आपल्या रोजच्या रुटीन मध्ये, घाई गडबडीत अनेक कचऱ्यात टाकण्या योग्य गोष्टी निर्माण होतात.त्यांच्या बद्दल हा धागा.
१. कचरा ओला+अधिक सुका मिश्र असेल (उदाहरणार्थ बिर्याणी पार्सल मध्ये बिर्याणी, प्लास्टिक पिशवीत ग्रेव्ही, दही,कांदा, लोणचे/ढोकळा समोसा बरोबर मिळणाऱ्या चटण्या/विकतच्या इडली डोसा पार्सल घेतल्यावर मिळणाऱ्या अनेक पिशव्या सांबार चटणी आणि लाल चटणी), तर वर्गीकरण कसे करता?घरात मदतनीस असेल तर त्यांना हे वर्गीकरण करायला कसे पटवता?
२. पर्सनल हायजीन च्या गोष्टी (प्लास्टिक टूथ ब्रश, इयर बड, हेअर कलर पाकिटात मिळणारे अनेक प्लास्टिक मोजे, रेझर्स) टाकताना काय करता? काही वेगळे रिसायकल चे विचार डोक्यात येतात का?(काही जण जुन्या झालेल्या बाद टूथ ब्रश ने बेसिन घासतात किंवा कंगवा साफ करतात.पण याने होणारा रियुज अगदी थोडा.) रेझर्स टाकताना कोणाला लागू नये कचरा स्टाफ ला म्हणून काही विशेष काळजी घेता का?पॅड वेगळ्या बॅग मध्ये टाकता का?(इथे 'सगळ्या बायकांनी कप वापरा' हे उत्तर अपेक्षित नाहीये.काही कारणाने वापरता न येणारे बरेच आहेत.
3. प्लास्टिक ला पर्याय म्हणून कंपन्या काचेच्या बाटल्या देतात.काच आमचे भंगारवाले घेत नाहीत.काचेच्या बाटल्या ग्लास यांचे टाकताना काय करता?काच फुटल्यास वेगळ्या पिशवीत टाकता का?
4. प्लास्टिक रियुज म्हणून सुचवलेले उपाय बरेचदा अगदी एखादा आयटम खपेल असे किंवा चार आणे ग्रेव्ही बारा आणे मसाला असे असतात.असे काही घाऊक उपाय हौसेने करता का?
5. काच/प्लास्टिक/इ कचरा गोळा करणाऱ्या संस्था आजूबाजूला आहेत का?जुन्या बॅटरी क्रोमा मध्ये त्यांच्या बिन मध्ये टाकता येतात.
6. घरातले सिंक मधले, बेसिन चे वाया जाणारे पाणी परत वापरात आणायला काही सोपे उपाय करता का?
मी_अनु, यांनी लिहिलेला
मी_अनु, यांनी लिहिलेला प्रतिसाद माझ्यासाठीच लिहिल्यासारखा आहे.
आणि अमित म्हणताहेत, तेही खरं आहे. आमच्या कॉलनीत लॉकडाउनच्या आधी एका एन जी ओ ने ओल्या आणि सुक्या कचर्यासाठी वेगवेगळ्या बिन्स घरोघर वाटल्या. प्रत्येक घरी जाऊन सॉर्ट कसं करायचं ते सांगितलं. त्याबद्दलची माहितीपत्रकं दिली. यातलं बरंचसं मी आधी पासून करत होतो, त्यामुळे मला काही फरक पडला नाही. सोसायटीने कचरा गोळा करणार्या महिलेला त्याबद्दल सांगितलं. मनपा आपल्याला दंड करेल हे समजावलं. तिनेही यापुढे तुम्ही ओला कचरा, सुका कचरा वेगळा दिला नाहीत, तर तुमचा कचरा घेणार नाही, असं काही मेंब्रांना धमकावलं. एकदोनदा तिच्यासोबत आमच्या विंगमधल्या कमिटीमेंबरने येऊन लोक नियम पाळतात का नाही ते पाहिलं.
