माझे मातीचे प्रयोग ३
पॉटरीच्या क्लासला जायला लागल्यापासून सगळ्यांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागलेले असायचे आपल्याला चाकावर कधी भांडी करायला मिळणार. एक संपूर्ण सत्रभर फक्त हाताने मातीकाम (हॅन्ड बिल्डींग) केल्यावर मग दुसर्या सत्रात आम्हाला चाकाला हात लावायची परवानगी मिळाली. तेव्हा हॅन्ड बिल्डींग करणार्या प्रत्येकाच्या चेहर्यावर एक प्रकारची अधिरता दिसत होती तर आधीपासून चाकावर काम करणार्यांच्या चेहर्यावर एक स्मितहास्य. त्या स्मितहास्याचा अर्थ आम्हाला नंतर कळला.
आमचे चाकावरचे मातीकाम शिकणे सुरू झाले, कुंभार चाकावर काम करतो तेव्हा किती छान वाटतं ते बघायला आणि किती सोपे आहे नै, त्यात मला पुण्यात चोखीदानी की असल्याच कुठल्यातरी ठिकाणी कुंभारकाम केल्याचा तब्बल ५ मिनीटाचा अनुभव होता. त्यात मी चक्क एक भांडे केले होते अर्थात तिथे असलेल्या कुंभाराने थोडीशी मदत केली होती पण भांडे केले होते हे महत्वाचे, तर या अनुभवाच्या जोरावर मी संपूर्ण आत्मविश्वासाने चाकावर काम करायला सुरूवार केली, आम्ही अगदी उत्साहात सरांना विचारले की कुंभार करतो तसा माठ मला करायचा असेल तर किती दिवस सराव करावा लागेल, सर म्हणाले जास्त नाही पण किमान ५-७ वर्ष लागतील ते पण पूर्ण वेळ मातीकाम केले तर. त्यामुळे आमचे विमान लगेच जमीनीवर आदळले.
आमचा पहिला धडा होता, चाकावर योग्य पद्धतीने माती ठेवणे, त्याला सेंटरींग असे म्हणतात... हा हे त्या चोखीदानीत कुंभाराने केले होते म्हणा. त्यात काय चाकावर मध्यभागी माती ठेवायची यात कसले आलय कौशल्य, पण नाही. कुंभारकामातील हे सगळ्यात महत्वाचे आणि आत्मसात करायला तेवढेच कठीण असलेले कौशल्य आहे हे. हे कौशल्य जमल्याशिवाय पुढे काहीच शिकता येत नाही हे कळल्यावर आमचा नाईलाज झाला. आम्हाला त्याचा सराव करणे भाग होते. शेवटी २ महिन्याच्या सरावाने हळू हळू अंदाज यायला लागला की काय करायचे नाही. काय करायचे हे जरी कळत नसले हे काय करायचे नाही हे कळत होते हे ही नसे थोडके. आता मला १ किलो माती चाकावर मध्येभागी ठेवुन सेंटरींग करता येते (सरांच्या मदतीने :))
असा काय फरक पडतो चाकावर मध्यभागी नीट माती नाही ठेवता आली तर... पडतो ना, भांडी सगळ्या बाजूला सारख्या जाडीची होत नाहीत, कमी जास्त उंचीची होतात, तर कधी गोल न होता एकदम वेडीवाकडी होतात.
तर कधी कधी चाकावरून उडून पडतात.
माती काम शिकायला सुरू केल्यावर टप्प्या टप्प्याने भांडी करायला शिकवली जातात. आधी नुसते सिलेंडर सारखे आकार करणे म्हणजे पेन ठेवायचे स्टँड, चमच्याचे स्टँड इ. मग त्या सिलेंडरचा आकार बदलून कॉफीचे मग, त्यानंतर फुलदाणी (Narrow neck forms), त्यानंतर वाडगी (Bowls), प्लेट्स, मग झाकणाच्या बरण्या इ.इ.
मागच्या २ सेमिस्टर मध्ये केलेल्या कामाचे हे फोटो. अर्थात जी भांडी चांगली जमलीत त्याचेच फोटो इथे टाकलेत, न जमलेली कित्येक भांडी तशीच पडून आहेत.
