Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाखाचे तिनही आणी अॅनिमल
शाखाचे तिनही आणी अॅनिमल सगळेच कचरा होते..
>>>
अनिमल चान्ग्ला होता
रणबीर सारखा चॉकलेट ईमेजवाला
रणबीर सारखा चॉकलेट ईमेजवाला अॅनिमल वाटू शकतो म्हणजे अॅक्टर म्हणून तो चांगला जमलाय त्या सिनेमामधे नि त्याबद्दल त्याला अवार्ड मिळाले तर अगदीच चुकीचे नाही.
डंकीबद्दल माहित नाही पण पठाण नि जवान मधे शाहरुख तरूण दिसतो ह्याचे अवार्ड शाहरुखला न देता मेकप नि वी एफक्स वाल्यांना द्यायला हवे ना ? बाकी हिट देण्याबद्दल अवार्ड नव्हते तर अॅक्टींगचे होते हि गोष्ट फुटकळ आहे.
शाखा ला आधी एक डझन अवार्ड
शाखा ला आधी एक डझन अवार्ड मिळाल तेवा घराणे शाही नवती>> त्याच्या मुला मुलीबद्दल म्हणत असाल तर आहे घराणेशाही. शारूख मात्र पार दूरदर्शन वर काम करून मग स्वतः पुढे आलेला आहे. अवॉर्ड विकत घेणे तर मग टी सिरीज वाल्यानी अनिमाल करता घेतला असेल. शारुख ला या वेळेस पैसे खर्च नसतील करायचे. हाय काय नाय काय
ऍनिमल बघायचा निष्फळ प्रयत्न
ऍनिमल बघायचा निष्फळ प्रयत्न केला काल रात्री. मला एक पण फ्रेम झेपली नाही. अर्थ कळला तर दूरच.
कोणाला काय एवार्ड मिळालेत हे
कोणाला काय एवार्ड मिळालेत हे कुठे समजेल?
शाहरूख फक्त अवॉर्ड विकत घेतो. बाकीच्यांचे मेहनतीचे असतात. हे लॉजिक बाकी कमाल असते नेहमी..
कारण तो कपूर आहे>>> नाही
कारण तो कपूर आहे>>> नाही रनबीर चे काम कायमच अव्वल असत आले आहे..मेहनती कलाकार आहे. अॅनिमल मी पाहिला नाही वाईट असावा पण त्याची अभिनय क्षमता अफाट आहे त्याने अनिल कपूर लाही खाऊन टाकलय असं कानावर आलं.. शाखा चे तिन्ही चित्रपट टुकार होते अभिनय पण टुकारच होता तोच तोच पणा सगळा..पण ते कुऋ मान्य करणार नाही
पण त्यांनी 12थ फेल ला क्रिटिक अवार्ड दिल्याने माझा राग शांत झाला>>>> सेम हीयर अनू.. आणि रॉकी रानी टुकार सिनेम्या साठी आलिया ला. पण राग शांत करायला राणी मुखर्जी ला नोर्वे साठी दिलाय. राणी नेहमीच राणी राहिल :डोळ्यात बदामः
अवॉर्ड विकत घेणे तर मग टी सिरीज वाल्यानी अनिमाल करता घेतला असेल>> अनुमोदन आजकाल तसेही अवॉर्ड बिकाऊच असतात..घाऊक दराने विकत असावेत
झान्वी, अनन्या & ठोकळा अर्जून
झान्वी, अनन्या & ठोकळा अर्जून कपूर ह्या माननिय लोकांना ही माठ अॅवार्ड मिळालेत
शाखा चे तिन्ही चित्रपट टुकार
शाखा चे तिन्ही चित्रपट टुकार होते अभिनय पण टुकारच होता तोच तोच पणा सगळा..पण ते कुऋ मान्य करणार नाही Wink
>>>>
मी सुद्धा हेच म्हणतो,
शाखा चे तिन्ही चित्रपट उत्तम होते. अभिनय पण दर्जेदार होता. तिन्ही भूमिकांत सॉरी, चारही भूमिकांत विविधता होती. पण ते तुम्ही मान्य करणार नाही Wink
बाकी पोल काढला तर मीच जिंकलो असतो. पण त्याचीही गरज नाही. लोकांनी बॉक्स ऑफिसवर आधीच याचे उत्तर दिले आहे
लोकांनी बॉक्स ऑफिसवर आधीच
लोकांनी बॉक्स ऑफिसवर आधीच याचे उत्तर दिले आहे>>
काही वर्षांपूर्वी सलमानचे सिनेमे बॉक्स ऑफिस वर जोरदार गल्ला खेचायाचे. म्हणजे त्याचं काम चांगलं होतं असा अर्थ होत नाही ना...
म्हणजे त्याचं काम चांगलं होतं
म्हणजे त्याचं काम चांगलं होतं असा अर्थ होत नाही ना...
