Submitted by मुग्धमानसी on 9 February, 2024 - 10:55
कधीकधी उगाचच
स्मृतींशी निगडीत मेंदूतल्या काही पेशी
चाळवतात काही जुन्या चवींना.
आणि जीभेला संदेश जातात...
शिजवावे, खावे, चाखावे,
भोगावे त्या चवीला. पुन्हा एकदा.
पण कसे?
तीच चव गाठण्याची प्रक्रीया नक्की आठवत नाही आता नीट.
जे सापडलं इंटरनेटवर ते जुळलं नाही स्मृतीसोबत
आणि तुला करावा कॉल आणि विचारावं पूर्वीसारखं...
अरे हो... ती सोय आता राहीली नाही.
लक्षात आलं.
आठवणींच्या आधारे शिजवलेल्या त्या पदार्थाला जेंव्हा आला तो जुना ओळखीचा वास
रडू आलं गं मला!
भूक नाही आता.
जेवू वाटत नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आई गं. काय कमाल लिहिलंय
आई गं.
काय कमाल लिहिलंय
ओह
ओह
सुंदर
सुंदर
पोचली.
पोचली.
(No subject)
Relate झाली
Relate झाली
(No subject)
आई ग्ग, पोचली
आई ग्ग, पोचली
(No subject)
<<आणि तुला करावा कॉल आणि
<<आणि तुला करावा कॉल आणि विचारावं पूर्वीसारखं...
अरे हो... ती सोय आता राहीली नाही.>>
गेले दीड वर्ष क्षणोक्षणी हाच अनुभव घेतेय..
अजूनही वाटते की हाक मारली तर ओ येईल पण तिची..
पण नाही हाक मारत कारण ओ नाही आली तर नंतरचे तुटणे आता सहन होणार नाही...
कारण ओ नाही आली तर नंतरचे
कारण ओ नाही आली तर नंतरचे तुटणे आता सहन होणार नाही...
धन्यवाद
धन्यवाद
अजूनही वाटते की हाक मारली तर
अजूनही वाटते की हाक मारली तर ओ येईल पण तिची..
पण नाही हाक मारत कारण ओ नाही आली तर नंतरचे तुटणे आता सहन होणार नाही...
हे असच वाटत मलाही.... आता फक्त वाट बघतेय कि त्या वाटेवर तरी भेटेलच ती