फुलदाणी (Narrow neck forms)
हा माझ्यासाठी करायला अत्यंत कठीण प्रकार आहे. परीक्षेसाठी जेवढी करायची होती तेवढीच केलीत नंतर असे एकही भांडे केलेले नाही.
वाडगे (Bowls)
या सत्रात मी गोल बोल/बाउल बनवून मग त्याला ठोकून आपल्याला हवा तसा आकार बनवणे हे काम केले त्याचीच ही काही उदाहरणे. आकार बदलणे (altering forms) हा प्रकार करायला मला खूप मजा आली.
Serving Bowls
सॉस,चटणीसाठी छोट्या वाट्या
त्रिकोणी वाट्या:
ह्या चुकुन एकातल्या एक मापाच्या झाल्यात त्या खर तर मला एकाच आकाराच्या करायच्या होत्या. पण एकसारख्या आकाराची भांडी करणे हे कौशल्य मला यायला अजून १-२ वर्ष लागतील.
चौकोनी पोलका डॉट वाडगे
झाकण असलेल्या बरण्या (Lided Forms)
झाकण असलेली भांडी या प्रकाराने आम्हाला खूप त्रास दिला. मातीची बरणी तयार करायची, मग लगेच त्याचे माप घेवुन झाकण तयार करायचे की झालं. खरी मजा येते ते ती भांडी भट्टीतून भाजुन आल्यावर, एकाही बरणीचे झाकण तिला नीट लागत नाही.
मला वेगळे झाकण नीट करता येते, नुसती बरणी पण नीट करता येते पण बरणी आणि तिला बसणारे झाकण हा सेट एकत्र तयार करणे हे प्रकरण अज्जिबात झेपत नाही. त्यासाठी आमच्या सरांनी सांगीतलेला उपाय आम्ही वापरतो ते म्हणजे एका बरणीला ४-५ झाकणं करायची आणि त्यातले जे नीट बसते ते शेवटी लावायचे. हाय काय अन नाय काय.
अर्थात एवढे करूनही नीट लागणारे झाकण मिळते याची शाश्वती नाही.
ही काही त्यातल्या त्यात जमलेली झाकणाची भांडी:
लसूण ठेवायचे भांडे, Garlic Jar (या बरणीला हवा खेळती रहावी म्हणून छिद्र पाडलेली असतात)
चटण्य/दही ठेवता येईल अश्या बरण्या :
छोटे झाड लावायची कुंडी, याला पाण्यासाठी असते ती ताटली जोडलेली आहे.
भट्टीत भाजतांना तडा गेलेल्या भांड्याचा उपयोग
आणि हे माझे अत्यंत आवडते प्रकार, हॅन्ड बिल्डींग प्रकारातले. २ सेमिस्टर चाकावर काम केल्यावरही माझा आवडता प्रकार हॅन्ड बिल्डीग हाच आहे आणि पुढे पण राहील. जगातले कुठलेही काम त्याच्याइतके रिलॅक्सींग नाही यावर मी ठाम आहे. खर वाटत नसेल तर करून बघा तुम्ही पण अन सांगा धमाल येते की नाही ते.
इथे फॉल मध्ये खूप पानगळ होते, रस्त्यावर चालतांना नेहमी वेगवेगळ्या आकाराची, रंगाची पाने दिसत असतात, ती पाने क्लास ला जातांना गोळा करायची असा एक अलिखित नियम सगळ्या विद्यार्थ्यांचा होता. मग सगळी पाने वर्गात आली की त्यातली सर्वानुमते आवडलेली पाने बाजुला काढली जायची.
मग सगळ्यांनी मोठी मातीची पोळी लाटायची (slab) त्यावर ही पाने ठेवुन त्या पानाच्या आकाराची माती कापायची आणि हवा तो आकार देवुन वाळवायची. आमच्या वर्गात यावर्षी खूप पानगळ झाली. कधीही बघीतले तरी सगळे जण पानांच्या आकाराची भांडीच तयार करते होती. त्यातुन आकाराला आलेली ही माझी काही पाने
पानांचे कँडल स्टँड
अजून एक
काही हिरवी, मोरपंखी पाने
Platter :
खर तर ही मोठी डिश सरांनी डेमो देतांना बनवली आणि मला दिली, मी ती घरी आणून नवर्याला दिली, त्याने ती रंगवली. मी फक्त भट्टीत भाजून आणली त्यामुळे याचे सगळे श्रेय त्यांचेच.
