Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58
आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोणी तो 'सलार' नावाचा चित्रपट
कोणी तो 'सलार' नावाचा चित्रपट पाहिला का?
गेल्या आठवड्यात कर्णावतीला (अहमदाबाद) मित्राकडे गेलो होतो. तिथे Sunset Drive-In Cinema नावाचे open theatre आहे. याआधी मी कधी open theatre पाहिले नसल्याने त्या संकल्पनेचा अनुभव घेण्यासाठी तिथे जो चित्रपट असेल तो पाहायचे आधीच ठरवले होते (अगदी गुजराती असेल तरी!). नेमका तिथे हा 'सलार' लागला होता. ठरल्याप्रमाणे बघितला पण हिंदीत असूनही काहीही कळला नाही! मध्यांतरानंतर अर्धवट सोडून आलो!
आता काय एडिटलं ?
आता काय एडिटलं ?
सलार मी बघितला थिएटरमध्ये
सलार मी बघितला थिएटरमध्ये तेलुगू वीथ सबटायटल्स..
मला जरा जरा कळला पण शेवट वीस मिनिटे डोक्यावरून गेला...कंटिन्यु बैकग्राऊंड म्युझिक, सस्पेन्स, स्क्रीन प्ले आवडलं...केजीएफ ला स्टोरी अशी नव्हती.. सलार ला गुंतागुंतीची स्टोरी आहे..
बाहुबली नंतर यात प्रभास मस्त दिसलाय...
आन, मुझे जीने दो या साठी
आन, मुझे जीने दो या साठी स्पेशल +1
माझेही खूप आवडते चित्रपट आहेत. आणि फारसे याबद्दल कोणी बोलताना मला आढळत नाही.
१२वी फेल फार सुंदर आहे.
१२वी फेल फार सुंदर आहे. बघण्यापूर्वी बॅकग्राऊंड अजिबात माहित नसल्ताने जास्त एन्जॉय केला.
Submitted by सायो on 2 January, 2024 - 14:36 >>>>>>
मलाही बॅकग्राऊंड माहित नव्हते आणि सुपर ३० बरोबर तुलना केल्याची कुठे तरी वाचले होते .
सावकाश बघावा म्हणून पेंडींग ठेवलेला , शेवटी आज बघितला !
सुंदर सिनेमा तो ही सत्यकथेवर .
खूप कमी सिनेमे आहेत जे डोळ्यात पाणी आणू शकतात , त्यातील हा एक 12 th fail .....
या सिनेमाला राष्ट्रीय पातळीवरील एखादे बक्षीस मिळायला हरकत नाहीं
काल पाहिला १२ वी फेल.
काल पाहिला १२ वी फेल.
फार सुंदर. सगळ्यांचीच कामं छान आहेत. विक्रांत मेस्सीला तर बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स, डोळ्यातून हावभाव व्यक्त करणे यासाठी पैकी च्या पैकी मार्क्स!
कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे १२
कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे १२ वी फेल?
Hot star वर आहे .
Hot star वर आहे .
हॉटस्टार
हॉटस्टार
आणि सुपर ३० च्या उपर आहे हा.. तुलना नको.
मला दोन्हीही आवडले , आपापल्या
मला दोन्हीही आवडले , आपापल्या जागी दोन्ही सिनेमे उत्तम आहेत , तुलना करणे चूकच ....
सुपर ३० शेवटाकडे जाता जाता ना
सुपर ३० शेवटाकडे जाता जाता ना इथला ना तिथला झाला आहे. जेव्हा तुम्ही अश्या चित्रपटात हृतिक घेता तेव्हा असा गोंधळ उडायची शक्यता असतेच. अर्थात पिक्चर छान आहे. मला आवडला होता. त्याला कमी लेखत नाहीये.
पण १२ वी नापासची तुलना त्याच्यासोबत नको. कारण हा फारच उत्तम आणि वरच्या दर्जाचा चित्रपट आहे.
