Submitted by webmaster on 2 April, 2021 - 12:04
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
४६ वे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ११७ वी काँग्रेस (सध्याची काँग्रेस) आणि अमेरिकेतलं राजकारण
त्याच्यावरचे सर्व खटले पॉज
त्याच्यावरचे सर्व खटले पॉज करून सरकारी वकील म्हणतील त्याला फक्त फॉक्सवर मुलाखती देउ द्या. सर्व पुरावे आपोआप बाहेर येतील Happy >>
(No subject)
अगदी! गिल्ट जाहिरपणे सांगायला
अगदी! गिल्ट जाहिरपणे सांगायला त्याला कोणीच कसं अडवलं नाही? मुलाखत हाताबाहेर जाते आहे, फ्रेंडली चॅनल आहे तर तिकडेही थांबवलं नाही कोणी?
Can any of what he said be
Can any of what he said be admitted in the court of law as a confession? No!
मग कशाला थांबवतील? हे 'मी फिफ्थ अॅव्हेन्यूवर मर्डर करूनसुद्धा सुटेन'चं लाइव्ह प्रात्यक्षिक सुरू आहे! जितं मया!
बाय द वे, ख्रिस ख्रिस्ती च्या
बाय द वे, ख्रिस ख्रिस्ती च्या मुलाखती पाहिल्यात का इतक्यात? या सगळ्या गदारोळात तो सेन्सिबल वाटतो. त्याची बोलायची स्टाइलही मस्त आहे. मी २-३ च क्लिप्स पाहिल्या आहेत. त्याची अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर मते अजून माहीत नाहीत. पण आणखी बघण्याइतका इंटरेस्ट आहे. मुख्य म्हणजे मागा क्राउड समोर लोटांगण घालणार्या इतर उमेदवारांपेक्षा तो स्पष्ट पणे ट्रम्पविरोधात बोलत आहे.
काल हंटर बायडनच्या बातमीवरून रिपब्लिकन्स का इतके रडत आहेत? तात्यालाही पन्नास वेळा नम्रपणेच कागदपत्रे मागितली होती ना? त्याने आडमुठेपणा केला आहे हे त्याने स्वतःच दिलेल्या मुलाखतींवरून कन्फर्म झाले आहे. त्याने ते वेळीच दिली असती तर हे सगळे व्हायची काही गरजच नव्हती.
हो ख्रिस्ती अॅक्चुअली
हो ख्रिस्ती अॅक्चुअली सेन्सिबल वाटायचा आधी. सँडी च्या कॅटॉस्ट्रॉफीच्या वेळी त्याने खुप चांगले हँडल केली होती परिस्थित्ती. नंतर गेल्या निवडणुकीत ट्रम्प ला सपोर्ट जाहिर केल्यानंतर फारच कोलांट्या उड्या मारून माकड करून घेतले त्याने स्वतःचे. आता पुन्हा बर्या वाईटाचा साक्षात्कार झालेला दिसतोय.
>>> सँडी च्या
>>> सँडी च्या कॅटॉस्ट्रॉफीच्या वेळी त्याने खुप चांगले हँडल केली होती परिस्थित्ती.
ब्रिजगेट आणि स्टेट गव्हर्न्मेन्ट शटडाऊनमध्ये सकुसप बीचवर गेला - हे त्याला कायम हाँट करणार.
आज बघितली मुलाखत
आज बघितली मुलाखत
सोमवारी अँथनी ब्लिंकन चायना
सोमवारी अँथनी ब्लिंकन चायना मधे होते, शी जिनपिंगसोबत हस्तांदोलन/ चर्चा झाली.
आज बायडन यांनी शी जिनपिंग यांच्यासाठी " डिक्टेटर " शब्द वापरला.
दोन देशांत मोठा अविश्वास आहे, बिघडलेली घडी बसवण्याचा प्रयत्न होत असतांना अशा डिवचण्याने काही साध्य होणार नाही.
२०२४ च्या निवडणुकीचा निकाल
२०२४ च्या निवडणुकीचा निकाल लागला
मोदी बोलणारेत आत्ता. पी बी एस
मोदी बोलणारेत आत्ता. पी बी एस डॉट ऑर्ग वरती थेट प्रक्षेपण आहे.
https://www.pbs.org/newshour/politics/watch-live-indias-prime-minister-m...
