४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि ११७ वी काँग्रेस

Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04

४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हुकुमशाह व्हायला आकड्यांची स्पर्धा नसते. काय अध्यादेश काढले जात आहेत तेही पाहिले पाहिजे.
युक्रेनच्या युद्धासाठी अवाच्या सवा मदत. क्लायमेट जस्टिसच्या नावाखाली अमेरिकेच्या ऊर्जा स्रोतांच्या गळ्याला नख लावणे.
देशांच्या सीमा नष्ट करणे. पोराच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालणे.
आरोग्याच्या नावाखाली निरर्थक लॉकडाऊन, वॅक्सिन सक्तीच्या नावाखाली अनेक लोकांच्या नोकरीवर गदा आणणे. असे कितीतरी भयानक निर्णय गलितगात्र म्हातारबाने घेतलेत जे हुकुमशहाला शोभतील.
ट्रंपने असे काय निर्णय घेतले आहेत जे अशा प्रकारे प्रचंड प्रमाणात अन्यायी होते?

सी एन एन आणि एम एस एन बी सी वगैरे बातम्या पहाणार्‍यांना ही बातमी माहित आहे का?
https://en.wikipedia.org/wiki/Sam_Brinton

वोकनेस आणि डी ई आय च्या नावाखाली म्हातारबाच्या सरकारने एका विकृत ट्रान्स माणसाला कुठलीही गुणवत्ता नसताना न्युक्लियर वेस्ट डिस्पोजल ह्या विभागात उच्चपदस्थ म्हणून नेमला.
हा इसम इतका विकृत होता की तो विमानतळावर सामान चोरायचा. त्यातील लोकांचे कपडे वापरायचा. अनेकदा हा इसम पकडला गेला. शेवटी हाताबाहेर गेल्यावर ऊर्जा विभागाने ह्याला काढून टाकले.
अशा महामूर्ख विकृत व्यक्तीला केवळ तो विकृत पद्धतीने वेषभूषा करतो, बाई आहे का पुरुष आहे हे कळणार नाही असे वागतो म्हणून ( खास अल्पसन्ख्य गटाचा प्रतिनिधी म्हणून) इतक्या महत्त्वाच्या, जोखमीच्या पदावर नेमणे ह्याला काय म्हणाल?
असले प्रकार अनेक सरकारी विभागात होत आहेत. ह्या अर्धमेल्या हुकुमशाहकडून.

वॅक्सिन सक्तीच्या नावाखाली अनेक लोकांच्या नोकरीवर गदा आणणे
>>> युएस सरकारने कुठे व्हॅक्सिन सक्ती केली होती ? एकतर टेस्टिंग किंवा व्हॅक्सिन असे दोन पर्याय उपलब्ध होते. ज्यांच्या कुणाच्या नोकऱ्या गेल्या त्या प्रायव्हेट कंपन्यांच्या पॉलिसी मुळे गेल्या. आणि जिथे संसर्गजन्य रोग असतो तिथे एम्प्लॉयरला आपली लस पॉलिसी बनवण्याचा हक्क अवश्य असावा असे मला वाटते.

आरोग्याच्या नावाखाली निरर्थक लॉकडाऊन
>>> निरर्थक ?! आणि भारतात जसे लॉकडौन होते तसे अमेरिकेत एक दिवस तरी होते का ? उगाच काहीही ! आणि बहुदा जे काय लॉकडौन युएस मध्ये होते ते तर ट्रम्प असताना होते ना ? आणि फेडरल लॉकडाऊन तर एकही नव्हता. बायडन ने कुठले निरर्थक लॉक्डाऊन केले ?

क्लायमेट जस्टिसच्या नावाखाली अमेरिकेच्या ऊर्जा स्रोतांच्या गळ्याला नख लावणे.
>>> बायडन प्रेसिडेन्सी मध्ये युएस एनर्जी आऊटपुट वाढले आहे.

माणसाला कुठलीही गुणवत्ता नसताना न्युक्लियर वेस्ट डिस्पोजल ह्या विभागात
- ती व्यक्ती MIT मधून अणु अणु विज्ञानात पोस्ट ग्रॅज्युएट आहे. हे तुम्ही दिलेल्या विकी पानावरच आहे. बाकी जर ती व्यक्ती चुकीचे वागत असेल तर काढले हे उत्तम केले.

ट्रंपने असे काय निर्णय घेतले आहेत जे अशा प्रकारे प्रचंड प्रमाणात अन्यायी होते?
>>> एक टॅक्स कट ही एकुलती एक लेजिस्लेटिव्ह अचिवमेंट ट्रम्प कडे आहे. त्यापलीकडे त्याला फार काही करताच आले नाही. आणि, शेवटी निवडणूक हरताना राडा करून गेला नसता तर फक्त फार काही न करू शकलेला राष्ट्राध्यक्ष म्हणून लक्षात राहिला असता. त्याचा lasting इम्पॅक्ट कोणता आहे तर रो वी. वेड रद्द करणे. पण ते सुद्धा त्याने passively केले. आपला जज नेमणे हे तर जशे संधी येईल तसे सगळे राष्ट्राध्यक्ष करतातच. पण प्रचंड प्रमाणात अन्यायी असे ट्रम्पने काही केले नाही. शेवटी निवडणूक हरल्यावर मात्र त्याने बरीच चुकीची कामं केली.

