दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व चॅनेल वर दाखवली बातमी.

सरांना श्रद्धांजली

सुहानीची बातमी वाचून धक्का बसला. वैद्यकीय निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू ओढवला अशी बातमी होती

खूप गोड मुलगी होती ती सुहानी.बहुतेक स्किन कंडिशन साठी इम्युन सप्रेस करणारं काही द्यावं लागलं, आणि इम्युन सप्रेस झाल्याने इन्फेक्शन असं झालं.वाचलं होतं, आठवत नाहीये.

मनोहर जोशी व सुहानी दोघांनाही श्रद्धांजली _/\_

वैद्यकीय निष्काळजीपणामुळे सुहानीचा मृत्यू झाला का? सुहानीला झालेला आजार दुर्मिळ होता त्यामुळे त्याचं निदान होणे व योग्य उपचार मिळणे कठीण गेलं असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितल्याच वाचलं काही ठिकाणी ...

केवळ स्किन कंडिशन असेल तर जिवघेणे नसावे पण या आजारांत सोबत स्नायू कमजोर (progressive muscle weakness) होणे हा प्रकार पण आहे.
https://www.mayoclinic.org/diseases-conditions/dermatomyositis/symptoms-...

auto immune disorder संदर्भातल्या आजारांवर उपाय आहेत/ असतील पण त्या उपायांचे गंभिर दुष्परिणाम देखिल आहेत. आजारावर उपचार, आणि immune system किती सप्रेस करायची , किती काळ ? आजार आणि उपाय यामधे ताळमेळ साधणे तारेवरची कसरत आहे आणि उपचारा दरम्यान गुंतागुंत वाढू शकते.

श्रद्धांजली .
चिठ्ठी आई है, और अहिस्ता, कीजे बाते आणि अनेक सुंदर गझला.

श्रद्धांजली .
चिठ्ठी आई है, और अहिस्ता, कीजे बाते आणि अनेक सुंदर गझला.>>>>+११११

नोबेल विजेते भौतिकज्ञ पीटर हिग्ज यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन. RIP _/\_

हिग्ज क्षेत्र आणि हिग्ज बोसॉन या दोन्ही मुळे विश्व अस्तित्वात आले असा सिद्धांत त्यांनी दशकांपूर्वी मांडला. २०१२ साली केलेल्या CERN च्या प्रयोगात हिग्स बोसॉनचे अस्तित्व शोधण्यात संशोधकांना यश आले.

खूप दुर्दैवी घटना आहे.इतके मोठे होर्डिंग लावताना हे डोक्यात आले नाही का?पुण्यात जुना बाजार होर्डिंग मुळे झालेली घटना अलिकडचीच आहे.पैसे, जाहिरात, उत्पन्न सुरक्षिततेपेक्षा महत्वाचे झाले का?
फेसबुकवर भक्ती चापळगावकर यांची पोस्ट वाचून अजून वाईट वाटले.ईश्वर मृतांच्या नातेवाईकांना यातून सावरण्याची शक्ती देवो आणि सुरक्षिततेशी असे खेळ करणाऱ्या उद्योगपतींना अक्कल देवो Sad

होर्डिंग्ज वर कसलेच नियंत्रण नाही. शहरे विद्रुप झालेली आहेत होर्डिंग्ज मुळे.

जेवढी परवानगी होती त्यापेक्षा तिप्पट का चौपट लांबी रुंदी होती त्याची असे कालच वाचले. किती भयंकर घडले असेल Sad आणि आता नेहमीप्रमाणे एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे लांच्छनास्पद उद्योग सुरू आहेत.

भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात संरक्षण समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले कर्नल वैभव अनिल काळे गाझा मधील राफा प्रदेशात मारले गेले. Sad

Pages