चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक रामफळ पण घ्या यात

वादा मधे तो पण आहे, त्यामुळे नाव बदलायला लागणार नाही...

मित्र म्हणे नावाच्या युट्यूब चॅनलवर एका प्रायव्हेट डिटेक्टिव्ह बाईंची मुलाखत बघत होतो. त्यांचे अनुभव ऐकताना मिंटा मिंटाला पुणे ५२ सिनेमाची आठवण होत होती.

Apurva हिंदी हॉटस्टारवर
मध्य प्रदेशात हायवेवर गाड्या थांबवून लोकांना मारून त्यांना लूटणारी चार जणांची टोळी.. त्यांच्या जाळ्यात अडकते प्रियकराला एकटी भेटायला निघालेली अपूर्वा..
क्राईम थ्रीलर सर्वायवल सिनेमा.

राजेश खन्नाचा 'रेड रोझ' - खतरनाक थ्रिलर आहे.
चढत्या क्रमाने टेन्शन वाढत जाते.
पूनम धिल्लों सुंदर दिसते.

96 बघितला. प्राईमवर सबटायटल्स सहित. (कदाचित स्पॉयलर्स असतील )

दोघांनी अतिशय सुंदर काम केले आहे. शाळकरी प्रेमपटांचा कंटाळा आला आहे पण ह्यांनी तो भाग फार ताणला नाही. एका रात्री पुरती सिंगापूरहून ती रियुनियनसाठी आलेली असते व बरेचसे मळभ दूर होऊन क्लोजर मिळवून परत जाते. सेथुपती जबरदस्त काम करतो, तृषाही तोडीसतोड.

त्यानं हे शाळेतलं प्रेम अगदी हृदयातील अत्तराच्या कुपीसारखं जपून ठेवलं आहे. स्त्री म्हणून त्यागाचं व जे मिळेल त्यात सुख मानण्याचं ट्रेनिंग असल्याने ती थोडीफार 'मुव्ह ऑन' झाली आहे पण हा नाही. त्याला तिच्याबद्दल इतकं प्रेम आणि आदर वाटतो की तो तिच्या आसपास प्रचंड ऑकवर्ड- निःशब्द होतो, तिला ही फजिती बघायची कधी मजा- कधी राग येतो. एक संपूर्ण रात्र एकांत मिळून अजूनही इतकं आकर्षण असून हे गप्पाच मारत बसतात. तिचा ओझरता स्पर्श झाला तरी हा शॉक लागल्यासारखं करतो. प्रेक्षकांना 'अरे, असू दे लग्न झाले असले तरी, एवढे आकर्षण आहे तर करा नं किस' असे होते, पण नाही. सेथुपती म्हणजे मर्यादापुरुषोत्तम..! तृषा हवं तेव्हा सात्विक- हवं तेव्हा मादक(PS) दिसू शकते. तेच समॅंथा 'ऊं अंटावा' मधे मादक आणि 'शाकुंतलम्' मधे बावळट दिसली.

खूप संयत -तरल प्रेमकथा आहे.

माहिती आवडली. कंसातले पीएस काय आहे? तृषा कशी दिसू शकते याबद्दल त्यामुळे फोमो आला आहे. विजय सेतुपतीचे मॅनरिजम, त्याच्या डेडपॅन कॉमेण्ट्स ई ची फर्जी मधे ओळख झाल्याने आता बघायची उत्सुकता आहे.

फर्जीमधे तो एका वकिलाला कन्सल्ट करतो. तेव्हा तो डिमाण्ड करतो की तू मला सगळे खरे सांगायला पाहिजेस. तर हा निर्विकारपणे त्याला म्हणतो की दारू पिल्यावर आपोआपच खरे सांगेन.

आकर्षण व एकांत असूनही गप्पा मारत बसणे याला फ्रेण्ड्सच्या एका एपिसोडमधे you have the night अशी फ्रेज ऐकली आहे. जोई कोणाबरोबर तरी अशाच गप्पा मारत बसतो - तेव्हा मोनिका त्याला हे समजावते की अशा गप्पांमधून लोक बरीच खाजगी माहिती शेअर करतात, तसेच तुझे झालेले दिसते. व नंतर तिच्याकडून ऐकलेली माहिती मोनिकाला सांगत असतो
Joey: "she has three sisters. one dead"
Monica: "YES!" Happy

Lol जोईला काही अशक्य नाही.

नक्की कोणतं रूप बघायचं आहे सात्विक की मादक, मी भाबडी आहे, मला कळलं नाही. Wink
PS Ponniyen Selven. हा प्रश्न वाचून स्वाती आणि हर्पांना कळ येणार आहे.