द्वेषाने, रागाने , खर्‍या खोट्याचे भान न ठेवता अद्वातद्वा बोलत सुटायचे!
इतरांना शिव्या देतो तो शहाणा असे समजतात त्या बेअक्कल लोकांना ट्रंप ग्रेट वाटणारच. कश्याहि खर्‍या खोट्या शिव्या दुसर्‍याला द्यायच्या एव्हढेच ट्रंपला येते.
<< एक टॅक्स कट ही एकुलती एक लेजिस्लेटिव्ह अचिवमेंट ट्रम्प कडे आहे. >>
त्यामुळे राष्ट्रावरील कर्जाचा बोजा आणखी वा॑ढला आणि त्या बाबतीत अमेरिका आता जगाच्या इतकी पुढे गेली आहे की इतर कोणच्याहि देशाला ते शक्य नाही. जय अमेरिका!
ट्रंपला आणखी चार वर्षे दिली असती तर सौदी अरेबिया, रशिया या सर्वांना फसवून ते सर्व कर्ज फिटवले असते.
फसवाफसवी, लांडीलबाडी, चोरी, खोटे बोलणे असे अनेक चांगले गुण ट्रंपमधे आहेत. अमेरिकेचे भले व्हावे असे वाटत असेल तर ट्रंपलाच मते द्या.

(भारतात घर घेऊन ठेवले आहे ना? ओसीआय नसल्यास लवकर काढून ठेवा.)

तात्याने विवेक रामस्वामी बद्दल तो बंडल आहे, तो मागा वाला नाही वगैरे ट्विट केल्यानंतर लगेच पुन्हा १८० कोनात वळून स्टेजवर दोघे एकत्र दिसले. जरी विरा चा प्लॅन पहिल्यापासून "ट्रम्प स्पर्धेत असेल तर व्हीपी, नाहीतर आपले घोडे पुढे दामटायचे" असाच उघड दिसत असला, तरी प्रत्यक्षात तात्या त्याची निवड व्हीपी म्हणून करेल की केरी लेक सारखे कोणीतरी पिक करेल बघायला हवे. अजून दोघी आहेत - एमटीजे व लॉरेन बोबर्ट. पण त्या दोघी त्यालाच डोईजड होतील Happy

हे बरेचसे अजूनही २०२० ची निवडणूक डिनाय करतात हे कॉमन आहे. विरा व केरी लेक तर नक्कीच. केरी लेक ती हरलेली मागच्या वर्षीची अ‍ॅरिझोना निवडणूकही डिनाय करते.

हेली ने सर्व पूल आता तोडलेले दिसतात. कालच तात्याने तिला साउथ कॅरोलीना मधून हटवायचे म्हणून युएन अँबेसेडर केले होते असा खुलासा केला आहे (आणि तरी सगळे निगोशिएशन्स मलाच करावे लागले म्हंटला). अशा वेळेस एखाद्या अमेरिकेकरता फार रिलेव्हंट नसलेल्या देशाचा राजदूत करतात. युएनचा नव्हे. वेस्ट विंग मधे याबद्दल एक मजेदार एपिसोड आहे. तो बघाच.

पण हेलीला तात्या वाघ म्हंटले तरी खातो आणि वाघोबा म्हंटले तरी खातो चा प्रत्यय आला असेल. त्यापेक्षा ख्रिस्ती सारखे ऑल आउट ट्रम्पच्या विरोधात सुरूवातीपासूनच जायला हवे होते असे तिला वाटले असेल आता.

इथे सतत म्हातारबा बायडन, म्हातारा म्हातारा वाचून त्याच्यासमोर ट्रम्पसारखा कोणीतरी तरणाबांड गब्रू तरतरीत जवानचा ऑप्शन आहे असे वाटू लागले . म्हणून माहित होते तरी दोन तीनदा ट्रम्प चे वय गुगलून खात्री करून घेतली. आता बायडनपेक्षा ४ वर्षांनीच का असेना पण लहान आहे आणि ऐंशी गाठली नाही ना मग तरुण नेतृत्वच झाले ना . . biggrin.gif

त्यापेक्षा ख्रिस्ती सारखे ऑल आउट ट्रम्पच्या विरोधात सुरूवातीपासूनच जायला हवे होते असे तिला वाटले असेल आता. >> +१.