वरची यादी आणि मेघना आणि
वरची यादी आणि मेघना आणि श्रवूची भर भारी आहे.
12th Fail सुरेख जमलाय. खूप आवडला.
विक्रांत मेस्सी ह्रितिक एवढा ग्लॅमरस नाही म्हणून त्याला टॅन करून जे तांबडं केलं आहे ते फार खटकत नाही. ह्रतिक साक्षात रोमन देवता आहे, त्याला सर्वसाधारण दाखवणं अशक्य आहे. सुपर ३० आवडला होता. बघताना तुलना केली गेली नाही.
त्याचं शरीरही किरकोळ आहे, त्यामुळे तो गिरणीत काम करताना ज्या हालचाली करतो त्या एकदम आदर्श वाटल्या आहेत. पांढरपेशे एवढे चपळ नसतात, हालचालीत चिवटपणा नसतो. आपल्याला त्यांच्या सारखं तासनतास उकिडवं बसता येत नाही, आपण मागच्या मागे पडतो. ते फार काटक असतात... ते त्याने फारच छान दाखवले आहे. पटकन भोरगं टाकून कुठंही अंग टाकतात. त्याने बाबा आल्यावर कसं झटकले तसं, मैत्रिणीलाही किती प्रेमाने स्टूल स्वच्छ करून दिला.
मला त्या दोघांचे प्रेम फारच आवडले, त्या वयात जसं उच्छृंखल प्रेम असतं, त्याचा लवलेशही नव्हता. अतिशय पोक्त आणि समजदार नातं होतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही त्याने जी जिद्द, चिकाटी आणि तत्त्वनिष्ठता दाखवली त्यानं भरूनच आलं. त्याच्या मित्रांनी दिलेला सपोर्टही कौतुकास्पद, 'आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही' म्हणतो. हे कळणं किती प्रगल्भ आहे.
आज्जी, बाबा, आई, शिक्षक, मित्र सगळेच आवडले. आज्जी 'बा बहू और बेबी' मधली बा - सरिता जोशी आहे, आता थकल्यासारखी दिसते. 'टूरिझम' ऐवजी चुकून 'टेररिझम'वर निबंध लिहितो तेव्हा आपलाच जीव तळमळतो. त्यामुळे त्याला जेव्हा यश मिळतं आपल्यालाच सुटल्यासारखं होतं. तो ताण, तगमग आणि समर्पण अतिशय खरं वाटलं आहे. एरवी निबर होत गेल्याने अशा गोष्टी कथेतच असाव्यात अशी आपली अपेक्षा असते पण हे खरं असल्याने ते सकारात्मक झालं आहे.
इथं रेको देणाऱ्या सर्वांना धन्यवाद, ते वाचूनच बघितला.
आपण मागच्या मागे पडतो >>>
आपण मागच्या मागे पडतो >>>
बघायचा आहे. इथे डिस्ने वर आहे का? हॉटस्टार आता स्वतंत्र सर्विस नाही ना?
आयपीटीव्ही फा , नक्की बघो.
आयपीटीव्ही फा , नक्की बघो.
आता चेक केलं. विधू विनोद
आता चेक केलं. विधू विनोद चोप्राने डायरेक्ट केलाय .
बघितला पाहिजे.
नक्की बघा आचार्य आणि त्यावर
नक्की बघा आचार्य आणि त्यावर लिहाही, वाचायला आवडेल.
उथळ, सवंग आणि अतिरंजित सिनेमांच्या लाटेत एखाद्या मृद्गंधासारखा वाटला. व्यावसायिक सिनेमापेक्षा समांतर सिनेमाची आठवण करून देतो.
बघा ! बघा!!!!
बघा ! बघा!!!!
नक्की सगळ्यांनी बघा.
आपण स्वतः upsc पस करण्याचा प्रयत्न करत असल्याचा फील येईल . सिनेमात दाखवलेला इंग्लिश चा भयगंड बऱ्याच जणांना असतो त्यामुळे हिंदी मीडियम चा स्टुडंट् upsc पास करील की नाही हे पाहणे खूप उत्कंठावर्धक ठरते .