हाहाहा AI = अमेरिका & इंडिया मोदी म्हणतात
आला रे 'योगा' चा उल्लेख आला
पहा
mmmf
मुलाखत हाताबाहेर जाते आहे,
मुलाखत हाताबाहेर जाते आहे, फ्रेंडली चॅनल आहे तर तिकडेही थांबवलं नाही कोणी? >>> फॉक्सला फार काही इंटरेस्ट नसेल आता. प्रश्न फक्त मागा क्राउडचा आहे. एकूण सर्व चॅनेल्स ख्रिस्तीला जितकी प्रसिद्धी देऊ लागले आहेत त्यावरून तो चॅनेल्स/मीडियाचा फेवरिट उमेदवार दिसतो आहे. नाहीतर पोलिंग नुसार तो बराच खाली आहे.
हायला तात्या प्रायमरी डिबेट
हायला तात्या प्रायमरी डिबेट मध्ये येणार नाही म्हणतोय. छ्या. पहिल्या वेळेस काय धमाल होती.
<<<ब्रिजगेट आणि स्टेट
<<<ब्रिजगेट आणि स्टेट गव्हर्न्मेन्ट शटडाऊनमध्ये सकुसप बीचवर गेला - हे त्याला कायम हाँट करणार.>>>
त्या गमती फक्त न्यू जर्सीच्या लोकांना माहित आहेत. इतर राज्यातले लोक म्हणतील हाँ, सो व्हाट?
लोक त्रंपला मते देतात, त्याच्यापुढे ख्रिस्ति बॉय स्काउटच आहे.
मस्तच चर्चा. माझी एक
मस्तच चर्चा. माझी एक कन्स्पिरसी थिअरी आहे. तात्याला निवडून आणले. मग लगेच तो सत्तेत असतानाच युक्रेन वर हल्ला करायचा प्लान होता.
मग झे ले न्स्कीला मदत मिळालीच नसती व काम थोडक्यात झाले असते. पण कोविड आला व सर्व टाइम टेबल पुढे गेले. मग मोमेंटम गेला थोडा बहुत. असे असेल का?
https://www.npr.org/2023/07
https://www.npr.org/2023/07/26/1190173929/rudy-giuliani-georgia-election...
सगळी २०२० ची बकवास बाहेर येऊ लागली आहे.
जॉर्जियाची इण्डाइटमेण्ट फॉलो
जॉर्जियाची इण्डाइटमेण्ट फॉलो करत आहात का लोकहो? फार इंटरेस्टिंग आहे. तिथल्या डीए ने तब्बल १९ लोकांवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्या नोव्हें २०२० च्या आसपासच्या अनेक स्पेसिफिक अॅक्शन्स नुसत्या स्वतंत्रपणे पाहिल्या तर ते गुन्हे नाहीत. पण ते सगळे एका मोठ्या षडयंत्राचा भाग होते असे आरोपपत्र आहे.
हे सगळे सिद्ध कसे करणार ते पाहणे इंटरेस्टिंग होईल. जॉर्जिया मधे खटला टीव्हीवर दाखवता येतो. ते ही केले जाईल बहुधा.
जनरल अंदाज असा केला जातोय की या १९ पैकी काही लोक माफीचे साक्षीदार होतील तर काही असेच काहीतरी डील करतील.
या सगळ्याच्या मुळाशी गुन्हा सिद्ध होऊ शकणारे पुरावे काय काय आहेत ते सगळे अजून बाहेर आलेले नाही. ट्रम्प ने रॅफेन्सपर्गर ला "११००० मते शोध" म्हणून केलेला फोन, त्या कॉफी काउण्टी का कोठे ट्रम्पचे लोक जाउन तेथील वोटिंग डेटा कॉपी करणे वगैरे इतकेच सध्या माहीत आहे. त्यात त्या फोन बद्दल तो निर्विवाद पुरावा होऊ शकतो का नाही याबद्दल तज्ञांत वाद आहेत.