क्लायमेट जस्टिसच्या नावाखाली अमेरिकेच्या ऊर्जा स्रोतांच्या गळ्याला नख लावणे.
>>> बायडन प्रेसिडेन्सी मध्ये युएस एनर्जी आऊटपुट वाढले आहे.
साफ खोटे आहे. अनेक प्रकल्प गुंडाळून लोकांना देशोधडीला लावले आहे त्याचे काय? एक मोठा पाइपलाईन प्रकल्प तडकाफडकी बंद करून अनेक लोकांच्या पोटावर पाय आणला का? केवळ काल्पनिक क्लायमेट इमर्जन्सी आहे म्हणून!
>>
ती व्यक्ती MIT मधून अणु अणु विज्ञानात पोस्ट ग्रॅज्युएट आहे. हे तुम्ही दिलेल्या विकी पानावरच आहे. बाकी जर ती व्यक्ती चुकीचे वागत असेल तर काढले हे उत्तम केले.

<<
इंटरव्ह्यू मधे निव्वळ पदवी बघतात का? अशा नाजूक ठिकाणी नेमलेला जाणारा माणूस डोक्याने ठीक आहे का हे बघितले जाते. हा माणूस फार पूर्वीपासून विकृत आहे हे उघड दिसते. त्याच्या विविध सोशल नेटवर्किंग पोस्टवर गलिच्छ चाळे करताना तो दिसतो आहे. तरी अट्टाहासाने डी ई आयच्या आहारी जाऊन ह्या जराजर्जर मरणासन्न मतिभ्रष्ट म्हातारबाने त्याला नेमले. हा एक कलंक आहे.

म्हातारबाने लस टोचा नाहीतर नोकरी गमवा असे अनेक अनेक ठिकाणी केले. सैन्यात केले. त्याचीच री ओढून अनेक डेमोक्रॅटिक सरकारांनी, राज्य, शहर, अनेक नर्स, वैद्यकीय कर्मचार्यांना हाकलले. विमान संस्था.
ओशा ह्या केंद्रीय संस्थेने लस टोचा, प्रत्येक आठवड्याला तपासणी करा नाहीतर नोकरी गमवा असा तुघलकी आदेश काढला होता.
https://www.dhillonlaw.com/lawsuits/the-daily-wire-challenges-biden-admi...

एका खाजगी संस्थेने याविरुद्ध पैसे जमवून केस फाइल केली तेव्हा तो बासनात गुंडाळला गेला.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने शाळा बंद करा, सार्वजनिक व्यवस्था बंद करा असे उन्मत्त आदेश दिले. कागदोपत्री, काय्देशीर आदेश नसले तरी ते आदेश होते. आता डॉ फौची वगैरे भेकड लोक काखा वर करून नामानिराळे होऊ पहात आहेत. पण हेच लोक रोज आपल्या लाडक्या चॅनेल वर जाऊन चार की पाच मास्क लावा, सहा की दहा बूस्टर टोचा, कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ नका, लस न घेणार्यांवर बहिष्कार टाका वगैरे आवाहने करत होते. आणि हे सगळे आसन्नमरण म्हातारबाच्या संमतीने चालू होते.

>>
इथे सतत म्हातारबा बायडन, म्हातारा म्हातारा वाचून त्याच्यासमोर ट्रम्पसारखा कोणीतरी तरणाबांड गब्रू तरतरीत जवानचा ऑप्शन आहे असे वाटू लागले . म्हणून माहित होते तरी दोन तीनदा ट्रम्प चे वय गुगलून खात्री करून घेतली. आता बायडनपेक्षा ४ वर्षांनीच का असेना पण लहान आहे आणि ऐंशी गाठली नाही ना मग तरुण नेतृत्वच झाले ना .
<<
म्हातारपण हे वागण्यातून, चालण्यातून, बोलण्यातून दिसते. वयातून नाही. ह्या मतिभ्रष्ट, गलितगात्र, अर्धमेल्या म्हातारबाला दोन चार वाक्ये भाषण करणे जड जाताना दिसते, भाषण झाल्यावर कुठुन आणि कधी बाहेर पडायचे हे कळत नाही. एखाद्या किल्ली दिलेल्या खेळण्यासारखा हा भिंत, पडदा कुठल्यही दिशेने चालताना दिसतो. मग त्याची बायको नाहीतर अंगरक्षक धावपळ करून हात पकडून त्याला योग्य दिशेला नेतात. हा प्रसंग असंख्य वेळा घडला आहे.
आकडे उच्चारताना मिलियन आहे का बिलियन आहे का ट्रिलियन आहे ह्यात कायम गोंधळ. कित्येकदा हे सर्व एकामागून एक म्हणतो (निदान एक तरी बरोबर असेल म्हणून!)
हा इसम दिवसातले एखाद दोन तास जेमतेम शुद्धीवर असतो. इतर वेळी गायब! २०२४ चा प्रचार कसा करणार आहे ते देवास ठाऊक!
ट्रंप वयाने कितीही म्हातारा असला तरी त्याचे भाषण आणि म्हातारबाचे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. अर्थात म्हातारबाच्या प्रेमात पडलेल्याना हे दिसणार नाही!