पण लॉकडाउनमध्ये लोकांना सगळा कचरा त्या काळ्या गार्बेज बॅगमध्ये भरून ती बांधून द्यायची सवय लागली. (तेव्हा कचरा खाली नेऊन सोसायटीच्या डब्यात टाकावा लागे) तेव्हापासून सॉर्ट करो बंद पडलं ते कायमचं. आता ती फक्त हझार्ड्स वेस्ट असेल तर ते वेगळं पॅक करून द्या एवढंच सांगते. स्वतःच सॉर्ट करते. प्लास्टिकच्या , काचेच्या डबे बाटल्या भंगारवाल्याला विकते. पण प्लास्टिकच्या पिशव्यांना वाली नाही. तो कचरा वेगळा ठेवला तर मनपावाले उचलत नाहीत, म्हणून मी तो ओल्या कचर्यातच टाकते असे तिने मला सांगितले आहे. तरीही माझी चटण्या, दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुवून वाळवून मग कचर्यात वेगळ्या द्यायची सवय कायम आहे.
मध्ये प्लास्टिकच्या पिशव्या व अन्य रिसायकलेबल कचरा घरी येऊन घेऊन जाणार्या एका एन जी ओ बद्दल कळलं. त्यांना मासिक देणगी सुरू केली व दोन पंधरवड्यांत त्यांनी आमच्या घरून हा कचरा नेलाही. पण पुढे त्यांना त्याच्या रिसायकलिंगमध्ये अडचणी आल्याने त्यांनी ते काम बंद केलं.
हल्लीच आमच्या इथल्या रेल्वे स्टेशनवर एक कचरा वेचक महिला (कर्मचारी?) शेजारी शेजारी असलेल्या ओल्या आणि सुक्या कचर्याच्या बिन्समधला कचरा एकाच मोठ्या झोळीत भरताना पाहून एका प्रवाशाने तिचे व्हिडियो शूट केले व तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
बरेच कचरा वाले हे करतात.शिवाय
बरेच कचरा वाले हे करतात। वेळ नसल्याने किंवा एकूण उत्साह नसल्याने.शिवाय घरातून देताना वर्गीकरण करत नाहीत लोक.किंवा ओला कचरा सुका कचरा काय हेच माहीत नसतं.त्या न्यायाने ओली दुधाची प्लास्टिक पिशवी ओल्या कचऱ्यात जाते.
मी सिंक पाशी एक बाउल ठेवते, त्यात सर्व ओला कचरा जमवून दिवसाच्या शेवटी सोसायटी ने दिलेल्या हिरव्या कचरा डब्यात टाकते या डब्यात घरात असेल तर कंपोस्ट पावडर पण टाकत राहते.आणि हा डबा पाऊण भरला की बाहेर ठेवते.आधी कंपोस्ट करायचे.पण कल्चर चांगली वेगाने कंपोस्ट बनवणारी मिळत नाहीयेत.शिवाय कंपोस्ट चे फायनल प्रॉडक्ट एकदम ढेकळे बनते.लोकांचे बनते तसे चुरा बनत नाही.एक दोन वेळा या डब्यात झुरळं आणि डब्यावर पाल पहिली तेव्हापासून उत्साह कमी झाला.आता डबा रिकामा केलाय.चांगलं कंपोस्ट कल्चर मिळालं की परत चालू करू.
धन्यवाद Mi _ anu
धन्यवाद Mi _ anu
वेगळा आणि उपयुक्त धागा काढल्या बद्द्ल....
घरात कचोरी, बटाटावडा, समोसा याबरोबरच आलेल्या ओल्या चटण्या हिरवी व चिंच गुळाची वाटीत काढून मग त्या पिशव्या धुवून पुन्हा वापरणे. काही बारीकसारीक वस्तू देण्यासाठी वापरणे. Zip lock पिशव्या बॅगेत ठेवून प्रवासात किंवा ट्रेकिंगला गेल्यावर बिया गोळा करायला वापरतो.
सॉस ची पाकिटे डब्यात वा प्रवासात वापरतो.
ओरेगानो चिल्ली फ्लेक्स सलाड वर टाकून लवकरात लवकर संपवणे.
काच फुटल्यावर, तसेच रेझर वर्तमान पत्रात दोऱ्याने बांधून कचरा देताना वेगळा देतो.
प्लास्टिक व ई कचऱ्या साठी सध्या तरी भंगार वाल्याला देतो.
Western लाईन ल बोरिवली दहिसरच्या आसपास रिसायकल करणारे कोण असल्यास कळवणे.
बाकी भाज्या निवडल्यानंतर होणारा बराच कचरा कंपोस्ट म्हणून वापरतो तरीही प्लास्टिक रॅपर यासारख्या बऱ्याच बारीक सारीक कचरा सुका कचऱ्यात जातो.
