कधीकधी वरवर सभ्यपणाचा आव आणुन
प्रेम येतं. अगदी दारावर टकटक करत
आपण म्हणतो "आत्ता वेळ नाही..... मग ये!"
.
"अरे काही काळ-वेळेचं भान? चालता हो!"
.
"लायकी नाही माझी. निघून जा."
.
पण हे बेटं! सभ्यपणाचा बुरखा टाकून,
धटिंगणासारखं आतच घुसतं.
आपलच घर असल्यासारखं,
ताणुन देतं.
खनपटीलाच बसतं
पूर्ण घराची उलथापालथ करुन,
जाताना मात्र, गर्भश्रीमंत करुन जातं.
--------------------------------
तर कधी प्रेम भिजलेल्या मांजराच्या
पिल्लासारखं,
वळचणीला सापडतं.
आपण आत घेतो
आणि हे लळा लावतं
आणि मारे एके दिवशी शेपूट वर करुन चालतं होतं,
परत न येण्याकरता.
-------------------------------
प्रेम उंटही असतं हं कधीकधी
आपण आसरा देतो आणि
आपला अरब कधी बनला
कळतही नाही.
-------------------------------------
कधीकधी तर पाऊस बनून अवेळी गाठतं.
पार भिजवुन टाकतं.
.
काय करावं या बहुरुप्याला
एक रुप असेल तर शपथ!
माणसाने आपला बचाव तरी कसा करायचा?
बहुरुपी
Submitted by सामो on 10 March, 2024 - 03:49
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अबोल मूक कोकरु जसे प्रेम माझे
अबोल मूक कोकरु जसे प्रेम माझे नि तुझे तसे.
न बोलता कळते सारे
हवेत कुणाला शब्दांचे वारे!
माझ्याजवळ बस एकदा डोळेभरुन पाहू देत
खुशाल होउ देत विरह मग
पुरेल शिदोरी जीवनभर!
कलेक्टिव्ह मेमरीत कोरलेले लावण्य
अशारीरी आत्मिक सौंदर्य
म्हणजे प्रेम ... म्हणजे प्रेम!
मस्त लिहीले आहेस
मस्त लिहीले आहेस
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages