माझे मातीचे प्रयोग ३
पॉटरीच्या क्लासला जायला लागल्यापासून सगळ्यांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागलेले असायचे आपल्याला चाकावर कधी भांडी करायला मिळणार. एक संपूर्ण सत्रभर फक्त हाताने मातीकाम (हॅन्ड बिल्डींग) केल्यावर मग दुसर्या सत्रात आम्हाला चाकाला हात लावायची परवानगी मिळाली. तेव्हा हॅन्ड बिल्डींग करणार्या प्रत्येकाच्या चेहर्यावर एक प्रकारची अधिरता दिसत होती तर आधीपासून चाकावर काम करणार्यांच्या चेहर्यावर एक स्मितहास्य. त्या स्मितहास्याचा अर्थ आम्हाला नंतर कळला.
आमचे चाकावरचे मातीकाम शिकणे सुरू झाले, कुंभार चाकावर काम करतो तेव्हा किती छान वाटतं ते बघायला आणि किती सोपे आहे नै, त्यात मला पुण्यात चोखीदानी की असल्याच कुठल्यातरी ठिकाणी कुंभारकाम केल्याचा तब्बल ५ मिनीटाचा अनुभव होता. त्यात मी चक्क एक भांडे केले होते अर्थात तिथे असलेल्या कुंभाराने थोडीशी मदत केली होती पण भांडे केले होते हे महत्वाचे, तर या अनुभवाच्या जोरावर मी संपूर्ण आत्मविश्वासाने चाकावर काम करायला सुरूवार केली, आम्ही अगदी उत्साहात सरांना विचारले की कुंभार करतो तसा माठ मला करायचा असेल तर किती दिवस सराव करावा लागेल, सर म्हणाले जास्त नाही पण किमान ५-७ वर्ष लागतील ते पण पूर्ण वेळ मातीकाम केले तर. त्यामुळे आमचे विमान लगेच जमीनीवर आदळले.
आमचा पहिला धडा होता, चाकावर योग्य पद्धतीने माती ठेवणे, त्याला सेंटरींग असे म्हणतात... हा हे त्या चोखीदानीत कुंभाराने केले होते म्हणा. त्यात काय चाकावर मध्यभागी माती ठेवायची यात कसले आलय कौशल्य, पण नाही. कुंभारकामातील हे सगळ्यात महत्वाचे आणि आत्मसात करायला तेवढेच कठीण असलेले कौशल्य आहे हे. हे कौशल्य जमल्याशिवाय पुढे काहीच शिकता येत नाही हे कळल्यावर आमचा नाईलाज झाला. आम्हाला त्याचा सराव करणे भाग होते. शेवटी २ महिन्याच्या सरावाने हळू हळू अंदाज यायला लागला की काय करायचे नाही. काय करायचे हे जरी कळत नसले हे काय करायचे नाही हे कळत होते हे ही नसे थोडके. आता मला १ किलो माती चाकावर मध्येभागी ठेवुन सेंटरींग करता येते (सरांच्या मदतीने :))
असा काय फरक पडतो चाकावर मध्यभागी नीट माती नाही ठेवता आली तर... पडतो ना, भांडी सगळ्या बाजूला सारख्या जाडीची होत नाहीत, कमी जास्त उंचीची होतात, तर कधी गोल न होता एकदम वेडीवाकडी होतात.
तर कधी कधी चाकावरून उडून पडतात.
माती काम शिकायला सुरू केल्यावर टप्प्या टप्प्याने भांडी करायला शिकवली जातात. आधी नुसते सिलेंडर सारखे आकार करणे म्हणजे पेन ठेवायचे स्टँड, चमच्याचे स्टँड इ. मग त्या सिलेंडरचा आकार बदलून कॉफीचे मग, त्यानंतर फुलदाणी (Narrow neck forms), त्यानंतर वाडगी (Bowls), प्लेट्स, मग झाकणाच्या बरण्या इ.इ.
मागच्या २ सेमिस्टर मध्ये केलेल्या कामाचे हे फोटो. अर्थात जी भांडी चांगली जमलीत त्याचेच फोटो इथे टाकलेत, न जमलेली कित्येक भांडी तशीच पडून आहेत.
फुलदाणी (Narrow neck forms)
हा माझ्यासाठी करायला अत्यंत कठीण प्रकार आहे. परीक्षेसाठी जेवढी करायची होती तेवढीच केलीत नंतर असे एकही भांडे केलेले नाही.
वाडगे (Bowls)
या सत्रात मी गोल बोल/बाउल बनवून मग त्याला ठोकून आपल्याला हवा तसा आकार बनवणे हे काम केले त्याचीच ही काही उदाहरणे. आकार बदलणे (altering forms) हा प्रकार करायला मला खूप मजा आली.
Serving Bowls
सॉस,चटणीसाठी छोट्या वाट्या
त्रिकोणी वाट्या:
ह्या चुकुन एकातल्या एक मापाच्या झाल्यात त्या खर तर मला एकाच आकाराच्या करायच्या होत्या. पण एकसारख्या आकाराची भांडी करणे हे कौशल्य मला यायला अजून १-२ वर्ष लागतील.
चौकोनी पोलका डॉट वाडगे
झाकण असलेल्या बरण्या (Lided Forms)
झाकण असलेली भांडी या प्रकाराने आम्हाला खूप त्रास दिला. मातीची बरणी तयार करायची, मग लगेच त्याचे माप घेवुन झाकण तयार करायचे की झालं. खरी मजा येते ते ती भांडी भट्टीतून भाजुन आल्यावर, एकाही बरणीचे झाकण तिला नीट लागत नाही.
मला वेगळे झाकण नीट करता येते, नुसती बरणी पण नीट करता येते पण बरणी आणि तिला बसणारे झाकण हा सेट एकत्र तयार करणे हे प्रकरण अज्जिबात झेपत नाही. त्यासाठी आमच्या सरांनी सांगीतलेला उपाय आम्ही वापरतो ते म्हणजे एका बरणीला ४-५ झाकणं करायची आणि त्यातले जे नीट बसते ते शेवटी लावायचे. हाय काय अन नाय काय.
अर्थात एवढे करूनही नीट लागणारे झाकण मिळते याची शाश्वती नाही.
ही काही त्यातल्या त्यात जमलेली झाकणाची भांडी:
लसूण ठेवायचे भांडे, Garlic Jar (या बरणीला हवा खेळती रहावी म्हणून छिद्र पाडलेली असतात)
चटण्य/दही ठेवता येईल अश्या बरण्या :
छोटे झाड लावायची कुंडी, याला पाण्यासाठी असते ती ताटली जोडलेली आहे.
भट्टीत भाजतांना तडा गेलेल्या भांड्याचा उपयोग
आणि हे माझे अत्यंत आवडते प्रकार, हॅन्ड बिल्डींग प्रकारातले. २ सेमिस्टर चाकावर काम केल्यावरही माझा आवडता प्रकार हॅन्ड बिल्डीग हाच आहे आणि पुढे पण राहील. जगातले कुठलेही काम त्याच्याइतके रिलॅक्सींग नाही यावर मी ठाम आहे. खर वाटत नसेल तर करून बघा तुम्ही पण अन सांगा धमाल येते की नाही ते.
इथे फॉल मध्ये खूप पानगळ होते, रस्त्यावर चालतांना नेहमी वेगवेगळ्या आकाराची, रंगाची पाने दिसत असतात, ती पाने क्लास ला जातांना गोळा करायची असा एक अलिखित नियम सगळ्या विद्यार्थ्यांचा होता. मग सगळी पाने वर्गात आली की त्यातली सर्वानुमते आवडलेली पाने बाजुला काढली जायची.
मग सगळ्यांनी मोठी मातीची पोळी लाटायची (slab) त्यावर ही पाने ठेवुन त्या पानाच्या आकाराची माती कापायची आणि हवा तो आकार देवुन वाळवायची. आमच्या वर्गात यावर्षी खूप पानगळ झाली. कधीही बघीतले तरी सगळे जण पानांच्या आकाराची भांडीच तयार करते होती. त्यातुन आकाराला आलेली ही माझी काही पाने
पानांचे कँडल स्टँड
अजून एक
काही हिरवी, मोरपंखी पाने
Platter :
खर तर ही मोठी डिश सरांनी डेमो देतांना बनवली आणि मला दिली, मी ती घरी आणून नवर्याला दिली, त्याने ती रंगवली. मी फक्त भट्टीत भाजून आणली त्यामुळे याचे सगळे श्रेय त्यांचेच.
आमच्या कॉलेजमध्ये दर वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात क्रिसमसचा शो असतो त्यात पॉटरी क्लास मधले विद्यार्थी स्वतः बनवलेली भांडी विकतात व आलेले सगळे पैसे कॉलेजच्या एज्युकेशन फाऊंडेशनला डोनेट करतात. वरच्या चित्रातली अर्ध्याहुन जास्त भांडी मी त्या शो मध्ये डोनेट केली होती, मुख्य म्हणजे सगळी विकली गेली. त्यामुळे आपण केलेली भांडी लोकांना आवडतात हा आत्मविश्वास मिळाला
आम्हाला यावर्षी ही भांडी विकुन ३२०० डॉलर मिळाले. त्या डोनेशन मधुन कॉलेज शैक्षणिक साहित्य विकत घेते.
या क्लास मुळे एक झाले चाकावर मातीकाम करायला किती कष्ट लागतात, कुंभाराला किती मेहनत घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो हे सगळे कळले आणि एवढे करून त्याची कला अगदी मातीमोल(!) भावाने विकली जाते. त्यामुळे मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला की भारतात आपण रस्त्यावर, इतरत्र कुंभाराकडून जी मातीची भांडी विकत घेतो माठ, सुरई, पणत्या, मडकी इ.इ. त्यासाठी मी कधीही घासाघीस करणार नाही. कारण त्यांनी कितीही किंमत लावली तरी त्या भांड्यांसाठी कुंभाराने केलेल्या कष्टाचे मोल आपण दिलेल्या पैश्याहून खूप जास्त असते.
झकास पॊटरी...... फ़ोटोग्राफ़ी
झकास पॊटरी...... फ़ोटोग्राफ़ी आणि प्रेझेंटेशनही सुरेख. आवडलं
रुनी- खल्लास आहेत गं भांडी.
रुनी- खल्लास आहेत गं भांडी. स्वतःच्या भांडी वापरताना काय अप्रुप आणि समाधान वाटत असेल गं.
आमच्या मेल्या बोटात कला नाही ती नाहीच यावर पुन्हा एकदा उसासा टाकला.
मस्तच गं रुनी!
मस्तच गं रुनी!
सुंदर खरेच मस्त कला आहे हातात
सुंदर खरेच मस्त कला आहे हातात
रूनी - काय एक से एक भांडी आणि
रूनी - काय एक से एक भांडी आणि पानांची कल्पना तर अफलातूनच !!
अ प्र ति म ... मस्तच
अ प्र ति म ... मस्तच
काय सुंदर बनवली आहेस ग भांडी.
काय सुंदर बनवली आहेस ग भांडी. सुंदर कला आहे हातात.
पु. मा. प्र. शु.
आय हाय रुनी, कसलं भारी
आय हाय रुनी, कसलं भारी केलयस..
मस्तच..
चालु राहु दे..
रुनी मस्तच ग एकदम, मस्त कला
रुनी मस्तच ग एकदम, मस्त कला आहे तुझ्या कडे
अ प्र ति म ! ! ! >> गोल
अ प्र ति म ! ! !
>> गोल बोल/बाउल बनवून मग त्याला ठोकून आपल्याला हवा तसा आकार बनवणे
मातीचे भांडे ठोकायचे?!! मजा वाटली वाचताना...
>> कुंभाराकडून जी मातीची भांडी विकत घेतो माठ, सुरई, पणत्या, मडकी इ.इ. त्यासाठी मी कधीही घासाघीस करणार नाही.
बरोबर!