यात गुन्हा सिद्ध झाला व त्याला शिक्षा झाली तर त्यातून पार्डन मिळणे सोपे नाही. म्हणून ट्रम्प व इतर लोक ही केस फेडरल कोर्टात हलवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याच्या बाजूने व विरोधातील आर्ग्युमेन्ट्सही रोचक आहेत. एका प्रेसिडेण्टच्या नेहमीच्या कामासंबंधी काही केस असेल तर ती फेडरल केस होऊ शकते. पण इथे ट्रम्पने तेव्हा निवडणुकीबद्दल फोन करणे वगैरे त्याच्या एक प्रेसिडेण्ट म्हणून जबाबदारीचा/कामाचा भाग नाही. एका राज्यातील निवडणूक बरोबर झाली आहे का हे पाहणे ही त्या राज्याची जबाबदारी आहे. प्रेसिडेण्टने रॅण्डमली फोन करून मते शोध सांगणे त्यात बसत नाही - वगैरे मुद्दे आहेत. ते बरोबर वाटतात. कोर्टाला ते मान्य झाले तर हा खटला जॉर्जियातच राहील.
एकूण या लोकांनी असंख्य काड्या केल्या आहेत ते उघड आहे. फक्त स्पेसिफिक आरोप सिद्ध करायला तसे पुरावे आहेत की नाही अजून कळत नाही.
शेंडेनक्षत्र - २०२४ करता नविन
शेंडेनक्षत्र - २०२४ करता नविन धागा काढा..
कालची डिबेट मस्त झाली. विवेक रामास्वामीला भरपूर एयर्टाइम मिळाला, रादर त्याने मिळवला. हि डिस्ट्रॉय्ड ख्रिस ख्रिस्टी व्हेन हि वाज रेल्ररोडेड बाय ख्रिस्टी. अपॅरंटली, ख्रिस्टी डिडंट सी दॅट कमिंग. फनी मोमेंट. बाकि, रॉन डिसँटिस लूक्ड लॉस्ट, निकि वाज ओके बट शी डझंट स्टँड ए चँस. उरलेले दखलपात्र नाहित. डझ रामास्वामी हॅव पोटेंशियल टु बी ए नेक्स्ट ओबामा, ओन्लि टाइम विल टेल...
डझ रामास्वामी हॅव पोटेंशियल
डझ रामास्वामी हॅव पोटेंशियल टु बी ए नेक्स्ट ओबामा, ओन्लि टाइम विल टेल... >> वेट - हिंदू नॉन व्हाईट गाय पुशिंग आउट तात्या फॉर जीओपी नॉमिनेशन ? ऑर फॉर दॅट मॅटर फॉर नेक्स्ट व्हॉएव्हर गाय २०२८ नि पुढे ? अशी सूतराम शक्यता वाटत नाही. झाडून सगळे लिबरल मिडीया चॅटबॉट चे कौतुक करत आहेत तर उरलेले 'न तळ्यात ना मळ्यात' मोड मधे आहेत ह्यातच समजा काय ते.
माझा अंदाज - रामस्वामी असाच
माझा अंदाज - रामस्वामी असाच पोल्स मधे चढत जाउन नं २ ला येइल. ट्रम्प रेस मधे राहिला तर त्याचा रनिंग मेट होईल. ट्रम्प जर त्याच्या खटल्यांमुळे रेस मधून बाहेर पडला (तशी शक्यता सध्या दिसत नाही) तर मात्र रिपब्लिकन फिल्ड एकदम ओपन होईल. कारण पब्लिक जरी रामस्वामीला फुल सपोर्ट करत असले तरी प्रेसिडेंट म्हणून त्याला इतका वाइड सपोर्ट पुढच्या वर्षभरात तरी मिळण्याची शक्यता कमी आहे.
तो बोलताना सगळे कॉन्झर्वेटिव्ह्/मागा चेकमार्क्स चेक करतो. तात्याच्या विरोधात थेट जात नाही. तात्या निवडून आलाच आणि हा व्हीपी झाला तर ४ वर्षांत प्रेसिडेण्टपद त्याच्या आवाक्यात असेल.
डिसॅण्टिस मात्र अगदीच गर्दीत हरवला. नोव्हें २२ नंतर त्याचा ग्राफ जितक्या वेगात वर आला तितक्याच वेगात तो परत खाली गेलाय.
रिपब्लिकन स्पेक्ट्रम मधे एका बाजूला रामस्वामी/डिसॅण्टिस तर दुसर्या बाजूला ख्रिस्ती आहे. ते बाकीचे दोन-तीन धरत नाही कारण त्यांना आणखी सपोर्ट मिळेल असे दिसत नाही. पेन्स बर्यापैकी चांगला बोलत होता पण तो ही फार पुढे येणार नाही.