दारू पिल्यावर आपोआपच खरे सांगेन.>>> Lol

धाकटा भाऊ सालार बघून आला होता पण ही माहिती त्याने लपवून ठेवली.
पण ते उघड झाल्यावर मी विचारलं कि कसा आहे रे सालार ?
त्याने मला लहानपणी लिहीलेल्या पिक्चरची स्टोरीची आठवण करून दिली. इकडून हिरो येतो.इकडून व्हिलन येतो.
दोघं सॉलीड फायटिंग करू लागतात. मग दोघांचे पंटर्स येतात. ते पण एकमेकांची जाम धुलाई करतात. मग सगळे दमून पडतात.
तेव्हढ्यात इंटर्वल होतं.
इंटर्वल संपल्यावर पुन्हा हिरो आणि व्हिलन फायटिंग फायटिंग खेळतात.
स्टार्ट टू एण्ड नुसती अ‍ॅक्शन,
एव्हढ्यात त्यांची आई येते.
"अरे तुम दोनो क्यूं लड रहे हो ?"
" पता नही मां . बस ऐसे ही "
भाऊ म्हणाला ,सालार या स्टोरीपेक्षाही पुढची स्टेज आहे.

>>> कंसातले पीएस काय आहे?
हे विचारल्याबद्दल खरंतर एखाद्याला आयड्यांत प्रायश्चित्ताची शिक्षा द्यायची सोय हवी! Proud
अस्मिता, तूच गं तूच! Proud

" पता नही मां . बस ऐसे ही " >>> Lol

आयड्यांत प्रायश्चित्त >>> Lol

मला वाटले पीएस ही मादकची पुढची व्हर्जन असे काहीतरी आहे. हपा Happy मी पीएस काय आहे जानत नसलो तरी पीएसपीओ ची अ‍ॅड जानतो Happy

(PS) >>> मला हे 'पन इंटेंडेड'सारखं काहीतरी असावं असं वाटलं Lol

(अनुस्वार आणि ड चा हिशेब लावताना दमछाक झाली. Biggrin )

गेल्या आठवड्यात काही चित्रपट बघितले, त्याविषयी खाली.

पद्मावत: हा आधी तुकड्यातुकड्यात बघितला होता आता सलग बघितला. एकूण ठीक आहे पण काही कच्चे दुवे वाटले. खिलजी जेव्हा रावलला भेटायला येतो तेव्हा पद्मावतीचा चेहरा पाहायची अट घालत नाही पण पुढच्यांच सीनमध्ये पद्मावती 'माझा चेहरा दाखवून राजपूत प्राण वाचणार असतील तर ते मला मान्य आहे' असं म्हणते. बहुतेक मधल्या एखाद्या सीनला कात्री लागलेली असावी. तसंच ती खिलजीच्या महालात रावलला सोडवायला जाते तेव्हा केवळ मेहरुन्निसा मदत करते म्हणून ते निसटू शकतात. पद्मावती तुरुंगात जाऊन रावलवर शाल पांघरते तेव्हा तुरुंगाचे दरवाजे बंद करून मेहरुन्निसाला त्या दोघांनाही कैद करणं एकदम सोपं होतं. गोरा आणि बांदल हे दोघेच बरोबर होते आणि त्यांच्यावर सैनिक सोडता आले असते. पण तिच्या चांगुलपणामुळे आणि तिने दाखवलेल्या गुप्त मार्गामुळेच सगळे निसटू शकतात. मेहरुन्निसाऐवजी मलिक काफूर पद्मावतीच्या स्वागताला आला असता तर काही plan B तयार होता का त्याचा काहीच संदर्भ लागत नाही.

मोहब्बते: हा परत बघितला, गाणी आवडतात म्हणून! सर्व चित्रपटच अचाट आणि अतर्क्य आहे त्याविषयी अजून काय लिहिणार Happy त्या पैरोंमे बंधन है गाण्यात बहुतेक दिवाळी साजरी करत असावेत असं वाटतं (दिवे आणि एकूण वेशभूषा, सजावटीवरून) पण काही ठिकाणी happy valentine day च्या signs दिसतात! ती प्रीती कडवं आणि मुखड्यातल्या वेळात कपडे बदलून, मेकअप, हेअरस्टाईल करून नाचात सामील झाली तिच्या efficiency ची कमाल आहे. तिचे आणि त्या शमिता आणि किमचे कपडे अगदी एकाच साच्यातले आहेत. अंबाडा, हातातलं कंगन, पेस्टल रंगाचे शरारे आणि ओढण्या, सारख्याच प्रकारचे सॅण्डल्स, अगदी बॅंडवाल्या शोभतात! भुताच्या गळ्यात शेवटी मंगळसूत्र आलेलं पाहून गदगदून आले. त्यावेळी हा चित्रपट प्रचंड आवडला होता, आता तो का आवडला (आणि परत आवर्जून का बघितला!) त्याचं नवल वाटतं.