इथे आणखी मार्गदर्शन नक्की मिळेल.
Purifier चे पाणी वाया जाऊ नये
Purifier चे पाणी वाया जाऊ नये म्हणून : एक मोठं पातेलं किंवा बकेट ठेवून drain चं पाणी भरून घेतो, ते bathroom च्या स्टोरेज बकेट मध्ये use होतं.
आमच्याकडे सुका कचरा रविवारी
आमच्याकडे सुका कचरा रविवारी आणि बुधवारी नेला जातो. त्यामुळे काहीच प्रश्न नसतो.
काचेच्या बॉटल ते वेगळ्या नेतात. कोरोना काळात प्लास्टिक विकत घेणाऱ्या भंगार वाल्यांनी ते बंद केलं होतं. जुने टिव्ही, संगणक मॉनिटर, टुइनवन, म्युझिक सिस्टिम घेणारा एक भंगार वाला आहे. त्याला लोक देतात. जड वस्तू त्याचा माणूस घरी येऊन नेतो.
विकतच्या इडली डोसा पार्सल घेताना मिळणाऱ्या चटण्या घेतच नाही.
घरातले सिंक मधले, बेसिन चे वाया जाणारे पाणी परत वापरात आणायला सोसायटीच्या ब्लॉकमध्ये काही उपाय नसतो.
माझा रिसायकल वरचा विश्वास
माझा रिसायकल वरचा विश्वास अगदी उडालेला नाही म्हटलं तरी खूप कमी झालेला आहे. रीसायकल करतो हे आपला इगो पँपर करणे किंवा आपण कित्त्ती पर्यावरणाची काळजी घेतो याकरता. हे केलं की आपलं काम झालं. आपल्या नजरेत आपण वर चढतो. पण ते पैसे आणि पर्यावरण दोन्ही दृष्टीने फार किफायतशीर नाही.
रिड्युस, रीयुज, रीपर्पज ह्यात जे होईल ते खरं. रिसायकल फार खर्चिक आणि थँकलेस प्रोसेस आहे. बरेचदा ती क्लोज्ड लूप होत नाही. म्हणजे वाईन बॉटलची वाईन बॉटल होत नाही, पाण्याच्या बाटलीची पाण्याची बाटली होत नाही. डाऊनसायकल होते फारतर.
फार श्रम करुन ते करणं कितपत बरोबर याचं माझ्या डोळ्यासमोर स्वच्छ उत्तर नाही.
कमी होतो खरा विश्वास. एक
कमी होतो खरा विश्वास. एक गोष्ट वाचवायला दुसरी खर्च होते.पेट्रोल वाचवायला होम ऑर्डर करावं तर त्याबरोबर भरपूर प्लास्टिक येतं.चालत जाऊन जवळून घ्यावं तर महाग आणि ताजं नसलेलं मिळतं.
पण त्यातल्या त्यात करायचा प्रयत्न.हे घरगुती पातळीवर. मोठे राजकीय समारंभ, हॉटेल्स यात किती नासाडी किती प्लास्टिक कचरा निर्माण होतो याची तर गणतीच नाही.
जोवर प्लास्टिक पचवणारे एंझाईम निघत नाही तोवर पूर्ण 100% प्लास्टिक विरहित जगणे अशक्य आहे.
खूप चांगला उपयुक्त धागा.
खूप चांगला उपयुक्त धागा. भारता साठी आहे असे गृहित आहे.
इथे सिंगापोरात ओला, सुका(प्लॅस्टिक, पेपर कंटेनर्स, दुधाच्या प्लॅस्टिक बाटल्या, फळांचे प्लास्टिक पारदर्शक डबे, पिशव्या) हे वेगळे फेकतात. काच, कॅन्स साठी वेगळा डबा खाली असतो. ओला कचरा प्रत्येक फ्लोअर वर डक्ट असतो त्यात टाकायचा. सुका, काच खाली जाऊन त्या-त्या मोठ्या कंटेनर मधे टाकायचे. न कंटाळता हे काम करतो.
जर्मनी ला १८ वर्षांपुर्वी देखिल ही अशी सीस्टम होती.
माझा प्रतिसाद कदाचित भारता साठी लागू नाही सॉरी पण शेयर केले. जुन्या बॅटरी & फुटलेले काच वस्तू वेगळ्या १ रुबर लाऊन साईड ला ठेवते/गोळा करून १ प्लॅस्टिक मधे फेकते. कचरे वाले नेतात. भारतात माझे बाबा काळ्या जास्त जाडीच्या री युसेबल थैल्या आणुन वापरतात.
