भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
(No subject)
पुण्यात पुस्तक महोत्सवात
पुण्यात पुस्तक महोत्सवात खाद्यपदार्थांचेही स्टॉल्स आहेत तिथला फोटो. मला आधी एक मिनिटभर अर्थच लागला नाही
(No subject)
भारी अमृत !
भारी अमृत !
हल्ली च्या पिढीला.
हल्ली च्या पिढीला.
ऋ,क्ष,ज्ञ , ण, ष, ढ, ट, ही अशी अक्षरे कुठे वापरायची हे माहीत नाही
चाट gpt , आणि गूगल translate हे तर भाषे चे सर्वात मोठे मारेकरी आहेत
>>>चाट gpt , आणि गूगल
>>>चाट gpt , आणि गूगल translate हे तर भाषे चे सर्वात मोठे मारेकरी आहेत<<< गुगल ट्रान्सलेट साठी तुम्ही जरूर मदत करू शकता.
"Go to Google Translate.
"Go to Google Translate.
Sign in with your Google account.
At the bottom, click Contribute .
Follow the steps to complete sign up."
दिव्य चक्र विव्य
दिव्य चक्रविव्य
आणि “अंबानी” नसून “अंबानींना” आहे ते एक आहेच
चक्रव्ह्यू असं वाचायला
चक्रव्ह्यू असं वाचायला मिळण्याची शक्यता खूप असूनही विव्य ने बाजी मारली.
:फिदीफिदी:
मायबोलीवरच हिंदी शब्द वापरत
मायबोलीवरच हिंदी शब्द वापरत गोष्टी, लेख लिहिणारी लोकं आहेतच की. त्या एक नवीन लेखिका बाईंच्या गोष्टीत ‘घुरत’ (होता) असा वापर झाला होताच की. ऋन्मेषही वापरत असतो. शाप हा मराठी शब्द अस्तित्वात असताना ‘श्राप’ वगैरे रेटून लिहायचं. वाचणार्यांनाही हे मराठी शब्द आहेत असं कालांतराने वाटायला लागतंच.
"घुरत होता" हे विदर्भी मराठी.
"घुरत होता" हे विदर्भी मराठी.
विदर्भात थोडं हिंदीचं
विदर्भात थोडं हिंदीचं प्रभ्त्व असल्यामुळे तो मराठी शब्दच झाला असू शकेल पण मुळचा हिंदीच.
हो.
हो.
चक्रविव्य >>
चक्रविव्य >>
ह्या वृत्तपत्रांचे मराठी हे हिंदी-मराठी वादाच्या पलीकडचे आहे.
खरंय, सगळंच दिव्य आहे !
खरंय, सगळंच दिव्य आहे !
पायरी 5: मासे तळणे
पायरी 5: मासे तळणे
कढईत भाजी किंवा खोबरेल तेल गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर -(परंतु धुम्रपान न करता), हलक्या हाताने लेपित माशांचे तुकडे ठेवा. प्रत्येक बाजू तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर तळा.
धुम्रपान >>> भारीच !
धुम्रपान >>> भारीच !
(No subject)
नक्की कसली ऑफर आहे?
नक्की कसली ऑफर आहे?
कडक मिठी
कडक मिठी
हे जर हिंदी मधून टेक्स्ट जसेच्या तसे उचलले असेल तर तो हिंदीवाला पण चुकलाय - “मीठी” चाय हवे “मिठी” नाहीच
+१ भारीच !
+१
भारीच ! एकदम कडकडून....
:हहपुवा:
कुमार गिरीश ची उपमा असेल.
कुमार गिरीश ची उपमा असेल.
कडक मिठी
डब्बा मिठी
(No subject)
तोंडाला गोडाची मिठी बसते तशी
तोंडाला गोडाची मिठी बसते तशी तोंडाला मिठी बसत असेल या चहाने
मिठी किल्ली >>
मिठी
किल्ली >>
(No subject)
दोन दोन आश्चर्ये......
दोन दोन आश्चर्ये......
१. " त्याला" गर्भाशय आहे आणि
२. त्या गर्भाशयाला मणका आहे !!
काय म्हणायचं आता.......
हा बातमीच्या गर्भाशयाला
हा बातमीच्या गर्भाशयाला (गर्भित आशयाला) चांगलाच
मदणका बसलेला दिसतो आहे.Pages