आमच्या कॉलेजमध्ये दर वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात क्रिसमसचा शो असतो त्यात पॉटरी क्लास मधले विद्यार्थी स्वतः बनवलेली भांडी विकतात व आलेले सगळे पैसे कॉलेजच्या एज्युकेशन फाऊंडेशनला डोनेट करतात. वरच्या चित्रातली अर्ध्याहुन जास्त भांडी मी त्या शो मध्ये डोनेट केली होती, मुख्य म्हणजे सगळी विकली गेली. त्यामुळे आपण केलेली भांडी लोकांना आवडतात हा आत्मविश्वास मिळाला
आम्हाला यावर्षी ही भांडी विकुन ३२०० डॉलर मिळाले. त्या डोनेशन मधुन कॉलेज शैक्षणिक साहित्य विकत घेते.
या क्लास मुळे एक झाले चाकावर मातीकाम करायला किती कष्ट लागतात, कुंभाराला किती मेहनत घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो हे सगळे कळले आणि एवढे करून त्याची कला अगदी मातीमोल(!) भावाने विकली जाते. त्यामुळे मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला की भारतात आपण रस्त्यावर, इतरत्र कुंभाराकडून जी मातीची भांडी विकत घेतो माठ, सुरई, पणत्या, मडकी इ.इ. त्यासाठी मी कधीही घासाघीस करणार नाही. कारण त्यांनी कितीही किंमत लावली तरी त्या भांड्यांसाठी कुंभाराने केलेल्या कष्टाचे मोल आपण दिलेल्या पैश्याहून खूप जास्त असते.
रुने, अफलातून!!!!! A+
रुने, अफलातून!!!!! A+
बढीया!!! रुनी, १०-११ फोटोतली
बढीया!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुनी, १०-११ फोटोतली रंग-संगती लोणच्याचा बरण्या सारखी वाटते..
'प्रयोग ३' मधे हात छान साफ झालाय हे दिसुन येतंच.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काय मस्त केलयस ग! एकदमच
काय मस्त केलयस ग! एकदमच जबरा!
कुठे असतात हे क्लासेस? मला पण. मला पण.
रुनी, सुरेख!
रुनी, सुरेख!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फारच सुरेख..
फारच सुरेख..
अप्रतिम
अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रतिसादाबद्दल खूप खूप
प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद मंडळी. तुमचे प्रतिसाद बघुन हुरूप वाढला. तुम्हाला कुंभारकामाबद्दल उत्सुकता वाटतेय हे बघुन पण खूप छान वाटले.
खूप लोकांनी भांडी रंगवण्याबदाल विचारलय त्याबद्दल थोडसे, ही सगळी भांडी २ वेळा भट्टीतून काढलेली असतात, पहिल्यांना कच्ची भांडी भाजुन पक्की करतात (Bisque Fired, या स्टेजला आलेली भांडी आपण विकत घेतो, उदा. माठ, सुरई, रांजण इ, ही भांडी सछिद्र असतात). मग ही भाजलेली भांडी रंगवली जातात, कधी रंगात बुडवुन तर कधी ब्रशने पेंट करून, तर कधी स्प्रे करून रंग मारला जातो आणि मग रंगाच्या भट्टीत भाजली जातात, ह्या रंगवण्याच्या प्रक्रियेला ग्लेझींग म्हणतात. शेवटी रंगाच्या भट्टीतून बाहेर आलेली भांडी म्हणजे चित्रातली वरची सगळी. ह्या भांड्यांना Vitrified भांडी पण म्हणतात कारण यांना छिद्र नसतात त्यामुळे यात द्रव पदार्थ साठवता येतो. ग्लेझिंग ही अशी कला आहे की तुम्ही यात कितीही वर्ष काम केले तरी फायनल रीझल्टची शाश्वती देता येत नाही.
वरच्या लेखात अजून एक लिहायचे राहीले ते म्हणजे ही सगळी भांडी आपल्याला रोज स्वयंपाक घरात वापरता येतात (food safe), यात अन्न पदार्थ साठवता येतात. तसच ही भांडी मायक्रोवेव्ह मध्ये वापरता येतात आणि डिशवॉशर मध्ये धुता पण येतात.
