Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दर्वर्शी हिरवा ई. शालू
दर्वर्शी हिरवा ई. शालू पांघरून धरती सुद्धा कंटाळली आहे >> अगदी अगदी! टिपिकल ठोकळेबाज उपमा
फक्त धरती हिरवा शालू नेसण्याऐवजी आडवी पडून शालीप्रमाणे पांघरून घेते आहे असं डोळ्यासमोर आलं.
शाल पांघरली की व्यक्ती शालीन होते.
अरे वा, जुन्या गाण्यांवर
अरे वा, जुन्या गाण्यांवर गप्पा
कुछ दिल ने कहाँ...आहाहा
Once upon a time in mumbai या
Once upon a time in mumbai या चित्रपटात तुषार कपूर नव्हता, तुम्हाला कदाचित *शोर इन the सिटी* ह्या विषयी म्हणायचे असावे
>> अरे देवा! 2 दिवसात खात्रीने आठवलेली दुसरी चुकीची गोष्ट आहे ही.
आता काय करावं!
तुषार कपूर, उदय चोप्रा, इशा
तुषार कपूर, उदय चोप्रा, इशा देओल, सारा अली खान, अरबाज खान, सोहेल खान, फरदीन खान, फैजल खान, राहुल खन्ना, लव कुश सिन्हा, मिथुनपुत्र चक्रवर्ती असा मल्टीस्टारर सिनेमा बघायची इच्छा आहे.
या ज़ालिम दुनियेला बरेच
या ज़ालिम दुनियेला बरेच कंटाळलेले दिसता..
(No subject)
म्हणजे आता बांगडू यांच्यासाठी
म्हणजे आता बांगडू यांच्यासाठी कोणाला तरी 'गोलमाल धरती लुटकर मदहोश किसान करे केदारनाथ पे पलटण के साथ खुषीसे धूम' नावाचा नवा पिक्चर बनवावा लागणार
काल जुना हृषिकेश मुखर्जींचा
काल जुना हृषिकेश मुखर्जींचा 'अनुपमा' बघितला>>
अनुपमाची ओळख सर्वप्रथम गाण्यांमधून झाली मग सिनेमा पाहिला. शर्मिला, शशिकला सगळेच इतके फ्रेश दिसतात. मलाही ' कुछ दिल ने कहा ' जास्त आवडतं. कमीत कमी वाद्यवृंद असूनही सुमधुर गाणं!
हृषिकेश मुखर्जीचा ' अनुराधा ' सिनेमा सुद्धा छान आहे. लीला नायडू आणि बलराज साहनी. ह्याचीही अगोदर गाणी ऐकून ओळखीची होती, मग सिनेमा बघितला. पं. रविशंकरांचं संगीत आहे. ' जाने कैसे सपनो में खो गई रतिया', ' सांवरे सांवरे काहें मोसे करो जोराजोरी ' सारखी लताबाईंची अप्रतिम गाणी आहेत.
दर्वर्शी हिरवा ई. शालू
दर्वर्शी हिरवा ई. शालू पांघरून धरती सुद्धा कंटाळली आहे
>>> तर काय अधून मधून तिला पण घागरा, सलवार कमीज, इवनिंग गाऊन वगैरे घालावेसे वाटत असेलच की. पण आपली कवी/लेखक मंडळी तिला सांस्कृतिक गणवेशात डांबून ठेवतात. पॅट्रिआर्कीकल कुठचे.....
शाल पांघरली की व्यक्ती शालीन होते. >>>
फि बां, भयानक आयडिया!
फि बां, भयानक आयडिया!
गोलमाल धरती छोडकर मदाहोश किसान करे केदारनाथ पे धूम>> केवळ या एका नावासाठी तुम्हाला पुन्हा टिव्हीवर बोलावलं जावं अशी शिफारस मी करतो
तरी चुकलं होतं
तरी चुकलं होतं
आता बरोबर झालं बघा
गोलमाल धरती लुटकर मदहोश किसान करे केदारनाथ पे पलटण के साथ खुषीसे धूम
गोलमाल धरती लुटकर मदहोश किसान
गोलमाल धरती लुटकर मदहोश किसान करे केदारनाथ पे पलटण के साथ खुषीसे धूम'>>>>
लहू के दो रंग - यातलं सिमटी
लहू के दो रंग - यातलं सिमटी हुइ ये घडियां - हे गाणं मला खूप आवडतं.
फक्त धरती हिरवा शालू
फक्त धरती हिरवा शालू नेसण्याऐवजी आडवी पडून शालीप्रमाणे पांघरून घेते आहे असं डोळ्यासमोर आलं
शाल पांघरली की व्यक्ती शालीन होते. >>>
गोलमाल धरती लुटकर मदहोश किसान करे केदारनाथ पे पलटण के साथ खुषीसे धूम >>
ललिता - हे गाणं? ते चम्बल की
ललिता - हे गाणं? ते चम्बल की कसम मधले आहे असे दिसते
https://www.youtube.com/watch?v=KbtmAG_1CPQ
पण ब्लॅक अँड व्हाईट चा ठळक
पण ब्लॅक अँड व्हाईट चा ठळक वापर आणि प्रकाशयोजना म्हटलं कि गुरूदत्तच आठवतो. >>>> १०० %
गुरुदत्तच्या चित्रपटात छायाप्रकाशाचा अप्रतिम खेळ असतो. कागज के फूल नी प्यासा तर नावाजलेले आहेतच. पण साहिब बीबी और ग़ुलाम मधले फारसे न आठवणारे 'साक़िया आज मुझे नींद नहीं आएगी' बघा. पुराणकाळात (अर्थ तर सोडाच, साक़िया, रतजगा वगैरे शब्दही माहित नसण्याच्या वयात) कधी तरी गुरुदत्तचे ३ चित्रपट दूरदर्शनवर लागले होते. तेव्हा बाबांनी मुद्दामहून या गाण्यातली प्रकाशयोजना दाखवली होती.