वैयक्तिक लेव्हल वर आता घरी
वैयक्तिक लेव्हल वर आता घरी पार्टी असेल तर स्टील प्लेट्स्/काच असे री युसेबल किंवा बायो डीग्रेडेबल वाले डीस्पोजेबल प्लेट्स वापरते. ग्लास स्टील/ काचेचे. डीश वॉशर नाही, पण बाई आहे म्हणुन जे डिश वॉशर वापरतात त्यांच्य वर काही ताशेरा नाही, पण ४-५ फॅमिली साठी वापरू नये असे वाटते, ज्याने त्याने आपापली ताट वाटी घासली तर फार ताण पडत नाही.
सिंक पाणि परत वापण्या बद्दल - सोसायटीत ते शक्य नाही..बंगला असेल तर ते पाणी बागेला सोडण्याची सोय शक्य आहे.
कुठलंही लिहिलेलं चालेल.
कुठलंही लिहिलेलं चालेल.
प्रगत देशात ही सिस्टम पाहिली आहे, चांगली मॅनेज पण होत असावी.
पुण्यात जिथे गावठाण-आता जमिनी घेऊन झालेल्या शहरी सोसायटी हे जिथे एकत्र येतं तिथे मोकळ्या जागी थेट कचऱ्याचे ढीग असतात.डंपर च्या मागच्या भागासारख्या दिसणाऱ्या कचरा कुंड्या असतात पण कमी पडत असाव्या बहुतेक.आजूबाजूला कचरा भरून वाहत असतो.बहुधा या वस्त्या लहान असताना सिस्टम एकदम नीट चालत असावी.शहरी सोसायटी मधून कचरा गोळा होऊन पुढे काय होतं माहीत नाही.त्यामुळे त्यांना दृष्टीआड सृष्टी असते.
हिंजवडी मध्ये निवासी हॉटेल्स जास्त झाल्याने कधीकधी संध्याकाळी चालायला निघालेले, व्हिडीओ काढणारे परदेशी दिसतात.काढो बापडे. त्यांच्या व्हिडिओ काढण्यानं जर परिस्थिती बदलणार असेल तर वैसा सही.
पालिका कर्मचारी अगदी नियमित 8.30 ला ट्रक ने कचरा गोळा करताना दिसतात.त्यामुळे बहुतेक हा भरून वाहणारा कचरा जास्त लोकसंख्या, जास्त उलाढाली यांचा परिणाम असावा.
मागे मला ओला कचरा सुका कचरा
मागे मला ओला कचरा सुका कचरा वर्गीकरणाबद्दल प्रश्न पडलेले तेव्हा हा धागा काढलेला
ओला कचरा - सुका कचरा - https://www.maayboli.com/node/59618
आताच्या सोसायटीत आधीपासूनच ओला-सुका कचरा वेगळ्या डब्यात ठेवला जातो. प्रत्येकाच्या घरीच दोन डब्बे असतात. सफाई कामगार दारात येऊन दोन्ही डब्बे घेऊन जातात.
ईथे नवी मुंबईत रस्त्याकडेला दर शंभर शभर पावलावर कचर्याचे डब्बे टांगले असतात ते देखील दोन दोन असतात. ओला आणि सुका अशी पाटी असलेले. बाकीच्यांचे माहीत नाही, मी काळजी घेऊन तिथेही हे फॉलो करतो. कारण मुलांसोबतच जास्त फिरणे होत असल्याने ओला-सुका कचरा स्वतंत्र विल्हेवाट लावणे हे नेहमीचे काम आहे. सवय झालीय.
धागा वाचला रुन्मेष.
धागा वाचला रुन्मेष. माहितीपूर्ण.
रुण मेष प्लस वन. मी पण रोज
रुण मेष प्लस वन. मी पण रोज ओला सुका वर्गिकरन करतेच. इथे नियमआहेत. उरलेली पिठे वगैरे असले तर ते एका बॅगेत घालून ती बंद करुन दुसृया ओल्या कचर्याच्या बॅगेत ठेवते.