ह्या म्हातारबाच्या अनेक घातक कृत्यातील एक म्हणजे हौती नामक येमेनी अतिरेकी संघटनेला दहशतवादी नाहीत असे अध्यादेश काढून जाहीर करणे. काही अनाकलनीय कारणाने इराणला खुश करणे हे म्हातारबाचे ध्येय बनलेले आहे. त्यांना अनेक अब्ज डॉलर खुले करून देणे, हौती सारखे लोक मोकाट सोडणे.
आता हे हौती भस्मासूर अमेरिकेच्या बोटी आणि तळावर हल्ले करत आहेत म्हणून कदाचित पुन्हा ते अ तिरेकी असल्याचा साक्षात्कार झाला असेल पण ह्यातून म्हातारबाची दूरदृष्टी दिसून येते! आंतरराष्ट्रीय घडामोडींची ह्या भ्रष्टाचार्याला किती खोलवर जाण आहे ह्याचे बिंग फुटते!

You won’t hear President Biden talking about it much, but a key record has been broken during his watch: The United States is producing more oil than any country ever has.
https://www.washingtonpost.com/politics/2023/12/31/us-oil-production-has...

ओशा ह्या केंद्रीय संस्थेने लस टोचा, प्रत्येक आठवड्याला तपासणी करा नाहीतर नोकरी गमवा असा तुघलकी आदेश काढला होता.
>>>ह्यात काहीही तुघलकी नाही. उगाच आरडाओरडा केला म्हणजे हा निर्णय काही घोर अन्याय होत नाही. एक तर vaccine घ्या किंवा टेस्टेड असा ह्यात काहीही तुघलकी नाही.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने शाळा बंद करा, सार्वजनिक व्यवस्था बंद करा असे उन्मत्त आदेश दिले. कागदोपत्री, काय्देशीर आदेश नसले तरी ते आदेश होते.
>>> आदेश हे आदेश असतात, आणि recommendation हे recommendation असतात. उगाच लांडगा आला रे आला म्हणून एकाला दुसरे म्हणू नका.

पण हेच लोक रोज आपल्या लाडक्या चॅनेल वर जाऊन चार की पाच मास्क लावा, सहा की दहा बूस्टर टोचा, कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात जाऊ नका, लस न घेणार्यांवर बहिष्कार टाका वगैरे आवाहने करत होते. आणि हे सगळे आसन्नमरण म्हातारबाच्या संमतीने चालू होते
>>> बरोबरच बोलत होते ते. मूर्ख अँटी वॅक्स लोकांमुळे किती लोकं मेली. रिसर्च करा, ट्रम्प काउंटी मध्ये वॅक्स न घेतल्याने डेम काउंटी पेक्षा किती जास्त लोक मेले. तुमच्या पार्टीने जितक्या शंका कुशंका पसरवून लस खोटी पाडता येईल तितकी पाडली. मास्क बद्दल रडा ओरडा तर अत्यंत बालिश प्रकार. एका pandemic मध्ये मास्क घातल्याने तुमचे काय मास झडणार आहे काय ?

आणि सैन्यात लशीची सक्ती जुनी नाही. सगळ्या लसा घेतल्याशिवाय तुम्हाला घेत पण नाहीत. त्याचा कोविड लसीशी संबंध जोडणे चुकीचे आहे. बायदन मुळे लस न घेणाऱ्यांना नोकऱ्या गमाव्या लागल्या हे साफ चूक आहे.

https://www.foxnews.com/politics/doj-further-acknowledges-hunter-bidens-...

२०२० च्या निवडणूकीत डेमोक्रॅट पक्षाला सामील असणार्या एफ बी आय , पेंटागॉन वगैरे यंत्रणांनी हंटर बायडनचा विविध साग्रसंगीत पराक्रमांनी भरलेला लॅपटॉप हे रशियन कटकारस्थान असल्याचा जोरदार कांगावा केला. सी एन एन, एम एस एन बी सी ह्या डेमोक्रॅटिक मुखपत्रांनी ह्या कांगाव्याला जोरदार प्रसिद्धी देऊन त्याचा एक मोठा गोंगाट सूरु केला. त्याबद्दल कुणी पत्रकाराने ट्वीटरवर वा अन्य कुठे काही लिहिले तर त्यावर तत्परतेने बंदी घातली गेली.
हा सरळ सरळ निवडणूक प्रक्रियेतील हस्तक्षेप आहे. हिलरीच्या इमेल प्रकरणामुळे जो झटका मिळाला तोच झटका म्हातारबाला ह्या प्रकरणात मिळाला असता. त्याचा रंडीबाज, दारूबाज, ड्रगी, बदफैली, कर्तृत्वहीन मुलगा बापाचे नाव वापरून अमाप पैसा मिळवताना दिसला असता तर नक्कीच काही लोकांनी म्हातारबाला मत दिले नसते. पण हे प्रकरण पार गाडून टाकले गेले. आणि तरी इलेक्शन अगदी कशा शुचिर्भूत वातावरणात पार पडल्या असे अट्टाहासाने मानायचे! वा!
आता डी ओ जे ला मोठी उपरती झालेली आहे. पण हा ढोंगीपणा करून व्हायचे ते नुकसान केलेच आहे.