वॉव रुनी.. एकापेक्षा एक
वॉव रुनी.. एकापेक्षा एक अप्रतिम भांडी आहेत. नुसती बघत रहावित अशी... रंगवलीत पण सुरेख.
आई शप्पथ! अल्टीमेट
आई शप्पथ! अल्टीमेट !!
कुंभाराचं फिरणारं चाक आणि त्यावर आकार घेणारा मातीचा गोळा बघणं हे माझं अत्यंत आवडीचं काम आहे.
(चोखी धाणीत मी पण एक चिंटुकलं भांडं बनवलं होतं. :हाहा:)
पानगळ आणि कँडल स्टँन्ड्स मस्तच.
बरण्या आणि झाकणांबद्दल वाचून मजा आली.
कुंभाराला किती मेहनत घ्यावी लागते, वेळ द्यावा लागतो हे सगळे कळले आणि एवढे करून त्याची कला अगदी मातीमोल(!) भावाने विकली जाते.
अगदी खरंय
जिथे संपुर्ण भांडे एकाच
जिथे संपुर्ण भांडे एकाच रंगाचे आहे ते समजु शकतो पण जेव्हा एकाच भांडयात वेगवेगळे रंग असतात तेव्हा कसे करतात ? फिनिशिंगहि मस्त जमलय.
पॉटकर, सही आहे ग. एकदम फंडू.
पॉटकर,
सही आहे ग. एकदम फंडू.
मस्त ग! मिनोतीनी केलेली भांडी
मस्त ग! मिनोतीनी केलेली भांडी आठवली मला मिनोती लिंक टाक ना असेल तर मजा येइल बघायला.
ती पानं लैच आवडली मला.
सुपर्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्
सुपर्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब्ब
काय सुंदर जमल्येत सगळी
काय सुंदर जमल्येत सगळी भांडी!
पानाचे candle stands मस्त आहेत!
रूपाली? काय स्सॉलिड केलंयस
रूपाली? काय स्सॉलिड केलंयस गं. अंगातल्या क्रिएटिव्हिटीला अगदी पूर्ण स्कोप. मलाही हे काम खूप शिकावंसं वाटायला लागलंय.
मस्त काम आणि लेखही.
छानच. सगळीच आवडली आणि केवढी
छानच. सगळीच आवडली आणि केवढी ती विविधता.
आपल्या मायबोलीवर भरपूर कलाकार आहेत.
मस्त!!! झाकणाच्या बरण्या,
मस्त!!!
झाकणाच्या बरण्या, पाने, फुलदाणी सेट सग्गळेच खूप आवडले.
मस्तच गं रुनी. त्या पानांमधली
मस्तच गं रुनी. त्या पानांमधली काळी पाने आहेत ती धातूची वाटत आहेत. कसलं सुंदर फिनिशिंग जमलयं.
केवळ महान आहेस!!
केवळ महान आहेस!!
मस्त गं रुनी.
मस्त गं रुनी.
किती सुंदर अन अप्रुप! गुणी
किती सुंदर अन अप्रुप! गुणी पॉटर.. अगदी, अगदी! काही तर मातीची आहेत यावर विश्वासच नाही बसला.
(आयडीतल्या 'पॉटर'चा सस्पेन्स आज कळला. )
वाव... काय मस्त केलीत
वाव... काय मस्त केलीत भांडी.... अप्रतिम...
अप्रतिम! किती सुंदर बनवल्यात
अप्रतिम! किती सुंदर बनवल्यात सगळ्या वस्तु रुनी... रंगवल्यात पण खूप छान.
खुपच सुंदर. ऑर्डर कधीपासुन
खुपच सुंदर. ऑर्डर कधीपासुन घेणार? त्यात माझाही नंबर लावा.
सुंदर आहेत सगळे पॉट, रंगसंगती
सुंदर आहेत सगळे पॉट, रंगसंगती पण मस्त जमलीय.
सुरेख !!! हातात जादू आहे
सुरेख !!!
हातात जादू आहे तुझ्या.
खूपच मस्त !!! सहीच.
खूपच मस्त !!! सहीच.
Pages