>>>>
असा अर्थ का नाही होत?
त्यांना ते काम चांगले वाटत असेल म्हणूनच जात असतील ना?
लोकं खराब काम बघायला का वेळ आणि पैसे खर्च करून जातील?
एक बन्दा काफि है साठी मनोज
एक बन्दा काफि है साठी मनोज बाजपेयी चे निदान nomination व्ह्यायला हवे होते award साठी
एक बन्दा काफि है फक्त OTT
एक बन्दा काफि है फक्त OTT रिलीज होता. म्हणुन घेतला नसेल
ओ मेरे शारुककान
ओ मेरे शारुककान
वीट आये मेरे दिल को दुआ कीजिए
आपके धागे आपके फॅन
फिरभी यह झाड छोडते नही
मेरा क्या SSSSS
होSगाSSSSS
पूछो तो जरा
वीट आये मेरे दिल को दुआ कीजिए
पण ते तुम्ही मान्य करणार नाही
पण ते तुम्ही मान्य करणार नाही>> करणार. काही चित्रपटांत त्याने उत्तम काम केलंय. पण टुकार ला टुकार च म्हणणार कारण सगळे आंधळे नसतात.
किलर सूप बघत आहे..सरकलेला डोळा वाला स्क्रीन भाग हाताने झाकून वगैरे बघतेय. मधे मधे नॉन हिंदी डायलॉग्स मुद्दाम टाकलेत का? काश ते कळाले असते खूप च उत्कंठावर्धक वाटला मला तरी.. पण किती खून, किती योगायोग..असो.
मनोज वाजपेयी ह माणुस अभिनय करतोय असं कधी वाटतच नाही..खूप च नॅचरल. पंकज त्रिपाठी सारखा.
जुडवा भुमिकेतले बेअरींग कसे
जुडवा भुमिकेतले बेअरींग कसे सांभाळावे, २ वेगळ्या व्यक्ती एकाच चित्रपटात कशा साकाराव्या ह्याचे उत्तम उदाहरण.
करणार. काही चित्रपटांत त्याने
करणार. काही चित्रपटांत त्याने उत्तम काम केलंय. पण टुकार ला टुकार च म्हणणार कारण सगळे आंधळे नसतात.
>>>>
मी सुद्धा हेच करतो. त्याच्या वाईट पिक्चरला वाईटच म्हणतो. जसे की जब तक है जान, रावण, झिरो, फॅन वगैरे चित्रपटांनी माझी निराशा केलेली. हॅपी न्यू ईयर, दिलवाले वगैरे मला ठिकठाक वाटलेले. चेन्नई एक्सप्रेस, डिअर झिंदगी हे फार आवडलेले... मी त्याचा चाहता आहे. आंधळा भक्त नाही. पण या वर्षी मात्र मी बेहद्द खुश आहे त्यावर. कारण त्याने बॉलीवूडला तारले आहे.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/C0x56Irqrhx/?igsh=N2VnMzl0emozeWdi
या वर्षी मात्र मी बेहद्द खुश
या वर्षी मात्र मी बेहद्द खुश आहे त्यावर. कारण त्याने बॉलीवूडला तारले आहे.>>>>> हेच हेच ते आंधळेपण.
कधी कधी डोळे मिटलेला पण आंधळाच असतो पण त्याला कळत नाही.
मोक्षू हो ना काही family
मोक्षू हो ना काही family members ना आवडला आहे ...म्हणूनच विचारलं..OTT वर आला तर बघीन>>>नक्की बघा...बाईपण आणि पेक्षा झिम्मा पेक्षा तर चांगलाच आहे....
बाईपण आणि झिम्मा
बाईपण आणि झिम्मा
या नावाचा चित्रपट दुप्पट धंदा करू शकतो.
Redlife थाय सिनेमा नेटफ्लीक्स
Redlife थाय सिनेमा नेटफ्लीक्स सबटायटल्स.
सोम, एका सेक्स वर्करची टिनेज मुलगी शाळेत जाणारी, तीला तीचं प्रेम एक चांगले आयुष्य देऊ शकतं या समजूतीत जगणारी, तीची आई,मुलीनं चांगलं शिकून या दलदलीपासून दुर राहावं या धडपडीत असणारी..
टेर, एक भुरटा रोडसाईड चोर, चोरी करून प्रेयसीला खुश करू पाहणारा, एका अशा जगाची ओळख करून देणारा सिनेमा, जे दुर्लक्षित आहे,जीथं सुटकेची, चांगल्या आयुष्याची आशा नाही...
थ्रीलर इमोशनल ड्रामा..