फा, रामास्वामी च्या नावाने
फा, रामास्वामी च्या नावाने आधीच तो हिंदू आहे ह्याबद्दल कोल्हेकुई सुरू झाली आहे.
>>हिंदू नॉन व्हाईट गाय पुशिंग
>>हिंदू नॉन व्हाईट गाय पुशिंग आउट तात्या फॉर जीओपी नॉमिनेशन ?<<
वेट, ट्रंपला जिओपी नॉमिनेशन मिळणार हे ब्लेटंटली म्हणतांय! समबडी पिंच मी...
आय थिंक, रामास्वामी विल हॅव टु टोन डाउन हिज स्टँड ऑन क्लायमेट चेंज. नो पॉइंट इन टिकिंग ऑफ नु वोटर्स...
ट्रंपला जिओपी नॉमिनेशन मिळणार
ट्रंपला जिओपी नॉमिनेशन मिळणार हे ब्लेटंटली म्हणतांय! >> ते उघडच आहे ना.
रामास्वामी विल हॅव टु टोन डाउन हिज स्टँड ऑन क्लायमेट चेंज. >> +1 He is just trying to instigate MAGA crowd.
बाय द वे रामस्वामी या
बाय द वे रामस्वामी या पब्लिकमधे अमेरिकन अॅक्सेण्ट मधे बोलायला लागला की थ्री इडियट्स मधल्या चतुर रामलिंगम सारखा त्याला कोणीतरी बोलायला उभा करून त्याची फिरकी घेत आहेत असे वाटते. आणि तो ऑफिस मधल्या मायकेल स्कॉट सारखा आजूबाजूला काय चालले आहे त्याच्याशी पूर्ण अनभिज्ञपणे हा सगळा प्रतिसाद आपल्यालाच मिळतोय अशा समजात आहे - असे ही कधी कधी वाटते
कालचा दिवसच भारतीय लोकांनी
कालचा दिवसच भारतीय लोकांनी गाजवला एकूण. चांद्रयान त्या तिथे पलिकडे उतरवलं. नंतर चेसमध्ये प्रज्ञानंद उपविजेता ठरला. आणि जिओपी डिबेटमध्ये पंजाबी कुडी निक्की आणि टॅमब्रॅम रामू एकमेकांशी कचाकचा भांडले. तो बहुधा व्हीपी साठीच ट्राय करतो आहे. कमला होऊ शकते तर मी का नाही टाईप? आणि आता sizeable indian voters असावेत निदान काही ठिकाणी निकाल फिरवू शकतील इतके. सो त्याला चान्स आहे. बाकी तो थोडा वेडसरपणे हसत असतो ते ठीके. हिंदू असणं इश्यू होऊ शकेल. कमला ख्रिश्चन आहे. ऋषी सूनक(नाना मूर्तींचे जावई) तर टोटल कट्टर हिंदू आहे (परवा केंब्रिजला जिझस कॉलेज नामक वास्तूत तो रामकथा ऐकायला गेला होता आणि जय श्रीराम अशा घोषणा देत होता. राणी गेली आणि जुनं इंग्लंड हरवलं.) पण ऋषी जनतेतून निवडून नाही आलेला अजून. देखते है.
निकी हेली चांगली वाटली मला
निकी हेली चांगली वाटली मला डिबेट मध्ये. खास करून अबॉर्षन वर तिने सूज्ञ स्टँड मांडला, conservative दृष्टीतून. आधी जे मोस्ट अमेरिकन मान्य करतील असे अबोर्षन रेस्ट्रिक्षन आणू. पुढचे पुढे.
हेली, ख्रिस्ती, हचींसन जानेवारी ६, पेन्सचे निर्णय आणि ट्रंपच्या गुन्ह्यांबद्दला सेन माणसांसारखे बोलले. मिटबॉल रॉनने त्याबाबत जास्त न बोलण्याचा निर्णय घेतला. ट्रंपने गुन्हे केलेत इतके म्हणले तरी पबलिक बू करत होती. अजूनही फॅशिस्ट समर्थक आहे म्हणायचा बराचसा GOP बेस.
फॉरेन पॉलिसी वर विवेक पूर्णपणे तोंडावर पडला. हेलिने चांगले धारेवर धरले.