घरी किमो घेतल्या नंतर त्याचा एक मेडिकल हॅजार्ड कचरा येतो. सिरिंज, इंजेक्षने, डिस्पोजेबल ग्लोव्ह्ज, औषधाच्या प्लास्टिक बाटल्या. टेप्स,
ब्यांडेजेस. नी डल. हे सर्व प्लास्टिक बॅग मध्ये गोळा करुन स्वतंत्र विल्हे वा ट. हा सोसायटीच्या सुक्या कचर्यात टाकल्यास ५००० रु. फाइन आहे.
मला क्लीन अप मुंबई मोहिमेचा व
मला क्लीन अप मुंबई मोहिमेचा व ट्रक्स चा फार अभिमान आहे. एकदा मी सकाळची कुत्रा फिरवायला गेले होते. गणपतीचे दिवस होते. तर नेहमी
प्रमाणे क्लीन अप चा ट्रक आला. त्यांनी गजानना श्री गणराया गाणे लावले होते. मला एकदम एकदम भरून आले. आपले मराठी लोक्सच मुंबई साफ ठेवतात. हे एक फार मोठे व अवघड टास्क आहे.
बहुतेक पुण्यात(pcmc मध्ये)
बहुतेक पुण्यात(pcmc मध्ये) कचरा वर्गीकरण मुंबई इतक्या सिंसीयरली होत नसावं.
ओल्या कचर्याच कंपोस्ट करते
ओल्या कचर्याच कंपोस्ट करते तरीही कांदा,लसूण, पपई,डाळींबाची सालं, आमटी भाजीतील मिरची, आमसुले हे त्यात टाकत नाही. ते आणि सुका कचरा वेगळा करून देते. फुटक्या काचा, औषधाची काचेची /प्लस्टिकची बाटली, साफसफाईसाठी आणलेल्या लिक्विडच्या रिकाम्या बाटल्या हे सर्व वेगळे ठेवते. RO चे पाणी लादी पुसायला, पायपुसणी धुवायला वापरते.
पुण्यात मी राहतो तिथे व आमची
पुण्यात मी राहतो तिथे व आमची सदनिका भाड्याने दिली आहे तिथे दोन्ही कडे लोक ओला व सुका कचरा वेग्वेगळा ठेवतात. कचरा न्यायला येणार्या गाड्यांमधे सुद्धा तो दोन वेगवेगळ्या कप्प्यांमधे ठेवला जातो. त्या गाड्या पुढे जाऊन परत एका ठिकाणी वर्गीकरण केले जाते. तिथे परत ओला कचरा व सुका कचरा यांचे दोन वेग्वेगळे ढिग असतात.
मी ओला कचरा biodegradable bags मधे टाकून ती बॅग कचर्याच्या डब्यात टाकतो.
खताचा प्रयोग केला पण माझ्या घरात निर्माण होणारा कचरा, त्या सेट अप मधे लागणारा वेळ, त्याला लगणारी जागा वगैरे गणित जमेना. म्हणून आता ओला कचरा सरळ फेकून देतो किंवा शक्य असेल तेव्हा जमिनीत पुरतो.
मी हल्ली दोनेक वर्षं कंपोस्ट
मी हल्ली दोनेक वर्षं कंपोस्ट करत नाही कारण सोसायटीत कॉमन कंपोस्टिंग करतात. त्यामुळे फक्त ओला, सुका आणि सॅनिटरी ( यात कापलेली नखं वगैरे सगळंच ) कचरा वेगवेगळा करून देते. काचेची बाटली, कप, ग्लास वगैरे फुटला असेल तर वेगळ्या प्लास्टिक किंवा कागदी पिशवीत भरून ठेवते.
वर्गीकरण करायला जमतं, पण मुळात कोरडा कचरा ( धान्याच्या, इतर किराणा मालाच्या, खाऊच्या प्लास्टिक पिशव्या, खोके, तुपाचे वगैरे तसे पातळ असलेले प्लास्टिकचे डबे, कधी खाण्याचं पार्सल मागवलं तर ते पॅकिंग, ऑनलाइन ऑर्डर केलेल्या वस्तूंचे खोके, बबल रॅप असा विविध प्रकारचा) खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो घरात. यावर त्यातल्या त्यात एक उपाय म्हणजे डाळी, धान्यं मोठ्या प्रमाणावर आणायची म्हणजे मग एकेक किलोच्या पाच पिशव्यांऐवजी पाच किलोची एकच पिशवी कचरा म्हणून निर्माण होईल आणि मोठी असल्याने तिचा पुनर्वापर होण्याची शक्यता वाढेल. 'मोअर'सारख्या दुकानात सुटी धान्यं कागदी पिशवीत
मिळतात. मी सध्या तरी फक्त तांदूळ तसे आणते. इतरही आणता येतील. प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्या वापरल्या जातील.