उथळ, सवंग आणि अतिरंजित
उथळ, सवंग आणि अतिरंजित सिनेमांच्या लाटेत >>> खरंय. पूर्वी ज्या सिनेमांना आपण हसायचो, ते आता नॉर्मल आणि "मानवी" वाटतात.
>>>>>ह्रतिक साक्षात रोमन
>>>>>ह्रतिक साक्षात रोमन देवता आहे
मला हृतिकचं लांबलचक पिनाकिओ सारखं नाक अज्जिबात आवडत नाही. त्या शिल्पा शेट्टीचे नाकही फेंदारलेले वाटते. तेव्हा माझ्याच डोळ्यात काहीतरी दोष असावा
Migration पाहिला. निवांत संथ,
Migration पाहिला. निवांत संथ, सेफ आयुष्य असताना jamaica च्या adventure ट्रिप ला गेलेल्या डक फॅमिली ची ऍनिमेटेड गोष्ट. छान आहे पण फारच लहान आहे मूवी कसा बसा दीड तास, एकदम उरकल्या सारखा वाटला अजून छान करता आला असता. ऐनवेळी जायचं ठरल्या मुळे तिथं असलेल्या dunki, animal आणि migration अशा तिनं option पैकी सेफ option निवडला
12 फेल बद्दल सगळ्यांना
12 फेल बद्दल सगळ्यांना अनुमोदन
खुप वर्षांनी इतका खिळवून ठेवणारा चित्रपट पाहिला
विक्रांत मेसी चा अभिनय तर लाजबाब सोबत तो त्याचा शिक्षक कम सिनियर घेतलाय तोही फार मस्त
लव्ह स्टोरी पण अगदी खास च
तो घरी जातो तिच्या तेव्हा झालं सगळं संपलं असा फील येतो बिचारा आयुष्यात एक आशेचा किरण मिळवू पाहण्यासाठी धडपड करत असतो तेही दैव असं हिरावून घेत ते बघताना काळजात तुटलं माझ्या
शेवट पण अगदी सही, ती त्याचा हेअर कट अगदी लक्ष देऊन करवून घेते ते बघून तर अगदी बाया बापड्या कसं कानशिलावर बोटं मोडून दृष्ट न लागो लेकराला म्हणतात तसं यांच्या प्रेमाला कुणाची दृष्ट न लागो अस म्हणावं वाटलं
मलाही सिनेमा बघण्यापूर्वी काहीही माहिती नव्हतं, रिव्ह्यू पण मुद्दाम वाचले नव्हते, त्यामुळे ही खरी स्टोरी आहे हे कळल्यावर तर अगदि ऑ झालं, म्हणजे अक्षरशः सिनेमात शोभावी अशी रियल स्टोरी
कसलं सही यार
फार सुंदर
12th fail बद्दलची चर्चा आवडली
12th fail बद्दलची चर्चा आवडली. मला आणखी एक आवडलेला प्रसंग म्हणजे मनोज तिच्या घरी जातो तेव्हाचा फोन कॉल. घरातला मदतनीसही त्याला किंवा त्याच्या अवताराला पाहून हाडतुड करत नाही. त्याला तिला काहीतरी सांगायचं आहे पण मदतनीस समोर असताना सांगता येत नाही तेव्हा तो स्वतः समजूतदारपणे मी पाणी आणतो म्हणून आत जातो आणि मनोजला थोडीशी प्रायव्हसी देतो. हा प्रसंग मला खूप छान वाटला.
मी हा सिनेमा youtube वर पहिला, चांगली प्रत उपलब्ध आहे.
हॉटस्टार>> अच्छा. धन्यवाद.
हॉटस्टार>> अच्छा. धन्यवाद. बघायलाच हवा आज-उद्या.
