पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुल्हे की सहेली कसं वाटेल? किंवा ex Lol
.
दुल्हन की सहेली बनून कोणत्याही लग्नात जाऊन जेवता येईल. फुकट.
Investment आहे ही.

चर्चा.... Lol
हनुमानाने छाती फाडून दाखवलं त्यापेक्षा हे टेलरकडून शिववून घेतलेलं 'मॅन्युअल' प्रेम बरं.

तर मेहेरबान कदरदान दिल थामके बैठें
प्रेम आणि फॅशन चा अत्युच्च नमुना आता सादर होत आहे. होऊद्या खर्च कार्य आहे घरचं...0e6f7e6d7af312ae98cee53006032046.jpg
नवरा आणि स्वतःचा फोटू ब्लॉउज च्या पाठीवर छापून घेतल्या गेलेला आहे.

Lol
कॉस्कोतले जॉगर व ओल्ड नेव्हीच्या टीशर्ट वर आयुष्य काढणाऱ्यांना पाषाणहृदयी गटात टाका. Wink

@ अस्मिता तुमचं माझं प्रेम कॉस्को आणि ओल्ड navy च्या मटेरियलिस्टिक जगात अडकून पडलंय वर बघा जरा फोटूत, नवऱ्याच प्रेम प्रेम काय असत.
अर्थात असा ब्लॉउज घातला तर आमचं प्रेम आम्हाला त्याच्यावर ओल्ड navy च्या हूड्डी घालायला लावून कुणी बघायच्या आत घरी आणेल तो भाग अलाहिदा आहे. पण तरी...

मागच्या पानावरच्या लिंक्सवर क्लिक केल्यानंतर शिवाय खाली जे काही फोटो आले, त्यातले काही काही actually छान वाटले. म्हणजे झगमगीत ब्लाऊज घालायला आवडत असेल तर काही नाजूक डिझाईन्स छान आहेत राधाकृष्णाची वगैरे.
बाकी बराचसा प्रकार मला तरी बटबटीत वाटला. ज्यांना आवडत असेल त्यांना आवडो बापडा!

कॉस्कोतले जॉगर व ओल्ड नेव्हीच्या टीशर्ट वर आयुष्य काढणाऱ्यांना पाषाणहृदयी गटात टाका >>> Lol

शब्दश: मेनै तुम्हारे नाम का मंगळसूत्र पेहेना है >>> गुड वन Lol

मानव यांची मागच्या पानावरची पोस्ट धमाल आहे आणि आयडियापण भारी आहे. पण त्यातले फूड बद्दलचे जे सल्ले आहेत ते ती व्यक्ती पंक्तीला बसायच्या आधीच कळवायला हवेत. नाहीतर प्रत्येक पंगतीमागे आरसे लावून ही अक्षरे अ‍ॅम्ब्युलन्स शब्द मिरर इमेज मधे लिहीतात तशी लिहावी लागतील Happy

नवरा आणि स्वतःचा फोटू ब्लॉउज च्या पाठीवर छापून घेतल्या गेलेला आहे. >>> Lol उद्या या रेटने तेथे "लाइक" व 'शेअर" ची बटने येतील. लोकांनी येताजाता दाबावीत. किंवा त्याच कार्यात एखाद्या मावशीची "अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा" प्रतिक्रिया एका कापडाच्या तुकड्यावर लिहून सेफ्टीपिनने तेथेच खाली जोडतील

These type of women must embrace patriarchy like coke. >>> अमा, यातली अगदी पहिली मीम पाहिली तेव्हासुद्धा हेच पहिले डोक्यात आले. दुल्हन की सहेली वगैरे ठीक आहे

त्याच कार्यात एखाद्या मावशीची “अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा" प्रतिक्रिया एका कापडाच्या तुकड्यावर लिहून सेफ्टीपिनने तेथेच खाली जोडतील>>> Lol

थे "लाइक" व 'शेअर" ची बटने येतील. >> आरारा! हे म्हणजे आमच्या हापिसात कॅफेटेरिया मध्ये वॉशरुम मध्ये किती स्वच्छ आहे त्यानुसार हिरवं हसू किंवा उतरत्या भाजणीत लाल हसू क्लिक करा झालं. Wink

फा Lol
'लक्ष्मीनारायणाच्या जोडा' त्या दिवशी फक्त, एरवी 'टॉम अँड जेरीचा' जोडा.