ओला अन सुका कचरा वेगळा देतो
ओला अन सुका कचरा वेगळा देतो इथे. पुड्।अं आमच्या हाउसकिपिंग च्या मदतनीस तो अजून वेगळा करून पिएमसी च्या मोठ्या उभ्या ट्रॉलिज मध्ये भरून ठेवतात, पिएमसी चा ट्रक त्या ट्रॉली मशीननी उचलून ट्रकमध्ये जातो आणि तिथून पुढे काय होतं कळत नाही.
सुका कचरा मोठे खोके इ. ते लोक वेगळे घेतात आणि काही खोके, मोठ्या प्लॅस्टिक बॅग्ज वगरे सोसायटी रीयूज करता वापरते.
बाकी फरसाण अणि इतर ऑर्डर्स सोबत येणारी (मी दुकानात असेल तर घेतच नाही शक्यतो; चितळे सोडून) चटणी सॉस ची पाकिटं शक्यतो सिंक मध्ये रिकामी करून कचर्यात जातात. अन प्याकबंद असतील तर आमच्याकडे एक ड्बा करून ठेवलाय त्यात जातात, आणि मग लाग्तील तशी वापरल्या जातात उदा. चिंचेचा सॉस भेळेत, ढोकळ्यावर इ. टॉसा तर खपतोच तसाही, इटालिअन सिझनिंग कधी कोशिंबीरीत, उकडलेल्या मक्यांवर इ.
हो खूप कचरा होतो पॅकिंग चा
हो खूप कचरा होतो पॅकिंग चा.त्यातल्या त्यात खोकी भंगारवाले घेतात.बबल रॅप असाच घरात ठेवलेला असतो(आमच्याकडे एक विअर्ड सवय आहे, जादा उरलेले cfl बल्ब ओढणीच्या बॉक्स च्या तळाला ठेवायची.तिथे त्या बल्ब ना बबल रॅप वापरता येतं.
अमेझॉन बॉक्स मधून हल्ली बबल रॅप ऐवजी कागदाच्या कापलेल्या झिरमिळ्या सॉफ्ट पॅकिंग म्हणून घालतात, त्या कंपोस्ट करते.
सोसायटीच्या कचरा
सोसायटीच्या कचरा व्यवस्थापनामध्ये मी काही काळ लक्ष घालत होते. तिथे काय अडचणी येतात आणि कसं काम चालतं हे बघितल्यावर कमीत कमी कचरा निर्माण करण्याविषयी जास्त जागरुक झालेय.
सोसायटीचा ओला कचरा प्रकल्प असला तरी घरचा सगळा ओला कचरा मी घरातच जिरवते. गॅलरीत आता झाडांपेक्षा कम्पोस्टच्या कुंड्या जास्त झाल्या आहेत.
प्लॅस्टिक कमीत कमी घेरी येईल असं बघितलं जातं. पाण्याच्या बाटल्या विकत घेत नाही, डिस्पोझेबल्स वापरत नाही, छोटे सॅशे घेत नाही. सकाळी नाश्त्याला इडली वगैरे आणायची ठरली किंवा असं प्रिप्लॅन्ड पार्सल असेल तर ते आणायला नवर्याला घरून डबे घेऊन पाठवते.) तरीही बरंच प्लॅस्टिक येतंच. ते सगळं स्वच्छ आणि कोरडं करून महिन्यातून एकदा प्लॅस्टिक वेस्ट संकलनाला जातं. इ वेस्टही प्लॅस्टिकच्या बरोबरच जातं. मधून मधून ते जुने कपडे, खेळणी, बूट, हेही नेतात.
सोसायटीत दर महिन्याला रद्दी संकलन असतं, तिथे रद्दी पेपर जातात. (याचे पैसे एका एनजीओला मिळतात.)
मुलगी लहान आहे, तिला वॉशेबल सॅनिटरी पॅड जमत नाही, त्यामुळे डिस्पोझेबल वापरते. त्यावर कितीही ठळक अक्षरात बायो-डिग्रेडेबल लिहिलेलं असलं तरी ते डिग्रेड तसं होत नाही याची कल्पना आहे. सॉनिटरी वेस्ट सोसायटीमध्ये वेगळा गोळा केला जातो.