हुलु वर पण आहे
हुलु वर पण आहे
इथली चर्चा वाचून १२वी फेल
इथली चर्चा वाचून १२वी फेल पाहिला. अतिशय सुंदर !!! इथल्या चर्चेतील सगळ्या प्रतिसादांना +१. नवीन वर्षाची सुरुवात एका चांगल्या चित्रपटाने झाली .
12th fail पाहिला.. आजच्या
12th fail पाहिला.. आजच्या काळातला जबरदस्त प्रभावी चित्रपट..!
अजूनही आपण कोणत्या काळात राहतो , देशात आजच्या काळातही घडणाऱ्या काही गोष्टी चित्रपटात पाहताना त्या घटना आपल्याला हादरवून सोडतात. बारावीच्या बोर्डाच्या परिक्षेत सगळ्या विद्यार्थ्यांना बिनधास्त कॉपी करताना पाहून आणि त्यासाठी कॉलेज प्रशासनाची पूर्णतः फूस असणे.. म्हणजे देशात शिक्षणाची किती भीषण आणि दुर्दैवी परिस्थिती आहे .. ते लक्षात येते.
एखादा प्रामाणिक सरकारी अधिकारी आपलं कामं आपल्या उपजत सदसद्विवेकबुद्धीने करू लागला तर त्याची बदली अटळ असते हे आपल्या देशात वास्तवात घडतेच .. ते चित्रपटात आहेच.. चित्रपटातल्या नायकाला ' जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर अजिबात चिटींग करायचं नाही ' असे प्रेरणादायी विचार देणारा पोलिस अधिकारी आवडला.
आपल्या पेन्शनचे पैसे जमवून , विनाकारण खर्च न करता.. नातवाने सरकारी अधिकारी बनावं म्हणून पै न् पै गाठीला राखणाऱ्या त्या प्रेरणादायी आजीला दंडवत..! तेच पैसे बसमध्ये चोरणाऱ्या स्त्रीला शोधून रस्त्याच्या मधोमध उभी करून चपलेने बडवावे इतका टोकाचा विचार चित्रपट पाहताना मनात येतो..
नायकाला ग्वाल्हेर वरून दिल्लीला घेऊन येणाऱ्या स्टेशनवर भेटलेल्या त्याच्या मित्राला सलाम. प्रवासात भेटलेल्या एखाद्या अनोळखी मुलाला आपल्यासोबत घेऊन त्याला मदत करणं म्हणजे एखाद्या संकटालाही आपण निमंत्रण देतोयं असा विचार मनात न येऊ देता सहकार्य करणारा .. संघर्षाच्या काळात मनोबल वाढवणारा असा एखादाच मित्र भेटतो..!
आयुष्यात, रोजच्या जीवनात, सरकारी कार्यालयात नायकाला जीवघेणे अनुभव येतात.. त्यातून आलेल्या जाणीवेतून त्याच्या मनात जिद्द निर्माण होते की, आपण एक प्रामाणिक सनदी अधिकारी बनायला हवे.. पण ते तेवढं सोपं नक्कीच नाही..
वेळप्रसंगी टॉयलेट साफ करत , चहा विकत, पिठाची गिरणी चालवत चिकाटी न सोडता.. संघर्षाची लढाई लढत यश मिळवणं म्हणजे खायची गोष्ट नक्कीच नाही.
चित्रपट प्रेरणादायी आहे.. नक्कीच.!!
मागे लोकसत्तामध्ये एक लेख आला होता.. upsc परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघर्षाच्या अनेक कहाण्या तेव्हा त्या लेखात वाचल्या होत्या.. महाराष्ट्रातून दिल्लीला जाणाऱ्या अनेक विद्यार्थीनींनी आपला संघर्ष त्या लेखातून मांडला होता. त्यांना कोणत्या- कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते ते वाचून धक्का बसला होता.
देशभरातून, खेडयातून अनेक विद्यार्थी upsc ची तयारी करण्यासाठी दिल्लीपर्यत पोहचतात.. प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्न असतं.. लाखो विद्यार्थ्यांतून शंभर-दिडशे विद्यार्थी यश संपादन करतात.. ज्यांना फी परवडते असे काही विद्यार्थी खाजगी शिकवणीचा आधार घेतात.. सगळ्यांनाच ते शक्य नसते.