कोविडच्या लशीला जबरदस्तीने गळ्यात मारले गेले. कोविड होऊन गेलेल्या लोकांना जी नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळते ती लशीपेक्षा चांगली असते ह्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले गेले. कुठलाही अभ्यास न करता ६ फूट अंतर ठेवण्याची सक्ती केली गेली.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लशीचे दुष्परिणाम कुठेही चर्चा करू दिले नाहीत ह्याची एफ बी आय खबरदारी घेत होती. या कारणावरून चांगल्या डॉक्टरना ट्वीटरवर बंदी घालण्यात आली.
कोविड वर लस हा रामबाण उपाय आहे असा दावा. मग लस घेतल्यावर कोविड होतो पण अगदी सौम्य होतो. मग लस घेतल्यावर कोविड होतो पण तुम्हाला हॉस्पिटलमधे जायची शक्यता कमी होते. मग लस घेतल्यावर कोविड होतो. तुम्ही हॉस्पिटलात जालही पण मरण्याची शक्यता कमी असते. वगैरे नित्य बदलते दावे केले गेले.
कोविड हा चीनी प्रयोगशाळेतून निर्माण झालेला व्हायरस आहे हे आता सर्वांनी स्वीकारले आहे. पण कोविड जोरात असताना असा विचार मांडणारा बहिष्कृत केला जात असे. फौची आणि त्याची फौज खोटी वैज्ञानिक संशोधने दाखवून ह्या दाव्याची नियमित खिल्ली उडवत असत. ट्रंपपासून अनेक लोकांनी हा दावा केला होता आणि त्यांना वंशद्वेष्टे, महामूर्ख, विज्ञानाशी फारकत घेतलेले वगैरे शिव्या दिल्या जात. आज ते खरे ठरत आहेत आणि विज्ञानाचा प्रेषित म्हणवून घेणारा फौची हा एक नराधम, खोटारडा, अहंकारी दुष्ट माणूस असे सिद्ध होते आहे.
,मुळात घाईघाईने बाजारात आणुन, पूर्ण साईड इफेक्ट न अभ्यासता ही लस लोकांना सक्तीने टोचणे हा एक अत्यंत घातक पायंडा आहे.
आयव्हर मेक्टिन ह्या औषधाची घोड्याचे औषध म्हणून टिंगल केली गेली. वास्तविक कोविड आहे असा संशय येताच हे औषध घेतल्यास कितीतरी फरक पडतो. भारताच्या अनेक भागात आयव्हर मेक्टिन दिले गेले. पण बड्या कंपनींचे उखळ पांढरे करायचा चंग बांधलेल्या फौची आणि अन्य लोकांनी दुसरे कुठलेही उपाय केले जाणार नाहीत ह्याची खबरदारी घेतली.
कोविड काळ हा भ्रष्टाचार, खोटी माहिती आणि अ त्याचार ह्यांचा बुजबुजाट असलेला काळ होता. कदाचित दहा वीस वर्षाने ह्याचे सत्य उघडकीस येईल.

सरकारी ब्रेन वॉशिंगमुळे अनेक खाजगी कंपन्यानी लस टोचून घ्या नाहीतर नोकरी सोडा असे धोरण राबवले होते. काही कंपन्या धार्मिक कारण असेल तर सवलत द्यायला तयार होते. पण हा मार्गही खडतर बनवला होता. अनेक लोकांनी धार्मिक मुद्यावरून लस न घेण्याचा प्रयत्न केला त्यांना कारण नाकारून नोकरीवरून काढून टाकले.
एकंदर हजारो लोकांच्या नोकर्या गेल्या असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
कोविड लस टोचल्याने कोविड होत नाही किंवा लस घेतलेल्या व्यक्तीमुळे कोविड पसरत नाही हे दोन्ही दावे पूर्ण खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवाय खुद्द त्या लशीचे किती दुष्परिणाम आहेत, नक्की काय दुष्परिणाम आहेत हे कायम गुलदस्त्यात ठेवले गेले आहे. तमाम औषध कंपन्या, फायजर वगैरे यांनी जोरदार काय्देशीर डिस्क्लेमर तयार करून आपल्याविरुद्ध लशीच्या दुष्परिणामांची दाद मागू शकणार नाही ही व्यवस्था करून ठेवली आहे.
फौची आणि अन्य नराधम अधिकारी लस बनवणार्या कंपन्यांकडून रॉयल्टी मिळवतात. ती आकडेवारी आम्ही देणार नाही ह्यावर ते ठाम आहेत. अशा प्रकारे पोसलेले लोक लशीच्या दुष्परिणामाबद्द्ल तटस्थपणे मत देतील का? की सक्तीने जास्तीत जास्त लशी लोकांच्या गळी उतरवण्याकरता उत्सुक असतील?
हा रोग आणि त्यावरील उपाय हे एक भयानक कारस्थान आहे की काय असा संशय येतो. कॉन्स्पिरसी थियरी च्या आहारी जात आहोत का वस्तुस्थितीच तशी विदारक आहे हे कळेनासे झाले आहे.