फुटलेल्या काचा इ. कधी असतील तर वेगळ्या कागदात गुंडाळून देते.
याव्यतिरिक्त कोरडा कचरा दोन – तीन आठवड्यातून एकदा द्यावा लागतो, रोज कचर्याचा डबा बाहेर ठेवत नाही. नवरा ऑनलाईन खरेदी करतो त्याचा फार कचरा होतो अशी माझी तक्रार असते.
भंगारमध्ये देण्यासारखं काही असेल तर कामाच्या मावशीकडे देते. भंगारवाल्याला ते देऊन जे काही मिळतील ते पैसे तिचे.
मेडीकल हॅझर्ड कचर्या बद्दल
मेडीकल हॅझर्ड कचर्या बद्दल माहित नव्हते थँक्स अमा.
कंपोस्ट करते तरीही कांदा,लसूण, पपई,डाळींबाची सालं, आमटी भाजीतील मिरची, आमसुले हे त्यात टाकत नाही> पण का? सिरियसली विचारत आहे, खोचक पणे नव्हे.
गॅलरीत आता झाडांपेक्षा कम्पोस्टच्या कुंड्या जास्त झाल्या आहेत.>>> गौरी जेनुईन समस्या येत नाहित का? जसे मुंग्या, झुरळं, पाली, डास..
अजून १ लिहायचे राहिले- इथे मोठे कपडे- चादरी, पडदे, किंवा आपले वापरलेले जुने कपडे रीयुज ला देण्या साठी १ मोठी बॅग देतात आणि ६ महिन्या तून १ दा घेऊन जातात. आफ्रिके ला गरीब मुलांना देतात म्हणे. आधी मी जुन्या टॉवेल्स चे नॅपकीन्स बनवून पुसायला वगैरे वापरायचे, पण आता इथे देऊन टाकते.
भारतात जुन्या फर्नीचर & कंप्युटर्/वायरी ची विल्हेवाट कशी लावतात? अगदीच अस्थानी नाही प्रश्न, कारण तो ही कचराच आहे
बऱ्याच मोठ्या कंपनी किंवा
बऱ्याच मोठ्या कंपनी किंवा पर्यावरण ऑर्गनायझेशन इ वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह करतात.अर्थात आपल्याला गरज असेल तेव्हा या असतीलच असे नाही.सध्या आम्ही भंगारवाल्याला देतो इतर प्लास्टिक डबे वगैरे बरोबर.
100% प्लास्टिक इन्फ्लो थांबवायचा तर ब्रँड मध्ये तडजोडी कराव्या लागतायत. त्यामुळे ते जमणार नाही.पण शक्य तितक्या कमी केल्या आहेत.
आमच्याकडे ओला कचरा बुधवार,
आमच्याकडे ओला कचरा बुधवार, रविवार सोडून रोज नेतात. शुक्रवारी सफाई कामगार रजेवर असतो. बुधवार, रविवार सुका कचरा ठेवायचा असतो, त्यात प्लॅस्टीक, काच नेतात.
सांबार शक्यतो आणत नाही, चटणी संपवल्यावर पिशवी धुवून सुक्या कचऱ्यात टाकते. बाकी ठेपले वगैरे कधी आणले आणि लोणचे, सॉस, फोडणीची मिरची वगैरे पाऊचेस येतात. ते मदततीस ताईना हवे असतात, त्यांना देते.
डायपर्स वगैरे कागदात बांधून वरती लाल रंगाची गुणाकार खूण करून ठेवते, सुक्या कचऱ्याबरोबर नेतात आमच्याकडे.
कोविड काळात kdmc तर्फे ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण आणि अंमलबजावणी झाली आणि त्याचं पालन आमच्या सोसायटीत तरी होतं. आम्हाला फक्त घराबाहेर त्या त्या दिवशी ठेवायला लागतो, सफाई कामगार नेतात.
मोठं खराब झालेलं फर्निचर वगैरे मागे पैसे खर्च करून टेम्पोवाल्याला टाकायला द्यायला लागलं होतं.
शेजारच्या मुलाच्या शाळेत काहीतरी प्रोजेक्ट होता, तो जुने कीबोर्ड, माऊस वगैरे म्हणजे ई कचरा असेल तर मागायला आलेला, तेव्हा त्याला दिलेला.