खाजगी क्लासेसच्या लबाडीच्या कहाण्या, विद्यार्थ्यांच्या संघर्षाच्या कहाण्या आपल्याला चित्रपट पाहताना अवाक् करतात..
एखादा गरीब विद्यार्थीही चिकाटीने, जिद्दीने, शक्य होतील तेवढे प्रयत्न करून सनदी अधिकारी बनू शकतो.. हे प्रभावीपणे, ताकदीने विधू विनोद चोप्रांनी चित्रपटात मांडले आहे.
विक्रांत मेस्सी अभिनयाच्या बाबतीत 'लंबी रेस का घोडा' आहे हे अजिबात अतिशयोक्तीचे म्हणणे ठरणार नाही. चित्रपटातली भूमिका तो खरोखर जगलाय्.. त्याने त्याची भूमिका जिवंत केलीयं.. मुळात चित्रपटाचा दिग्दर्शकच एवढ्या ताकदीचा आहे की, नायकाकडून त्याने जो अभिनय करवून घेतलायं त्याला तोड नाही..दोघांचेही खूप अभिनंदन..!
चित्रपट पाहताना आपण भारावून जातो हे नक्की.. हे त्या चित्रपटाचे यश आहे.
थोडे अवांतर- ( जराशी गंमत) - चित्रपट पाहत होते तर लेक मध्येच आला.. म्हणाला, कोणता चित्रपट आहे .. मी म्हटलं, 12th fail.. तो म्हणाला माहितेयं मला नाव ... मग तोही मोठ्या उत्सुकतेने पाहू लागला.. म्हणाले.. जा अभ्यास कर ... परीक्षा आहे पुढच्या आठवड्यात .. तर मला म्हणतो कसा.. प्लीज बघू दे.. मला पण..., हा पिश्चर बघून तरी खूप अभ्यास करायला पाहिजे असं वाटेल मला ... रोज अभ्यास कर म्हणून घसा दुखेपर्यंत ओरडायला लागते ह्याच्या मागे...
__आणि हा चित्रपट पाहून तरी अभ्यास करेन , असं चिरंजीव म्हणाले... अन् चित्रपट पाहून तरी त्याला अभ्यास करावासा वाटतो .. हे ऐकून डोळ्यांत अश्रू उभे ठाकले ना माझ्या..!!
हे सुद्धा 12th fail चित्रपटाचे यशच म्हणायला लागेल मला... !
अस्मिता, बारावी नापास बद्दलचे
अस्मिता, बारावी नापास बद्दलचे सर्व प्रतिसाद खूप आवडले..
पाटील मॅडम ,
पाटील मॅडम ,
12 th fail बद्दल
खूपच डिटेल्स मध्ये लिहिले आहे हो !
सिनेमा सर्वोत्कृष्ट आहे यात वादच नाही .
पण इतकी माहिती असल्यावर पाहणाऱ्यांचा आनंद कमी होऊ शकतो ......
फुरोगामी सर,
फुरोगामी सर,
इतना टेंशन मत लेना सरजी.. पिश्चर जिसको देखना है वो देखेगाच कुछ भी लिखा तो भी..!
चार- पाच ओळी जास्त खरडल्याचे वाचून कुणाला चित्रपट पाहायला उत्सकता नसेल हे काही पटलं नाही बुवा..! चित्रपट बघणारे बघतीलच ..!
मी काही पूर्ण कथा लिहिली नाही.. खरी कथा संघर्षाची आहे म्हटलं म्हणजे शेवट गोड होणारच नाही का..?
१२ वी फेल वर वेगळा धागा चालला
१२ वी फेल वर वेगळा धागा चालला असता खरतर एरवी फडतुस मुव्हिजचे २-३ धागे विणत बसतात लोक.
Pages