यातल्या बॅकग्राउंड डान्सर्सच्या चेहऱ्यावर एकदाही प्रकाश नाही, थिरकणाऱ्या पायांवर प्रकाश आहे, पलीकडे बसलेल्या वादकांवर प्रकाश आहे पण यांच्या चेहऱयावर नाही. जणू त्यांच्या नाचापलीकडे त्यांना काही ओळखच नाही. हाताने फिरवायच्या पंख्याची सावली अधून मधून वादकांनाही झाकोळून टाकते. पण जमीनदार आणि त्याचे सोबती सतत लक्ख प्रकाशात आहेत.
'न जाओ सैय्यां' मध्येही रेहमानच्या अर्ध्या चेहऱ्यावर बरेच वेळा सावली आहे. मीनाकुमारीचा चेहराही बऱ्याच वेळा केसांनी, सावलीने झाकलेला आहे. जणू तिची ओळख तिच्या परिस्थितीने, सौंदर्याने झाकोळली असावी. एका शॉटमध्ये तिने रेहमानच्या पायावर डोके ठेवले आहे, त्यात पहिल्यांदा तिचा पूर्ण चेहरा दिसतो. गाण्यात नंतर जसजशी ती बोल्ड होत जाते तसा तिचा चेहरा झाकला जात नाही, ऍज इफ इन शी इज इन हर एलेमेंट्स. अर्थात कुठल्याही शॉटमध्ये ठसठशीत दिसत राहते ते तिचे कपाळ आणि तिचे कुंकू.
स्त्रीवादाचा, सामाजिक समतेचा कैवार न घेताही गुरुदत्त असे काही भाष्य करून जातो कि बस्स....
माझे मन, क्या बात है!
माझे मन, क्या बात है!
माझेमन, व्वा!
माझेमन, व्वा!
'साकिया' मलाही आवडायचं, त्यात खोचक- मादक काहीतरी आहे.
अनघा पुणे, छान लिहिले आहे.
माझेमन हे सर्व किती मस्त
माझेमन हे सर्व किती मस्त उलगडलय तुम्ही. वा!
गोलमाल धरती लुटकर मदहोश किसान
गोलमाल धरती लुटकर मदहोश किसान करे केदारनाथ पे पलटण के साथ खुषीसे धूम'>>> अगं काय हे
शाल-शालीन >>>>
यावरून सगळ्यात 'शालीन' शोलेचा ठाकूर झाला, गब्बरला मारेपर्यन्त शाल सरकू दिली नाही.
फिबां, अनु
फिबां, अनु
माझेमन, मस्त पोस्ट! आता
माझेमन, मस्त पोस्ट! आता पुन्हा ही गाणी बघणं आलं.
साकिया आवडतंच - आशा कमाल गायली आहे (नेहमीप्रमाणेच)!
माझे मन, पोस्ट वाचून पुन्हा
माझे मन, पोस्ट वाचून पुन्हा गाणी बघितली. अगदी समर्पक वर्णन!
माझेमन, मस्त पोस्ट! आता
माझेमन, मस्त पोस्ट! आता पुन्हा ही गाणी बघणं आलं >>> +१
>>>>>>>धीरे धीरे मचल ऐ दिले
>>>>>>>धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार -
आत्ताच पाहीलं. काय गोड काय गोड. ती अभिनेत्रीही कसली स्वीट दिसते. पुढे दिसली नाही परत.
बांगडु, त्या झायेद खानला कसे
बांगडु, त्या झायेद खानला कसे विसरलात?
मीअनु, सिनेमाचे नाव बदल
माझे मन मस्त पोस्ट !
माझे मन मस्त पोस्ट !
“सिमटी हुइ ये घडियां - हे
“सिमटी हुइ ये घडियां - हे गाणं मला खूप आवडतं.” - तो कुठलासा धागा आहे ना, सुश्राव्य पण अत्रंगी चित्रीकरण असलेल्या गाण्यांचा - त्यातल्या प्राईम कँडिडेट असलेल्या गाण्यांपैकी हे एक गाणं आहे.
गोलमाल धरती लुटकर मदहोश किसान
गोलमाल धरती लुटकर मदहोश किसान करे केदारनाथ पे पलटण के साथ खुषीसे धूम करनेका वादा
हे तु झायेद खानचा सिनेमा
हे तु झायेद खानचा सिनेमा घालुन लिहिलेस की असंच? असेल तर कोणता सिनेमा? हळु हळु सिनेमाची कथा तयार होईल सगळे पडेल कलाकार आले तर.
Pages