चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोलमाल १ एका गुजराथी नाटकावरुन घेतलेला आहे की जे मराठी नाटकावर आधारित होते.

गोलमाल १ एका गुजराथी नाटकावरुन घेतलेला आहे की जे मराठी नाटकावर आधारित होते>><> मराठी नाटक: घरघर. विजय पाटकर यांचे पहिले नाटक

१२वी फेल बद्दल सर्वांना अनुमोदन तर आहेच पण तो विक्रांत मेसी ज्या पद्धतीने सिनेमात हसला आहे (तो विद्यार्थी असताना ज्या लोकांचे त्याच्याहुन समाजात वरचे स्थान आहे त्या लोकांकडे पाहुन हसताना), ते पाहुन त्याला साष्टांग नमस्कार आणि माझ्यातर्फे ऑस्कर बहाल.

गोलमाल सारखा all the best सुद्धा आहे रोहित शेट्टी चा.
तो पती सगळे उचापती ची copy आहे

ऑल द बेस्ट संजय मिश्रा नी खाल्लेला सिनेमा आहे.
अजय देवगण त्यातल्या त्यात थोडा वर येतो. बाकी सगळे साधारण.

धोंडू, जस्ट चिल...

बाकी गोलमाल म्हटल्यावर रोहित शेट्टी आठवत असेल तर हर हर.>>> हे मात्र खरं आहे. गोलमाल म्हटले की आनेवाला पलच आठवते. मग नंतर बाकीचे

हे तुम्ही कुठल्या जनरेशन चे आहात यावर अवलंबून आहे ना Happy

जसे ते आपले सनी म्हटले की सनी गावस्कर आठवतो, सनी देओल आठवतो की आपली सनी लिओन आठवते..

जनरेशन नाही रे. सोनी वर गोलमाल इतक्या वेळा लावला होता आणि तो पहिल्या वेळाच आवडला होता. त्यामुळे प्रत्येक वेळेस पाहिला गेला. Lol

तोच खरा गोलमाल बाकी सब झोलझाल Wink

तसे सनी म्हटले की बजाज सनी आठवते ... आता काय घ्या Proud

दोन्ही गोलमाल आवडीचे आहेत.
पहिला गोलमाल छान आहेच. पण दुसरा अतिशय फालतू आहे. चौघे, दुष्ट , मत्सरी, स्वार्थी, चावट एकुणच सर्वगुणसंपन्न आहेत. त्यामुळे फारच मजा येते. मनोज जोशीला 'खास जगह का कॅन्सर' म्हणतात व वर्गणी गोळा करून पार्टी करतात, गोपालला विष घालतात, वसूलीला 'वास्तवका टिका भाई बिलकुल संजय दत्त' म्हणून पैसे बुडवतात, शर्मन जोशीलाच समजणारं तुषार कपूरचं 'ऊ ऊ' . चौघे लपून बसतात, पुन्हा तिथंही मनोज जोशी येतो तर 'ब्लॅक ब्लॅक' खेळतात, सूड घेतला आहे अगदी. Lol

परेश रावल आणि सुश्मिता मुकर्जीचं 'आगे पिछे डोलते हो भंवरो की तरह' गाणं. शेवटी ते दोघं 'तुम्ही चौघं आमचे श्रवण(बाळ) बनून रहा' म्हटल्यावर 'और नदीम भी' म्हणतात. Lol या दोघांचंही काम एकदम लल्लनटाप.

जबरदस्त फालतूपणा, sarcasm , हजरजबाबीपणा आहे. शर्मन जोशी आणि अर्शद वारसी दोघांचंही टाईमिंग जबरी आहे. नंतर त्यानं तळपदेला घेतलं मग ती मजा आली नाही मला. त्याच्या देहबोलीत आणि संवादफेकीत 'शुद्ध' पांचटपणाला लागणारा बेदरकारपणा नव्हताच कधी. काही गोष्टी पांचटच असल्या पाहिजेत, किंचितही सभ्य नको. पूर्ण 'निर्लज्ज' व्हायला हवं. Happy

पिसं काढण्याच्या टीपी साठी सिनेमा शोधत होतो. पण जे बघतोय ते बरे निघताहेत.
या उपाद्व्यापात हिट - द फर्स्ट केस नावाचा डब्ड चित्रपट पूर्ण पाहिला. शेवट बघताना लक्षात आलं कि अरेच्चा ! हा तर आपण आधीच पाहिला आहे. त्या वेळी चालाक खिलाडी कि पुलिसवाला खिलाडी नाव होतंं.

सुनिधी तुम्हाला किंवा इतर कुणाला उद्देशून नाही.
जनरल गोलमाल सिरीज मधली मला सगळ्यात इरिटेट करणारी गोष्ट म्हणजे तुषार कपूर. जाम डोक्यात जातो माझ्या.
मला तुषार कपूरचा आवडलेला एकमेव चित्रपट म्हणजे 'मुझे कुछ कहना है'. बहुतेक त्याला लाँच करण्यासाठी काढला होता. त्याची कथा (मधेच ढिसाळ झाली तरी ) चांगली होती. रिलेटेबल, काळाशी सुसंगत होती. त्याचे, करीना आणि रिंकी खन्नाचे पात्रही चांगले रेखाटले होते. केकेचे टायटल सॉन्ग ही आवडले होते.

मुझे कुछ कहना है मला पण आवडायचा.त्यात तुषार कपूर एकदम भाबडं काम करतो.अमरीश पुरी पण धमाल.
गोलमाल 2(अँथनी गोंसालविस) मध्ये तुषार कपूर आणि श्रेयस दोघे ऍट बेस्ट आहेत.आम्ही खूप वेळा बघतो.आणि वसुली आणि मुन्नी पण.
"वसुली, तू इस लडकी को ऐसें नही ले जा सकता. कानून के हाथ बहुत लंबे है"
"ओह, तो इसका नाम कानून है?चल कानून मेरे साथ."

फिबां, त्यात तो (गायब होत असल्याने) पडद्यावर नसताना का? Happy का कोणास ठाउक मला तुम्ही तेच म्हणत आहात असे वाटत आहे Happy

खाकी मध्ये अमिताभ, अतुल कुलकर्णी, अक्षय कुमार आणि मग तुषार कपूर असा क्रम लावेन मी. पण येस चांगले काम केलेय त्याने. कॅरॅक्टर ग्राफही चांगला आहे त्याचा.

गोलमाल, खाकी, गायब, मुझे कूच कहना है...
अजून एखाद्या पिक्चर मध्ये त्याने चांगले काम केले आहे असे आता कोणी म्हटले तर मी त्याच्या प्रेमातच पडेन असे वाटते Happy

बाई दवे,
जसे उदय चोप्रा अभिनयाच्या नावाने बोब असून देखील धूममध्ये कमाल करतो तसेच तुषार कपूर गोलमाल मध्ये करतो हे बाकी खरे आहे.

आणि मुझे कूछ केहना है मध्ये बहुधा त्याला पहिल्यांदाच पाहिल्याने जे आहे ते ठिक समजून मलाही तो त्या पिक्चर मध्ये सुसह्य वाटलेला. आणि पिक्चर आवडलेला..

त्या अर्जुन कपूर बाबत हेच टू स्टेटस चित्रपटाबाबत झालेले. त्याचा ठोंब्या सारखा वावर मला त्याची कूल स्टाईल वाटलेली आणि त्यात तो चित्रपटासह आवडलेला...
नंतर समजले त्याला कुठलाही चित्रपट कुठलाही रोल द्या, तो ठोब्यासारखाच वावरतो..

Pages