जागतिक तापमानवाढ - सर्वेक्षण

Submitted by दिप्ती हिंगमिरे on 13 March, 2024 - 14:02

नमस्कार!

आम्ही, दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी मिळून हे सर्वेक्षण करत आहोत. दिप्ती वायुमंडलीय विज्ञान (atmospheric science) या विषयात संशोधन करते. संहिताची पार्श्वभूमी खगोलशास्त्राची आहे; ती आता विदावैज्ञानिक (data scientist) म्हणून काम करते. जागरुक नागरिक म्हणून आम्हांला जागतिक हवामानबदलाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता वाटते. जागतिक तापमानवाढीच्या भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची आम्हांला विशेष काळजी वाटते.

एक देश म्हणून भारताची या हवामानविषयक बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. एकीकडे आपण जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या हवामानबदलाच्या गंभीर परिणामांना तोंड देतोय आणि त्याचवेळी दुसरीकडे आपण लोकसंख्येमुळे प्रदूषण करणाऱ्या सर्वांत मोठ्या देशांपैकी एक आहोत. जागतिक तापमानवाढीबद्दल भारतीय लोकांमध्ये किती माहिती आहे आणि या समस्येला सामोरे जाण्याच्या विविध मार्गांबद्दल आपण काय विचार करतो याबद्दल आम्हांला उत्सुकता आहे. म्हणून हे सर्वेक्षण. तसेच आम्हाला किंवा भारतातील हवामान बदल क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही लोकांना प्रभावी धोरण ठरवण्यात याचा उपयोग होईल.

हे सर्वेक्षण पूर्ण भरण्यासाठी अंदाजे ५-१० मिनिटे लागतील. हे पूर्णपणे निनावी सर्वेक्षण आहे. ह्या सर्वेक्षणातल्या माहितीचा कुठल्याही प्रकारे व्यावसायिक वापर होणार नाही. तुम्हाला पुढील तपशीलवार सर्वेक्षणात भाग घ्यायचा असेल किंवा आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही तुमचा ईमेल शेवटच्या पर्यायी प्रश्नात देऊ शकता.

या दुव्याचा वापर करून तुम्ही सर्वेक्षणात भाग घेवू शकता. आपल्या ओळखीच्या भारतीयांना याचा दुवा पाठवा अशी विनंती. जितक्या वेगवेगळ्या विचारांच्या, पार्श्वभूमीच्या, वयाच्या लोकांकडून उत्तरं मिळतील तेवढं उत्तम. ३१ मार्चपर्यंत सर्वेक्षणात भाग घेता येईल.

धन्यवाद.
दिप्ती आणि संहिता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्वलंत विषय आहे. सर्वेक्षणात भाग घ्यायला आवडेल.

<< जागरुक नागरिक म्हणून आम्हांला जागतिक हवामानबदलाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता वाटते. जागतिक तापमानवाढीच्या भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची आम्हांला विशेष काळजी वाटते. >>
----- जागरुक नागरिक आहात, जबाबदारीची जाण आहे आणि बदल घडविण्यासाठी काही प्रयत्न करत आहात याचे कौतुक वाटते. शुभेच्छा.

Submitted

Done