<कोविड लस टोचल्याने कोविड होत नाही किंवा लस घेतलेल्या व्यक्तीमुळे कोविड पसरत नाही हे दोन्ही दावे > असे दावे कोणी केले होते? भारतात तरी असे दावे अधिकृत , अधिकारी व्यक्तींनी केल्याचं दिसलं नाही. मायबोलीवर त्याबद्दल चर्चा झाली तिथेही असा दावा आहे असं आठवत नाही.

<लस घेतल्यावर कोविड होतो पण अगदी सौम्य होतो. मग लस घेतल्यावर कोविड होतो पण तुम्हाला हॉस्पिटलमधे जायची शक्यता कमी होते. मग लस घेतल्यावर कोविड होतो. तुम्ही हॉस्पिटलात जालही पण मरण्याची शक्यता कमी असते. वगैरे नित्य बदलते दावे केले गेले.> यात काही वावगं नाही. विज्ञान जशी जशी माहिती समोर येते त्यानुसार अनुमान ठरवतं. आणि कोव्हिडचा विषाणू हा काही स्टॅटिक नव्हता. तो स्वतः बदलत होता. त्यामुळे जुन्या रूपातल्या लशीचा परिणाम विषाणूच्या पुढल्या म्युटेशनमध्ये तेवढाच असेल असं नाही.
पण लशीकरण सुरू झाल्यावर हॉस्पिटल किंवा ऑक्सिजनची गरज पडलेल्यांत लस घेतलेल्यांचं प्रमाण कमी आहे, अशी आकडेवारी भारतात दिली जाई.
लस निर्मात्या कंपन्यांना इम्युनिटी, लशीच्या दुष्परिणामांबद्दल चर्चा न होणं याबद्दल सहमत. मान्यता मिळण्यासाठी केलेल्या चाचण्यांत याची उत्तरं असू शकतील.

<कोविड होऊन गेलेल्या लोकांना जी नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळते ती लशीपेक्षा चांगली असते > ज्यांच्यात अशी प्रतिकार शक्ती कमी असते अशा वृद्ध, व्याधिग्रस्त लोकांचं काय?

तुम्ही वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह लावताय. पण तुम्ही करत असलेल्या दाव्यांसाठी पुरावा काय? तुमचा विश्वास?

कोविड होऊन गेलेल्या लोकांना जी नैसर्गिक प्रतिकारशक्ती मिळते ती लशीपेक्षा चांगली असते
>>
हे खोटे आहे. असल्या खोट्या बातम्या पसरवण्यात रीपबलिकन हिरीरीने पुढे असतात. कोव्हीड लस न घेतलेल्या लोकांमध्ये मृत्यू आणि गंभीर रोगाची शक्यता जास्त होती. आकडेवारी बघितले तरी समजेल, की unvaccinated ग्रुप संख्येने लहान आहे पण एकूण मृत्युमध्ये त्यांचा वाटा अत्यंत disproportionately जास्त आहे. अजूनही लोकं लसी बद्दल थापा कष्या मरतात समजत नाही.IMG_20240120_110502.jpg

>>>>>हा रोग आणि त्यावरील उपाय हे एक भयानक कारस्थान आहे की काय असा संशय येतो. कॉन्स्पिरसी थियरी च्या आहारी जात आहोत का वस्तुस्थितीच तशी विदारक आहे हे कळेनासे झाले आहे.

काळजी घ्या हो!!! हे असे होणे बरोबर नाही वाटत. काळजी वाटते. असो.

