कधीकधी वरवर सभ्यपणाचा आव आणुन
प्रेम येतं. अगदी दारावर टकटक करत
आपण म्हणतो "आत्ता वेळ नाही..... मग ये!"
.
"अरे काही काळ-वेळेचं भान? चालता हो!"
.
"लायकी नाही माझी. निघून जा."
.
पण हे बेटं! सभ्यपणाचा बुरखा टाकून,
धटिंगणासारखं आतच घुसतं.
आपलच घर असल्यासारखं,
ताणुन देतं.
खनपटीलाच बसतं
पूर्ण घराची उलथापालथ करुन,
जाताना मात्र, गर्भश्रीमंत करुन जातं.
--------------------------------
तर कधी प्रेम भिजलेल्या मांजराच्या
पिल्लासारखं,
वळचणीला सापडतं.
आपण आत घेतो
आणि हे लळा लावतं
आणि मारे एके दिवशी शेपूट वर करुन चालतं होतं,
परत न येण्याकरता.
-------------------------------
प्रेम उंटही असतं हं कधीकधी
आपण आसरा देतो आणि
आपला अरब कधी बनला
कळतही नाही.
-------------------------------------
कधीकधी तर पाऊस बनून अवेळी गाठतं.
पार भिजवुन टाकतं.
.
काय करावं या बहुरुप्याला
एक रुप असेल तर शपथ!
माणसाने आपला बचाव तरी कसा करायचा?
बहुरुपी
Submitted by सामो on 10 March, 2024 - 03:49
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुमासदार ..!!
खुमासदार ..!!
पॅडी, प्रतिसादाबद्दल आपले
पॅडी, प्रतिसादाबद्दल आपले आभार.
छान
छान
धन्यवाद भरत.
धन्यवाद भरत.
छान आहे !
छान आहे !
धन्यवाद कुमार सर.
धन्यवाद कुमार सर.
मस्त
मस्त
२ states मधलं गाणं आठवलं - लोचा ए उलफत हो गया
किल्ली आभार. ऐकते.
किल्ली आभार. ऐकते.
भारीच की....
भारीच की....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच आवडली फक्त अरब वालं कडवं
खूपच आवडली फक्त अरब वालं कडवं कळालं नाही. आपला अरब होणे म्हणजे काय?
अगं अरब उंट कथा.
अगं अरब उंट कथा.
प्रेमच व्यापुन रहातं, आपलं 'स्व' गळून पडतं. किंवा ज्याला जो लागेल तो अर्थ.
आलं लक्षात. मस्त आहे
आलं लक्षात. मस्त आहे
धन्यवाद.
धन्यवाद.
प्रेम उंटही असतं हं कधीकधी
प्रेम उंटही असतं हं कधीकधी
आपण आसरा देतो आणि
आपला अरब कधी बनला
कळतही नाही.>> खरंय!
Taken for granted.
छान आहे कविता
छान आहे कविता
मस्त, आवडलं
उघड्या पुन्हा जहाल्या...https
उघड्या पुन्हा जहाल्या...
https://www.youtube.com/watch?v=-pD1OQXzEyc
हपा, अवल, पाटील आभार.
हपा, अवल, पाटील आभार.
युट्युबची लिंक बघते.
शर्मिला खरच असेही असू शकते की
>>>>>>>>>Taken for granted.
शर्मिला खरच असेही असू शकते की.
पण Taken for granted. - मला खटकत नाही. एखाद्या (प्रिय व जवळच्या) व्यक्तीच्या जीवनातील विश्वासार्ह भाग बनणं, ही मला उच्च कॉम्प्लिमेन्ट वाटते.
छान आहे. आवडली कविता.
छान आहे. आवडली कविता.
शर्वरी आभार.
शर्वरी आभार.
प्रेम उंटही असतं हं कधीकधी
प्रेम उंटही असतं हं कधीकधी
आपण आसरा देतो आणि
आपला अरब कधी बनला
कळतही नाही.>> खरंय! >>>> मला
जुन्या झालेल्या नात्यात जोडीदार manipulative किंवा abusive kinva possessive झाला/झाली तर अस काहीसं वाटलं
समो छान लिहिलयस!
Fifty Shades of Love
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थँक्स छंदीफंदी.
थँक्स छंदीफंदी.
वाह!! प्रेमाच्या विविध छटा
वाह!! प्रेमाच्या विविध छटा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
असेच लिहित गेले पुढे तर महाकाव्य बनेल
स्वरुप उत्तम कल्पना आहे.
स्वरुप उत्तम कल्पना आहे. प्रतिक्रियेकरता, धन्यवाद.
छान आहे !
छान आहे !
वाह!!
वाह!!
सहज, सांज आभार.
सहज, सांज आभार.
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद.
धन्यवाद.
Pages