विवेक all style but same substance as Trump आहे.
बाकी एक निरीक्षण. विवेक आणि रॉनला मॉडरेटर कडून सगळे सॉफ्टबॉल पडत होते. ख्रिस्ती आणि टीम स्कॉटबाबत मात्र सगळे प्रश्न, हीपोक्रसी दाखवण्याचे प्रयत्न इत्यादी चाललेले.
रिपबलिकन नेत्यांना सोरोस
रिपबलिकन नेत्यांना सोरोस बद्दल बोलायला फार आवडते. पूर्वी एका "कबाल" बद्दल बोलायचे, त्याआधी थेट ज्युंचे नाव घेऊन बोलायचे, आता त्यावर आवरण चढवून सोरोस बद्दल बोलतात. "सोरोस फंडेड डिस्ट्रिक्ट अटर्निज" वर कारवाई करणार असे भर सभे मध्ये कालच रॉन डीसांतीस म्हणाला. एकूण, सोरोस कडून पैसे घेणे हे रीपबलिकन नेत्यांनी (एकमेकांवरच वापरायचे) अण्वस्त्र बनवले आहे. (एकमेकांवरच कारण असल्या थेयऱ्या रीपबलीकन बेसला पटतात. डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी सोरोस कडून पैसे घेतले तरी त्यांना मत देणाऱ्या लोकांना फार फरक पडणार नाही.)
त्यावर एक जोक पाहिला.
विवेक रामस्वामीला २०११ मध्येच येल मधून लॉ डिग्री घेण्यासाठी सोरोसच्या संस्थेतून फेलोशीप मिळालेली.
सोरोस आजकाल आपल्याकडच्या
सोरोस आजकाल आपल्याकडच्या व्हॉट्सॅप अंकल्सनाही माहीत झालेला दिसतो. बर्याच रॅण्डम फॉरवर्ड्स मधून येत असतो
ख्रिस्ती आणि टीम स्कॉटबाबत मात्र सगळे प्रश्न, हीपोक्रसी दाखवण्याचे प्रयत्न इत्यादी चाललेले. >>> "UFO? I get the UFO question?" - ख्रिस्ती
मजा आली डिबेट बघायला.
मजा आली डिबेट बघायला. रामास्वामीची पर्सनॅलिटी आणि त्याचा नेमका बाणा ह्यावर असं बोट ठेवता येत नाहीये मला. खुपच विचित्र काहीतरी कॉम्बो आहे त्याचा. शिकलेला आहे, आंटरप्रनर आहे पण विचार काहीतरी वेगळेच आहेत. म्हणजे कधी कधी सेन्सिबल बोलतो असं म्हणावं तर काहीच्या काही विधानं पण केलेली आहेत त्यानी. बोलायचा सपाटा खुप आहे आणि कदाचित तो हुशार असल्यामुळे फास्ट थिंकर आणि त्याच बरोबरीने ते विचार मांडण्यात फ्लुअंट सुद्धा आहे पण कुठेतरी काहीतरी पाणी मुरतय असं वाटत राहतं.
त्या मानानी हेली आणि पेन्स सुद्धा बरे वाटले. पेन्स खुप अनुभवी आहे पण कन्झर्वेटिव असल्यामुळे नेहमीचे बॅगेज आहेच. त्यामुळे हेलीच चांगली वाटली मला. बोलण्यात सुस्पष्टता आहे आणि ह्यावेळी अबॉर्शन विषयावर ताकाला जाऊन भांडं न लपवता नीट मतं मांडले तिनी.
टिम स्कॉट ला बॅकिंग आहे मोठ्या लोकांचे असं एकलय्/वाचलय (बहुतेल लॅरी एलिसननी डोनेट केलं त्याच्या कँपेन ला, आठवत नाही आता) पण तो आय कॅचर नाहीये. डिबेट विनर वगैरे नाही होऊ शकणार आणी पुढे त्याच्या विषयी पोलिंग कसं आहे त्या हिशोबानी पाठीराखे किती टिकतात ते अवलंबून आहे.
क्रिस्टीचं सध्या तरी काही खरं नाही. मागा पब्लिक जगणं मुश्किल करतील त्याचं.
बाकी ट्रंपचा मग शॉट पाहिला का? मला अजून त्याची टकर कार्लसननी घेतलेली मुलाखत बघायची आहे.
Pages