<<<कोव्हीड लस न घेतलेल्या लोकांमध्ये मृत्यू आणि गंभीर रोगाची शक्यता जास्त होती. आकडेवारी बघितले तरी समजेल, की unvaccinated ग्रुप संख्येने लहान आहे पण एकूण मृत्युमध्ये त्यांचा वाटा अत्यंत disproportionately जास्त आहे.>>>

+१
कोविड लस निर्मितीत सगळ्यात मोठे आव्हान वेळेचे होते. व्हायरस कडे स्वतःची अशी सेल्युलर मशिनरी नसल्याने व्हायरस आणि मानवी पेशी ह्यांच्यातील वेगळेपणा ला लक्ष्य बनवुन औषध निर्मिती करणे फार कठीण असते. त्यामुळे वेगाने पसरत जाणार्या ह्या व्हायरल आजाराला अटकाव करण्याचा सगळ्यात खात्रीचा मार्ग लस हा होता. म्हणुन
लवकरात लवकर लस निर्मिती करणं आवश्यक होते पण त्या मुळे एरवी लस निर्मिती साठी जो वेळ घेतला जातो तो शास्त्रज्ञांकडे नव्हता. बहुतांश कोविड लसींमध्ये वापरलेले एम आर एन एन तंत्रज्ञान पण तुलनेने अपरिचीत होते. त्यामुळे कओव्हइड लस शरीरात काय काय परिणाम घडवुन आणले हे खात्रीने सांगता येणार नाही असेच जवळपास सगळे शास्त्रज्ञ सांगत होते. पण क्लिनिकल रिसर्च मधल्या "benefits outweigh the risks" ह्या तत्वाला अनुसरून सगळ्या वॅक्सिनस ना त्या त्या क्षेत्रातील अधिकारी संस्थांनी expedited approval दिले होते. कोविड लसींचा अभ्यास अजुन चालु आहे आणि पुढची काही वर्षे चालू राहिल.

@ शेंडे नक्षत्र राजकारण, राजकीय विरोध सगळे ठीक आहे‌ पण कृपा करून लसीबदद्ल संशय निर्माण होईल अशा पोस्ट्स टाकु नका. संशोधन क्षेत्र हे कोव्हिड काळात शास्त्रज्ञांनी अतिशय पारदर्शक पद्धतीने काम केले, ओपन प्लॅटफॉर्म वर डेटा शेअर केला (संशोधन प्रसिद्ध होऊन त्याचे श्रेय मिळण्याआधी एरवी डेटा गुप्त ठेवला जातो), स्वतः चे संशोधन बाजुला ठेवून अनेकांनी कोविड लस लवकरात लवकर निर्माण व्हावी म्हणून त्या त्या प्रोजेक्ट्स मध्ये मदत केली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचु शकले ही वस्तुस्थिती आहे. कृपा करून वस्तुस्थिती चा विपर्यास करु नका.

कोविड लसींमध्ये वापरलेले एम आर एन एन तंत्रज्ञान पण तुलनेने अपरिचीत होते.
>>>
पर्णिका +१.
एमारेने लस नवीन आहे. पण हे तंत्रज्ञान नवीन नाहीये, लसी साठी वापरता येईल का म्हणून ह्या तंत्रज्ञानावर अनेक दशकांपासून संशोधन चालू होते.

कोविड प्रकरणी प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळ झाला आहे. अ त्यंत खोटी माहिती देऊन, लोकांना घाबरवून एक घातक लस टोचून अनेक लोकांना दुष्परिणाम भोगायला लावले आहेत.
ह्या रोगाचे मूळ चीनमधे होते हे जाणूनबुजून लपवून ठेवण्यात आले.
६ फूट अंतर, लहान मुलांना मास्कची सक्ती हे सगळे निरर्थक होते. ६ फूट अंतर ठेवण्यामागे काहीही वैज्ञानिक कारण नाही हे नराधम फौचीने आत्ताच सांगितले आहे. हळूहळू लॉकडाऊन हे निरर्थक होते, लशीचे दुष्परिणाम जाणून बुजून लपवून ठेवले असेही बाहेर येईल.

ह्याबाबतीत ट्रंपने ही चूक केली होती. वेळीच फौचीला अर्धचंद्र दिला असता तर थोडा फरक पडला असता.

खोटी चेरी पिकिंग करून बनवलेली आकडेवारी मी स्वीकारणार नाही. जेव्हा कुंपण शेत खात असते तेव्हा कुणावर विश्वास ठेवणे अवघड जाते.

ह्या बीबीचा विषय नाही म्हणून मी हे थांबवतो. पण माझ्या मतात सुतराम बदल होणे नाही.

म्हातारबा २०२४ शर्यतीतून माघार घेईल या आशेवर गुडघ्याला बाशिंग बांधून वाट पहात बसलेला कॅलिफोर्निया गवर्नर न्युसन्स लटकत रहाणार असे दिसते आहे. बिचार्याने सॅन फ्रान्सिस्कोचा महापौर बनून त्या शहराची वाट लावली, कॅलिफोर्नियाचा गवर्नर बनून त्या राज्याची वाट लावली. पण अमेरिकेचे अध्यक्षपद मिळवून अमेरिकेची पुरती वाट लावण्याचे स्वप्न मात्र अपुरे रहाणार!
अनंतकोटी ब्रह्मांडनायक ओबामाजींची पत्नी मिशेल ओबामा डेमोक्रॅट पक्षाकडून नामांकन मिळवणार आणि म्हातारबांची गच्छंती होणार अशा अफवा उठत आहेत. एकंदरीत इंटरेस्टिंग गोष्टी चालू आहेत.