कत्ल: संजीवकुमारचा शेवटचा चित्रपट. त्याच्या निधनानंतर दोन महिन्यात प्रदर्शित झाला. जबरदस्त आहे. त्यात त्याने आंधळ्या माणसाचं काम केलं आहे. मर्डर थ्रिलर आहे. त्याच्याबरोबर सारिका आणि शत्रुघ्न सिन्हा आहेत. संजीवकुमारच्या सर्वोत्तम कामांपैकी एक! नक्की बघा.

भुताच्या गळ्यात शेवटी मंगळसूत्र आलेलं पाहून गदगदून आले. >>>> Lol Lol

पद्मावत >>> ते मेहरुन्निसा प्रकरण अगदीच काहीतरी आहे. म्हणजे गोरा, बादल यांची वीरश्री, पद्मिनीची चाल यांना काही मोलच नाही? पद्मावतमध्ये मला आवडलेल्या गोष्टी म्हणजे घूमर गाणे (सिच्युएशनली चुकीचे असले तरी). आणि सुरुवातीची आणि शेवटची क्रेडेन्शियल्स येतात त्यावेळी स्क्रीनवर दिसणाऱ्या ठिणग्या. सुरुवातीच्या क्रेडेन्शियल्समध्ये समजले नव्हते. शेवटी अंगावर आले.
बाकी दीपिका काय 'अ फेस दॅट लॉन्चड थावझन्ड शिप्स' कॅटेगरीतली वाटली नाही.

डंबलडोर पाहिला पण बंडलबोअर वाटला. काहीच घडत नाही. फक्त भुतांची भूतानची सफर घडते. फिनिक्सचा गेस्ट ॲपिअरन्स आहे. उगंच.

चीकू, मस्त पोस्ट. Happy

बाकी दीपिका काय 'अ फेस दॅट लॉन्चड थावझन्ड शिप्स' कॅटेगरीतली वाटली नाही.
>>>>>>>

मला दीपिका, तिचा मेकप , तिच्या मांड्या आणि ती लोळत (की वळवळत Wink ) पडलेली बघण्याचा- एकाच कॉपी पेस्ट लूकचा कंटाळा आला आहे. ते Fighter चं 'इश्क जैसा कुछ' नवीन गाणं अजिबातच 'फन' नाही वाटलं. She needs to reinvent..!

चीकू, बऱ्याच दिवसांनी आणि मस्त लिहिलंय.कत्ल ऑल टाईम आवडता चित्रपट.
मोहब्बते चे सर्वच अचाट अतर्क्य आहे.पण जेव्हा पहिला होता तेव्हा ऐश्वर्या शाहरुख चे मरणोत्तर सर्व सीन्स बघून भावनाप्रधान व्हायला झालं होतं.

इथले वाचून रेड रोज पाहिला. सस्पेन्स असा नाहीये पण पुढे काय याची चिंता लागते. उगीचच राजेश खन्ना आहे म्हणून वेगळा शेवट असेल की काय असे वाटत राहते. पिक्चर ठीकठाक आहे. सगळ्यात भारी आर डी चे पार्श्वसंगीत आहे. भन्नाट वातावरण निर्मिती होते त्याने.

ओरिजनल मध्ये कमल हसन आहे म्हणे. कदाचित तो जास्ती बरा असेल

मला दीपिका, तिचा मेकप , तिच्या मांड्या आणि ती लोळत (की वळवळत Wink ) पडलेली बघण्याचा- एकाच कॉपी पेस्ट लूकचा कंटाळा आला आहे. >> ह्यावर फिस्सकन हसू आल अस्मिता ! मला उगाचच एलियन्स मधला सिगोर्नी वीव्हरचा शॉट आठवला.

ते Fighter चं 'इश्क जैसा कुछ' नवीन गाणं अजिबातच 'फन' नाही वाटलं. >>>>>>>>>>> बेशरम रंग आणि इश्क जैसा गाण्यातले दहा फरक किंवा दहा साम्य ओळखून दाखवा Lol

Pages