शरुम मध्ये किती स्वच्छ आहे त्यानुसार हिरवं हसू किंवा उतरत्या भाजणीत लाल हसू क्लिक >>> Lol

'लक्ष्मीनारायणाच्या जोडा' त्या दिवशी फक्त, एरवी 'टॉम अँड जेरीचा' जोडा. >>> Happy Happy हो

ही फोटू फॅशन करू ईछछीणाऱ्याना अजून एक आयडिया पाठीला एक लटकन लावा ज्यावर paytm /google pay चा QR कोड लटकत असेल. म्हणजे वऱ्हाडी त्यावर स्कॅन करून आहेर करतील. नवरी पाठमोरी असली तरी फोटू मुळे नव दाम्पत्य आहेर स्वीकारत आहे असं वाटेल वऱ्हाड्याला पण

ही कल्पना खरोखरच चांगली आहे बिल्वा, 'शार्क टॅन्क'मधे जायला हवी. आहेरमाहेरात फार वेळ जातो आणि भिंतीवरली पाच-पाच घड्याळं येतात आणि आहेराच्या पोत्यावर लक्ष ठेवावं लागतं.

भिंतीवरली पाच-पाच घड्याळं येतात >>> Lol आणि काही काळानंतर सगळी वेगवेगळी वेळ दाखवतात. ती ही "न्यू यॉर्क, लंडन, मुंबई, टोकियो" वगैरे मधली जागतिक वेळ नव्हे. जनरली थोडाफार फरक असलेल्या वेळा Happy

न्यू यॉर्क, लंडन, मुंबई, टोकियो" वगैरे मधली जागतिक वेळ नव्हे. जनरली थोडाफार फरक असलेल्या वेळा >> हीच ती भारतीय प्रमाणवेळेच्या लोच्याला कारणीभूत आहेरातील पाच घड्याळं.
>>समय बडा बलवान' >> म्हणून 'मै समय हु! समय हु!! समय हु!! समय हु!!!! समय हु !!!!! ' असं जेव्हा तो महाभारताच्या आधी ऐकू येतं तेव्हा तो एको नसून, वास्तविक पाच समयं आपापल्या समयी बोलत असतात.

Lol हो. समय आहे का 'तुणकतुणकतुण' मधला दलेर मेहंदी.

मला तो हृतिकचा 'मुझसे दोस्ती करोगे' मधला संवाद पुन्हा आठवला. लंडनहून पंधरा वर्षांनंतर येऊन 'तुमभी बहोत बडी होगई हो राणी.'
प्रमाणवेळ वेगळी आहे रे बाबा, पण काळ तर सारखाच पुढे जातो की...

I think Hritik studied theory of relativity in London.
Can we print important Unix commands on blouse?

मला वाटते ब्लाऊज च्या पाठीमागे एखादं स्मार्ट पॅनल ठेवावं xr चं.म्हणजे मागून स्पर्श न करता हवेत बोटं फिरवून जे हवं ते गुगल करता येईल आणि ते समोर भिंतीवर उमटेल(इनकोग्नीटो ब्राऊजर वापरला तर विशिष्ट(शब्द लिहायला चुकला असेल तर सांगा) चष्मा घालून फक्त हवेत बोटं चालवणाऱ्यालाच भिंतीवर दिसेल एक्सटेंडेड रिऍलिटी सारखं.)

त्या ब्लॉउज च्या पाठी च्या पाठीच लागलोय आपण सगळे हात धुऊन. सगळ्यांच्या फॅशन कल्पनांचे वारू चारी दिशा उधळलेत पार Lol

अर्रे इथे तर मैफिल जमलिये धमाल नुसती Lol Lol
माझेमन, बिल्वा, फारेंड कहर आहात.

उद्या या रेटने तेथे "लाइक" व 'शेअर" ची बटने येतील. लोकांनी येताजाता दाबावीत. किंवा त्याच कार्यात एखाद्या मावशीची "अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा" प्रतिक्रिया एका कापडाच्या तुकड्यावर लिहून सेफ्टीपिनने तेथेच खाली जोडतील>>> देवा हसून च मेले Rofl

मैत्रिणीचं लग्न आहे तिला आम्ही ही qr code ची idea सांगितली होती. माथ्यावर ओढणीवर qr छापून घे म्हणून. नमस्कारला वाकलं की upi trqnsfer झाला पाहिजे शगुन. त्यांच्यात खूप रुपये मिळतात म्हणे शगुन, आशीर्वाद म्हणून. आपल्याकडे कुठून तरी आलेले काचेचे बाउल ढकलतात.

Pages