं हे अशक्य ध्येय ठेवलं तर त्याचा उलट परिणाम होण्याची शक्यता असते - तो म्हणजे 'किती प्रयत्न केला तरी नाहीच जमत' असं वाटून ध्यानाचा सराव बंद करावासा वाटणं.
विचारांपासून अलिप्तता साधणं हा उद्देश असायला हवा. 'मी चिडलो आहे' ही (रागाशी आयडेन्टिफाय करण्याची) स्थिती बदलून त्याऐवजी 'माझ्या मनात रागाचे विचार येताना दिसत आहेत' ही (प्रेक्षकाची) स्थिती साधता यायला हवी.
मन नाठाळ वासरासारखं चौखूर उधळतंच. पण ते उधळलं आहे हे लक्षात येऊन त्याला पुन्हा फोकल पॉइंट (श्वासोच्छ्वास/मंत्रोच्चार इ.) वर पुनःपुन्हा आणत राहाणं हाच ध्यानाचा सराव. तो सातत्याने केला की जेव्हा आवश्यकता भासेल (आपण कारणपरत्वे चिडू किंवा अस्वस्थ होऊ अशा वेळी) ते मेन्टल मसल्स नीट वागतात आणि आपला 'फ्यूज उडत' नाही.
विचार/भावना माझ्या कह्यात आहेत की मी त्यांच्या हा पॉइंटाचा मुद्दा असतो यात.
मी 'टेन पर्सेन्ट हॅपिअर' हे अॅप वापरून गाइडेड मेडिटेशन्स करते. मला ती ट्रेनिंग व्हील्स लागतात अजून.
Pages