२००८ च्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी मी हा मातीकामाची ओळख करून देणारा व्हिडीओ केला होता त्यात अजून काही प्रश्नांची उत्तरे मिळतील.
अहाहा. सुरेख एकदम. यासाठी
अहाहा. सुरेख एकदम. यासाठी किती कष्ट घेतले असतील हे विचार करुन आणखी जास्त आवडल सगळ. सेल करायला सुरु करणार असशील तर त्या आजीच्या बरण्यांसाठी माझा नंबर अगोदरच लावुन ठेवते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी थोडे दिवसापुर्वी एक असच अतिशय सुंदर हाताने केलेला पॉटरीचा पिस पाहिलाय. अगदी समुद्राच्या पाण्याचा रंग असलेला. जरा पैसे साठवुन मग घेईन.
मातीकामाचा व्हिडीओ पाहिला
मातीकामाचा व्हिडीओ पाहिला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता पुढच्या वर्षीच्या दिवाळी अंकात चाकावरच्या भांड्यांचा टाक. (तोपर्यंत थोडंफार जमायला लागलं असेल न तुला... :हाहा:)
जबर्याच आहे एकेक ! गुणी
जबर्याच आहे एकेक !
गुणी पॉटर![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जबरदस्त! डॉ. रुनी
जबरदस्त! डॉ. रुनी पॉटर..
मस्त आहे कला!!
अप्रतिम!! भाग १ ,२ हि आत्ताच
अप्रतिम!! भाग १ ,२ हि आत्ताच पाहिले .. खुपच मस्त .. सगळे आवडले.. पानाचे सेट व बरण्या.. आहा !!
रुनी, एकेक फोटो बघताना केवळ
रुनी, एकेक फोटो बघताना केवळ थक्क व्हायला झालं. सही कला आहे तुझ्या हातांत.
त्यामुळे मी माझ्यापुरता एक
त्यामुळे मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला की भारतात आपण रस्त्यावर, इतरत्र कुंभाराकडून जी मातीची भांडी विकत घेतो माठ, सुरई, पणत्या, मडकी इ.इ. त्यासाठी मी कधीही घासाघीस करणार नाही. >>>> अगदी अगदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रुपाली, मी हे पाहिलंच नव्हतं. इतका मस्त खजिना (कलेचा) आहे तुझ्याकडे !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ठाण्यात कुठे पॉटरीचे क्लासेस आहेत ते कुणी सांगेल का?
रुनी ,एक से एक सरस भांडी
रुनी ,एक से एक सरस भांडी .पानांच्या आकाराची भांडी तर फारच छान .ग्रेट .
वा छान आहे कुंभारकला. शिकण
वा छान आहे कुंभारकला. शिकण त्याहुन कठीण.
सहिरे खुपच छान. मस्त वाट्ल
सहिरे खुपच छान. मस्त वाट्ल मला तु़झि हस्तचित्र पहुन.
काय मस्त आहेत गं!! सुंदर. हे
काय मस्त आहेत गं!! सुंदर.
हे करायला किती मेहेनत असते याची कल्पनाच नव्हती!
ग्रेट वर्क
अप्रतीम !!!
अप्रतीम !!!
छान पण निळ्या रंगाची भांडी
छान
पण निळ्या रंगाची भांडी सुबक वाटत नाहीत का कुणास ठाऊक...
बाकी उत्तमच...
मायबोलीचा सन्यास का सध्या?
आज पाहिला हा धागा.एकसे एक
आज पाहिला हा धागा.एकसे एक बढकर भांडी.वा!
सर्व भांडी सुंदर. मेपल लीफ
सर्व भांडी सुंदर. मेपल लीफ आणि लोणच्याच्या चिनीमाती बरण्या एकदमच आवडल्या.
रूनी सगल्या पॉट्स ना एकेक
रूनी सगल्या पॉट्स ना एकेक उम्म्म्म्मा. काय गोड आहेत ग पॉट्स.
ऑक्सि. ग्लेजिंग केलय ना?
मला ग्लेझिंग बद्दल नीट माहिती हवीये.
मुंबैइत कुठे शिकता येईल
Pages