बाईपण आणि झिम्मा
बाईपण आणि झिम्मा
या नावाचा चित्रपट दुप्पट धंदा करू शकतो>>> धंद्याचं नाही माहित...पण मला तरी काहीच तथ्य नाही वाटलं या दोन्ही चित्रपटात त्यामानाने ओले आले चांगला आहे इतकंच सांगायचं होतं...
सॅम बहादूर - खूप दिवसांनी
सॅम बहादूर - खूप दिवसांनी ओटीटीवर मेन स्ट्रीम मूव्ही बघायला सुरूवात केली. ठीक ठाक आहे. सान्या मल्होत्रा हिरॉईन वाटत नाही, पण अशा रोल मधे फिट बसते. बायोपिकची सुरूवात जन्मापासून करायची गरज नव्हती असे वाटले.
विकी कौशलने सॅम माणेकशा यांची तडफदार देहबोली आत्मसात केली आहे, स्वतःत भिनवली आहे. काही वेळाने तो सॅम माणेकशा वाटू लागतो. किंचित सावळा वाटतो पण नंतर तिकडे लक्ष जात नाही.
त्याने जी देहबोली पेश केली आहे ती माणेकशांच्या लष्करी जीवनातल्या प्रसंगांमधे चपखल आहे. पण घरी बायकोबरोबर सुद्धा तो चेहर्याला स्टार्च केल्याप्रमाणे अवघडल्यासारखे वागतो. तिथेही त्यातला लष्करी अधिकारीच बायकोशी वागताना उभा केला आहे. चेहर्यावरचे हावभाव कमी पडलेत असे आतापर्यंत तरी वाटलेय.
बायोपिक मधे देहबोली, दिसणे उभे करणे हे कंपल्शन झालेले आहे भारतात. अभिनयाने ते वाटायला हवे. असो.
त्या आधी सफेद नावाचा चित्रपट दिसला. नावे सुरू असतानाच अंदाज आला. असले ट्रान्स विषयावरचे नाहीत आवडत. हल्ली पेव फुटलेय.
एक आहे , नावे सुरू असताना जे स्टिल्स दिसतात ते एक से एक आहेत. फोटो प्रदर्शनात गेल्यासारखे वाटले.
Redlife थाय सिनेमा नेटफ्लीक्स
Redlife थाय सिनेमा नेटफ्लीक्स सबटायटल्स.
सोम, एका सेक्स वर्करची टिनेज मुलगी शाळेत जाणारी, तीला तीचं प्रेम एक चांगले आयुष्य देऊ शकतं या समजूतीत जगणारी, तीची आई,मुलीनं चांगलं शिकून या दलदलीपासून दुर राहावं या धडपडीत असणारी..
टेर, एक भुरटा रोडसाईड चोर, चोरी करून प्रेयसीला खुश करू पाहणारा, एका अशा जगाची ओळख करून देणारा सिनेमा, जे दुर्लक्षित आहे,जीथं सुटकेची, चांगल्या आयुष्याची आशा नाही...
थ्रीलर इमोशनल ड्रामा..चांगला आहे..
‘द स्टालिन्स डेथ’ जुना ऑस्कर
‘द स्टालिन्स डेथ’ जुना ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपट प्राईमवर पाहिला. फिक्शन असावा कारण या डिटेल्स बाहेर येणं शक्य नाही. ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने कम्युनिझम शिखरावर असताना सोविएट रशिया काय होता याचं प्रत्ययकारी चित्रण.
काल भक्षक बघितला नेटफ्लीक्स
काल भक्षक बघितला नेटफ्लीक्स वर
बिहारमधील एका मुलींच्या अनाथाश्रमात, लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकाराचा सोशल, पर्सनल लेवलवरचा संघर्ष ..
चांगला आहे स्क्रीनप्ले..
गुंटूर कारम हिंदीत नेफी वर
गुंटूर कारम हिंदीत नेफी वर पाहिला. खूप मोठा आहे. महेश बाबू सोडून बाकी काही खास नाही. याच्यापेक्षा तो आला वैकुंठ.... आलू अर्जूनचा मस्त होता.
बासमती ब्लुज - चाईल्डिश आहे
बासमती ब्लुज - चाईल्डिश आहे पण ठिक वाटला. प्राईम.
खूप च नॅचरल. पंकज त्रिपाठी
खूप च नॅचरल. पंकज त्रिपाठी सारखा
>>
वाजपेयी सीनिअर आहे त्रिपाठी चा, NSD मधला...
परवा जनावर पाहिलं
परवा जनावर पाहिलं
ज्या भयानक अपेक्षा घेऊन गेलो होतो त्या मानानी फार काही हिंस्र, हिडीस वगैरे वाटलं नाही. उलट काही काळ साधारण मनोरंजनही झालं (थोडं इंटेंशनल अन् थोडं अन् इंटेंशनल)
फार डोक्यावर घ्यायच्या लायकीचं नव्हतं अन् फार शिव्या घालण्याच्या ही...
Pages