गौरी जेनुईन समस्या येत नाहित
गौरी जेनुईन समस्या येत नाहित का? जसे मुंग्या, झुरळं, पाली, डास. >> ashu29, मुंग्या, झुरळं, पाली काही प्रमाणात होतात, पण कम्पोस्टमधले कीटक त्यातून बाहेर पडत नाहीत. गॅलरीमध्ये हे राहिले तरी माझी हरकत नसते. कम्पोस्ट टी (खाली गोळा होणारे पाणी) साठून राहिले तर डास होऊ शकतात. कम्पोस्ट करताना सुरुवातीला हे माहित नव्हते तेव्हा झाले होते डास. आता होत नाहीत. झाडांसाठी माती न वापरता मी नुसतं कम्पोस्ट वापरते त्यामुळे अजूनतरी कम्पोस्ट ठेवायला जागा कमी पडली नाहीये.
थोडे इ वेस्ट बद्दल :
थोडे इ वेस्ट बद्दल :
एक उपक्रम नुकताच पाहिला.
सर्व TATA Croma क्रोमा दालनांमधे असे इ-वेस्ट काउंटर केले आहेत
मुंबई आणि पुण्यात दोन्हीकडे बघितले. ते व्यवस्थित विल्हेवाट लावतात.
छान मोहीम दिसतेय ही अनिंद्य.
छान मोहीम दिसतेय ही अनिंद्य.
डोंबिवली ठाण्यात ऊर्जा संस्थेतर्फ दर महिना प्लॅस्टिक आणि कधीतरी फर्निचर, ई कचरा विशिष्ट ठिकाणी नेऊन द्यायची मोहीम राबवतात. प्लॅस्टिक आमच्याकडे सुका कचऱ्यात देता येते. हे बाकीचे वर्षातून एक दोनदा त्यांची मोहीम असेल तेव्हा तिथे पोचवायला हवं.
छान मोहीम दिसतेय ही अनिंद्य.
छान मोहीम दिसतेय ही अनिंद्य.
डोंबिवली ठाण्यात ऊर्जा संस्थेतर्फ दर महिना प्लॅस्टिक आणि कधीतरी फर्निचर, ई कचरा विशिष्ट ठिकाणी नेऊन द्यायची मोहीम राबवतात. प्लॅस्टिक आमच्याकडे सुका कचऱ्यात देता येते. हे बाकीचे वर्षातून एक दोनदा त्यांची मोहीम असेल तेव्हा तिथे पोचवायला हवं.
प्लास्टिक साठी ठाणे मुंबई
प्लास्टिक साठी ठाणे मुंबई मध्ये ऊर्जा संस्था आहे.
ठाण्यात समर्थ भारत व्यासपीठ संस्था आहे.
शक्यतो एका एरियातल्या अनेक लोकांनी त्यांना प्लास्टिक कचरा दिला तर कलेक्शन स्वस्त आणि सोपे होऊ शकेल.
आपल्याला नको असलेल्या मोठ्या खूप चांगल्या वस्तू असतील, तर समर्थ भारत कडे देता येतील. त्या वस्तू ते त्यांच्या दालनात ठेवतात, गरजू घेऊन जातात.
आणि ठाणे मुंबई वाशी या एरियात e waste collection साठी अजून एक संस्था आहे. We The Recycling या नावाची.
या दोन्ही संस्थांचे नंबर हवे असतील तर मला संपर्क करू शकता.
-------
कोरड्या कचऱ्यात देखील दोन प्रकारे वेगळा कचरा ठेवते.
स्वच्छ प्लास्टिक, मोस्टली पिशव्या असतात. डबे, बाटल्या, hdpe कॅन, सलाडचे प्लास्टिक डबे जरा धुवून वगैरे या एका कचऱ्यात ठेवते. हा आठवडा दोन आठवड्यांनी टाकता येतो. आणि सोसायटीत गोळा झालेला कचरा ऊर्जा संस्था नेते.
खराब झालेले प्लास्टिक, कागद, कपटे, चिंध्या, इतर बारीक सारीक कचरा एका डब्यात. हा कचरा दोन चार दिवसातून एकदा टाकला तरी चालतो.
छान प्रतिसाद....वाचतोय.
छान प्रतिसाद....वाचतोय.
@सावली, पश्चिम उपनगरात दहिसर बोरीवलिजवल अशी सुविधा आहे का?
Pages