पण माझ्या मतात सुतराम बदल होणे नाही.
>>> ते आहेच हो. नजरेसमोर असलेला पुरावा चेरी पिकिंग म्हणून बाजूला सारायला सुरू केले की मत कसे बदलणार ? डाटा नाकारला की ट्विटर वरचे कन्स्पिरसी थेरिस्ट राहिले माहिती घेण्यासाठी.
डाटा चेरी पिकींग केलेला आहे हे सिद्ध करा. तुम्हाला आवडत नाही म्हणून डाटा चेरी पिकड होत नाही.

शेंडेनक्षत्र व मी हे महान संत मोतीलाल यांचे शिष्य आहोत.
जिन्दगी ख्वाब है, ख्वाबमे झूठ क्या और भला सच है क्या (ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या) असे महान संत मोतीलाल यांनी जागते रहो या सिनेमात परत परत म्हणून ठेवले आहे. म्हणून समोर जे जे दिसते ते खोटे असे आम्ही म्हणतो.
पुनः अहं ब्रह्मास्मि! त्यामुळे मी म्हणेन तेच खरे.
तर हे असे आहे.
हे भारतीय तत्वज्ञान आहे, यावर शंका घेऊ नका.
आमच्याशी वाद घालू नका.

पण हे प्रकरण पार गाडून टाकले गेले. आणि तरी इलेक्शन अगदी कशा शुचिर्भूत वातावरणात पार पडल्या असे अट्टाहासाने मानायचे! वा! >>>

एखादी व्यक्ती चोर असल्याचे सिद्ध झालेले नाही असे कोणी म्हणत असेल तर लोक ती व्यक्ती पोलिस आहे असा अट्टाहास करत आहेत असा अर्थ होत नाही. ती निवडणूक "चोरल्याचे" कोठेही सिद्ध झालेले नाही, इतकेच. ९० खटल्यांंनंतर सुद्धा. आणि क्रॅकेन वगैरे रिलीज करणार्‍यांनीच नंतर हे सगळे बकवास होते हे ही कबूल केले आहे (त्यांच्या फॅन्सनी इथे केले नसले तरी. तेवढी, किंवा केवढीच, ह्युमिलिटी त्यांच्याकडे नाही). फॉक्स ने ८०० मिलीयन सकट कबुली दिली आहे. तरी अजून हे आहेच का?

आणि इलेक्शनच्या ४ दिवस आधी हिलरीबद्दल एफबीआय ने सनसनाटी खबर छापल्याचा ट्रम्पलाही २०१६ मधे फायदा झाला होता. वरच्या लॉजिकने त्याची निवडही "शुचिर्भूत" होत नाही.

लायझॉल प्या सांगणारा संत महात्मा आहे, येशूनंतर तोच आहे, आणि सध्या उपलब्ध माहितीनुसार खबरदारी घ्या सांगणारा नराधम आहे. सॉलिड लॉजिक आहे.

(तुमच्या सारखे एक्झॅगरेशन नेहमी जमतेच असे नाही, पण कधीकधी ऑल्मोस्ट जमते)

राजकारणी लोक आज वेगळेच बोलतात व उद्या वेगळेच पण डिसॅण्टिसने शब्दश: तसे केले आहे.

कालच तो हे म्हंटला होता ट्रम्प बद्दल (नॅन्सी पेलोसीच्या ऐवजी ट्रम्पने २-३ वेळा निकी हेलीचे नाव घेतले जाने ६ बद्दल - त्यावर ट्रम्पही म्हातारा झाला आहे, बायडेन २०२० मधे निवडून आला तेव्हा तो (बायडेन) ज्या वयाचा होता त्याच्यापेक्षाही ट्रम्प नोव्हेंबर २०२४ मधे म्हातारा असेल ई.ई).

आज १८० अंशात फिरून ट्रम्पला पाठिंबा. कोणता डिसॅण्टिस खरा?

कुठलाहि राजकारणी सतत खरे किंवा खोटे बोलत नसतो. जे बोलल्याने स्वतःला मते मिळतील. सत्ता मिळेल, जनतेच्या पैशावर चैन करता येईल, ते बोलत असतात. त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका.
आपण आपले घर, कुटुंब, पैसे संभाळून रहावे, क्रिकेट, फूट्बॉल, बेसबॉल नाहीतर हिंदी सिनेमे बघावे.

डेम्स मधली वोक ब्रिगेड तात्याला २०२४ मधे अध्यक्षपद बहाल करणार असे दिसते. अशा बातम्या पूर्वी फक्त फॉक्स मधे येत.
https://www.cnn.com/2024/01/23/food/in-n-out-oakland-closure-crime/index...

Pages